Quotes New

Audio

Forum

Read

Contests


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,
मोकळा श्वास
मोकळा श्वास
★★★★★

© Pranali Kadam

Romance Tragedy Others

20 Minutes   435    19


Content Ranking

दारावरची बेल वाजली, शितलने दरवाजा उघडला. दारात तिचे बाबा, मनोहर पंत होते. बाहेर खूप उकाडा होता, म्हणून ते थकल्यासारखे वाटत होते. शितलने आत जावून पाण्याचा तांब्या घेऊन आली आणि तिने बाबांना पेल्यातून पाणी दिलं... शितलचे बाबा तसे परिस्थितीमुळे थकलेलेच होते आणि तिची आई सतत आजारी होती, पाच सहा वर्ष झाली कॉटला खिळून होती. मनोहर पंतांच्या नोकरीत तसं फार काही मिळकत नव्हती. घराची सगळी जबाबदारी आता एकट्या शितलवर पडली होती, शितल एका छोट्या कंपनीत पार्ट टाइम अकाउंटचं काम करत होती. 


शितल, खूप साधी, सालस आणि मनमिळावू मुलगी, लहानपणापासून तिच्या वाट्याला सुख असं आलं नाही. लहानपणी मुलं खेळायची, दंगा मस्ती करताना दिसायचे. पण शितल मात्र घरातच असायची. शितलची आई वरचेवर आजारी असायची आणि शितल मात्र लहानपणापासून घरात लक्ष देवू लागली होती. शितल वयाने लहान, पण कर्तृत्ववानाने ती जाणती झाली होती. मनोहर पंतांना हे पाहून खूप वाईट वाटायचं. आपली मुलीने ज्या वयात खेळलं पाहिजे, बागडलं पाहिजे...त्या वयात ती घर सांभाळत होती. इतर मुली खेळत असताना पाहून, शितल घरातील काम करते हे पाहून मनोहर पंतांचे डोळे भरून यायचे. पण ते काही करू शकत नव्हते. ते परिस्थितीमुळे हतबल झाले होते. पुढे शितलने जेमतेम बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर नोकरी करायची असं तिने ठरवलं. मनोहर पंत तिला बोलले सुध्दा,


"शितल, बाळा तू तुझं शिक्षण पूर्ण कर, मी करतो काहीतरी."


"नको बाबा, तुम्ही एकटे किती करणार..मी नोकरी केली तर तेवढाच तुम्हाला थोडा हातभार लागेल."


"नाही बाळा, ऐक तू माझं, एकदा शिक्षण अर्धवट राहिलं की ते पूर्ण करता नाही येत."


शितलने मग विचार केला, बाबा बोलतात ते बरोबर आहे. आपण शिक्षण पूर्ण केले तर चांगल्या कंपनीत नोकरी मिळेल आणि पगार सुध्दा चांगला मिळेल. पण तिला सगळा भार आपल्या बाबांवर टाकायचा नव्हता. खूप वेळ ती विचार करत बसली होती, एकटीच खिडकीतून बाहेर बघत होती. तेवढ्यात मनोहर पंतांनी तिला आवाज दिला.


"काय गं चिमणे, कुठे हरवलीस."

अधूनमधून मनोहर पंत शितलला प्रेमाने चिमणी बोलायचे.


"अं!! काही नाही"


"काय झालं?, कसला विचार करत आहेस.?"


"बाबा, मी पार्ट टाइम जॉब करते, दिवसा जॉब करेन आणि संध्याकाळी अभ्यास करेन. परिक्षा मी बाहेरून देईन."


"अगं, पण तुझ्यावर जास्त ताण पडेल."

"नको चिमणे, तू तुझं शिक्षण पूर्ण कर, बाकीचं मी बघतो."


"नाही बाबा, मी आता ठरवलं आहे, तुम्ही हो बोललात तरच मी माझं शिक्षण पूर्ण करेन."


"तू खूप हट्टी आहेस, ऐकणार नाही कधी...कर तुझ्या मनासारखं."


असं बोलून मनोहर पंत त्यांच्या पत्नीच्या रूममध्ये गेले.


शितल खूप खुश झाली होती, आता ती दोन्ही गोष्टी करू शकत होती, एक म्हणजे नोकरी आणि दुसरं ती तिचं शिक्षण पूर्ण करणार होती.


दुसऱ्या दिवशी शितलने वर्तमानपत्र चाळायला सुरूवात केली आणि जिथे जिथे पार्ट टाइम जॉब होते तिथे तिने अॅप्लिकेशन केले. आता शितल तिथून येणाऱ्या फोनची वाट पाहत होती. दोन दिवस झाले तरी काही फोन आला नाही. तिसऱ्या दिवशी दुपारी तिला एका कंपनीतून फोन आला. तिला लगेच इंटरव्ह्यू साठी बोलावण्यात आले. शितलने तसे मनोहर पंतांना सांगितलं आणि ती तयार होऊन बाहेर पडली. शितलच्या मनात थोडी धाकधूक होती, कसं असेल ऑफिस, आपल्याला नोकरी मिळेल का?... असे अनेक प्रश्न तिच्या मनात येत होते. तिने बस पकडली आणि सीटवर जाऊन बसली. शितल मनातून खूप घाबरली होती, हा जॉब तिचा पहिलाच होता आणि तिला तो कसंही करून मिळवायचा होता. तिचा स्टॉप आला तशी ती बस मधून खाली उतरली. बसस्टॉप समोरच ऑफिस बिल्डींग होती. शितलने रस्ता क्रॉस करून पलिकडे गेली आणि समोरच्या बिल्डींगमध्ये गेली. तिथे बोर्ड लावलं होतं, तिथे तिने एकदा नजर फिरवली आणि ऑफिस कितव्या मजल्यावर आहे ते पाहिले. तिसऱ्या मजल्यावर ऑफिस होते, शितल लिफ्ट मध्ये प्रवेश करून तिसऱ्या मजल्यावर आली. आता शितल आणखीनच घाबरली होती. तिने एकदा जोरात श्र्वास घेतला आणि ऑफिस मध्ये प्रवेश केला. शितलने रिसेप्शनिस्टला आपण नोकरीसाठी आलो आहोत असे सांगितले. रिसेप्शनिस्टने शितलला थांबायला सांगितले. थोड्या वेळाने रिसेप्शनिस्टने शितलला केबिनमध्ये जायला सांगितले. शितलचं इंटरव्ह्यू छान झाला होता, तिला दुसऱ्या दिवसापासून जॉबवर यायला सांगितलं होतं. शितल खूप खुश होती, तिला महिन्याला पंधरा हजार पगार मिळणार होता. शितल आता दोन्ही गोष्टी करू शकणार होती, एक तिचं शिक्षण पूर्ण करणार होती आणि तिला तिच्या बाबांना मदत करू शकणार होती. आज ती खूप आनंदी होती, घरी जाताना तिने मिठाई घेतली. घरी आल्यावर तिने आपल्या बाबांना आणि आईला ही आनंदाची बातमी सांगितली. शितलचे बाबा, मनोहर पंत ती बातमी ऐकून खूप खुश होते. शितलच्या आईच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले, 


"आपली मुलगी खूप लवकर मोठी झाली. आपण तिचं साधं कौतुक पण करू शकत नाही." असे विचार त्यांच्या मनात येवून गेले.शितलची आता तारेवरची कसरत चालू होती. रोज सकाळी ती लवकर उठायची, सकळी ती सर्व कामं आटपायची. जेवण आणि इतर कामं उरकली की मग ती तिच्या आई जवळ जाऊन तिला काय हवं नको ते पाहायची. शितल वयाने जरी लहान असली तरी तिच्या मध्ये समंजस आणि हरहुन्नरी हे गुण होते. जबाबदारीमुळे ती खूप लवकर मोठी झाली होती. आईचं सगळं आवरून मग तिच्या कामाची वेळ व्हायची. तयार होऊन ती जॉबसाठी निघायची, तिथून ती घरी आल्यावर पुन्हा संध्याकाळचं स्वंयपाक करायची. जेवणं आटपून आणि सगळं आवराआवर करून मग ती अभ्यास करायला बसायची. दिवसभर शीतलची दमछाक होवून जायची. रात्री बारा वाजेपर्यंत अभ्यास करून ती झोपायला जायची. असं करता करता दोन वर्षे निघून गेली आणि शीतल ग्रॅज्यूएट झाली. शीतल उत्तम मार्कानीं पास झाली होती, तिला तिच्या मेहनतीचं फळ मिळालं होतं. 
शितलने आता मोठ्या मोठ्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करायला सुरुवात केली होती. तिला पूर्ण खात्री होती, कुठेतरी चांगली नोकरी मिळेल. शितलने अजून पार्ट टाइम जॉब सोडला नव्हता, तिथे ती जातच होती. रोज शितल संध्याकाळी घरी आली की विचारायची,


"बाबा, माझं लेटर आलं का.?"


"नाही आलं."


"अगं येईल, तू नको काळजी करू."


"तसं नाही ओ बाबा, पण खूप दिवस झाले. अजून कसं अपॉईंटमेंट लेटर आलं नाही."


"येईल, तू शांत रहा."


"तुझ्यासाठी चहा करू का?, मलाही थोडासा चहा प्यायचा आहे. तू येण्या आधी मी चहा घेतला होता, पण आता तुझ्या सोबत थोडासा घेईन. काय म्हणतेस, घेणार का चहा?"


"बाबा, तुम्ही जास्त चहा घेऊ नका, तुम्हाला अॅसीडिटीचा त्रास होतो."


"हो गं चिमणे, पण मी जास्त घेत नाही. आता तुला कंपनी म्हणून मी घेणार."


"हं.... तसंही तुम्ही ऐकणार नाही, करा चहा...कडक!... हाहाहाहा."


शितलचं आणि तिच्या बाबांचं असं रोज चालायचं. चहा झाल्यावर शितलने तिची कामं आटपली आणि थोडावेळ आई जवळ जाऊन बसली. शितल रोज बाबांच्या चहाची तक्रार आई जवळ करायची. तशीच आजही ती आई जवळ तक्रार करणार होती.


"आई, बघ बाबा काही माझं ऐकत नाही, सारखं चहा पितात."


तेवढ्यात मागून मनोहर पंत आले,


"काय गं चिमणे, माझ्याच बायको जवळ तू माझी तक्रार करतेस. ती माझ्या बाजूने आहे, कळलं का?"


शितलची आई, नलिनी बाई दोघांकडे बघून फक्त हसायची. तिला ही दोघं, बाप आणि मुलगी यांच्यातील भांडण आवडायचं.


"आई, तू हसतेस काय?, बोल ना त्यांना काही. नंतर बोलू नको तू मला, माझ्या नवऱ्याची तू काळजी घेत नाही."


हाहाहाहा....


श्रीमंती नव्हती, पण सुखी कुटुंब होतं. नलिनी बाईंचं आजारपण सोडलं तर सगळे हसून खेळून होते. नंतर सगळे जेवायला बसले, जेवणं आटोपल्यावर शितलने एकदा आईच्या रूममध्ये डोकावून बघितलं आणि ती तिच्या रूममधे आली. शीतलच्या मनात विचार आला की, अजून अपॉईंटमेंट लेटर का नाही आलं. असं विचार करता करता कधी डोळा लागला हे तिला कळलेच नाही. सकाळी लवकर उठून सगळी कामं आटोपून शीतल ऑफिसला जायला निघाली आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजली. दारात नेहमीचे पोस्टमन काका, हातात एक एन्वअल्प घेऊन उभे होते. 


"कशी आहेस शीतल बेटा"


"ठीक आहे काका."


"हे तुझं लेटर आलं आहे, सही कर बघू."


"हो करते."


सही करून शीतलने हातात लेटर घेतलं आणि पाकिटातून पेपर बाहेर काढला. शीतल ते लेटर वाचून खूप आनंदी झाली. तिचे बाबा सुध्दा तिथेच उभे होते. पोस्टमन काकांनी तिला विचारलं,


"काय गं, काय झालं...एवढी खुश का झाली तू."


"काका, बाबा मला एका चांगल्या कंपनीमधून अपॉईंटमेंट लेटर आलं आहे, ज्याची मी वाट पाहत होती. उद्याच त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलावलं आहे."


घरातलं वातावरण खूप आनंदी झालं होतं. शीतलने ही बातमी तिने तिच्या आईला सांगितली. नलिनी बाईंना खूप आनंद झाला. शीतलने देवाला नमस्कार केला आणि ती ऑफिस मध्ये जायला निघाली.


"आई, बाबा निघते मी आणि उद्यासाठी सुट्टी घेणे."


"चला मी पण निघतो, बाकीच्या घरी जाऊन पत्र देतो."


पोस्टमन काकांनी निरोप घेतला आणि ते निघून गेले.


शीतल सुध्दा घरून निघाली आणि ऑफिस मध्ये आली. ऑफिस मध्ये आल्यावर तिने रिसेप्शनिस्टकडे सुट्टी साठी अर्ज दिला आणि काम करायला सुरुवात केली. पण तिचं काही कामात लक्ष लागत नव्हतं. तिचं सगळं लक्ष, सुट्टी मिळेल की नाही इकडे लागलं होतं. संध्याकाळी ती जायला निघाली तेव्हा रिसेप्शनिस्टने शीतलला हाक मारली. 


"शीतल"


शीतल स्वतःच्या विचारात होती, आवाज ऐकून ती थबकली.


हां.....


"अगं इकडे ये.."


"काय झालं, काही काम आहे का?.."


"अगं नाही..."


मग


"अगं, तुला उद्या सुट्टी मिळाली."


शीतल हे ऐकून खूप खुश झाली


"थॅन्क्यू"


"मी काय केलं, मी तुला फक्त सांगितलं."


हं...


शीतलला सुट्टी मिळाली होती, आता ती उद्या नवीन जॉबसाठी इंटरव्ह्यूला जाऊ शकत होती.


शीतल घरी आली, हातपाय धुतले आणि देवाला नमस्कार केला. तिने तिच्या बाबांना उद्याची सुट्टी कन्फर्म झाली ते सांगितलं. मनोहर पंत खूप खुश झाले आणि मनोमन देवाजवळ प्रार्थना करू लागले, 


"देवा माझ्या मुलीला ही नोकरी मिळू दे, तुझे खूप उपकार होतील. माझ्या मुलीने खूप मेहनत घेतली आहे, त्याचं तिला फळ मिळू दे."


शीतल आईच्या रूममध्ये डोकावून पाहिलं, आई झोपली आहे असं पाहून ती स्वयंपाकाला लागली. तिने पटपट जेवण बनवून थोडावेळ आईबरोबर गप्पा मारायला गेली.


नलिनी बाई उठून बसल्या होत्या.


"आई कशी आहेस, आज छान झोप झालेली दिसत आहे."


हे ऐकून नलिनी बाई गालातल्या गालात फक्त हसल्या.


"हसलीस का?"


"मी येऊन गेली होती, तेंव्हा तू झोपली होती."


त्यावर नलिनी बाई बोलल्या,


"हो.., माहीत आहे."


"म्हणजे तू जागी होती, मला वाटलं झोपली आहेस."


"ये, बस इथे...

सगळं तुझ्या एकटीवर भार पडला आहे, मी काही करू शकत नाही. आता तुला ही नोकरी लागली की तुझं लग्नाचं पाहायला हवं."


हे ऐकून शीतलला राग आला.


"येवढी काय घाई आहे, आणि तसंही मी लग्न करणार नाही. लग्न केलेच तर तो मुलगा असा हवा जो माझ्या आई-बाबांची काळजी घेईल."


हाहाहा हाहाहा....


नलिनी बाईंना हसायला आलं, त्यांनी शितलला बसायला सांगितलं.


"बस इथे, ऐक आता मी काय सांगत आहे ते."


"हं...बोल"


"आम्हाला माहीत आहे, तुला आमची खूप काळजी आहे. पण कसं आहे ना, तो मुलगा आपलं घर, नाती हे सगळं कसं बरं सोडून येईल. आज हे सर्व मुलगी करत आली आहे, आपण ज्या समाजात राहतो तिथले काही नियम आहेत. ते आपण बदलू नाही शकत. तू सुखी राहावी, बस एवढीच आमची इच्छा आहे. अधूनमधून तू येशील आम्हाला भेटायला. तेव्हा असा हट्ट तू करू नको."


"झालं तुझं बोलून".


हो...


"आता मी काय सांगते ते एक"


बोल...


"माझं मी सगळं ठरवलं आहे, तेव्हा तू काळजी करू नको."


"जेवून घे आणि औषध घेऊन आराम कर, मी आलेच...." असं बोलून शीतल रूम बाहेर आली.


सर्वांनी जेवणं केली आणि थोडावेळ अशाच गप्पा गोष्टी चालू होत्या. झोपेची वेळ झाली तशी शीतल तिथून उठली आणि झोपायची तयारी करू लागली. नेहमी प्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी शीतल लवकर उठली. तिने भरभर तिची कामं आटपायला घेतली. आज तिला नवीन कंपनी मध्ये जायचं होतं. आज तिने खूप छान ड्रेस घातला, असं म्हणतात ना First impression is the last impression. तयार होऊन तिने देवाला नमस्कार केला आणि आई-बाबांना सांगून ती घरातून बाहेर पडली. बस तिने पकडली आणि ती ऑफिस गेट जवळ आली. ऑफिस बाहेरून खूप सुंदर दिसत होतं. शितलने लिफ्टचा बटन प्रेस केला आणि ती लिफ्टची वाट पाहू लागली. लगेच लिफ्ट खाली आली आणि ती लिफ्ट मध्ये प्रवेश केला. दोन नंबर तिने प्रेस केला आणि ती वाट पाहू लागली. शीतल मनातून खूप घाबरली होती. हा जॉब मिळेल का अशी शंका मनात येत होती. शीतल लिफ्ट मधून बाहेर आली आणि ऑफिस मध्ये प्रवेश केला. आल्यावर तिने सगळीकडे नजर फिरवली आणि रिसेप्शन डेस्क जवळ जाऊन रिसेप्शनिस्टला तिने लेटर दाखवलं. 


"तुम्ही बसा, मी सरांना इन्फॉर्म करते.", रिसेप्शनिस्ट मिस अंजलीने सांगितलं.


"हो, चालेल... मी बसते" शीतल बोलली.


शीतल सोफ्यावर जाऊन बसली.


मिस अंजली फोनवर बोलत होती, बहुतेक ती शीतल आली आहे हे सांगत असणार.


शीतल आतून बोलावणं येईपर्यंत, ती ऑफिस स्टाफ आणि ऑफिस न्याहाळत होती. प्रत्येकजण आपापल्या कामात मग्न होते, मात्र एक व्यक्ती शीतलकडे चोरून बघत होती. त्या व्यक्तीचं नांव सुधीर जोशी होते. सुधीर जोशी, मुंबई मध्येच राहणारा. एकटाच राहत होता तो, आई-वडील..भाऊबहीण कोणी नव्हते त्याला. लहानपणी एका अपघाताने त्याचे आईवडील निघून गेले. लहानपणापासून तो त्याच्या मामामामी कडे राहिला. त्यांना सुध्दा मूलबाळ नव्हते, ते सुधीरला आपलाच मुलगा समजून त्याची देखभाल करत होते. सुधीर दिसायला खूप सुंदर, एकदम राजबिंडा सारखा. कॉलेज मध्ये असताना अनेक मुली त्याच्यावर प्रेम करायच्या, पण सुधीर कधीच कोणत्या मुलीला भाव द्यायचा नाही. तो कधीच कोणत्या मुलीजवळ बोलायला जायचा नाही. कॉलेज संपले आणि पुढे त्याने एम बी ए केलं आणि या कंपनीत जॉबला लागला. त्याचे मामा मामी आता गावी जाऊन राहत आहेत. गावी घर, शेतजमीन आहे आणि तिकडे लक्ष द्यायला कोणी नाही. म्हणून मग ते गावी राहायला गेले. सुधीर आता एकटाच मुंबई मध्ये राहतो. अधूनमधून त्याचे मामा मामी त्याला भेटायला येतात, कधी कधी सुधीर सुध्दा एक फेरी गावी टाकून येतो. 


आता सुधीरचं लक्ष शीतलकडे लागले होते. कधी कोणत्याही मुलीकडे न बघणारा सुधीर आज तो शीतलकडे बघत होता. अचानक शीतलचं लक्ष सुधीरकडे गेलं आणि दोघांची नजरानजर झाली. सुधीर एकदम बावचळला, आपली चोरी कोणीतरी पकडली असं त्याला वाटलं. लगेच खाली मान घालून त्याने कामाला सुरुवात केली. "मिस शीतल". रिसेप्शनिस्टने हाक मारली.


शीतलने आवाजाच्या दिशेने मान वळवली आणि ती रिसेप्शन डेस्क जवळ गेली."तुम्ही आत जाऊ शकता" मिस अंजलीने सांगितलं.


"हो, Thank you". असं बोलून शीतलने केबिन डोअर नॉक केलं.


"May I coming sir"


"Yes coming"


शीतल आत मध्ये गेली आणि सरांसमोर जाऊन उभी राहिली.


"बसा मिस शीतल". सरांनी सांगितलं


"धन्यवाद सर" असं बोलून शीतल खुर्चीवर बसली.


"मिस शितल, तुमचा बायोडेटा मी पाहिला, खूप छान आहे आणि तुम्हाला कामाचा अनुभव सुध्दा आहे. तुम्हाला हा जॉब मिळाला आहे. तुमची salary बाबतीत काही अपेक्षा आहे का?"


"अपेक्षा आहेत सर, घरी आई आजारी आहे आणि घरची परिस्थिती बेताचीच आहे. पण मी काही सांगत नाही, तुम्ही जे द्याल ते मला मान्य आहे."शीतल बोलली.


"ठिक आहे, तुमचा हा प्रामाणिक स्वभाव आवडला. तुम्हाला महिन्याला तीस हजार पगार मिळेल, एवढा ठीक आहे ना"


"अं...हो ठीक आहे सर" शीतलला पगार ऐकून तिचा तिच्या कानावर विश्वास होत नव्हता. ती भांबावून गेली आणि आतून खूप खुश झाली होती.


"ठिक आहे, तुम्ही उद्या पासून जॉबवर येवू शकता."


"सॉरी सर, मला उद्या जॉईन होता नाही येणार"


"का, काही अडचण आहे का?


"नाही सर, अडचण नाही, पण मी जिथे आधी काम करत होती, तिथे मला उद्या जाऊन कळवावे लागेल. मी परवा पासून आली तर चालेल का?."


"हो चालेल, तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही जॉईन होऊ शकता."


"खूप धन्यवाद सर"


असं बोलून शीतल केबिन बाहेर आली. शीतलसाठी ही खूप मोठी अचीव्हमेंट होती. आज तिचं स्वप्न पूर्ण झालं होतं. एका मोठ्या कंपनीत तिला जॉब मिळाला होता. परवा पासून तिला जॉईन व्हायचं होतं. शीतल तशीच घरी आली, घरी आल्यावर तिने नवीन ऑफिसमध्ये जे घडलं ते तिने आई-बाबांना सांगितलं. मनोहरपंत आणि नलिनी बाई या दोघांना ही बातमी ऐकून खूप आनंद झाला. ते दोघे शीतलकडे कौतुकाने पाहू लागले. शीतल दोघांकडे अळीपाळीने पाहू लागली.


"असे का पाहात आहात तुम्ही दोघे, तुम्हाला आनंद नाही झाला का.?"


"अगं आम्हाला खूप आनंद झाला, एक मुलगी असून तू हे शिखर पार केलंस. आता फक्त तुझ्या लग्नाची काळजी आहे, म्हणजे आम्ही मोकळे." असे मनोहरपंत बोलले


"नाही बाबा, मी तुम्हा दोघांना सोडून कुठेही जाणार नाही. मी त्याच मुलाशी लग्न करेन, जो माझ्या आईबाबांची काळजी घेईल." असं बोलून शीतल तिथून उठली आणि बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेली.


"चिमणे, अगं असा हट्ट करू नये बाळा, अशाने तुझं लग्न कसं होईल. आताच्या काळात असा मुलगा मिळणे खूप कठीण आहे आणि तो मुलगा त्याचे आई-वडील सोडून आम्हाला का सांभाळेल." मनोहरपंत बोलले.


यांवर शीतल काही बोलली आणि तिने जेवण वाढायला घेतले. जेवताना कोणीच काही बोलले नाही, आई-बाबा शीतलकडे बघत जेवत होते. त्या दोघांना आपल्या मुलीची तळमळ दिसत होती आणि आपल्या प्रती असलेली तिची काळजी यामुळे ते दोघे चिंतित झाले होते. जेवणं आटोपल्यावर शीतल आवराआवर करू लागली. सगळं आवरल्यावर ती एकटीच खिडकी जवळ उभी राहिली आणि विचार करू लागली,


 "मी माझ्या आई-बाबांना असं एकटं नाही सोडू शकत. मुलगी असली म्हणून मी माझी जबाबदारी नाकारू शकत नाही. जोपर्यंत मला तसा मुलगा मिळत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही." असं तिने मनाशी निश्चित केले.दुसऱ्या दिवशी शीतल घरचं सगळं आटपून तिच्या जुन्या ऑफिसमध्ये आली. ऑफिसमध्ये आल्यावर ती सरांच्या केबिनमध्ये गेली


"ये शीतल, काय काम काढलं" असं तिच्या सरांनी विचारलं.


शीतल थोडी अवघडल्या सारखी झाली, कारण तिने एक महिन्याची नोटीस दिली होती, पण तिला त्या आधीच जॉब सोडावा लागत आहे."काय गं, काय झालं...‌नि:संकोचपणे बोल" असे तिचे सर बोलले.


"सर मी उद्या पासून इथे जॉबवर नाही येऊ शकणार, मला दुसऱ्या कंपनीत जॉब मिळाला आहे." असे शीतलने सांगितले.


"अरे व्वा!...ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. हे असं घाबरत का तू सांगत होती, पेढे कुठे आहेत." सर बोलले.शीतल सरांकडे पाहतच राहिली, सर तिला काही बोलले नाही आणि त्यांनी लगेच परवानगी दिली, हे ऐकून शीतलला हायसे वाटले.हात जोडून शीतलने सरांचे आभार मानले आणि तिथून ती बाहेर आली. बाहेर आल्यावर तिने सगळ्यांचा निरोप घेतला आणि ती घरच्या वाटेने निघाली. उद्या नवीन ऑफिसमध्ये जॉबसाठी जायचे होते आणि सगळी तयारी करायची होती. उद्या पासून शीतलला लवकर उठावे लागणार होते. कारण ऑफिस वेळ सकाळी १० ची होती. तेव्हा तिला सगळं आटपून घरातून ९ वाजता तरी निघावं लागणार होतं. शितल घरी आली आणि तिने उद्या पासून नवीन ऑफिसमध्ये जॉबसाठी जायचे आहे असे सांगितले. शीतल आता मनात हिशोब लावत होती, घरखर्च आणि आईची ट्रिटमेंट सगळं व्यवस्थित होणार होतं. आजचा दिवस संपला आणि शीतलने झोपायची तयारी केली. आज तिने सगळं लवकर आटोपलं होतं, उद्या पासून तिला आणखीन लवकर उठावे लागणार होते. दिवे मालवले आणि ती झोपी गेली, उद्याचा नवीन दिवस आणि नवीन स्वप्न पाहण्यासाठी. शीतल सकाळी नेहमीपेक्षा लवकर उठली. भरभर तिने सगळं आवरलं आणि ती ऑफिसला जायला निघाली. जाताना तिने आई-बाबांना आणि देवाला नमस्कार केला आणि घरातून बाहेर पडली. आईच्या डोळ्यातून नकळत अश्रू बाहेर पडले आणि मनात विचार आला, आज मी ठीक असती तर माझ्या लेकीला एकटीने सगळं पाहावं लागलं नसतं. मनोहर पंतांनी आपल्या पत्नीकडे पाहिले आणि त्यांना धीर दिला, "होईल सगळे नीट, आपली लेक खूप मजबूत आहे." असे बोलून त्यांनी रेडिओ लावला. रेडिओवर छान गाणं लागलं होतं....काळ्या मातीत मातीत, तिफन चालते... मनोहर पंत ते गाणं गुणगुणू लागले. दोघांचा हास्य विनोद चालू होता आणि मध्येच शीतलच्या भविष्या बाबतीत चर्चा चालू होती.
इथे शीतल बरोबर दहा वाजता ऑफिसमध्ये पोहचली. ऑफिसमध्ये आल्यावर तिने रिसेप्शनिस्टला जाऊन भेटली आणि आज पासून ऑफिस जॉईन करणार असल्याचे तिने सांगितले. रिसेप्शनिस्टने तिला सुधीरच्या बाजूच्या टेबलवर बसण्याची व्यवस्था केली. शीतल आपल्या टेबल जवळ आली आणि तिने बॅगेतून तिच्या सगळ्या वस्तू बाहेर काढून, त्या तिने व्यवस्थित मांडून ठेवल्या. बाजूच्या टेबलवर सुधीर बसला होता, त्याचं तिच्याकडे लक्ष लागलं होतं. शीतल आपल्याच कामात मग्न होती. तिचं सगळं सामान लावून झाल्यावर सुधीरने हात पुढे केला,


"हाय, मी सुधीर जोशी"


"शीतल पंत" शीतलने सांगितले


"खूपच सुंदर नांव आहे." सुधीर म्हणाला


"धन्यवाद" असं बोलून ती आपल्या कामाला लागली.असेच दिवस जात होते, हळूहळू शितल तिथे रूळू लागली होती. सगळ्यांना ती मदत करायची, प्रत्येकाशी ती हसून बोलायची. शितल तिचं काम झालं कि ती लगेच घरी निघायची.घरी जावून तिला सगळं आवरायचं असायचं. हळूहळू दिवस जात होते, मनोहर पंत काळजीत असायचे. शितलचं लग्न झालं की आपण मोकळे झालो हा त्यांचा विचार चालू असायचा. नलिनी बाई सुध्दा हाच विचार करत असायच्या, त्यातून आपल्या मुलीची अट हा त्यांना पोरखेळ वाटत होता. एक दोन स्थळं येवून गेली, पण त्यांना शितलची अट त्यांना मान्य नव्हती. आई-वडील चिंतातूर झाले, कसं होणार आपल्या मुलीचं. शितल काही हट्ट सोडायला तयार नव्हती. 
सुधीरचं लक्ष शीतलकडे लागलेलं असायचं. त्याला शितल आवडू लागली होती, पण तो तिला सांगायला घाबरायचा. काहींना काही कारण काढून तो तिच्याशी बोलत राहायचा. शितलला सुद्धा त्याची मैत्री हवीशी वाटायची. तिला पण त्याच्याशी बोलायला आवडायचं. अधुनमधून दोघे कॉफी पिण्यासाठी एकत्र जायचे, पण शीतलच्या मनात त्याच्या बाबतीत मैत्री शिवाय कोणती भावना नव्हती. शीतल कडून सुधीरला शीतलची एकंदरीत घरची परिस्थिती समजली होती. सुधीरला वाटायचं की तिला आपल्या मनातील गोष्ट सांगावी, फार फार तर ती रागावेल. 
सुधीर घरी आला की त्याच्या डोक्यात आणि मनात फक्त शीतल असायची. सुधीरला जास्त कोणी मित्र नव्हते, त्यामुळे तो आपल्या मनातील गोष्ट कोणाला सांगू शकत नव्हता. 

एक दिवस त्याने ठरवलं की शीतलला आपल्या मनातील गोष्ट सांगायची. सुधीर ऑफिसमध्ये आला तेव्हा शीतल अजून आली नव्हती. त्याने ठरवलं, आज शीतल बरोबर कॉफी प्यायला जाऊ तेव्हा तिला आपल्या मनातील गोष्ट सांगू.

शीतल ऑफिसमध्ये आली तेव्हा सुधीरचं लक्ष तिच्याकडे होतं.


"हाय! गुड मॉर्निंग" शीतल बोलली.


पण सुधीरचं काही तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते. उत्तर मिळाले नाही म्हणून शीतलने त्याच्याकडे पाहिले. 


"ह्याला काय झालं?, हा का असा बघत आहे."असं शीतल स्वत:शीच बोलली.शीतल मग त्याच्या टेबल जवळ गेली आणि टेबलवर थाप दिली....तसा सुधीर दचकला...


"काय, लक्ष कुठे आहे तुझं, मी एकटीच बोलत आहे. काय झालं? सगळं ठीक आहे ना?" शीतलने विचारले.


"अं...हो हो, सगळं ठीक आहे. तू कधी आलीस? मला कळलंच नाही तू कधी आलीस ते. तू काही बोलत होतीस का? सॉरी! माझं लक्षच नव्हतं, बोल काय बोलत होती तू." सुधीर बोलला.


"अरे, हो. किती प्रश्न विचारतोस. जरा श्वास तरी घे." शीतल .


"माझा श्वासच तुझ्यात अडकला आहे." असं सुधीर पुटपुटला.


"काय म्हाणालास तू..."शीतल


"कुठे काय? काही नाही. संध्याकाळी कॉफी प्यायला जाऊया?" सुधीरने विचारले.


"आज पुन्हा! का रे बाबा" शीतल


"काही नाही गं, असंच...चल ना जाऊया, प्लीज" सुधीर


"ओके, जाऊया" असं बोलून शीतल तिच्या टेबल जवळ येऊन ती तिचं काम करू लागली.


पण सुधीरचं काही आज कामात लक्ष नव्हते, त्याच्या मनात गोड युद्ध चालू होते. संध्याकाळ कधी होते याची तो वाट पाहू लागला. त्याचं सारखं घड्याळाकडे लक्ष लागले होते. सुधीर मनाची सगळी तयारी करून, कसं आणि काय बोलायचे हे तो पुन्हा पुन्हा आठवू लागला. संध्याकाळ झाली तशी शीतल सुधीरच्या टेबल जवळ आली आणि म्हणाली,"चल, निघुया का?"


"हो, चल" असं बोलून सुधीर तिच्या सोबत चालू लागला.


कॉफी शॉप ऑफिस समोरच होते, दोघे आले आणि एखादं टेबल बघून तिथे बसले. सुधीरने दोन कप कॉफी ऑर्डर केली आणि इकडच्या तिकडच्या गप्पा चालू झाल्या. सुधीरने आईची तब्येत कशी आहे, घरी कसं आहे अशी चौकशी केली. शीतलने पण सगळं ठीक असल्याचं सांगितलं. सुधीरने आता जास्त बोलणं न लांबवता मुख्य विषय बोलण्याची सुरुवात केली. 


"शीतल, मला तुला काही सांगायचं आहे."


"हो, बोल ना." शीतल


सुधीरने धीर करून शितलला सांगितलं, " शितल तू मला खूप आवडते. माझ्याशी लग्न करशील". 


यांवर शितल काही बोलली नाही, ती फक्त त्याला म्हणाली," उद्या संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तू माझ्याबरोबर घरी चल". सुधीरला ती अशी का बोलली हे त्याला समजलं नाही. "ठिक आहे, येईन मी तुझ्याबरोबर. पण तू असं काय आहे जे तू मला इथे सांगू शकत नाही.""तू ये घरी, मग कळेल तुला. चल निघुया आपण, मला घरी जायला उशीर होईल." शीतल"हो, चल निघुया." सुधीर असं बोलून दोघे कॉफी शॉप मधून बाहेर आले.


शीतलने बस पकडली आणि निघून गेली. सुधीर फक्त बस जाण्याच्या मार्गाकडे पाहू लागला. त्याने पण बाईक सुरु केली आणि निघाला. त्यादिवशी दोघांच्याही मनाची चलबिचल चालू होती. दोघांनाही रात्रभर झोप नव्हती. दुसऱ्या दिवशी दोघे ऑफिसमध्ये आले, पण फारसे काही बोलले नाही. कामापुरते थोडंसं बोलत होते, आणि आपलं काम करत होते. सुधीरच्या मनात धाकधूक होती, हिने मला घरी का बोलावले हे काही कळत नाही. 


संध्याकाळी सुधीर, शितल बरोबर तिच्या घरी आला. तिने सुधीरची ओळख आपल्या बाबां बरोबर करून दिली. मग तिने त्याला आईच्या कॉट जवळ त्याला घेऊन आली. तिच्या आईची अशी अवस्था आणि घरची परिस्थिती बघून सुधीरला खूप वाईट वाटले. शितल त्याला बोलली,


" हे माझं कुटुंब आहे. यांना सोडून मी कुठेही जाऊ शकत नाही. मी त्याच मुलाशी लग्न करेन जो माझ्या आई-बाबांना सांभाळेल. तुला माझ्याशी लग्न करायचे आहे, माझी अट मान्य असेल तर करू आपण लग्न."


शीतलला माहीत होतं की तिची अट सुधीर मान्य करणार नाही. तो आपल्याशी लग्न नाही करणार. सुधीर थोडावेळ तिथे थांबला, तिच्या आई-बाबांशी गप्पा मारल्या आणि तो तिथून निघाला.घरी जाताना त्याच्या डोक्यात शितलचे आणि तिच्या घरचे विचार चालू होते.सुधीरचं पण आयुष्य असंच धकाधकीतून गेले होते, त्याचे आईवडील लहानपणीच गेले होते. मामाच्या घरी तो लहानाचा मोठा झाला. तिथे त्याने चांगलं शिक्षण घेतले आणि घरी तो मामीला घरकामात मदत करू लागला. पुढे त्यांने छोटे छोटे काम करून आपलं शिक्षण पूर्ण केले. मामांना एकट्यांना हा भार द्यायचा नव्हता. म्हणून तो जे मिळेल ते काम करायचा. आता तो चांगल्या कंपनीत जॉबला आहे. तिच परिस्थिती अजूनही शीतलची आहे. 
सुधीर घरी आला, तो विचार करू लागला की आपण शीतलसाठी काय करू शकतो. तिचा त्रास कसा कमी होईल, हे विचार चालू होते. रात्री कितीवेळ तो जागा होता हे त्याला माहीत नव्हते. विचार करतच त्याचा डोळा लागला आणि तो झोपून गेला. सकाळी उठून त्याने सगळं आवरलं आणि अॉफिस मध्ये आला. ऑफिस मध्ये आल्यावर त्याला शीतल दिसत नव्हती. तो शितलला शोधू लागला, पण त्याला ती कुठेच दिसत नव्हती. तो विचार करू लागला, "आज शीतल ऑफिसमध्ये आली नाही का?, माझ्यामुळे ती आली नाही का?, काय झालं असेल... का आली नाही?," असे अनेक विचार डोक्यात चालू होते. मग त्याने अॉफीसमध्ये शीतलची मैत्रीण, नीना हिच्या जवळ चौकशी केली. 


"हाय नीना"


"हाय, आज तू इथे कसा.? नीना


"काम होतं तुझ्याकडे" सुधीर


"माझ्याकडे! काय?" नीना 


"आज शीतल का आली नाही" सुधीर


"अरे, तिच्या आईची तब्येत अचानक खूप बिघडली. म्हणून आज ती नाही आली." नीना


"ओके, थॅन्क्स." सुधीरसुधीर मनातच एकटाच बोलू लागला, " काय झालं असेल तिच्या आईला?... खूप सिरीयस तर नसेल, एकटी शीतल कशी सांभाळत असेल, मला जायला हवं" आणि तसाच तो रिसेप्शनिस्टला काही सबळ कारण सांगून तिथून निघाला. जोपर्यंत शीतलच्या घरी पोहचत नाही, तोपर्यंत सुधीरला एक एक क्षण मैलाचा वाटत होता. थोड्यावेळाने सुधीर शीतलच्या घरी पोहोचला. घरचं वातावरण खूप गंभीर वाटत होतं. घरी डॉक्टर आले होते, तिचे बाबा आईच्या बाजूला बसले होते. शितल एका बाजूला रडत उभी होती. सुधीरने पुढे होऊन तिला धीर दिला,"शीतल, आईला काही होणार नाही. तू काळजी करू नको. मी आहे तुझ्यासोबत". ह्या एवढ्याच बोलण्याने शीतलला धीर आला, एक बळ मिळाल्या सारखं झालं होतं. शितलला त्या शब्दांचा खूप आधार वाटला, मनोमन ती खूप सुखावली होती. डॉक्टरांनी शीतलच्या आईला व्यवस्थित तपासले आणि काही औषधे लिहून दिली. डॉक्टर जायला निघाले तसा सुधीर पण त्यांच्या बरोबर बाहेर आला. त्याने डॉक्टरांना तिच्या आई बद्दल नीट चौकशी केली व उपचार किती वेळ चालू ठेवावे लागेल हे सर्व त्याने सविस्तर विचारले आणि मग तो आतमध्ये आला. त्याने शितलला आणि तिच्या बाबांना काळजी करण्यासारखं काही नाही असं सांगितलं. लवकरच त्यांना बरं वाटेल आणि त्या हिंडूफिरू लागतील. हे ऐकून मनोहर पंत आणि शीतल या दोघांना बर वाटलं. सुधीर थोडावेळ तिथे थांबला आणि मग तो पुन्हा ऑफिसला जायला निघाला. शीतल आणि तिचे बाबा जेवून जाण्याचा आग्रह करत होते, पण सुधीर सहज बोलण्याच्या ओघात बोलून गेला," पुढल्यावेळी हक्काने जेवायला येईन" असं बोलून तो तिथून निघाला आणि अॉफिसमध्ये आला. पण त्याचं कामात लक्ष लागत नव्हतं, सारखा शितलचा विचार चालू होता.त्याने शितलशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याने तसं त्याच्या मामांनाही कळवलं होतं. काही दिवस असेच निघून गेले, हळूहळू शीतलला सुध्दा सुधीर आवडू लागला होता. सुधीरचं अधूनमधून शीतलच्या घरी येणजाणं चालू होतं. शीतलच्या आई-बाबांना सुधीर हा त्यांच्याच घरातील व्यक्ती आहे असे वाटत होते. शीतलच्या आईची तब्येत आता थोडीफार सुधारली होती. 
सुधीरने आता मनाशी निश्चय केला, शीतल बरोबर लग्न करायचे. त्याने त्याच्या मामा मामीला मुंबई मध्ये बोलावून घेतले. ते आल्यावर सुधीरने, शीतल आणि स्वत: बद्दल थोडक्यात दोघांना सांगितले. दोघांनी सुधीरचं बोलणं ऐकून घेतलं आणि मग ते थोडावेळ विचार करू लागले. दोघे एकमेकांशी चर्चा करून निर्णय घेतला. सुधीर मनातून घाबरला होता, मामा मामी होकार देतात की नाही. पण मामा मामींनी त्या दोघांच्या लग्नाला संमती दिली. मामाने सुधीरला सांगितलं,


"सुधीर, त्यांना कळव आपण संध्याकाळी त्यांच्याकडे येत आहोत."


सुधीर हे ऐकून खूप खुश झाला, त्याने मामा मामीला आनंदाने मिठी मारली. लगेच त्याने शीतलला फोन करून कळवलं.


इथे शीतल सुध्दा हे ऐकून खूप खुश झाली. तिला तिच्या कानावर विश्वास होत नव्हता. तिने ही बातमी आई-बाबांना सांगितली आणि संध्याकाळच्या तयारीला लागली.संध्याकाळी सुधीर आणि त्याचे मामा मामी शितलच्या घरी आले. शीतल आणि मनोहर पंतांनी पाहुण्यांचं स्वागत केले आणि त्यांना बसायला सांगितले. सुधीरने मामा मामींची ओळख करून दिली. त्याने त्याचा निर्णय शितलला आणि तिच्या घरच्यांना सांगितलं. " शीतल, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, मी तुझ्या आईबाबांची काळजी घेईन आणि त्यांचा सांभाळ करेन". हे ऐकून मामा मामीला आपल्या भाच्याचे खूप कौतुक वाटले.


शितल चहा आणि नाश्ता घेऊन बाहेर आली आणि तिने सुधीरला सांगितलं. 


" सुधीर तू भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नको, पुन्हा विचार कर".


पण, सुधीरचा निर्णय पक्का झाला होता..."माझा निर्णय पक्का आहे," असं सुधीरने सांगितलं.मग सुधीरने तिच्या आई-बाबांना त्यांचं मत विचारले. शीतलच्या आई-बाबांना हे ऐकून खूप आनंद झाला. सुधीर सारखा मुलगा आपल्या शीतलसाठी शोधून सापडणार नाही हे त्यांना माहित होते.सुधीर आणि शीतलने आई-बाबांचा आणि मामा मामीचा आशिर्वाद घेतला. शितलचे आई-बाबा खूप खुश झाले, सुधीर सारखा चांगला मुलगा आपल्या मुलीला मिळाला, त्यांनी हात जोडून देवाचे आभार मानले. शीतलच्या आईची तब्येत बरी नसल्यामुळे, लग्न साध्या पद्धतीने करायचे असे ठरले. दोन तीन दिवसांनी त्यांनी एखादा चांगला मुहूर्त पाहून दोघांचा साध्या पद्धतीने लग्न लावून दिले. सुधीरने आता घरची संपूर्ण जबाबदारी स्वत:वर घेतली होती. शितलच्या आईची तब्येतीत हळूहळू सुधारणा होत होती. मनोहर पंतांनी आपल्या मुलीचा संसार सुखाचा पाहून मनोमन देवाचे आभार मानले. सगळे खूप आनंदाने राहत होते.शितल खूप खुश होती. आयुष्यात पहिल्यांदाच ती हे सुख अनुभवत होती. आज खऱ्या अर्थाने शितल मोकळा श्वास घेत होती.

आनंद संसार निर्णय आभार

Rate the content


Originality
Flow
Language
Cover design

Comments

Post

Some text some message..