मरणाने सुटतात का सारे प्रश्न
मरणाने सुटतात का सारे प्रश्न
मरणाने सुटतात का सारे प्रश्न?
बायको, मुलांना टाकून
मरणाला तू कवटाळलेस
म्हणून तुला वाटते का
सारेच प्रश्न सुटलेत?
तरूण बायको पुढे काय करील
चिमुकल्या बाळाला कसे सावरील
हा प्रश्न नाही पडला तुला
तू मात्र मरणाला कवटाळून
झालास की रे मोकळा
संकटाला सामोरे जाण्याचे
नव्हते का रे तुला बळ?
स्वत:चाच विचार करून
तू काढलास की रे पळ
******************