आभास
आभास
पावसाळी रातीला जशी
काजव्यांची आरास आहे
डोळ्यासमोर नसून तू
असल्याचा भास आहे
बरसशील एक दिवस
मला तुझा विश्वास आहे
जसा चातकाला
पावसाचा ध्यास आहे
पुरे झाली लपाछपी
हा चंद्राचा लपंडाव आहे
कळूनसुद्धा सार काही
न कळल्याचा आव आहे
तुझ्यासाठी झगडणे आता
संघर्षाचाच एक भाग आहे
न्याहाळून बघ त्या चंद्राला
तुझ्याच घावांचे डाग आहे

