STORYMIRROR

Kiran Chavan

Children

3  

Kiran Chavan

Children

आई बाबा मला शाळेत जाऊ दया

आई बाबा मला शाळेत जाऊ दया

1 min
318

      आई बाबा मला शाळेत जाऊ दया ,

     माझ्या डोळ्यांनी मला जग पाहू दया ,

       उगीचच घरी मला नाय राहायच , 

    अजून मला खूप शिकायच खुप शिकायच... //

     मदत करीन तुम्हाला झाल्यावर मोठ ,

    माझ्यासहित कमवणं आहे सारच खोट ,

      या वयात मला पैसे नाही कमावायच ,

    अजून मला खूप शिकायच खूप शिकायच ...//

    गुरुजी सांगा ओ माझ्या आई बाबां ना ,

     पर्याय राहिला नाही यापुढे शिक्षणाला ,

     किती दिवस आम्ही लाकडे वाहायचे ,

  अजून मला खूप शिकायचे खूप शिकायचे ... // 

   अजून तरी कागदावर आहेत अनेक कायदे,

   कधी समजणार यांना शिक्षणाचे फायदे ,

   ठरवा सर्वांनी मला प्रवाहात आणायच ,

 अजून मला खूप शिकायच खूप शिकायच ...//

  गरीब म्हणून शिक्षणापासून दूर का पळायच ,

  अजून मला खूप शिकायच खूप शिकायच ...//


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children