अस्पष्ट आवाज
अस्पष्ट आवाज
1 min
733
काही अस्पष्ट आवाज येतो कानी
"वाचवा, मला वाचवा" असा
"बाबा, आई, डॉक्टरकाका,
मला वाचवा हो
जगात यायचंय मला
काही करायचंय मला
शिकायचंय काही आणि
अनुभवायचंही मला
अहो, मोड अजून अंकुरायचाय
आत्ताच त्याला खुडू नका
मला मोठं व्हायचंय
मला मारून टाकू नका
मला जग पाहू द्या
मला जगात येऊ द्या
मला जगात येऊ द्या"