Pranali Kadam

Inspirational

3  

Pranali Kadam

Inspirational

निर्णय

निर्णय

4 mins
1.9K


आजही ती घरी एकटीच होती, नेहमीसारखीच. समिक्षा तिचं नाव, अगदी नावाप्रमाणेच आहे ती. नवरा मुलं सकाळी आपापल्या कामाला निघून जातात. ते तिघे जाईपर्यंत हिची खूप गडबड चालू असते. तिघे दोन मुलं आणि नवरा, त्यांचे डबे, नाश्ता हे सगळं ती बघत असते. तिला पण हे सगळं करताना खूप छान वाटतं. तिचं पूर्ण जग या तिघांच्या अवतीभोवती फिरत असतं. हेच तिचं अस्तित्व असतं, सगळ्यांचं ती जातीने करत असते.

सकाळी बरोबर ती सहा वाजता उठते आणि तशीच ती किचनमध्ये जाते. सगळी आवराआवर तिची चालू असते. मग हळूहळू एक-एक जण उठत असतो. जो तो आपापल्या तयारीला लागतो. अधूनमधून तिघांची आवाज येत असतात,

"समू, माझे कपडे कुठे आहेत?

"मम्मी मला माझी ही वस्तू सापडत नाही, जरा शोधून दे ना."

मग लेकिचा आवाज,"मम्मा, मला माझा हा टॉप सापडत नाही, कुठे आहे. जरा बघतेस का?"

तेव्हा तिला खूप बरं वाटतं, कारण या सगळ्यांचं आपल्यामुळे काहीच नाही. यांच्यासाठी मी खूप महत्त्वाची आहे हे सुख तिच्यासाठी अनमोल असतं. ती सगळं करत असते, एका बाजूला डबा तयार करते. एक एक डबा भरून ठेवते आणि ज्याचा आहे त्याला ती देते आणि दुसरीकडे कोणाला काय हवं आहे हे सुध्दा ती बघत असते.

नंतर तिघे त्यांची तयारी झाल्यावर एक एक जण आपापल्या वेळेत घरातून बाहेर पडतो.

"बाय समू, लव यू."असं बोलून नवरा आधी बाहेर पडतो.

"मम्मी निघतो"

"बाय मम्मा"

असे बोलून सगळे आपल्या कामासाठी निघून जातात.

मग थोड्यावेळाने कामवाली येते, लक्ष्मी

लक्ष्मी आली की मग समिक्षा तिच्या बरोबर थोड्या गप्पा मारते. कधीकधी तिची मुद्दाम मस्करी करते.

लक्ष्मी गप्प असली की मग समिक्षा तिला बोलतं करायची. तिला काहीना काही विचारत राहायची.

"लक्ष्मीजी, आज बहोत गर्मी है।"

"लक्ष्मीजी, आज थंड है।"

असं काही ना काही बोलत असायची.

कधी कधी मुलांची चौकशी करायची. लक्ष्मीला दोन मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. मोठी आहेत आणि लक्ष्मी विधवा आहे. घरकाम करून ती मुलांचं संगोपन करत असते. समिक्षाला खूप वाईट वाटतं. कधी काही गरज असली की तिला ती मदत करते.

लक्ष्मी काम करता करता गप्पा मारत असते. लक्ष्मीचं काम झालं की मग समिक्षा गॅसवर चहा ठेवते. रोज एक कप ती लक्ष्मी बरोबर घेत असते, हा रोजचा दिनक्रम ठरलेला असतो. कधी समिक्षाने चहा नाही घेतला की मग लक्ष्मी तिला विचारायची.

"भाभी, आपने चाय नहीं ली।"

"अरे नहीं, आज मैने जल्दी चाय पी ली।" असं समिक्षा तिला सांगायची.

समिक्षा तिला चहा बरोबर खायला पण द्यायची. दिवसभर काम करायची, मग दिवसभर तिला कुठे काय खायला मिळत असेल किंवा नाही. म्हणून मग थोडंसं ती द्यायची.

लक्ष्मीचं आटपलं की मग ती निघून जायची. जाताना सांगितल्या शिवाय जायची नाही.

"भाभी चलती हूँ।"

लक्ष्मी गेली की मग समिक्षा दिवसभर घरात एकटीच असायची. हे सगळं होईपर्यंत सकाळचे दहा वाजतात. सकाळचे दहा ते रात्रीचे आठ वाजेपर्यंत समिक्षा घरी एकटीच असते. कंटाळा आला की थोडावेळ टिव्ही बघायची, पुस्तक वाचन हे चालू असायचं. पण हे करून तिला कंटाळा येतो. तिला खूप वेळा वाटतं की आपण काही तरी करावं. नवरा आणि मुलं घरातून बाहेर पडतात ते एकदाही तिची चौकशी करत नाही. याचं तिला वाईट वाटतं.

कधी कधी कंटाळा आला तर घरातलं काम कर, कपाट आवर. कुठे काय राहिलं आहे ते बघ हे तिचं चालूच असतं. कधी कधी ती दुपारची झोपून जाते. मग थोड्यावेळाने उठून चहा बनवून एकटीच प्यायची. नंतर मग थोडावेळ टिव्ही सिरियल बघायचे आणि रात्रीच्या जेवणाची तयारी करायची. असं रोजचं दिनक्रम चालू असतं. वेगळं असं काही नसतं, हे ती कित्येक वर्षे करत आहे.

आता समिक्षाला वाटतं की आपल्या स्वत:साठी वेळ काढायला पाहिजे. मग तिने विचार केला की आपली इच्छा होती डान्स आणि गाणं शिकायचं. ते आपण त्यावेळी नाही करू शकलो. आता आपल्याकडे वेळ आहे आणि आपण ते करू शकतो. लगेच ती या कामाला लागली आणि डान्स क्लास व गाण्याचा क्लास शोधायला तिने सुरूवात केली. तिने हे घरी आपल्या मुलांना आणि नवऱ्याला आपला विचार सांगितला. तिघांनी लगेच होकार दिला. मुलं खूप खुश झाले, आपली मम्मी नवीन काही करत आहे आणि मुख्य म्हणजे ती स्वत:साठी काही करत आहे.

आज समिक्षा खूप आनंदी होती, तिने तिच्या आयुष्यात एक चांगला निर्णय घेतला होता. आता ती स्वत:साठी वेळ देवू करणार होती. ती ज्या क्षणाची वाट बघत होती आता ते होणार होतं. मनातून तिला पंख आल्यासारखं वाटत होतं. उद्याची सकाळ ही नवी असणार आहे. आयुष्याचा नवा अध्याय आता ती लिहायला घेणार होती. एक निर्णय घेवून स्वत:चं आयुष्य ती स्वत: घडवणार होती आणि याचाच तिला खूप आनंद होत होता. निर्णय तिचा होता, तिच्यासाठी.....आता फक्त ती सकाळ होण्याची वाट बघत होती. उडण्यासाठी!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational