बरसात
बरसात
बरसत बरसून आल्या धारा
संगे घेऊन अलगद वारा
खिडकी पाशी तसा कुणी तरी
ओंजळीत साठवी प्राण पसारा
तुषार ऊडवी हळूवार दूर ते
वाट पाहते कुणी लांब ते
गालावरती थेंब चिमुकले
पिसाट होई चिंब कूणी तसे ते
हळूवार पावली संध्या येई
अलगद झेलून या जललहरी
पांघरून चंद्रकळा तारका
भरजरी चांदण्यांची नक्षी गोजीरी
असाच सरींचा खेळ चालला
तिन्हीसांजेचा रंग आगळा
वरवर फिरती नभीचे मेघ ते
प्रेमी युगुलांचा प्राण पसारा

