STORYMIRROR

Sandhya Ganesh Bhagat

Inspirational

3  

Sandhya Ganesh Bhagat

Inspirational

ड्रीम्स कम्स ट्रू

ड्रीम्स कम्स ट्रू

6 mins
226

     संपूर्ण भूतकाळ सुदर्शन च्या स्मृतीत तरंगत होता. जॉब च कॉल आला. घरचे ही खूप खुश होते आणि दहा दिवसांनी जोईनिंग होती त्यामुळे घरच्यांनी देवदर्शन आणि फिरण्याचा प्लॅन केला आणि महाबळेश्वर हून येताना रात्री बहुतेक ड्रायव्हर चा डोळा लागल्याने, कार चा अक्सिडेंत झाला आणि सगळ्या फॅमिली मध्ये फक्त एकटा सुदर्शन वाचला.


त्या दिवशी चा तो अपघात ... आता संपूर्ण आयुष्य अंधारमय...

किती स्वप्न बघितली होती... जीव द्यावासा वाटायचा आणि....

मग ती त्याच्या आयुष्यात आली... एका एन जी ओ मध्ये.... घरी भरपूर.... पण भरल घर अस एकाएकी खाली झाल्याने त्याला ते खायला उठायचं... म्हणून तो एका "आनंद" नावाच्या एन जी ओ मध्ये आला.

अनुजा.... अनुजा त्याच्या आयुष्यात आली आणि त्याचे आयुष्यच पालटले. 

सुरुवातीला तो नेहमी उदास राहायचं. पण ती च्या समजावण्या मुळे तो बोलायला लागला. त्याची काळजी घेतली. वेळेवर औषध वगेरे देणं, सगळच करायची. तो ही तिची एनेर्जी बघून आनंदी राहायला शिकला.

ती नेहमी म्हणायची, "अरे, तू आजवर हे जग बघितले आहे, तू कल्पना तरी करू शकतो. पुन्हा बघू शकतो. जे जन्मापासून आंधळे आहेत, कधीच बरे होवू शकत नाही, त्यांचा विचार कर... आणि तुझे आई बाब जिथे कुठे असतील ते तुला बघत असतील तर त्यांना आवडेल का तुझ अस निगेटीव्ह विचार करणं, आणि तू नक्की बरा होशील, मला खात्री आहे..." 

ती बोलत असताना त्याला मात्र ऐकतच राहावं वाटायचं.

 विचारांच्या घोळक्यातून बाहेर पडत, हातातल्या काठीने चाचपडत सुदर्शन अनुजा कडे आला.

"अनु.... "

" हा.. बोल ना सुदर्शन..."

तुला माहित आहे आरती मॅडम ला कॉल आलेला हॉस्पिटल मधून की माझ्यासाठी डोळ्यांची व्यवस्था केली आहे... फक्त ऑपरेशन चा खर्च येईल... तीन दिवसांनी अडमिट व्हायला सांगितलं आहे."त्याचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. तिला ऐकुन खूप आनंद झाला.

त्याने रघु ला मिठाई आणायला सांगितल.

"काय रे! आज चक्क स्वीट... ऑपरेशन व्यवस्थित होऊ दे मग आधी देवाला ठेऊ मग भरपूर खाऊ..." अनुजा

"अरे तूच तर शिकवलंय ... ऑपरेशन नक्की यशस्वी होणार... आणि १०-१५ दिवसात मी हे जग पुन्हा पाहणार...! सुदर्शन अगदी उत्स्फूर्तपणे बोलत होता.

"काय सांगतोस काय... अरे वा.... अभिनंदन सुदर्शन.... मला केवढा आनंद झाला आहे... मी...कसं... "आणि अनुजा चा कंठ दाटून आला." तिला खूप आनंद झाला होता.

" अनु, थँक्यू... माझी तर जगण्याची इच्छाच मेली होती... पण तूच आयुष्यावर पुन्हा प्रेम करणे शिकवले.... अनु... तुझ्याजवळ आलो की पॉझिटिव्ह व्हेव्स येतात.... तू कशी नेहमी उत्साही...! तू टीचर आहे का मनोवैज्ञानिक...?" सुदर्शन नॉनस्टॉप बोलत होता.

"अरे बस्स बस......! किती हे कौतुक ...." अनुजा त्याला थांबवत म्हणाली.

"बरं सांग... बरा झाल्यावर सर्वात आधी काय करशील...? तुझी 'फर्स्ट विश'...?" अनुजा.

" डोळे उघडल्या उघडल्या मला तुला बघायचं आहे... आणि तुला घेऊन... तुझा हात धरून .... डोंगरावर जाऊन चिंब भिजायचंय...( मनात म्हणतो... तुला प्रपोज करायचंय ... तुझा लाजून दिलेला होकार बघायचाय... तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचाय...) तू नेहमी म्हणतेस नं... जस्ट ड्रीम... एँड वन डे ... ऑल युअर ड्रीम्स विल कम ट्रू...." सुदर्शन.

"हो. मी आजही हेच म्हणेन.... माणसाने कधीच आशा सोडू नये.... यू नेव्हर नो..." एक दीर्घ श्वास घेत आणि तिच्या हातातल्या कुबड्या बघून म्हणाली.


सुदर्शन च ऑपरेशन खूप चांगल्या प्रकारे पार पडलं. 

आणि शेवटी ती वेळ आली . 

डॉक्टरांनी त्याला सांगितलं की आजपासून तू जग बघू शकशील. 

" माझी एक विनंती आहे डॉक्टर, तुम्ही प्लिज माझी मैत्रीण अनुजा ला बोलावू शकता का. ?" मला डोळे उघडले की सगळ्यात आधी तिला बघायचंय." सुदर्शन अगदी उत्सुकतेनं म्हणाला.

" नक्कीच ." डॉक्टरांनी त्याला प्रेमानं आश्वासन दिलं. 

डॉक्टरांनी आरती मॅडम ना इंफॉर्म केलं की सुदर्शन सगळ्यात आधी डोळे अनुजा म्हणून कुणी मुलगी आहे त्याची मैत्रीण , तिला बघू इच्छितो. " 

आरती मॅडम ना अनुजा आणि सुदर्शन मध्ये झालेली दोन - तीन महिन्यातील जवळीकते बद्दल पूर्ण कल्पना होती.

आरती मॅडम ना पेच पडला की अनुजा ची ही अवस्था पाहून सुदर्शन च्या ट्रीटमेंट वर काही परिणाम तर होणार नाही ना. शेवटी त्यांनी ही सल अनुजा ला बोलून दाखवली. 

अनुजा ने परिस्तिथी बघता त्यासमोर जाण्यास नकार दिला. पण कुणाला पाठवावे हा ही प्रश्न अनुजा आणि आरती मॅडम ला सतावत होता.

शेवटी आनंद मधील एक सुंदर स्वयंसेविका, प्रांजल ची मदत त्यांनी घ्यायची ठरवली. 

तिला झालेली परिस्थिती सांगितली. ती ही तयार झाली. 

शेवटी सुदर्शन ने डोळे उघडले आणि त्यासमोर प्रांजल उभी होती. डॉक्टरांनी आणि प्रांजल , आरती मॅडम सगळ्यांनी त्याच अभिनंदन केले. 

त्याला ही खूप छान वाटलं. प्रांजल ने त्याच हसतमुखाने स्वागत केलं. 

सगळे बाहेर निघाल्या नंतर त्याने प्रांजल ला 'अनुजा' अशी हाक मारली आणि तिने ऐकलच नाही. आरती मॅडम लगेच सावध झाल्या. त्यांनी प्रांजल ला खुणावले आणि थांबायला सांगितलं. 

सुदर्शन ला मात्र काहीसं वेगळंच वाटलं. पण त्याने दुर्लक्ष केलं. 

अनुजा ने देवासमोर पेढे ठेवले आणि सगळ्या आश्रमात सगळ्यांना वाटले. ती आज खूप खुश होती पण का कोण जाणे तिला ही सुदर्शन ला भेटण्याची ओढ लागली होती. 

गेल्या तीन दिवसात त्याला प्रांजल सोबत काहीसं वेगळंच वाटत होतं. कारण जितकं अनुजा त्यासोबत मुक्त वागत होती तितकीशी जाणीव त्याला प्रांजल मध्ये दिसत नव्हती. आज सुदर्शन ला डॉक्टर डिस्चार्ज देणार होते. पण त्याने घरी जाण्याऐवजी आनंद मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आरती मॅडम ने समजावलं की, " तू आता ठीक आहेस , तू तुझ्या घरी जाऊ शकतोस. "

" पण ज्यांनी मला आधार दिला आणि माझी सेवा केली त्यांची सेवा करण्याची माझी मनापासून इच्छा आहे. आज माझ्यात जो आत्मविश्वास आहे फक्त 'आनंद' मुळे आहे. माझं जे काही आहे ते मी आनंद ला देत आहे आणि आजपासून 'आनंद' हेच माझं घर आहे.


शेवटी आरती मॅडम ने त्याच्या हट्टापुढे हार मानली आणि त्याला घेऊन आनंद मध्ये आले. 


सगळेजण त्याच्या स्वागतासाठी तयार होते. सगळ्यांना अनुजा ने सांगून ठेवलेलं की तिला प्रांजल आणि प्रांजल ला अनुजा म्हणायचं. सुदर्शन ला जराही त्रास होऊ द्यायचा नाही.


तो गाडीतून उतरताच सगळ्यांनी हसतमुखाने स्वागत केलं. आणि त्याने बघताच क्षणी अनुजा चे डोळे आणि स्माईल ने त्याच्या मनावर छाप पाडली. जे तो इतके दिवस हॉस्पिटल मध्ये अनुजा बनलेल्या प्रांजल च्या डोळ्यात बघायची इच्छा होती. 


त्याच लक्ष तिच्या हातातील कुबड्यावर गेलं आणि पुन्हा शांत झाला. सगळे आत आले. त्यासोबत गप्पा मारल्या . त्याचा अनुभव विचारला. 


दुसऱ्या दिवशी सकाळीच तो अनुजा च्या खोली कडे त्याची पाऊले नेहमी प्रमाणे वळली. आणि तो बरोबर पोहोचला. बघतो तर अनुजा खुर्चीत बसून काहीतरी डायरीत लिहीत होती. 

" अरे गुड मॉर्निंग सुदर्शन, तू इथे... इतक्या सकाळी.." 

" हो, तुला जाब विचारायला आलो होतो की तू त्यावेळी माझ्यासमोर का नाही आलीस.. हीच का आपली मैत्री... इतकंच ओळखलस का तू मला..."

आल्या आल्या प्रश्नाच्या भडिमार ऐकून ती ओशाळली. 

त्याचे डोळे मात्र पाणावले होते. त्याची ही अवस्था बघून तिला ही भरून आलं... काय बोलाव कळेना...


शेवटी आल्या पावलाने तो जाऊ लागला. 

ती तिच्या कुबड्यांची टक टक करत त्याच्या मागे घाईने जाऊ लागली. आणि जाता जाता तिचा तोल सुटू लागला. तोच त्याने मागे वळून पाहिले आणि तिला पकडलं. 

" मी मनापासून तुझी माफी मागते, प्लिज मला माफ कर. " त्याने तिला कडकडून मिठी मारली. 


"मला तुझ्यासोबत डोंगरावर जायचं आहे आणि पावसात चिंब भिजायचं आहे..." तो हसतच तिला म्हणाला. 


तिने तिच्या कुबड्या त्याला दाखवल्या. 

" काहीच अशक्य नाही हे तूच मला शिकवलं होत ना, माणसाने कधी आशा सोडू नये, यू नेव्हर नो. तरीही तू माती खाल्लीस ना .." 

" पण तुला कसं कळलं की ती अनुजा मी नाहीये.." 

" तुझा चालताना जो आवाज येतो ना... तो तिच्या चालण्यात नव्हता. आणि सगळ्यात आधी मी तिला ' अनु ' असा आवाज दिला पण तिने ऐकलेच नाही. तिच्या स्पर्शात तुझा स्पर्श नव्हता आणि तिच्या आवाजात तुझा आवाज नव्हता, महत्वाचं म्हणजे तुझ्यात जी पोसिटीव्ह एनर्जी जाणवते ती तिच्यात जाणावलीच नाही कधीच..." सुदर्शन अगदी भारावून बोलत होता. 

आणि अनुजा च डोळे अगदी पाणावले होते.

" आपण तुझी चांगली ट्रीटमेंट करू यात... आणि हे तुझं नाही, माझं ड्रीम आहे...जस्ट ड्रीम... एँड वन डे ... ऑल युअर ड्रीम्स विल कम ट्रू... यू नेव्हर नो..." 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational