arun gode

Tragedy

4.0  

arun gode

Tragedy

वृद्ध म्हातारा दिवाणजी

वृद्ध म्हातारा दिवाणजी

5 mins
202


भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे शेती व्यवसाय. प्राचीन काळापासून शेती ही भारतीय मूलनिवासियांचा प्रथम व्यवसाय होता आणी आजही आहे. कोरोना महामारीतही याच व्यवसायाने देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ दिला आहे. जुन्या काळ्यात ग्रामीण अर्थव्य्वस्था ही शेतीशी निगडित असायची. गांवात काही देशमुख, पाटिल हे जमिनदार असायचे. त्यांच्या जवळ भरपुर शेती असायची. पूर्ण शेतीची व्यवस्था बघण्यासठी गडी- माणसा सोबत एक विश्वासपात्र असा माणुस देशमुख, पाटिला जवळ असायचा.त्याला दिवाणजी म्हणतात. तो शेतिचा कारभार, शेत मालकाच्या वतीने बघायचा. बहुतेक या विश्वासपात्र दिवाणजीचे जीवन याच शेतमालकाच्या सेवेत खर्च होत असे.अशाच एका दिवाणजीच्या सेवे बद्दल त्याचा मालक हयात नसतांना काय घडते हे आपण समोर जाननार आहो. 


   एक जमीनदाराकडे एक विश्वासपात्र दिवाणजी होता.तो त्या मालका कडे आपल्या तरुण पणा पासुन नौकरी करत होता. त्या घरात मालका नंतर सम्मानाने ओळखला जाणारा व्यक्ति म्हणजे गणु दिवाणजी. तो शेत मालकाचे, शेती पासुन तर घर दाराचे सर्व कार्य बघायचा. घरात काही समस्या निर्माण झाली तरी त्याची विलेवाट लावण्याचे कार्य गणु दिवाणजी करणार !. मालक जीवंत असे पर्यंत गणु दिवाणजीना फार किंमत त्या घरात होती. शेत मालक फार वृद्ध झालामुळे मालकाने पूर्ण कारभार आपल्या जेष्ठ मुलाला दिला होता. जेष्ठ मुलाला सांगितले कि हे मुला आपले गणु दिवाणजी हे तुला पिता समान आहे. तु जसा माझा आदर राखतो तसा तु त्यांचा पण राखत जा. ते आपले फार विश्वासपात्र दिवाणजी आहे.या व्यवसायात त्यांचा अनुभव माझ्या पेक्षा ही दाडंगा आहे. तुला त्यांच्या पासुन बरेच काही शिकता येईल. त्याचा फायदा जीवनात समोर तुला आणी आपल्या कुटंबाला नक्कीच होणार. 


    वडिल जीवंत असे पर्यंत मुलाने गणु दिवाणजी सोबत मतभेद असातंना सुध्दा जुळवुन घेतले. या गोष्टिची जानीव शेत मालकांच्या पण लक्ष्यात येत होती.पण हा मतभेद म्हणजे पिढीचे अंतर समजुन शेत मालक त्याकडे दुर्लक्ष करायचा. अचानक एक दिवशी शेत मालकाचा मृत्यु झाला.त्यामुळे गणु दिवाणजीला फार दुःख झाले. त्यातुन ते कसे-बसे बाहेर निघाले. आणी आपल्या मालकाच्या परिवाराला आता आपणंच सांभाळले पाहिजे. हे आपले कर्तव्य समजुन तो मालकाच्या मुलाला जिथे तो चुकत असे, तीथे मार्गदर्शन करनाचा प्रयत्न करत असायचा. पण शेत मालकाच्या मुलाला ही ढवळा-ढवळ आवड नसत. त्यामुळे तो गणु दिवाणजीचा नेहमी अपमान करत असत. सारख्या अपमानामुळे शेवटी गणु दिवाणजीनी निर्णय घेतला कि आता आपल्याला चाकरी करायची नाही. आणी गणु दिवाणजी ने चाकरी सोडुन दिली. पण मनाने ते फार दुःखी झाले होते. आपन आपल्या मालकाला दिलेले वचन शेवट पर्यंत निभऊ शकलो नाही. आपन त्या परिवाराची आपल्या शेवटच्या घटके पर्यंत सेवा करु शकलो नाही. या खंतमुळे ते सारखे चिंतित व नाराज असायचे. आणी गावठाण्यातील एक घनघोर चिंचीच्या झाडा खाकी पडुन सारख्या विचारात राहचे. त्यांना अशा परिस्थित बघुन गांवातील तरुण-जेष्ठ मंडळी पण दुःखी होत असे. हे त्या झाडा वर असणारया भूताला पण लक्षात आले. आणी त्याने गणु दिवाणजीची मदत करन्याचे ठरविले.


    त्यासाठी त्याने त्या शेतमालकाकडे चाकरी करण्याचे ठरविले. तो मग शेतमालकाकडे चाकरी मागण्यासाठी गेला. मालकाने त्याला विचारले अरे तु या गावात नवीन दिसतो. याच्या पहिले मी तुला कधी बघितले नाही. त्यावर तो म्हणाला मालक मी बाजुच्या गावात राहत असतो. मी तुमच्या वडिलांना आणी तुमचे गणु दिवाणजींना पण ओळखतो. ते सध्या कुठे दिसत नाही आहे ?. त्याने पुष्कळ जुन्या वडिला संबंधीत गोष्टि त्या शेत मालकाला सांगितल्या होत्या. त्यामुळे त्याचा त्याच्या वर एकदम विश्वास बसला. त्याने सांगितले गणु दिवाणजी आता फार म्हातारे झाले आहे. त्यांची विवेक बुध्दी पण आता पहिले सारखी काम करत नाही. त्यामुळे त्यांना मी आता विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे मला आता एक होतकरु विश्वासपात्र नविन जवान व चतुर दिवानजीची आवश्यकता आहे. तु त्यांचा कारभार सांभाळू शकशील कां ?. आनी तु किती पगार घेणार. तेव्हा तो भूत म्हणाला मालक मी ते सर्व काम करनार जे तुम्ही मला सांगनार आहे. त्यासाठी मला काही पगार वैगरे नको. अरे असे कसे हे शक्य आहे कि तु काही पगार न घेता सर्व कामें करनार. हो मालक मी करणार सर्व कामें . पण माझी एक अट आहे. ती तुम्हाला पूर्ण करावी लागेल. स्वार्थापायी त्याने त्याला आपली अट ठेवावयास सांगितली. मालक उद्यापासुन कामाला आल्यावर माझे एक काम संपले की मला दुसरे काम लगेच सांगा. जर तुम्ही मला दुसरे काम दिले नाही तर, मी तुमच्यावर हल्ला करीन आणी तुम्हाला ठार करुन टाकेल! अट मंजुर असेल तर सांगा. नाही तर मी चाललो. शेत मालकाने थोडा विचार केला की आपल्याकडिल सर्व माणसांना आपण काढून टाकू. मग आपल्याकडे याच्यासाठी कामच काम असणार. क्षणात विचार केल्यानंतर त्याने होकार दिला.


     ठरल्याप्रमाने तो भूत दुसरया दिवशी कामाला आला. मालक काम सांगत जात होते. आनी भूत तो लगेच करुन टाकत होतो.आनी पुन्हा-पुन्हा मालकाला काम सारखे मागत जात असे. भितिपाळी तो सारखे काम सांगत जात होता शेवटी त्याच्या कडे सांगायला काम काही उरले नाही. जर आपण याला काम सांगितले नाही तर हा आपल्या वर हल्ला करनार आणी आपल्याला ठार मारणार ! या भितिने काय करावे त्याला समजत नव्हते. शेवटी त्याला आपल्या वडिलांनी दिलेला सल्ला आठवला. आनी तो लगेच धावत- धावत गणु दिवाणजी कडे गेला.त्यांचे चरण स्पर्ष करुण त्यांची क्षमा मांगितली. आपल्या वर आलेल्या संकटा विषयी माहिती दिली.


    सर्व माहिती मिळाल्यावर गणु दिवाणजींच्या लक्ष्यात सर्व बाबी आल्या. आणी जुने सर्व मन-मुटाव विसरुन मालकाच्या मुलाची मदत करण्याचे ठरविले. शेतमालक गणु दिवाणजीच्या सोबत आपल्या घरी गेले . त्या भूताला सांगितले अरे बाबा तु काम करु-करु थकला अशील. आता पुरे कर. पण तो म्हणाला गणु दिवाणजी जर मला तुम्ही किंवा तुमच्या मालकाने काम जर सांगितले नाही तर मी तुमच्या मालकांवर ठरलेल्या अटी प्रमाने नक्कीच हल्ला करणार. आणि त्याला मारुन टाकनार.शेवटी गणु दिवाणजीने आपली अक्क्ल लढवली. त्याला एक मल्लखांब तयार करण्यास सांगितले . व समोरच्या अंगनात गाडन्याचा हुकुम दिला. भूताने तो मल्लखांब समोरच्या अंगनात गाडला. शेवटी गणु दिवाणजी ने त्याला मलखांब वर, खाली आनी वर, असे वर –खाली करन्यास जो पर्यंत मी नाही म्हणुन सांगत नाही ,तो पर्यंत थांबायचे नाही असे खडसावुन सांगितले. तो पर्यंत सारखे खालुन वर व वरुन खाली करत राहयचे काम सांगितले. आणी तो असे करायला लागला. शेवटी भूत गणु दिवानजीला नतमस्तक झाला. आणी तो मग निघुन गेला.  


    या कथेवरुन आपन बोध घेवु शकतो. आपला आपल्य विषयी किती ही आत्मविश्वास असला तरी वृद्ध मानसाचा अनुभव खूपच मोलाचा असतो. वृद्ध माणसाला विनाकारण डावलू नये. त्यांचा सम्मान करायचे शिकले पाहिजे. म्हणून आपण इतिहासातील घटनांचा सारखा आढावा वेळोवेळी घेत राहिले पहिजे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy