STORYMIRROR

SWATI WAKTE

Inspirational

3  

SWATI WAKTE

Inspirational

बाल शिवाजी आणि जिजाऊ

बाल शिवाजी आणि जिजाऊ

1 min
938

जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेडराजा येथे झाला. त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले ह्यांच्याशी झाला. शहाजी राजे बंगळुरूला चाकरी करत. त्यांच्या जवळ त्यांचा थोरला मुलगा संभाजी होता. जिजाऊ ह्या पुणे येथील कारभार बघत. त्यांच्या मदतीला दादाजी कोंडदेव हे होते. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरी किल्ल्यावर झाला. जिजाऊ शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच स्वराज्याचे स्वप्न दाखवून राम-कृष्णाच्या, थोर पुरुषांच्या गोष्टी सांगत. समान न्याय कसा करायचा, अपराध्याला शिक्षा कठोर कशी द्यायची ह्याचे धडे देत. ह्या सर्वांचा परिणाम म्हणूनच वयाच्या सोळाव्या वर्षी मूठभर मावळ्यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी आदिलशाहच्या तावडीतून तोरणगड जिंकला आणि स्वराज्याचे पहिले तोरण बांधले.


शिवाजी महाराज जेव्हा मोहिमेवर जात तेव्हा जिजाऊच राज्यकारभार सांभाळत. आग्र्याला जेव्हा शिवाजी महाराजांना कैद केले तेव्हाही कारभार जिजाऊंनी सांभाळला. शिवाजीच्या पत्नी सईबाईंच्या मृत्यूनंतर संभाजी राजांचा सांभाळ करून त्यांनाही जिजाऊंनीच संस्कार दिले. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर जिजाऊंची प्राणज्योत मावळली.


अशा ह्या हिंदवी स्वराज्याचे संस्कार देणाऱ्या जिजाऊंना शतशः प्रणाम 🙏

आणि जिजाऊ च्या छत्रछायेत घडणारे मातृभक्त, संस्कारी, थोर, महान आणि शूर शिवाजी महाराजांना प्रणाम 🙏


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Inspirational