Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Anuja Dhariya-Sheth

Inspirational

4.0  

Anuja Dhariya-Sheth

Inspirational

यशाचा पाठलाग.....

यशाचा पाठलाग.....

5 mins
191


सकाळी सकाळी अनघा मस्त चहा घेत पेपर वाचत होती...तिला खूप आधीपासून ही सवय होतीच.... आज अगदी पुढच्या पानावर मोठी बातमी छापून आली होती, सुप्रसिद्ध चित्रकार दिनेश कांबळे यांच्या चित्रांचे प्रदर्शन आणि विक्री... सोबतच त्यांचा मोठा फोटो... ते बघून अनघा मात्र भूतकाळात हरवली... एवढासा दिनू केवढा मोठा झाला...


हा दिनू म्हणजे तिच्याकडे घरकाम करायला येणार्या मंदाचा मुलगा.... घरची गरीबी असल्यामुळे मुलाने पण शिक्षण सोडून द्यावं असं तिला वाटायचं... त्यात खाणारी तोंड जास्त... मी आणि माझा धनी आम्ही दोघंच कामावर जातो बाकी सगळे बसून असतात ताई.. कस काय भागवणार? सांगा तुम्हीच... अगं पण त्याला शिकायचे आहे तर शिकु दे की, अनघा म्हणायची... पण मंदा ऐकेल तर कसली...


ती आपली रोज येऊन तेच बोलायची अन अनघा शांतपणे ऐकायची....बोलुन काहीच उपयोग नव्हता हे तिला माहीती होते.. एकदा कामावर येताना त्याला घेऊन आली होती सोबत.. बिचारा तिने ओरडून,दटावुन ठेवले होते आधीच.. आल्यापासून एका जागी बसून होता... अनघाने खाऊ दिला तो पण घेतला नाही... खूपच शांत आणि समंजस वाटला तिला तो... त्याचे डोळे खूप काही बोलत होते जणू..पण परिस्तिथीने हात बांधून ठेवले होते त्याचे...


हळूच तिने मंदाला विचारले, हा एवढा गप्प का आहे?


मंदा वाटच बघत होती, अनघा तिला कधी विचारते काय तें.. तिने लगेच अनघासमोर दिनूला चार बोल सुनावले...


आव ताई, ह्याला मी सातवी पतुर शिकवला.. त्या नगरपालिकच्या शालत होत मनुन जमलं आता पुढ मी कोठून आणू पैका..?? याच्या पाठीवर तिन पोरी हायत, सासू-सासरा.. ह्याला म्हनल आता काहीतरी काम कर अन हातभार लाव पर हा ऐकतच न्हाय..दिवसभर कुठंतरी फिरतो अन रातच्याला भी... आधीच काय दूःख कमी हाय का? त्यात हा अजून तो डोंगर वाढीवतो बघा.. ह्याच्या काळजीनं मया झोप लागत नाय...


काय करतो? कुठं जातो? काय ती सांगत नाय बघा... तुम्ही जरा सांगा त्याले.. उगा आमच्या जीवाला घोर लागून राहतो...याला जरा बी जाणीव नाही बघा घरच्या परिस्थितीची...


अनघाने एक हळूच नजर टाकली... दिनूचे डोळे बरेच काही बोलत होते... त्याने चेहरा टाकला असला तरी मनात प्रचंड विचारांचे काहुर माजले होते, असे त्याच्याकडे बघून अनघाला जाणवले...पण मंदा समोर तो काही बोलणार नाही हे तिने ओळखले... तिने त्याला काही पुस्तक दिली,खूप आनंद झाला त्याला..पण मंदाला घाबरून तो घेत नव्हता ती पुस्तके... त्याचा चेहरा अनघाला बरेच काही सांगत होता... तीने ठरवलं शोध घ्यायचा....


मंदाची बाजू तिने ऐकून घेतली होती...दुसरी बाजू म्हणजेच दिनूची बाजू ऐकल्याशिवाय तिला चैन पडत नव्हते... अन आई समोर असली की तो बोलणार नाही हे सुद्धा तिला माहिती होते...


मुळात बघताक्षणीच तिला दिनू आवडला होता..काहीतरी वेगळेपणा होता त्या मुलाच्यात... अनघाने ठरवलं दिनूला मदत करायची... तशी अनघाला आधीपासून समाजसेवेची आवड होतीच... लग्न झाल्यावर संसार,मुले यात ती मागे पडली होती... त्याचा श्री गणेशा दिनूपासुन करायचा तिने ठरवले...


मंदाची बाजू तिला पटत होती, घरची गरीबी म्हणून दिनूने मदत करावी, पण त्याने शिक्षण सोडाव हे तिला काही पटत नव्हते...


मंदा आणि दिनू निघून गेल्यावर अनघा पण बाहेर जायला निघते,दिवाळी जवळ आलेली असते बरीच कामे असतात... सगळी कामे आवरून होईपर्यंत संध्याकाळ होते.. रिक्षा मिळत नसते,चालत चालत ती जवळच असलेल्या चौकात येते,बघते तर काय दिनू पणत्या,कंदील,स्वतः बनवलेले ग्रीटींगकार्ड,पाॅटपैंटिंग विकत होता.. तिने दिनूला हाक मारली.. तसा तो घाबरला.. रडू लागला..


अनघाने त्याला तिच्यासोबतच घरी आणले ... अन त्याला धीर दिला, हे बघ दिनू,घाबरू नकोस.. मला सांग बरं काय मनात आहे तुझ्या??...तिने त्याला पाणी दिले, थोडा खाऊ दिला... तो शांत झाला.. आणि बोलू लागला..ताई," तुमी मायला नका सांगू,घरी समजल तर,बापू मला शाळा सोडायला सांगल,आनं हेच काम करायला लावंल,मला शिकायचं हाय.."


हे ऐकल्यावर अनघा म्हणाली ठीक आहे,पण एकाअटीवर...तसा दिनू परत घाबरून गेला... ती म्हणाली अरे घाबरू नको...अट ही आहे की ह्यापुढे रस्त्यावर ह्या गोष्टी न विकता,तू माझ्याकडे आणून द्यायच्या,मी तूला त्याचे पैसे मिळवून देईन... तुझ्या आईला मी समजावून सांगेन.


हे ऐकून दिनूला आनंद झाला, तो म्हणाला चालेल, येतो मी आता... अनघाने त्याला पुस्तके देऊ केली अन म्हणाली तूला आवडत ना वाचायला मग् आता घे..सकाळी मंदा ओरडेल म्हणून घेतली नाहीस माहिती आहे मला... तो फक्त हसला... ताई मी नेईन नंतर...


चार दिवसांनी दिनू परत आला, तेव्हा खूप साऱ्या पणती,कंदील,स्वतः बनवलेले ग्रीटींगकार्ड,पाॅटपैंटिंग बरेच काही घेऊन आला होता... त्याची ती कला बघून अनघाला त्याचे कौतुक वाटले...


तिने तें सर्व सोसायटीमध्ये दाखवले, तीच्या ओळखीच्या समाज कार्य करणार्या एका संस्थेला ह्या सर्व वस्तू दाखवल्या... त्यांना ते खूपच आवडले..त्यांनी अजून ऑर्डर दिली.. दिनू मेहनती होता..त्याने ती पूर्ण केली.. अन मंदाला अनघाने आधीच सांगितलं मी दिनूला एका कामासाठी चार दिवस इथे ठेवून घेणार आहे.. त्यामुळे सणावाराला चार पैसे अजून मिळतील म्हणून ती खुश झाली आणि तयार झाली...


भरपूर पैसे मिळाले, दिनू खुश होता.. अनघाने मंदाला सर्व समजावून सांगितल आणि दिनूची बाजू पटवून दिली...एवढे दिवस तो हे काम करून शिकत होता....कारण त्याला तुमच्या परिस्थितीची जाणीव होती... मग् मंदाने त्याला जवळ घेतले अन म्हणाली भरपूर शिक, मोठा हो...अनघाचे आभार मानले... तुझे पैसे तू ताईंजवळ ठेव..


अनघाच्या सर्व प्रश्नांची उत्तर तिला मिळाली होती..आणि समाजकार्याला सुरवात झाल्याचे समाधान देखील... दिनूला आता बऱ्याच ऑर्डर येऊ लागल्या, वॉल पैंटिंग, पिक्चर पैंटिंग असे करत त्याने पैसे साठवत शिक्षण पूर्ण केले.आज तो यशस्वी चित्रकार झाला होता.. तेवढ्यात बेल वाजली तशी अनघा भानावर आली, दिनू आला होता... दिनेश तू.. त्याला बघून अनघा म्हणाली.. ताई तुम्ही दिनूच म्हणा... तुमच्या मुळे ह्या दिनूला दिनेश म्हणून ओळखू लागले सर्व.... तुमच्यासाठी हि छोटी भेट.. याचा स्वीकार करा...


अनघा म्हणाली, अरे मी तर फक्त निमित्त होते... प्रत्येकाच्या जीवनात अडचणींचा डोंगर असतो, पण यश मिळवण्यासाठी कठोर मेहनत घेऊन त्याचा पाठलाग करावा लागतो अन तो तू केलास म्हणूनच तू एवढा यशस्वी झालास.. दिनू गेल्यावर तिने बघितल तर काय तिचे सुंदर पेंटिंग त्याने काढले होते... तिचे डोळे ती पैंटिंग बघून भरून आले... तिला त्याचा अभिमान वाटला, मनात म्हणाली.. आज तुझी आई नाही रे हे बघायला, सर्वांच्या आयुष्यात सुख दुःख हे पाठशिवणीचे खेळ खेळत असतात.. पण खरच यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी मेहनतीचा पाठलाग केला तरंच झेंडा रोवता येतो.... अन त्याच्या या मार्गात आपली काहीतरी चांगली मदत झाली ह्याचे देखील तिला समाधान वाटले...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational