छोट्टिशी परी...
छोट्टिशी परी...
1 min
532
तुझ्या टपोऱ्या डोळ्यांत
माझं इवलस गाव
तुझी गगन भरारी
माझी तुझ्यासाठी धाव
किलबिलत्या जगात
गोड तुझी चिवचिव
तुझ्या एका हाकेसाठी
झुरतो गं माझा जीव
जातो दूर दूर गावा
तुझ्या खाऊसाठी धावा
बोल बोबडे लावती
ओढ परतीची जीवा
तुझ्या सोबतीचा क्षण
तासा एवढाला व्हावा
अन् तुझ्याविण माझा वेळ
जसा कापूर जळावा
