स्कंदमाता
स्कंदमाता
शारदीय नवरात्री
आराधना स्कंदमाता
दिन ललित पंचमी
कार्तिकेय पुत्र माता
स्कंद बाळ घेई ओटी
चतृर्भुज महेश्वरी
पद्मासनी विराजित
नाश असुरांचा करी
शुभ्र कांती अलौकिक
सिंहासनी इच्छापूर्ती
नारी शक्तीचे सामर्थ्य
देई उर्जा दिव्यशक्ती
शौर्य कर्तृत्व दाखवी
मोक्षदायी अधिष्ठात्री
पुत्र प्राप्ती फलदायी
यशस्विनी विद्यादात्री
महाकाव्य कालीदास
विद्वानांची काव्यस्फुर्ती
देश कल्याणा धावशी
करू सदैव आरती
