akshata alias shubhada Tirodkar

Fantasy

2  

akshata alias shubhada Tirodkar

Fantasy

वजन

वजन

2 mins
42


राजा कृष्ण देवराय दरबारात हजर होते.सभा चालू होती,पण त्यांचं लक्ष काही सभेत लागत नव्हते.हे मात्र त्यांच्या जीवाभावाच्या तेनाली रामाने घेरले. एकदाची सभा संपली आणि रामा ची उत्सुकता ही त्याने न डगमगता राजाला विचारले "महाराज,आपण एवढे चिंतेत का? काही कारण"?

यावर राजा ने रामाला पाहात म्हटले,"रामा तूच माझा सच्चा मित्र,माझ्या मनातले तूच ओळखू शकतो"

"बरं,महाराज काय झालं"?

"काय सांगू?महाराणी ने मला एक टार्गेट दिले आहे".

"कसले टार्गेट"?

"वजन कमी करण्याचे".

"काय?"

"हो ना,आमचे साडू कसे फिट अँड फाईन आहेत.ते पाहून हीच जळत मला म्हणते तुम्ही तुमचा ढोल जरा कमी करा.रामा मी काय एवढा मोठा आहे का"?

रामा ने राजाच्या पोटाकडे पाहात म्हटले,"नाही महाराज,पण आहे".

"म्हणजे रामा?"

"माफ करा महाराज,मला खोटं नाही बोलता येत.पण राणी साहेब खरंच बोलल्या".

"म्हणजे,तू ही मला ढोल म्हणतो?"

"नाही महाराज, मी फक्त खरं तेच सांगतो"

"म्हणजे,मी खरंच वजन कमी करायला हवे"

"हो महाराज,तुम्हाला टार्गेट पूर्ण करावं लागेल" 

"अरे,करायला काही नाही रे.पण त्या टार्गेट चे नियम आणि अटी पाहिल्यावर चक्कर येते"

"नाही महाराज,तुम्ही राजा आहात.असल्या साध्या टार्गेटला घाबरला,तर तुम्ही राजा कसले"

"हे काय बोलतो तू"

"महाराज,तुम्ही तुमचे वजन कमी करण्याचे ध्येय करा आणि पहा तुम्ही विजयी होतात कि नाही"

"पण रामा,ते पथ्य वैगेरे"

"महाराज,नाही करून काय करणार? महाराणीसाठी तुम्हाला करावेच लागेल"

"हो रे बाबा,खरं आहे.तूच नाही तर राणी माझ्यावर नाराज होतील,पण मला हे ध्येय पूर्ण करण्यासाठी तुझी मदत लागेल"

हो महाराज,मी नक्की मदत करेन पण वजन तुमचं कमी करायचं आहे,माझं नाही.

असेच महिनाभर वजन कमी करण्याचं ध्येय चालू होते आणि महाराजांनी खरंच वजन कमी केले.

महाराणी ने हसत हसत राजाला म्हटले,"पहा बरे,आता कसे दिसता तुम्ही एखाद्या राजा सारखे! नाही तरी,ढोल वाजवणारे कसे दिसत होतात"

तेनाली रामाच्या समोर राणी ने असे म्हटल्यावर तेनाली रामा मनातल्या मनात हसला.पण,राजा ला वाईट नाही वाटले.तो खुश होता कि त्याने आपले ध्येय पूर्ण केले होते. 

राणी ने लगेच सेल्फी काढली आणि इन्स्टावर अपलोड केली आणि ती लिहायला नाही विसरली, #न्यू लुक ऑफ राजा #


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy