Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Neha Khedkar

Tragedy


2  

Neha Khedkar

Tragedy


व्यथा एका म्हाताऱ्याची...!

व्यथा एका म्हाताऱ्याची...!

2 mins 187 2 mins 187

आपला देश हा गरीब लोकांचा देश म्हणून प्रसिद्ध आहे. ,ते उगाच नाही. जिथे आजही अनेक ठिकाणी रस्ता नाही आहे तर अनेकठिकाणी वीज निर्मिती सुद्धा होत नाही.ना दवाखाना आहे ना शाळा ,कॉलेज आहे..लोकांना पिण्यासाठी आजही पाणी नाही. मुलांना शाळेत जायला नीट रस्ता नाही. या ठिकाणी अजूनही नीट वीज पोहोचलेली नाही. मोबाईल रेंज तर नसतेच मात्र, मोबाईल चार्ज करण्यासाठी कधी कधी 4 किलोमीटर जावं लागतं. अशातच म्हाताऱ्याचे डोळे भरून आले. गावाचा सर्वे करायला आलेल्या

तहसीलदाराला आपल्या मनातील भाव डोळ्यातून प्रगट होत होते...


गडचिरोली जिल्ह्यात एका लहान गवातील हे एक होतं. आदिवासी भागात ..महामार्गावर असलेलं हे एक छोट गावं. आदिवासी ठाकूरवाडीकडं यांची गाडी कधीच वळत नाही. त्यामुळं हे गावं कायमच विकासापासून वंचित राहिलं. तितक्यात तोंडावर सुरकत्या पडलेली 70 वर्षाचा म्हतारा डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन चालत होता. सोबतीला त्याची म्हातारी पण होती. वाडीवर कोणीतरी नवखं माणूस येत असल्याचं तिला समजताच, ती जरा थबकली आणि तो म्हातारा ही... आणि धापा टाकत आमची चौकशी केली. तेव्हा आम्ही तिला आमची ओळख करुन दिली. आणि पाण्याच्या समस्येबाबत विचारलं.


एका घरापासून पुढं जात असताना, एक म्हातारा बसला होता. त्या म्हाताऱ्यला रोजगाराचं साधन विचारलं असता, त्याने त्याची कैफीयत मांडली. आम्हाला जंगलात जावं लागतं, शेती करण्यासाठी पण फॉरेस्ट चे अधिकारी त्रास देतात. तसंच जगावं लागतं. शेतीत काहीच नाही’ धापा टाकत म्हातारी बोलत होता...


आमच्या वस्तीवर लाईट कधी येते तेच कळत नसल्यानं ५-६ किलोमीटर वर जाऊन मोबाईल चार्ज करावा लागतो. मात्र, चार्ज केलेल्या मोबाईलला नेटवर्क नसल्याचं त्याने सांगितलं. त्यामुळं महत्त्वाचा निरोप देता येत नाही. असं म्हणत गावात रेंज नसल्यानं आम्हाला जर महत्त्वाचं काही बोलायचं असेल तर डोंगऱ्याच्या कपारीला जावं लागतं. असल्याचं त्याने सांगितलं.


मला पण थोडंफार कळतं. मराठी लोक येतात, म्हणतात… तुम्ही मतदान करा आम्ही तुमची सुविधा करु. मात्र, सगळी फसवणूक... आम्हाला घरकूल नाही देत. आमची सगळी फसवणूक करतात. आम्ही शेती करतो, पण फॉरेस्ट लोक आम्हाला त्रास देतात. तिकडं सरकार स्थापन होत नाही… आम्ही गरीब लोक काय करणार ओ…’

एका दमात त्याने गाव ते राज्याचं राजकारण अशा लोकांचा प्रवास विषद केला आणि परत पुढच्या प्रवासाला सज्ज झाला...


Rate this content
Log in

More marathi story from Neha Khedkar

Similar marathi story from Tragedy