10 years
10 years
दहा वर्ष उलटून गेलीत
घरात सर्वात लहान तीच सून
सारे चाकरमनी पोटासाठी
शहरात गुंतले इथे तिथे
एकटीच तेव्हा सोबत
तोही रूबाबदार देखणा
खूष होती आरशावर
अन् त्याच्याही रूपावर
दोन सोबत पिल्ले आहेत
जपतात दोघे जमेल तसे मायेने
कधीतरी चाकरमनी
येऊन राहातात थाटाने
बावचळतात पिल्ले पाहून
त्यांचा नवा थाट
ती म्हणते आणू हा तसाच
शर्ट नी पॅन्ट आता हे घाला
वेळ मारून नेई हे ही दिस
जाऊ दे धन्याला चांगलं काम मिळू दे
चार पैसे गाठीला बांधून
मुलांना चांगलं मोठ होऊ दे
एक दिवस विपरीत घडलं
अपघातात तो तिथेच पडला
दवाखान्यात नेईपर्यंत
त्या तिथेच दम तोडला
नशिबानेच घात केला
जीवाचा आका
ंत झाला
पण पिल्लाकडे पाहून
सारा गोंधळ शांत झाला
चार बुक शिकली होती
शाळेत अंगणवाडीत
नोकरी ती ही खूप
मिनतवारी करून अखेर मिळवली
आताही कसे बसे चार दाणे
जातात पोटात दिवस चाललेत
म्हणता म्हणता वर्ष आलं
पितृपक्ष दारी आला
मुलं म्हणतात आई गं
बाबांना खीर आवडायची
आज दिवस आहे ना त्यांचा
पाण्याच्या धारा डोळ्यात तिच्या
केळीच्या पानावर ताट
मुलांसोबत बाहेर आली
ये बाबा खा दोन घास
वेळ उगा लावू नकोस
बऱ्याच वेळाने आला
टोच मारली पहिली
खिरीवर तुटून पडला
पहिल्यांदाच हसली जोरात
छोटा म्हणाला आई
बाबाना कावळा का बनवलं
किती सुंदर होते ते
बनवायचं कोणी तर कोकीळ तरी