Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

अक्षय काळमेघ

Romance

5.0  

अक्षय काळमेघ

Romance

चाफा... बेधुंद प्रेमातला...

चाफा... बेधुंद प्रेमातला...

8 mins
975


पावसाळ्याचे दिवस होते...नुकताच श्रावण सुरू झाला होता. हलक्या सरी बरसत होत्या.श्रावणातला पाऊस म्हणजे सौम्य,आल्हाददायक,शांत असा...तसा राधाला ही तो खूप आवडायचा.त्याच्या चिंब सरित भिजायला तिला खूप आवडायचं. तस तिला हिरव्यागार झाडांत रमायला खूप आवडायचं.ती स्वतःपेक्षा ही त्या लहान रोपट्यांना जपायची मनातलं सारं त्यांच्याशी बोलायची. राधा तशी साधीशी गोरीपान काळे लांब केस भुरके डोळे अशी छान दिसायला तशीच स्वभावाने छान होती. जेवढी रोपट्यांना जपायची तशी तिने नातीही जपली होती.एक दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. राधा घरी एकटीच होती आज तिला एकट एकट वाटत होत. म्हणून ती बाहेर गेली आणि नर्सरी ला जाऊन तिने काही फुलांची रोपटे आणली. त्यात तीच आवडत रोपट..तो म्हणजे चाफा... तिला चाफा खूप आवडायचा.तिने ती रोपटे बागेत नेऊन ठेवली. आणि थोड्यावेळाने येऊन ती सारी रोपटे लावली. त्यात तिचा आवडता चाफा लावत असताना. तिला हळूच मागून कोणी तरी हाक दिली..."चाफा खूप आवडतो वाटते...आणि काहीही विचार न करता ती हो म्हणाली...आणि मागे वळून बघितलं. तर एक गोरा राजबिंडा शेजारच्या घराच्या बागेच्या भिंतीवरून डोकावून तिच्याकडे पाहत बोलत होता. ती एकदम घाबरली तिने स्वतःला सावरलं आणि म्हणाली...कोण तुम्ही? मी ओळखलं नाही?...त्यावर तो हसत म्हणाला. अरे माफ करा...मी राहुल...जोशी काकांकडे आलोय. काही दिवसांसाठी...पाहुणा म्हणून. जोशी काका राधाचे शेजारी होते. तीच त्यांच्याघरी येणं जाणं होत. त्यावर ती म्हणाली अच्छा...जोशिकाकांचे पाहुणे का...त्यावर राहुलने होकारार्थी मान हलवली...आणि म्हणाला...एक विचारू का..? राधा हळूच हो म्हणाली...त्यावर राहुल म्हणाला...तुम्हाला ही रोपटे ही फुले ही हिरवीगार झाडे खूप आवडतात का? त्यावर राधा म्हणाली हो...मी कधी ही एकटी असली की यांच्यासोबतच अख्खा दिवस घालवते...खूप मनापासून जपते यांना...आणि राहुल ला विचारत बोलली... तुम्हाला ही आवडतात का ही झाडे फुले ?... हो आवडतात न म्हणूनच तर सुट्ट्या घालवायला इथे आलोय...आणि तुम्हाला बघितलं चाफा लावताना तसा मलाही चाफा खूप आवडतो.बाकी खूप झाडे दिसतंय...छान दिसतेय तुमचा बागीच्या...कधी आलो म्हणजे बघितला तर आवडेल न तुम्हाला...? राधा ने होकारार्थी मन डोलावली.आणि तिकडून राधाला तिच्या बाबांनी हाक मारली तशी ती धावत तिथून निघून गेली...राहुल तिच्याकडे बघत होता...आणि हळूच हसत होत...

        राधा घरात जाऊन बाबा जवळ बसली..आणि म्हणाली बाबा मी न आज खूप फुलझाडे आणली तीच लावत होते आणि नेमका तुम्ही आवाज दिला....अरे माफ कर हा बाळा.अग मी चहा केला होता म्हटलं सोबत घेऊ.

अहो बाबा तुम्ही चहा केला पण का मला सांगायचं होत ना ?

त्यावर बाबा म्हणले अग असू दे कधी माझाही हातचा चहा पिऊन बघ...तसा तुझा इतका छान होत नाही पण तरी करावासा वाटला म्हणून केला... तू बस मी आलोच चहा घेऊन... राधाच्या बाबांनी चहा आणला आणि तेवढ्यात पाऊसही सुरू झाला.या अश्या गारव्यात गरम गरम चहाची मज्या काही औरच...दोघांनी ही चहा घेतला...आणि राधा रात्रीच्या स्वयंपाकाला लागली....राधा १२वर्षाची असतांनाच तिची आई देवघरी गेली...तिला तिच्या बाबांनी च वाढवल...हळूहळू तीही सगळीच कामे करायला शिकली. आता तिला पूर्ण स्वयंपाक येतो...तिने काही वेळातच स्वयंपाक पूर्ण केला आणि जेवायला पान वाढली. तेवढ्यात दारावरची बेल वाजली...आणि राधा ने दार उघडले. तर दारावर जोशी काका होते राधा ने त्यांना आत बोलवलं. ते आत येताच त्यांनी राहुलला ही आत बोलावलं.दोघेही आत आले.राहुल राधाकडे पाहून हलका हसला. राधाही त्याच्याकडे पाहून हसली.जोशिकाका आणि बाबा गोष्टी करत बसले. तेव्हा जोशिकाकांनी राहुलची ओळख करून दिली.आणि हेही सांगितलं की राधासारखी राहुललाही झाडांत रमण्यानी आवड आहे.राधाला हे पहिल्याच भेटीत माहीत पडलं होत. आणि हळूहळू सर्वांच्या छान गप्पा रंगल्या खूप वेळ झाला होता.जोशी काका आणि राहुल येतो म्हणून निघून गेले.तशी राधा राहुलला आतमधून बघत होती. रात्र निघून सकाळ झाली. पाऊस ही थांबला होता. राधा उठून पाहिले काल लावलेल्या झाडांना बघायला गेली तर चाफा तिथे कोमेजून पडला होता. काल तिने आणलेला चाफा तिने बरोबर जमिनीत लावलाच नव्हता. मग तिला आठवलं की राहुलने तिला हाक मारली.. त्याच्याशी गप्पा करत असताना तिचे चाफ्या कडे लक्षच राहिले नाही.मंतून तिला खूप वाईट वाटले तेवढ्यात राहुल पुन्हा तिथे आला आणि राधाला म्हणाला...काय झाले तू अशी अपसेट का ?? त्यावर राधा म्हणाली अरे बघ ना काल तुझ्या शी बोलता बोलता मी या चाफ्याला लावयलाच विसरले. अरे राहुल म्हणला...माफ कर हा माझ्यामुळे हा चाफा कोमेजून गेला. अरे तू कशाला सॉरी म्हणतोय माझाच लक्ष नव्हत. बरं ठीक आहे मग पण एक काम कर जर तू मला माफ केलं असशील तर अशी अपसेट राहू नको...तू जरा हस हसताना तू चाफ्यासारखी आणखी सुंदर दिसतेस...

हे ऐकुन थोड लाजून राधा गालातच हसली.इथूनच दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली. राधा लाजून तिथून निघून गेली. राहुल ही मनात हसत होता. 

              काही वेळाने...दारावरची बेल वाजली. राधाचे बाबा आज लवकर परत आले होते. राधा ने त्याच्यासाठी चहा बनवला दोघेही निवांत चहा घेत होते. आज लवकर घरी आले म्हणून बाबांकडे वेळ होता तर राधा आणि बाबा दोघेही राधा च्या बागेत आले खूप सुंदर बाग होती...राधा तिच्या बाबाला सांगत होती तेवढ्यात तिला...चाफा दिसला तिला आश्चर्यच वाटलं. तिने ते चाफा आणला नव्हता. मग इथे चाफा अचानक कसा आला. या विचारात असतानाच तिला राहुल आठवलं. तिला कळलं की त्यानेच हा चाफा आणला असावा. तशी ती बाबांना सांगून जोशिकाकांकडे धावत गेली. आणि काकूला आवाज देत आत आली पण तिला राहुल कुठे दिसत नव्हता. म्हणून तिने काकुलाच विचारले...काकू तुमच्याकडे पाहुणे आले ते गेले का? कुठे दिसत नाही आहे. ?त्यावर काकू म्हणाल्या अग राहुल ना तो बागेत आहे. तुला माहित असेलच त्यालाही तुझासारखीच झाडांची आवड आहे. ये चल मी तुला त्याची ओळख करून देते. काकूंनी अस म्हटल्यावर राधा जरा हसली...नंतर दोघीही घरामागे आल्या. काकूंनी राहुलला हाक मारली. तेवढ्यात राहुल त्या दोघी जवळ आला आणि काय काकू म्हणंनार तेवढ्यात तुला राधा दिसली...तो जरा लाजला...तेवढ्यात काकू म्हणाल्या राहुल ही राधा...शेजारी शिंदे कडे राहते ती त्या रात्री गेला होता न तिथे...राहुलने अनोळखी असल्याचं नाटक केलं कारण हे दोघे तर एकमेकांना ओळखत होते...आणि राधा हा राहुल माझा भाचा...आणि काकू म्हणाल्या राधा राहुल तुम्ही दोघे बसा गप्पा करत मी चहा करते...अस बोलून काकू निघून गेल्या...पण इकडे दोघांना काय बोलावं कळतं नव्हत...मग राधा नेच सुरुवात केली...थॅक्यु हा...तू दिलेल्या चफ्या बद्दल...अग त्यात thanks कसलं मला तुझा तो हिरमुसला चेहरा नाही बघावासा वाटला म्हणून मी तुला दिला...पण जर तुला नसेल आवडला तर राहू दे...तसाही एक मित्र म्हणून मी तुला तो दिला...बाकी तुझी इच्छा...अरे तस नाही... आवडल मला... म्हणूनच तर धन्यवाद म्हणायला आले...बर ते सोड इकडे ये हे बघ हा माझा बगीच्या...कसा वाटला...राधाला पाहताक्षणीच आवडला याआधी एवढा सुंदर नव्हता...पण तू खूप छान झाडे लावली हा...आवडला मला...अशा दोघांच्या गप्पा सुरू होत्या... तेवढ्यात चालता चालता राधा चा पाय घासरला ती खाली पडणारच तसचं राहुलने तिला पकडलं.जशी एखाद्या सिरीयल मधे घडवा असा सीन होता दोघेही एकमेंकांना पकडून...तेवढ्यात काकूंनी त्यांना आवाज दिला चहा तय्यार आहे राधा राहुल या...हे ऐकताच दोघेही सावरले...राहुलने राधा चा हात पकडुन तिला घरात आणलं दोघांनी ही हात पाय धुऊन मग निवांत चहा घेत बसले... आणि गप्पा...

              खूप वेळ झाला होता राधा घरी जायला निघाली. राहुल कडे बघून हसत त्याला पुन्हा धन्यवाद म्हणत निघून गेली..आणि तिच्या रूममधे जाऊन राहुल चाच विचार करू लागली. राहुल ही तिचाच विचार करू लागला.दोंघांच्याही मनात प्रेमाचा अंकुर फुटला होता... आता फक्त ती व्यक्त करण्याची वेळ होती.रात्र झाली.... राधा चे काम आटोपले...ती निवांत जाऊन बाहेर बघत होती...तिला तो क्षण पुन्हा आठवत होता...ती स्वतःलाच प्रश्न विचारत होती की हे काय होतंय...? मला राहुल वर प्रेम तर नाही ना झालं? हे मनाला काय होतंय. का फक्त राहुलची ओढ लागली आहे...अश्या अनेक प्रश्नांनी तिला घेरल होत.

तेवढ्यात राहुल तिथे आला आणि म्हणाला...राधा हे प्रेम आहे जे तुला माझावर झालंय...आणि मला तुझा वर...हे ऐकुन राधा लाजून खाली बघते...तसचं राहुल गायब..बघते तर काय की तो तिला झालेला भास होता...ही रात्र त्याच्याच विचारात जात होती...तिकडे राहुल ही राधाच्याच विचारात होता...दोघांच्याही मनात एकमेकांविषयी प्रेम होत...राहुलने ठरवलं की मनातलं राधाला सांगायचं...

ती रात्र विचारात जाते...सकाळी सकाळीच राहुल...बगीच्याच्या तिथे राधाची वाट बघत बसतो.पण राधा तिथे येत नाही...तो काकूला विचारतो तर ती सांगते की राधा आणि तिचे बाबा सकाळीच गावी गेलेत...हे ऐकुन राहुलचा चेहरा उतरतो...आणि दुरूनच त्या चाफ्याकडे बघतो.. आणि त्याला तिथे राधा असल्याचा भास होतो..तसचं तो हसतो...पण क्षणात ती तिथे नसते...मग मात्र तो हसतो...आणि राधा ची वाट बघत बसतो...

           तीन चार दिवस उलटून ही राधा परत येत नाही. राहुलचं मन मात्र वाटेकडे डोळे लावून बसल होत. तिकडे राधाचं ही मन कशातच लागत नव्हत. ती यायला तय्यार नव्हती पण बाबांनी आग्रह केला म्हणून तिला जावं लागलं.

काही दिवस आठवणीत गेले... राहुलच्या सुट्ट्या संपत आल्या होत्या त्यालाही जॉब वर जावं लागत होत...इकडे राधाचं अजून ठरल नव्हत...तिच्याशी बोलणे पण होत नव्हत...राहुलला उद्या जायचं होत.संध्याकाळची ट्रेन पकडून. पण त्याच मन लागत नव्हत.त्याला फक्त राधाला भेटायची ओढ लागली होती..पण तो दिवस आला राहुलने नाईलाजाने तयारी केली...काका काकुना नमस्कार करून तो निघाला...

जाता जाता एकदा त्याने त्या चाफ्या कडे बघितल....आणि त्याच्या प्रवासाला लागला...स्टेशन वर पोहताच ट्रेन आली होती तसचं तो ट्रेन मधे चढला...

    आणि नेमकी त्याच ट्रेन मधून राधा उतरली होती. तिलाही राहुलला भेटायची ओढ लागली होती...ती आणि तिचे बाबा घरी पोहचले...तशीच ती त्या चाफ्या जवळ गेली आणि तिथून जोशिकाकांच्या बागेत बघितल पण तिला तिथे कुणीच दिसल नाही.मग ती तशीच काकांच्या घरी गेली.पण तिथेही तिला राहुल दिसला नाही..तिने काकूला विचारले तर काकू म्हणल्या की तो आजच गेला. हे ऐकताच...राधाचं मन भरून आल.ती तशीच घरी परत आली आणि बागेत येऊन रडू लागली.तोच कुणी तरी तिच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणल्या...राधा रडू नको.मी आहे न तू काळजी करू नको आधी रडण थांबावं. राहुलने जाता जाता मला तुझ्यासाठी पत्र दिलंय...मी पत्र वाचलं. आणि मला सगळं कळलय.आणि हे मी काकांनाही सांगितलं. आणि हे बघ काकांनी तुझा बाबाला ही सांगितलं...म्हणून काळजी करू नको आम्हला तुमचं प्रेम मान्य आहे आणि आम्ही ठरवलं की लवकरच तुमचं लग्न ही लावावं...मी आजच राहुलच्या आईबाबला बोलते...हे ऐकुन राधा काकूंना बिलगली आणि रडू लागली...तेवढ्यात तिचे बाबाही आले आणि तिला समजावत घरात नेलं...

रात्री काकूंनी राहुलच्या आईबाबाला सर्व सांगितलं.तसा राहुलच्या आईबाबाचाही नकार नव्हता. 

आणि दोन तीन महिने निघून गेले. पावसाळा संपला आणि गुलाबी थंडीचा ऋतु आला..आणि लवकरच राहुल आणि राधा च्या लग्नाची तारीख पक्की झाली...

पण दोघांनीही अजून मनातलं प्रेम व्यक्त केलं नव्हत. 

म्हणून राहुलने राधाच्या बाबांची परवानगी घेऊन दोघं ही बाहेर फिरायला गेले...राधा कधी अशी कोणासोबत बाहेर आली नव्हती...पण राहुल सोबत तिला सेफ वाटत होत..

दोघंही रात्री जेवायला गेले...तिथेच राहुलने राधाला आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. आणि लग्नाची मागणी घातली राधा नेही होकार दिला... असाच प्रेमाच्या सोबतीने

आनंदी क्षणात दोघांच्या संसाराचा प्रवास सुरू झाला...हे पाहून

त्यांच्या प्रेमाची साक्ष देत असलेला तो चाफाही फुलून आला होता...आणि सुगंधात न्हाऊन गेला होता.....

     


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance