STORYMIRROR

Sandhya Ganesh Bhagat

Inspirational

3  

Sandhya Ganesh Bhagat

Inspirational

मी आणि झाशीची राणी

मी आणि झाशीची राणी

8 mins
160

 साहित्य वाचल्याने, ऐकल्याने किंवा पाहिल्याने मानवी अंत:करणातील भावना उद्दीपित होतात व रसानिर्मिती होते.


मानवी मनात काही भावना कायमच्या वास करीत असतात उदा. प्रेम करण्याची, रागावण्याची, हसण्याची, दु:खाची, पराक्रमांची इ. या मनातील ‘स्थिर’ व ‘शाश्वत’ भावनांनाच काव्यशास्त्रात ‘स्थायीभाव’ असे म्हणतात.


साहित्य कृतीच्या वाचनाने ‘स्थायी भाव’ जागृत होतात व रसनिर्मिती होते. हेच ' नवरस ' आपल्या कथेतून नवरात्री डायरी मध्ये मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.


दिवस ९: गुलाबी - गुलाबी शुद्धता आणि स्त्रीत्व दर्शवते. 


साहित्यातील नवरस पैकी एक रस, रसिकानो तुमच्यासाठी...अद्भुत रस


मी शामल.... आज माझी वेळ सरली होती. सगळ्यांनी अतिशय सुंदर पाठवणी केली पुन्हा एकदा... अर्थात ... एकदा लग्नाच्या वेळी... आणि आता मयताच्या वेळी.


सगळेच जिव्हाळ्याचे अगदी धाय मोकलून रडत होते. पण पहिल्यासारखी रडणाऱ्यांची संख्या मात्र दिवसेंदिवस कमी होत होती. पण सासरी आणि माहेरी दोन्ही कडे जॉईन फॅमिली असल्याने मला मात्र हे सुख पुरेपूर मिळालं.


आणि गेस व्हॉट... माझ्या प्रारब्धाने म्हणा किंवा पूर्व पुण्याईने आणि थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने स्वर्ग मात्र लाभला.


जरा सातव्या आसमंतात होते मी... माझ्यासाठी तर आज ही आनंदाची पर्वणी होती. माझ्या वर सगळ्यांचं असलेल्या प्रेमाच्या शब्दांनी तेव्हाही अगदी भरून येत होत.


ज्या आईने इतक्या कडक शिस्तीने वाढवलं. ज्या सासूबाईंनी अगदी धाकात ठेवलं त्या दोघीही मुक्तमुखाने शब्द सुमने उधळत होत्या. खरंच.. त्यांच्या मनात ही माझ्या विषयी किती प्रेम...!आपुलकी आहे हे आज समजल मला...! म्हणतात ना... मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तेच खर...!


स्वर्गात स्री सुलभ स्वभावाप्रमाणे... अर्थातच सुख शोधण्यापेक्षा कुणी बायका ज्या माझ्यासोबत गप्पा मारू शकतील,अशा बायकांना शोधण्यात रस वाढला... आणि बस... माझी ओळख झाली एका बावीस- तेवीस वर्षाच्या मुलीसोबत... अर्थात इतकी तरुण असून ही छान नव्वार नेसलेली... दागिने वगेरे... अगदी मोठ्या घरातून आलेली दिसत होती.


" हाय... " 


" हो... बोला ताईसाहेब..." थोडासा घोगरा... दमदार...पणं स्पष्ट असा... पुरुषी आवाजाच्या तर मी प्रेमातच पडले.


" तू ...?" 


" आम्ही लक्ष्मी बाई..." 


" आम्ही... वाह... " मी मुद्दामच तिची खिल्ली उडवत फिरकी घ्यायचं ठरवलं." कुठे फॅन्सी ड्रेस कंपेटिशन ला गेली होतीस की काय...!"


" हा आमचा... म्हणजे आमचा पेहराव आहे. रोज असेच वस्त्र वापरतो आम्ही." ती स्त्री.


" लक्ष्मी... जस्ट आताच आले... यमसदनी... मी शामल... तू खूपच तरुण आहेस, तू कधी आलीस. " 


" अठराशे अठ्ठवन मध्ये..."


" व्हॉट...? गम्मत करतेय की काय..." 


" हे बघा ताईसाहेब... मला इंग्रजी शब्दांचा खूप राग येतो... गोऱ्यानी खूप बिघडवून ठेवलय सगळ्या भारतीयांना... तुम्ही स्वदेशी भाषेतच बोला, नाहीतर मला जरा ही स्वारस्य नाही तुमच्या सोबत बोलण्यात..." लक्ष्मी थोडी नाराजीचा स्वरात म्हणाली.


" गोर्यानी म्हणजे... ब्रिटिश...?" शामल आश्चर्याने म्हणाली.


" हो... त्यांनी माझ्याकडून माझी झाशी घेतली. माझा दामोदर चा हक्क हिरावून घेतला. मी त्यांना मरणोत्तर माफ नाही करू शकत..." लक्ष्मी बाई म्हणाल्या.


" झाशी... म्हणजे ... तू... म्हणजे तुम्ही झाशीची राणी ... म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई... ?" शामलने विचारलं.


" हो..." लक्ष्मी बाई उत्तरली.


" सकाळपासून कुणी भेटल नाही का तुला..." शामल ला तीच बोलणं मस्करी वाटत होतं.


" काय..." ती हसतच प्रश्नार्थक नजरेने शामल कडे हसत बघू लागली.


" अग म्हणजे मामा बनवायला मीच सापडली का..!इथे आजच आली याचा अर्थ असा नाही की की कुणीही मला उल्लू बनवेल." शामल तोर्यातच म्हणाली.


" अग... नाही शामल... आम्ही कधीच खोटं बोलत नाही, बाबांचे संस्कार आम्ही कधीच विसरू शकत नाही...ते नेहमी म्हणायचे... मनु एकवेळ अन्न नसेल तरीही चालेल पण खोटं बोलायचं नाही. वागायचं नाही,आणि सहन तर मुळीच करायचं नाही."


" म्हणजे तू... तुम्ही खरोखर..." एक मोठा पॉज घेत..." मी काही प्रश्न विचारीन, ती उत्तर दिली तरच मला विश्वास बसेल की खरोखर तूच झाशीची राणी लक्ष्मीबाई आहेस. " 


" ठीक आहे..." 


" बर मला सांग... आय मीन सांगा..!" ही खरोखर झाशीची राणी लक्ष्मीबाई असेल तर माझ्याकडून चुकून ही अपशब्द नको ... त्यामुळे अहो जहो करून बोललेल योग्य राहील... शामल मनातच म्हणाली.


ती शामल कडे पाहत मिश्किल हसत होती... कदाचित शामल च्या मनातील द्वंद्व तिने ओळखलं होत.


" तुझ पूर्ण नाव..." 


" लक्ष्मीबाई गंगाधरपंत नेवाळकर...." 


" लग्न आधीचे..." 


" मनिकर्णिका मोरोपंत तांबे..." 


" जन्म... ?"


" वाराणसी..." 


अशाप्रकारे प्रश्नांची सरबत्ती शामल ने लक्ष्मी बाई मागे लावली... आणि त्याची त्यांनी अचूक उत्तर दिले.


शामल मनात तिच्या नवऱ्याला धन्यवाद देत होती की बर झालं विष्णुपंत गोडसेंची झाशी च्या राणीच्या जीवन चरित्रावर आधारित पुस्तक तिचा प्रवास त्याने दोन वर्षांपूर्वीच्या वाढदिवशी गिफ्ट दिलेलं.


तिच्या अप्त्याबाबत च्या प्रश्र्नाबद्दल मात्र खूपच भावूक झाली होती. एक राणी असून ही खूप हळव्या मनाची होती की चार महिन्यांचा तीच बाळ दगावल होत, त्यानंतर कालांतराने गंगाधर पंतचा मृत्यू झाल्याने तिने नातलग पैकीच एक मुल दत्तक घेऊन त्याला जीवापाड जपल, अगदी लढाईच्या प्रत्येक क्षणी त्यासोबत होती आणि जाताना ही बाळाची सोय करून गेली, तेव्हा मात्र शामल चा विश्वास बसला, कारणं मुलांबाबत शामल तेव्हढीच हळवी होती.


त्या दोघींमध्ये अगदी घट्ट मैत्री झाली. शामल ने मैत्रीण असून ही तिची मर्यादा कधीही ओलांडली नाही. ती खूप आदर करत राणी लक्ष्मीबाई यांचा... स्वर्गातील नियम मोडून त्या जेव्हा जेव्हा संधी मिळे तेव्हा तेव्हा लपून छपून पृथ्वीवर फिरायला जात. अर्थात पृथ्वीवरील लोकांना त्यांच्या इच्छेविरद्ध त्या कुणाला दिसू शकत नव्हत्या.


एकदा असच त्या एक घरातून आवाज आला.

"आई, तू उद्या परवा इथे पोहोचायला पाहिजे." मला परवा पहाटे ऑपरेशन साठी हॉस्पिटल मध्ये दाखल केले जाईल. " 


फोनवर अनन्याच्या तोंडून हे शब्द ऐकताच आईचे हात व पाय फुगले. हृदयाची धडधड वाढली. 

त्या दोघीही कान देऊन ऐकू लागल्या.


"काय आहे अनन्या..? आपल्याकडे अजून सतरा अठरा दिवस आहेत... मग अचानक काय एवढी समस्या आली की ताबडतोब ऑपरेशनची एमेर्जेन्सी आली.... सगळ काही ठीक आहे ना...?" आई घाबरून म्हणाली.


'आई...सर्व काही ठीक आहे पण... ऑफिसमध्ये एक अतिशय महत्वाचा प्रोजेक्ट आला आहे. जो मला कोणत्याही किंमतीत करायचा आहे. जर मी डिलिव्हरीच्या तारखेपर्यंत राहिले. तर मी वेळेवर ऑफिसमध्ये सामील होऊ शकणार नाही आणि तो प्रोजेक्ट माझ्या हातातून जाईल आणि हा प्रोजेक्ट माझ्या करीयरसाठी खूप महत्वाचा आहे. " अनान्याच उत्तर आले.


"काय?" वैशालीजी अस्वस्थ झाले. " तू एका शुल्लक प्रोजेक्टसाठी आपल्या मुलाच्या जीवनासोबत खेळते आहे अस नाही वाटत का तुला...? अग अनु, तू वेडी झाली आहेस? "


"अरे आई! इतके टेंशन नका घेऊ मी डॉक्टरांशी बोललो आहे.... मूल पूर्णपणे विकसित झाले आहे... कोणताही धोका नाही... आणि आवश्यक असल्यास आपण ते 2-4 दिवस इनक्यूबेटरमध्ये ठेवावे लागेल. " अनन्या म्हणाली.


"अग बाई, तू आई आहेस की कसाई आहेस..? आईच्या उदरातून निर्दोष मुलाचा नैसर्गिक हक्क हिरावून घे त आहेस तू... खूप चुकीचं करतिये... ” वैशाली रागाने म्हणाली.


"आई काय करू?" मीही असहाय आहे. जर मी हे न केल्यास माझे करिअर चे पाच वर्षे मागे जाईल. तुम्हाला माहित आहे की मी किती कठोर अभ्यास केला आहे आणि करियर बनविण्यासाठी मी किती धडपड केली आहे. आता आम्हाला आपल्या कष्टाचे फळ घेण्याची संधी मिळाली आहे. तू फक्त वेळेवर या. "


अनन्याने आईचे उत्तर न ऐकता फोन ठेवला.

वैशाली अस्वस्थ झाली. " कशी आहे ही आई...? फेम आणि करीयरमुळे ती तिच्या गर्भात लहान आयुष्यासह खेळत आहे... मुलाला अकाली जन्मासाठी भाग पाडले गेले होते हे त्याचे मन कोणत्याही प्रकारे स्वीकारू शकले नाही, मातृत्व ही एक सुखद भावना आहे.


प्रत्येक क्षणी... आपल्या मुलाच्या पोटात वाढ होत आहे असे वाटण्यासाठी... त्याच्या हालचाली मुळे मन आनंदित होत... आणि ही मुलगी? या आनंदापासून वंचित राहते.


वैशालीला म्हणजे अनान्याच्या आईला त्या जन्मलेल्या बाळाबद्दल काळजी वाटू लागली. आणि मन करुणाने भरले. जेव्हा वैशालीचे मन खूप अस्वस्थ झाले. तेव्हा ती बाहेर गेली आणि आपल्या पतीबरोबर बसली. ते पेपर वाचत होते. 


कागदाकडे पाहत त्याने विचारले. "काय झाले... फोनवर कोण शब्द सुमने फेकत होते.?"


"तुमची मुलगी." वैशाली मोठ्या आवाजात बोलली.


"का? काय झालं?" मागच्या कागदावर पतीची नजर स्थिर होती. मग वैशालीनी अनन्या ने सांगितलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. हे ऐकून शेखरनाही धक्का बसला. कागद बाजूला ठेवून टेंशन मधे आले.


या विषयावर थोड्या वेळासाठी बोलल्यानंतर शेखर म्हणाले, "जे काही झाले... जे झाले ते घडले... आता महत्त्वाची बाब वैशाली ही आहे की वेळेवर बंगळुरू कसे पोहोचेल. भोपाळ ते बेंगळुरू येथे थेट विमानही नाही. प्रथम भोपाळ येथून मुंबईला जावे लागेल आणि नंतर मुंबईहून बंगळुरूला जावे लागेल. ” असे सांगून शेखरनी ऑनलाईन तिकिटांचे बुकिंग सुरू केले.


" बापरे कसली विचित्र मुलगी आहे ही... करीयर च्या मागे धावत आपल मातृत्व सुद्धा जगत नाहीये." 


" खूपच बिघडल्यात आजकालच्या मुली... मुल बाळ नव्हत म्हणून झाशी गमवावी लागली आणि इथे अगदी परमेश्वराने भरभरून दिले तर त्याची जराही मोल नाही. कमाल आहे... आमच्या वेळी आम्हीही बंड करायचो पण योग्य असेल तरच... पण आईवडिलांना कधी ही दुखावलं नाही." 


" हो... तरीच इतिहासात स्वर्णा अक्षरांनी तुमचं नाव लिहिलं जात..." शामल आदराने म्हणाली.


" चल आता .. आपल्याला शोधत असतील आपल्या महाली आणि मला मनु म्हण... अगदी माहेरची मैत्रीण वाटतेस तू मला." राणी लक्ष्मीबाई.


" हो... पण अगदी लहान वयात तुमचं नाव आदराने कोरले ह्या मनावर ... ते एका एकी कस ढलेल ना. पण मी प्रयत्न करेन. मला ही तुम्हाला मनु म्हणायला आवडेल. " शामल म्हणाली.


त्या दोघी ही पुन्हा महाली परतल्या.त्यांचा हा रोजचा दिनक्रम च झाला. एक दिवस पाळणाघराच्या बाजूने जात असताना मुलांचा रडण्याचा आवाज आला. दोघीही खूप व्याकुळ झाल्या. त्या घाईने बघायला गेल्या. तेथील काही बायका मुलांना विनाकारण मारत होत्या. आणि मुलांच्या आयानी दिलेलं जेवण स्वतचं फस्त करत होत्या.


एकूण परिस्थिती शामल च्या ध्यानात आली.

" शामल काय आहे हे सगळ..." राणी लक्ष्मीबाईनि विचारल.


" खूप साऱ्या बायका मुलांना पाळणाघरात ठेवून जॉब ला जातात, म्हणजे नोकरी करतात. " शामल संकोचून उत्तरली.


" हे चुकीचं आहे... मुळात नोकरी करणं म्हणजे गुलामी करणं, त्यासाठी इतका सासुरवास इतक्या लहान बाळांना कशासाठी... त्यांच्यावर काय संस्कार होतील." राणी लक्ष्मीबाई चिडून म्हणाल्या. 


शामल ला चालू असणार प्रकार बघून खूप राग आला... 

ह्या दोघींनी त्यांची गम्मत करायची ठरवली.

ह्या बायकांनी कुणी मुलांना मारलं की त्या दोघी त्या बायकांना चपराक... गुद्दे ठेवाच्या.. त्या बायका इकडे तिकडे बघू लागल्या. त्यांना तिथे भुताटकी आहे अस वाटल... पण मुलांना पाणी ... दूध जेवण दिलं की त्यांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवायचा. त्या बायकांच्या हे लक्षात आले की आपण मुलांना त्रास दिलं की आपल्याला त्रास होतो. तेव्हापासून त्यांनी मुलांना मारण छळण बंद केलं.


नंतर शामल ने राणी लक्ष्मीबाई यांना समुद्र किनारे... गड किल्ले फिरून आणलं. आज ही लोकांनी इतिहासाची साक्ष देणारी वास्तू किती आपुलकीने जपली हे बघून राणी लक्ष्मीबाई यांना खूप आनंद झाला. प्रगतशील सैनिकी प्रशिक्षण केंद्र... हत्यार... वाहन... बघून राणीसाहेब ना मोह आवरेना. ही सगळी हत्यार तेव्हा असती तर ब्रिटिश तेव्हाच भारत सोडून निघून गेले असते. हा विचार देखील मनात डोकावून गेला.


रेल्वे... विमान वाहतूक... विविध जहाज... वैज्ञानिक संशोधन संस्था... कृषी सस्था... रक्षा संस्था... अगदी सगळच बघून खूप भारी वाटलं आणि हेवा देखील वाटला.


जाता जाता त्यांनी नर्सिंग होम बघितल. मुल कशी जन्म घेतात आज.. हे राणीसाहेब ना बघायचं होतं. मग शामल आधी नर्सिंग होम मध्ये घेऊन गेली. त्यांना खूपच आश्चर्य वाटलं की किती कमी त्रासात मुल जन्माला येत.

" हे तर काहीच नाही मनु... ज्या स्त्रियांना मुल होत नाही त्यासाठी... टेस्ट ट्यूब बेबी... आणि आय वी एफ पणं उपलब्ध आहे. " शामल.


" मला बघायचं... कशी जन्म घेतात बाळ त्यामध्ये..." राणी लक्ष्मीबाईनी हट्ट धरला.


मग ती आय वी एफ सेंटर मध्ये घेऊन गेली.

आणि तेथील डॉक्टरांची चर्चा आणि दाम्पत्य अगदी सुखाने बाहेर पडले बघून त्यांना खूप आनंद झाला आणि मुखातून अचानक बाहेर पडले, ही सुविधा तेव्हा असती तर खालसा नियम नसता आला आणि ना त्यावेळी लढाई झाली असती ना कुणी शहीद झाले असते आणि माझ्या. दामोदर सोबत मला माझ हक्काचं बाळ असतं. " नकळत टीप राणी लक्ष्मीबाई यांच्या डोळ्यातून पडली.

" शामल... आपण सगळच बघितल, पण राज्य कारभार कसा चालतो इथे..." राणी लक्ष्मीबाई.

शामल ने उत्तर टाळायचं म्हणून तिने स्वर्गाची आठवण करून दिली आणि राणी लक्ष्मीबाई यांना घेऊन पुन्हा स्वर्ग महाली परतल्या. 



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational