Pranali Kadam

Drama

1.2  

Pranali Kadam

Drama

पत्र

पत्र

3 mins
9.8K


खेडेगावात राहणारी प्रणाली आणि तिची छोटी बहिण संजीवनी, आईवडील लहानपणीच दोघींना सोडून देवाघरी गेलेले असतात. छोट्या बहिणीची सर्व जबाबदारी प्रणालीवर असते. प्रणाली खेडेगावात एका प्राथमिक शाळेत शिक्षिका असते. जे काही थोडी मिळकत मिळते त्यावर त्यांचं उदरनिर्वाह आणि संजीवनीचं शिक्षण चालत असतं. प्रियवंदाचं आपल्या छोट्या बहिणीवर खूप प्रेम असतं. दोघींनाही एकमेकांशिवाय कोणी नसतं. संजीवनी आता आठवी इयत्तेत गेली होती आणि तिला आता पुढील शिक्षणासाठी शहरात जावं लागणार होतं. खेडगावात फक्त सातवी पर्यंत शाळा होती. जवळ होती तोपर्यंत प्रणालीचं आपल्या बहिणीकडे लक्ष होतं, पण आता ती पुढील शिक्षणासाठी शहरात जाणार होती. तिला संजीवनीची काळजी लागून राहिली होती. कारण शहरातलं वातावरण गढूळ असतं, असा तिचा ठाम मत आहे. संजीवनी दुसऱ्या दिवशी निघणार होती, तिलाही आपल्या ताईला सोडून जायला मन होत नव्हतं. जाण्याचा दिवस उजाडला, सगळी तयारी झाली होती. प्रणाली स्वतः तिला सोडायला जाणार होती आणि एक दिवस तिच्या बरोबर राहणार होती. दोघीजणी सकाळी लवकरच घरातून निघाल्या. दुपार पर्यंत शाळेच्या रहवासी निवासस्थानी पोहचायचं होतं. तशी ही शाळा फक्त मुलींची होती, पण तरीही प्रणालीला काळजी लागलेली होती. दोघीजणी निवासस्थानी पोहचल्या, प्रणालीने सविस्तर माहिती घेतली आणि राहण्याची सोय व्यवस्थित आहे का ते बघून घेतलं. संजीवनीचं सगळं सामान व्यवस्थित लावून दिलं , मग दोघींनी थोडासा आराम केला आणि शाळेचा आवार फिरून येऊ, असं प्रणाली संजीवनीला बोलली आणि दोघी बाहेर पडल्या. शाळा छान प्रशस्त होती, शाळेचा आवार खूप सुंदर होतं. शाळेत बगीचा होता, अगदी फुलांनी बाग बहरलेली होती. एकूण शाळेचं वातावरण खूप छान होतं. प्रणालीला शाळा खूप आवडली होती, तिने शाळेचं प्रवेश पत्राद्वारे केला होता, त्यामुळे शाळा कशी आहे हे तिला माहीत नव्हते. रात्री दोघी जेवून लवकर झोपल्या, सकाळी लवकर उठायचं होतं. प्रणाली घरी जायला निघणार होती, तिथे तिची सर्व कामं खोळंबले होते. सकाळी दोघी लवकर उठल्या, सर्व सकाळच्या विधी आटोपल्या. जाण्यापूर्वी प्रणाली आपल्या बहिणीला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगते.

मी, संजीवनीला आपल्या जवळ बसवते आणि तिला काही सुचना देते..,

संजीवनी हे ठिकाण तुझ्यासाठी खूप अनोळखी आहे.

इथे तुला अनेक मैत्रिणी भेटतील,

काही चांगल्या असतील, तर काही वाईट असतील.

तुला इथे वेगवेगळे अनुभव अनुभवायला मिळेल.

अभ्यास खूप मन लावून कर

अनोळखी व्यक्तींशी जास्त बोलू नको.

काही वाटलं तर, तू तुझ्या शिक्षकांना सांग.

मला अधुनमधून पत्र लिही.

असं सांगून मी तिथून निघून येते.

काही दिवस निघून जातात, संजीवनीचं काही पत्र येत नाही. म्हणून मी तिला पत्र लिहिते.

प्रिय संजीवनी,

तुला खूप आशिर्वाद.

पत्र लिहिण्यास कारण की, तुझे पत्र नाही आले. तू कशी आहेस, ठिक आहेस ना? तुला सोडून मी कधी अशी राहिली नाही. तुझी खूप काळजी वाटते, तुझं कसं चालू आहे. शाळेत सगळं ठिक आहे ना? तुझा अभ्यास कसा चालू आहे. बघ, मी किती प्रश्न तुला करत आहे, रागवू नको तू. तुला माहित आहे, तुझी ताई तुझ्यावर किती जीव लावते. येताना मी तुला काही सूचना केल्या होत्या, त्याप्रमाणे तू करतेस ना. पुन्हा तुला मी लिहून पाठवते, त्याप्रमाणे तू सर्व करायचं आहे. मी हे तुला का सांगते हे तुला माहीत आहे. जे माझ्याबरोबर झालं ते तुझ्याबरोबर घडायला नको.

संजीवनी हे जग खूप वाईट आहे, इथे कोण कसा आहे हे आपण ठरवू नाही शकत. पण आपण काळजी घ्यायला हवी. पटतं ना तुला मी काय सांगत आहे ते.

अनोळखी व्यक्तींशी तू संवाद करू नको.

कोणी काही दिले तर ते तू घेऊ नको.

ज्या मुली स्वभावाने चांगल्या आहेत, त्यांच्याशीच तू मैत्री कर.

कोणाबरोबर कुठे जाऊ नको.

शिक्षकांशीसुध्दा तू चार हात लांब रहा.

अभ्यास तू मन लावून कर.

हल्ली शिक्षकसुध्दा मुलींचा गैरफायदा घेऊ लागले आहेत. तू जरा सांभाळून रहा.

बाहेर कुठे गेलीस तर आजूबाजूला नीट बघ, निरीक्षण कर.

अनोळखी व्यक्ती तुझ्याशी गोड बोलण्याचा प्रयत्न करेल, तू बोलू नको.

संजीवनी, तू खूप भोळी आहेस. कोणी काही बोलले की तू लगेच विश्वास ठेवते. तर तसं तू करू नको.

एकटी कुठे जाऊ नको,

तुझ्या शाळेत कराटे क्लास आहे, ते तू शिकून घे. कधीपण ते तुला उपयोगी पडेल.

आता महत्वाची गोष्ट, मासिक पाळीच्या वेळी तुला खूप त्रास होतो. मी तुला औषधांचा पाकीट दिलं आहे, ते तू घेत जा.

खूप छान अभ्यास कर आणि परिक्षेत पास हो.

खूप मोठी हो तू

संजीवनी मी जे सांगितले आहे ते तू जरूर कर.

बस, मी माझे पत्र पूर्ण करते. काळजी घे.

तुझी ताई

प्रणाली



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama