शहारा..!
शहारा..!
1 min
178
भिजवून चिंब चिंब
शहारले अंग अंग
रेखीती निसर्ग रंग
ते थेंब पावसाचे
दरवळतो मंद धुंद
मातीचा सुगंध
तो मेघ नादब्रम्ह
हे बंध रेशमाचे
ती पावसाची धार
हि शाल हिरवीगार
धुक्यात ते हरवले
किरण दिनकराचे
जल प्रपात कोसळता
भासे दह्या दुधाचे लोट
नवजीवन देऊन गेले
ते थेंब अमृताचे
