Anuja Dhariya-Sheth

Inspirational

4.0  

Anuja Dhariya-Sheth

Inspirational

व्यायामाचे महत्व

व्यायामाचे महत्व

4 mins
419


आपण या कथेत कुमारिका मंगळागौर बघणार आहोत जी काही गुजराथी लोकांमध्ये मुलीला पाळी यायच्या आधी म्हणजे ११-१२ हे वय वर्ष होण्याआधी करतात.


तन्वीच्या मंगळागौरीची तयारी जोरात सुरू होती.. तिची आजी कांचन यांना या साऱ्याची एवढी हौस कि काही विचारू नका.. तन्वी लहान असल्यामुळे तिला बाकी काही कळंत नव्हते. पण, पाच दिवशी पाहुणे येणार, आपले कौतुक होणार.. नवीन नवीन ड्रेस घालायला मिळणार म्हणून खूप खुश होती ती..


तीच्या आईने तनुजाने तर तिच्या साठी खूप महागडे ड्रेस घेतले होते. मेकअप, फोटो काही विचारू नका.. शाळा अभ्यास या सार्याला सुट्टी त्यामुळे तन्वी खुपच खुश होती. हळू हळू पाहुणे मंडळी घरी येऊ लागली..


आजी तर कोडकौतुक करून दमत नव्हती.. जागरण, खेळ सर्वच गोष्टींची तयारी अगदी जोरात होती. आज हातभर मेहंदी काढून तन्वी बसली. आजी तिला भरवत होती, तिचे प्रत्येक काम अगदी लक्ष देऊन करत होती.


पाहुणे आल्यापासून तनुजाला तर एक मिनिट सुद्धा उसंत मिळत नव्हती. मोठा मुलगा तनय सुद्धा सर्व काम बघत होता. आजीने सर्वांना पाच दिवशी असलेले वेग वेगळे कार्यक्रम समजावून सांगितले..


एक दिवस शाळेचा ग्रुप, एक दिवस सोसायटी मधील सर्व, एक दिवस दोघांच्या ऑफिसमधले आणि आजींच्या मैत्रिणी... आणि शेवटचे दोन दिवस सर्व नातेवाईक.. रोजचे वेगवेगळे मेनू सुद्धा त्यांनी अगदी प्रत्येकाचा विचार करून ठरवले होते..


मंगळागौरीचे खेळ काही सर्वाना येत नव्हते, सगळ्याजणी हाशहूश करू लागल्या. दमल्या तेव्हा हसुन आजीने सर्वांनाच चार गोष्टी समजावून सांगितल्या.. या खेळांमधून व्यायामाचे महत्व समजावून सांगितल.. या वयात मुलींमध्ये खूप बदल होतात. तसेच या मुलींच्या आया सुद्धा वयाच्या ३५-४० या वयोगटात असतात. मुलीच्या मंगळागौरीचे निमित्ताने त्यांना सुद्धा आपल्याला व्यायामची किती गरज आहे समजते. लग्न झाल्यावर येणार्या जबाबदार्या, बाळंतपण, संसार, मुले यात स्वतः साठी वेळ देता येत नाही.. किती ठरवल तरी व्यायामाची ऐशी तैशी होतेच.. आता मुले मोठी झाली की आपल्याला थोडा वेळ मिळतो.


खर तर व्यायाम आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग असायला हवा,म्हणून व्यायाम हा लहानपणापासुनच करायला हवा म्हणजे शरीराला आणि मनाला त्याची सवय लागते.पण आपली जीवनशैली अशी आहे कि त्यात व्यायामाला वेळ आपण ठेवत नाही

वय वाढलय, आता कोण बघतय असे विचार मनात आणण्या पेक्षा, वय वाढले तरी ही graceful दिसतेय असे आपण रहायला हवे.. फक्त दिसण्यासाठीच नाही तर आपल्या आरोग्यासाठी देखील हे गरजेचे आहे.

वयपरत्वे हालचाली मंदावतात.. आणि व्यायामाअभावी अजूनच अवघड होत जातात..


म्हणून आपल्याला सोपे सोयीस्कर होतील असे व्यायाम प्रकार तरी निदान करायलाच हवेत..मग ते योगासने असोत, चालणे असो, जॉगिंग असो वा न्रृत्य प्रकार असोत.. झुंबा देखील करू शकतो.. जिम मधे जाणे आवडत असेल तर ते करावे..


कोणाला पोहायला आवडत असेल, कोणाला सायकलस्वारी भावत असेल.. तर कोणी बॅडमिंटन किंवा टेबल टेनिस खेळाडू असतील.. पण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात व्यायाम हा करत राहायलाच हवे..

शाळेत असताना ह्यातील काही ना काही प्रत्येक जण करत असेलच.. तीच आवड आपल्याला आजही जपायची आहे..


पुर्वीच्या स्री चे जीवन बघितले तर विहिरीतुन पाणी काढणे;जात्या वर दळणे; रवी ने ताक घुसळणे असो किंवा एकत्र कुटुंबात एवढ्या मोठ्या प्रमाणात पोळ्या किंवा भाकरी करणे हि शरीराला कसरत करवणारी कामे होती.अगदी मंगळगौरीचे खेळ असो त्यात हि कसरत असायचीच. पण काळाच्या ओघात हे आता जवळ जवळ बंद झाले आहे त्यामुळे आता स्री ने स्वतःच्या व्यायामा कङे विशेष लक्ष द्यायला हवे.


शरीराच्या व्यायामाइतका मनाचा व्यायाम;" दि माईन्ङ जिम" चा पण विचार करायला हवा असे वाटते.वाढत्या वयात संसाराच्या रगाङ्यात मन थकते; अशा वेळी मेङिटेशन बरोबरच मन प्रसन्न होईल असे गेम खेळणे; वाढत्या वयात स्मरणशक्ती कमी होते त्यासाठी स्मरणशक्ती वाढवणारे वेगवेगळे गेम खेळणे:

कोङी सोङवणे; भाषा व गणित.संबधी खेळ खेळणे ह्या मुळे मनाची शक्ती वाढते.निरोगी मन असेल तर शरीर पण निरोगी राहते;आत्मविश्वास वाढतो; आपण कोणावर अवलंबून रहाणार.नाही; स्वत स्वतःची कामे करू शकतो हा विचारच शरीर व मन प्रसन्न करतो.शरीर चांगले रहाण्यासाठी मन निरोगी रहाणे;सकारात्मक रहाणे, त्यामुळे मानसिक व्यायाम करणे फार गरजेचे आहे.


घरातील कामे करून आपली शाररिक कसरत होते पण मनाचे काय? आपल शरीर हे काही काम करायचे यंत्र नाही; केलेल्या कामाचा; आनंद आपण तेव्हाच मिळवु शकु जेव्हा.मन प्रसन्न असेल. नाही तर बरेच वेळा कसरत करायची म्हटले कि आपल्याला न कळत टेंशन येते.कारण स्वतः साठी वेळ काढणे हे मोठे काम.वाटते. जी स्वतःवर प्रेम.करते तिच व्यक्ती स्वतः साठी वेळ काढण्याचे महत्व समजते. म्हणुन मनाला आनंद वाटेल असे काही छंद पण स्वतःला हवे.म्हणुन आधी मन प्रसन्न करावे म्हणजे शरीर पण नविन बदलाला तयार होईल.कारण नव्याने जेव्हा व्यायाम.सुरू करतो बरेच वेळा शरीरात ताप आल्या.सारखा दुखाव सुरू होतो आणि मग व्यायामाचा उत्साह.संपतो

अशा वेळी सुरूवातीला एकदम.कमी प्रमाणात.सुरूवात करून; शरीर व मन तयार होईल तसे हळुहळु प्रमाण.वाढवावे.ह्या सर्वा साठी आधी स्वतः वर खुप प्रेम करावे म्हणजे आपण स्वतः साठी स्वतंत्र;स्पेशल वेळ काढणे जमु शकेल. स्वतः ला महत्व देऊन स्वतः चा स्वतंत्र विचार करणे हे मनाच्या व्यायामाचा पहिला टप्पा आहे.आधी मनाची तयारी करा आणि मग शरीराला कसरतीसाठी तयार करा.


व्यायामामुळे शरीर लवचिक आणि हलके फुलके रहाते..

स्फुर्ती - उर्जा दिवसभर आपल्या सोबत रहाते..

तारुण्य टिकून रहाते..


आजीचे बोलणे ऐकून सर्वानी मनात तयारी केली. तन्वीच्या मंगळागौरी साठी जमलेल्या सर्वच जणींनी व्यायामाचा संकल्प करायचा ठरवला आणि तो अमलात आणला. पुढच्या वर्षी या सर्वजणींनी मंगळागौरीच्या गाण्यांमधून योगाचे सोपे आणि सहज जमतील असे प्रकार एकत्र येऊन करून दाखवले. तन्वीच्या मंगळागौरीचे निमित्ताने का होईना पण सर्वाना व्यायामाचे महत्व पटले म्हणून आजीला म्हणजेच कांचन ताईंना खूप आनंद झाला..


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational