Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

arun gode

Tragedy

3  

arun gode

Tragedy

ग्रहस्ती

ग्रहस्ती

5 mins
201


      एक श्रीमंत दिसणारा नावाजलेला परिवार मध्ये चार भाऊ व दोन बहीनी होत्या. त्यांची वडिलोपार्जीत त्यांच्या मुळ गांवी जमिन होती. घर प्रमुख त्या काळतला शिकलेला गृहस्थ होता. गृहस्थाचे वडिल भाऊ व आईपण होती. वडिल भाऊ साधारण प्राथमिक शिक्षण घेतलेला शेतकरी होता. एके काळी त्यांच्या जवळ भरपुर, दोन-चार गांवी जमिन होती. ते त्या भागातले मानलेले मालगुजार होते. पण यांचे वडिल, धाकटा मुलाच्या जन्मा नंतर मरण पावेले होते. तो काळ स्पेनिश फ्लु महामारिचा होता. त्यांचा वडिलांच्या मृत्यु नंतर मालगुजारी सांभाळण्याची जवाबदारी त्यांच्या चुलत्या वर आली होती.त्या काळात स्त्रीला जास्त पारिवारीक अधिकार नसल्या मुळे त्यांची आई काही करु शक्त नव्हती.   


      त्यांच्या चुलत्यांनी त्या काळात आपल्या बहिनींचे लग्न नावाजलेल्या परिवारात फार मोठ्या थाटात केले होते. आणी कारभार निट सांभाळता आला नसलेल्या मुळे खुप कर्ज झाले होते. शेवटी कर्ज वसुल करण्या साठी, ज्या जमिनी वर कर्ज घेतले होते त्या वर कब्जा करण्यात आला होता. शेवटी संपूर्ण जमिन सावकाराच्या ताब्यात गेली होती. त्या सावकारने त्यांच्या आईच्या नांवा वर 20 एकर जमिन बक्षीस म्हणुन दिली होती. कठीन परिस्थिति मध्ये कोण्या नातेवाईकाने मदत केली नव्हती. कालांतराने त्यांचा एक काका जांना काही मुलबाळ नव्हते ते आणी त्यांची पत्नी मरण पावल्यामुळे वारसा हक्काने ती जमिन यांना मिळाली होती. दोघेही भाऊ मोठे होवुन आपला संसार चालवित होते. पण शिकलेल्या भावाला शेति जमली नाही. जमिन पुराची असल्यामुळे हमखास पीक होत नसे.


     शेवटी नाइलाजास्त्व तो गृहस्थ शेती सोडुन आपल्या परिवारा सोबत छोट्या शहरात येवुन एका निजी बैंकेत नौकरी करु लागला. वडिल भाऊ त्यांची शेति बघत होते. त्यामुळे ते वर्ष भराचे परिवाराला लागणारे धान्य व इंधन फक्त पाठवत होते. पुढे निजी बैंकाचे राष्ट्रियकरण झालामुळे, थोडी आर्थीक परिस्थिति सुधरली होती. मुल-मुली कॉलेज मध्ये शिक्षण घेत होते. त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले होते. जेष्ठ मुलाला नौकरी लागली होती. बैंकेत काम करत असल्यामुळे गांवत त्यांची चांगली प्रतिष्ठा होती. नौकरी आणी जमिनदार असा दोहरी रुतवा होता. गांवात साख असल्या मुळे कोणी ही दुकानदार उधार देण्यासाठी मागे सरत नव्हता. यामुळे त्यांनी गांवात कुटुंबाला आवश्यक इतकी दोन मजली घर बांधले होते.मोठ्या मुलाचे लग्न झाले. त्यांना नातु पण झाले. दुसरया नंबरचा मुलगा शिकला होता पण त्याचे डोळे फार कमजोर असल्यामुळे किवा डोळे दोषपूर्ण असल्यामुळे त्याला प्रयत्न करुनही नौकरी मिळाली नाही. शेवटी त्याने गांवाला जावुन शेती बघावी असे ठरले. नंतर दुरुन दिसणारी संपन्नते मुळे लग्न पण झाले.


     घर प्रमुख सेवानिवृत झाल्या मुळे घरात येणारा आवक बंद झाली होती .पेनशन मिळत नव्हती.घर प्रमुखाला समोरचे भविष्य अंधकारमय दिसायला लागले होते.शेती पासुन पण फार मदत होत नव्हती. शेवटी वडिलांना दुस-या मुलाला सांगितले कि तु आपला परिवार, मोठ्या मुला सारखा घेवुन बाहेर पड. तुला दिलेले आश्वासन मी पूर्ण केले आहे. तुझ्या परिवाराला म्हटल्या प्रमाने दोंन वर्ष सांभालले आहे. तु काही मला आर्थीक मदत करित नाही .तुलाच सर्वांना मदत करावी लागते. उलट शेति करण्यासाठी जे पैसे तुला मी किंवा तुझा मोठा देतो. तो पैसा तु शेतिला लावत नाही. आणी शेतिच्या उत्पनाचा तुझा हिशोब काही समजत नाही दर वर्षि घाटाच दाखवते . शेति न पाहत ईथेच पडुन राहतो. तु आता शेति गांवात जावुन बघ.घरात फार भांडने होत आहे.आणी माझी पण शिल्लक संपत आली आहे. तुझ्या दोन भावांचे अजुन शिक्षण बाकी आहे.एका मुलीचे लग्न पन करायचे आहे. आता तु आपला संसार स्वतः सांभाळ आणी माझ्या पण उरलेल्या संसारात हातभार लाव. त्यामुळे तो घराच्या बाहेर निघाला व गांवाला त्याच्या परिवारा सोबत जावुन राहिला. सर्वांची शेति तो बघत असल्या मुळे त्याने कमीत-कमी अन्न-धान्य पुरवावे अशि वडिलांची व इतरांचे मत होते. हे करण्या ऐवजी तो सर्वांना आर्थीक मदत मागत होता. शेवटी संबंध वाईट होत गेले. नंतर दोन्ही मुलांना व मुलीच्या लग्ना नंतर तीलापण सरकारी नौकरी लागली होती.मधल्या काळत आर्थीक संकटा मुळे घरातील भाऊबंदीचे वातावरण फार दुषित झाले होते. त्याचा परिणाम असा झाला कि वडिलांनी शेतिवाल्या मुलाच्या लोभी प्रवृति मुळे शेतिच्या वाटण्या करुण दिल्या. त्यांना असे वाटले कि भविष्यात भावा- भावा मध्ये थोडे फार चांगले संबंध राहावे. शेतिवाल्या मुलाच्या परिवाराला आर्थीक मदत व्हावी म्हणुन कनिष्ठ पुत्राची जमिन तो वयस्क होये पर्यंत त्याच्या ताब्यात दिली होती. आणी त्याने त्याच्या शिक्षणाला मदत करावी हा उदेश होता. पण असे घडले नाही.त्याने आपल्या भावाला तर सोडा पण कधी आईवडिलाला पण मदत केली नाही. स्वार्थी प्रवृतिमुळे कोण्याच भाऊ-बहिन व आईवडिलाला त्याच्या विषयी मनात जिवाळा राहिला नाही.


       शेतिवाल्याचा परिवार वाढला होता. त्याला दोन मोठ्या मुली व दोन लहान मुले होती. परिस्थिति एकदम खालावत चालली होती.शेति मध्ये सारखे नुकसान दर वर्षि होत होते. याच काळात गांवातिल झालेल्या भांडना वरुन घर प्रमुखाची भांडणात असलेली दृष्टि पण गेली होती. परिवाराची जवाबदारी शेवटी वहिणी वर आली होती. पतिच्या आजार पणा मुळे परिस्थिति एकदम खराब झाली होती. भाऊबंदी मध्ये खुप वैमनस्य आल्या मुळे मदत करणारे हात उरले नव्हते. त्यामुळे ते कुटुंब बाजुच्या शहरात राहयला गेले. तीथे एक पारिवारीक खानावळ सुरु केली होती. आणी हळू-हळू आर्थीक परिस्थिति सुधरली होती. मोठ्या मुलीच्या शिक्षणाची व लग्न करण्याची जवाबदारी तीच्या लग्न न केलेल्या मोठ्या मावशीने घेतली होती .ती सरकारी सेवेत असल्यामुळे लग्नचा विशेष समस्या नव्हती. आता लहान मुलीच्या लग्नाची जवाबदारी त्याच परिवाराची होती. वडिल अपंग असल्यामुळे मुलीचे मावशे व मामा सक्रिय झाले होते. पूर्ण परिवारच नैसर्गिकच रुप-रंगने पाहयला सुंदर होते.लहान मुलगी सर्वात रुपवान व शिकली असल्यामुळे तीला सहज कोणीही सुन म्हणुन स्वीकारायला तैयार होते.


तीच्या मावशानी तीच्या साठी जास्त चौकशी न करता लग्न जमवुन आणले होते.मावशाने सबंध जोडल्या मुळे कोणी जास्त मुलाची चौकशी केली नव्हती. जावई चरित्रहीन होता. तीला एक मुलगी पण झाली. नंतर माहित पडले की त्याची पहिली प्रेमिका पत्नी त्याच शहरात राहत होती. ही आपल्या सासु-सासरया सोबत राहत असे. तो कधी- कधी यायचा.घरात पारिवारिक तंटे सुरु झाले होते. त्यामुळे आता परिवाराने घटस्फोट घेण्याचे ठरविले.आणी नंतर घटस्फोट घेतला. हा एक प्रकारचा म्हणजे गरिबी में गिला आटा असे झाले. घटस्फोट नंतर तीने प्रयत्न करुन सरकारी नौकरी मिळवली. पण अचानक मोठ्या मावशीची प्रकृति ढासळत चालली होती. त्यामुळे तीच्या मोठ्या बहिणीची लग्नाची घाई सुरु झाली. कारण मावशीला ती हयात असतांनाच तीचे लग्न करायचे होते. आणी मुलीचे लग्न जुळवुन आले होते. जावाई फार छान मिळाला. पति-पत्नीचा जोडा एकदम शोभुन दिसत होता.पण त्याच कार्यालयत मावशी सलाईन लावुन बेड वर पडली होती.लग्ना नंतर काही दिवसातच मावशीचा मृत्यु झाला होता. आता मुले मोठी झाली. लहान मुलीचा पुनर्विवाह करण्याचे ठरविले होते. तीला सरकारी नौकरी होती. लगेच पुण्याच्या दुसरपण्या मुलाचा निरोप आला होता. परिवार चांगला होता.निट चौकशी करण्यात आली होती. पुनर्विवाह करण्यात आला होती.नंतर बरेच प्रयत्ना केल्यावर एक-दिड वर्षानी तीची बदली पुण्याला झाली.आता त्यांचा संसार सुरळीत चालु आहे.


      दोन्ही मुलींचे लग्न झाले. मोठ्या मुलाने फोटोग्राफीचे दुकान लावले होते. उत्तम फोटोग्राफर म्हणुन त्याची शहरात ख्याती आहे. त्याला त्यात फार कौशल्य असल्यामुळे त्याने दुकान छोट्या भाऊ व नौकराच्या भरोशा वर सोडुन मुंबईला अँनिमेशन चा कोर्स करुन तीथे मॉडलिंगच्या क्षेत्रात चांगले लाखों रुपयाचे ठेके घेत होता. त्याने कॉप्युटर इंजिनियर मुलीशी लग्न केले. छोट्या भाववाला पण तीथेच पुलिस मध्ये नौकरी मिळाली आहे. सर्व काही व्यवस्थित चालले होते. पण सध्या कोरोना मुळे सगळे जन मुंबई सोडुन आपल्या घरी परतले आहे.अशा प्रकारे एका अपंग झालेल्या पतीचा अपंग झालेला परिवार पुन्हा रस्त्या वरुन वठणीवर आनला. तीने सुरुवातीच्या सांसारिक जीवणात कदाचित घोड चुका केल्या असतील. पण नंतर जे विसकटलेले घर होते त्याल योग दिशा देवुन मुलांसाठी विकासाचा मार्ग निर्माण केला आहे. त्यामुळे ती आपल्या मुलानसाठी तर सुपरमॉम आहेच यात काही शंका नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy