akshata alias shubhada Tirodkar

Fantasy Inspirational

4.3  

akshata alias shubhada Tirodkar

Fantasy Inspirational

यंग कपल

यंग कपल

3 mins
208


(सकाळची वेळ होती देवधर आजोबा नेहमी प्रमाणे पार्क मध्ये मॉर्निंग वल्क करत होते ट्रॅक पॅन्ट टी शर्ट कानात एअर फोन असा त्याच्या पेहराव होता ते सगळयांच्या कुतुहुलचे विषय बनले होते आठ दिवसच झाले होते त्याना असा पेहराव चढवुन जो तो त्यांना पाहून हसत होता पण देवधर आजोबानी लोकांचे म्हणे मनावर घेतले नाही )

असेच एके दिवशी देवधर घरी परतले ते काहीतरी घेऊन 

"अगं ये ऐकतेस का "

"हो आले काय झालं आणली का भाजी "

"हो आणि गंमत पण आणली आहे "

"गंमत "?

"हो "

"हे बघ" 

"काय?" 

" कपल डान्स कॉम्पेटिशन चा फॉर्म "

"काय "?

"कोणासाठी "

"आपल्या साठी आपण दोघे भाग घेतोय "

"काय वेड लागलं का ह्या वयात तुम्हाला तुम्ही पेहराव बदलात तर केवढी कुजबुज झाली डान्स केला तर "

"अगं लोक तसेच असतात फक्त बोलण्यासाठी आपण लक्ष द्याच नाही "

"तरी पण ह्या वयात" 

"का म्हतारपणात डान्स करणे पाप आहे "

"तसे नव्हे पण शोभत का ?"

"न शोभायला काय झालं आम्ही काही चोरी करतो का आणि आम्ही जोडीने असणार ना "

"तरी पण मुलं काय म्हणतील "

"त्याच काय अमित तर अमेरिकेला आहे आणि आपली अवनी आपल्या सासरी आणि कळ तर त्याना पण आपला अभिमान वाटेल त्त्याच्यासाठी आम्ही आपली आवड निवड सोडून दिलेली मग आता आपण आपली आवड निवड जपायला नको का "?

"तरीपण हे अति होतोय आपण आहेत त्यात खुश आहोत मग कशाला हा नसता उठाठेव "

"ते मला काही माहित नाही आणि काय गं तू तर एक उत्तम डान्सर असताना अशी बोलतेस "

"हो होते मी आता नाही आहे आणि आता आपल्याला झेपणार आहे का सोडून द्या तो विषय "

"मला माहित आहे कलाकार आपल्या कलेवर जन्मभर प्रेम करतो तसेच तू हि करते तुच्या मनात आहे पण लोक काय म्हणतील हेच ना "

"नाही नाही कोणी सांगितलं माझ्या मनात आहे म्हूणन "

"हो का परवा च्या दिवशी टीव्ही वर गाणे लागले तर तुच्या किचन मध्ये डान्स स्टेप पहिल्या मी "

"ते सहज होत्या "

"हो का आपण भाग घेणार म्हणजे घेणार "

"अहो पण "

"तयारी ला लाग "


(दुसऱ्या दिवशी भरलेला फॉर्म घेऊन डान्स ऑफिस मध्ये नाव नोंदणी करून आले आणि हि बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली कुजबुज सुरु झाली )

संध्यकाळी अभिनंदन करायला कमी पण टीका करणाऱ्याची गर्दी घरी जमू लागली 

सगळ्याच ऐकू घेतल्या नंतर देवधर आजोबानी बोलायला सुरुवात केली 

"धन्यवाद तुम्ही सगळे इथे आम्हला प्रोत्साहित करण्यासाठी आला आहात पण माफ करा तुमचा टीकेचा सूर जरा जास्त वाटतोय आम्ही वयस्कर म्हूणन भाग घेणे योग्य नाही असे तुम्हाला वाटते तुम्ही आमच्या आरोग्यच्या काळजी पोटी म्हणत असाल पण का व्यसकर माणसांना मन नसत मी माझा पेहराव बदला तर म्हतारपणची थेर म्हूणन काहींनी मला हिणवलं वयस्कर लोकांनी जगायचं कसं ज्या वयात आम्ही हे करायला हवे होते तेव्हा नोकरीच्या जबाबदारी अटकेलेलो मग संसार मग मुलाचं भविष्य उज्वल करण्यासाठी आपली आवड निवड बाजूला सारून आम्ही त्यात पडलो आता कुठे मुलांना शिकून सरवून त्यांना संसारात रमवून आता कुठे आम्हला वेळ मिळाला तर वय मध्ये आलं यात चूक आमची आहे का सांगा ना आणि आपल्या आयुष्यातल्या सहवासाचे शेवटचे क्षण तरी मनासारखे जावे हीच इच्छा आहे आमची तर आम्ही टिके ला भरी पडलो ह्या तुमच्या आजी लग्ना पूर्वी डान्स शिकवायच्या पण लग्नानंतर ‌संसारात‌ इतक्या रुळल्या की बिचारीने‌ डान्सचा ‌नाद सोडला मग तिने‌ आता नाच केला ‌तर‌ काय बिघडल‌ म्हातारं पण नुसतं देवदेव करत बसायचं का अखेरच्या क्षणाला जीवनाचं काही तरी सार्थक केल्याच समाधान वाटायला हवे की नको ‌आम्ही आमच्या आरोग्याची काळजी घेऊन‌ आमचे छंद जोपासणार आहोत त्यामुळे कोणाला ही आमचा त्रास होणार नाही तुम्ही इथे आलात पण आमची साथ द्यायची नसेल तर कृपया आम्हाला हिणवु तरी नका "

"अहो आजोबा खरंच आम्ही चुकलो आम्ही तुमच्या सोबत आहोत जिंकुन यायचं हं"

"यंग कपलसाठी हिप हिप हु्र्रे ...सगळ्यांनी एकच कल्ला केला"


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy