STORYMIRROR

Arun Gode

Tragedy

3  

Arun Gode

Tragedy

विचित्र सवय

विचित्र सवय

8 mins
307

आमच्या शेजारी, माझ्या मुळ गांवी एक परिवार राहत असे.घरात पती-पत्नी व त्यांची दोन मुले व सर्वात मोठ्या मुलीचे लग्न झाले होते. घरातील सर्वच सदस्य फार सिस्तबध्द होती. काका गवांतल्या सुतगिरणी मध्ये ड्राफ्ट-मॅन होते.ते प्रक्रृतिने लहान पणा पासुन फार अशक्त होते. पण घर कामात फार लक्ष्य देत असे. घर सुट-सुटित चालवण्यात ते कुटुंब फार चतुर होते. वर्ष भरात आपल्याला काय आवश्यक आहे, त्याची मात्रा किती आणी ते कोणत्या ऋतु मध्ये उत्तम प्रकारचे आणी स्वस्त दरात मिळते याचा त्यांचा फार सखोल चांगला अभ्यास होता. त्याप्रमाने ते जीवणावश्यक वस्तुंचा साठा करुन ठेवत असे. त्या घरातली शिस्त पाहुन असे वाटायचे कि काकांनी सैन्या मध्ये चांगले मोठे अधिकारी असायला पाहिजे होते. अशि शिस्त फक्त सैन्यातच असु शकते. घरात लागणारा किराना नेमक्या त्याच तारखेला यायचा. मध्यंतरी समजा गोडे तेल जर संपले तर भाजीची फोडनी ही बिना तेलाची द्यायची असे कांकाचे सक्त आदेश होते. पण शेजारी वाटी घेवुन जायचे नाही असी त्यांची ताकित कुंटुंबाला होती.अशा वेळी काकु कधी येत नव्हता. समजा कधी अचानक आल्या, तर चुपचाप काका नसतांना, काकु आमच्या कडुन काही वस्तु उसण्या घेवुन जात होत्या. ठरल्या दिवशी न चुकता त्या परत आणुन देत असे. 

     मी जेव्हा साधारण मोठा झालो होता. तेव्हा पासुन मी त्या घरातील सगळ्यांचे बारिक निरिक्षन करित होतो. दोन्हीं मुला पैकी लहान मुलगा मोठ्या मुलापेक्षा हुशार होता. त्यामुळे मोठ्या मुलाने कसी-तरी शालांत परिक्षा पास करुन घरा जवळच्या औद्दोगिक प्रशिक्षण संस्थे मधुन फिटरचा सर्टिफिकेट कोर्स केला होता. त्याच आधारावर त्याला स्थानिय सुतगिरणी मध्ये फिटरची नौकरी मिळाली होती. संपूर्ण परिवारात काट-कसरीचे वातावरण असल्यामुळे ते बरेच मॅक्यानिक सवंधी काम जसे, पंखा दुरस्त करने, सायकलची ओहर ऑयलिंग,पंचर वैगरे घरीच त्यांचा मोठा मुलगा करित असे. कुठेही मोहल्यात घर बांधनी,विद्युतिकरण किंवा कोणचेही यांत्रिक काम जीथे चालु असायचे तीथे ते भाऊ आपली उपस्थिति दर्ज करत असे. उपस्थित असतांना जर यांत्रीकी सबंधी जुने-पुराने पार्ट्स नट-बोल्ट, स्क्रू वैगरे जे काही मिळाले की ते जमा करन घेवुन जात असे. कधी-कधी त्यांना आवश्यक असणारे एखादे टूल ते जमल्यास चोरुन घेवुन जात असे. मोहल्यात सहज फिरत असतंना काही यांत्रीकी सबंधी सुटे भाग बाहेर पडलेली दिसली किंवा जंगलेले, फेकलेली खिळे, नट वैगरे उचलुन नेते असे. मोहल्यात कुठे लग्न किंवा त्या सबंधीत काही कार्यक्रम असला म्हणजे, त्या काळात साधारणता घरी किंवा बाजुच्या पटागंनात मंडप टाकुन करत असे. तीथे भाउ नक्कीच दिसायचे.जर कधी दिसले नाही, तर त्यांचे मित्र व नगरवासी त्यांची आठवण करत असे. काम पूर्ण झाल्यावर जर भाऊंनी आवश्यक काही वस्तु दिसल्या की त्यावर ते धावा बोलत असे. अशा वेळी जर अचानक ईलेकट्रीक टेस्टर वैगरे दिसले नाही तर सबंधीत परिवाराचा सदस्य भाऊ कडे जावुन त्यांचा कडिल ईलेकट्रीक टेस्टरची मागणी करत असे. अशा वेळेस भाऊ तीच वस्तु त्याला द्यायचे व म्हणतं, मघाशी तीथे हे पडले होते. म्हणुन मी उचलुन आणले होते. प्रेम सबंध, शेजार धर्म त्या काळ्यात टिकवण्याचे सर्वांना माहित होते. त्यामुळे सबंधीत सदस्य त्यांचे आभार मानुन ते परत घेवुन जात असे. भाउंनी त्यांच्या कडे या सर्व वस्तु व्यवस्थित ठेवण्या साठी विशेष व्यवस्था केली होती. आपल्या कधी काही अशा वस्तु किंवा टूलची आवश्यकता भासली तर भाउंच्या घरी जावुन आणावे लागत असे. समजा भाऊ घरी नसले तर ती वस्तु मिळत असे. भाऊ असतांना ते वस्तु घेवुन आपल्या सोबतच त्यांच्या घरी जात असे. व काम झाल्या वर आपल्या सामाना सोबत काही अन उपयोगी वस्तु ज्या घर मालक फेकुन देनार होता. त्या भाऊ सोबत घेवुन जात असे. भाऊची विशेष विशेषता सांगायची असेल तर समजा तुम्हच्या घरी किंवा कुठेही पैसे किंवा मुल्यवान वस्तु पडली असली तरी भाऊ त्याला हात लावणार नाही याची खात्री सर्वांना होती. पण समजा यांत्रीकी सबंधी काहीही असे पार्ट दिसले तर , भाऊला संधी मिळाली की लंपास करणारच हे सर्वांना माहित होते.

      पूर्ण परिवार हा फार काटकसरी व मेहनती होता. आपली ठेव व दुस-याची चख, कोणाचीही वायफड वस्तुंचा ते फार चांगला उपयोग करित असे.दिवाळीत बहुतेक त्यावेळची मुले नविन- नविन प्रकारचे आकाश दिवे बनवत होते. त्यासाठी लागणारी सामग्री विकत आणुन हर्ष-उल्हासाने आकाश दिवे बनवत असे. भाऊ कधीच असे आकाश दिवे बनवत नसे. कोणी आकाश दिवा बनवतांना दिसला कि भाऊ तीथे पालथी मारुन बसतं. त्याला बनवायचे मोफत मार्गदर्शन पण करित असे. आकाश दिवा बनला कि उरलेला रंगित पंतगीचा पेपर जमा करुन घेवुन जात असे. व दिवाळीच्या पहिले त्यांच्या कडे दादा-आलमच्या जमान्याची शेगडीला ते रंगित पंतगीचा पेपरने सजवत असे. दिवाळीत त्यात एक छोटासा लटू लावत असे.असा भाउंचा आकाशदिवा असे. दिवाळीत ते कधीच फटाके फोडत नसे. मोहल्यात फुटणा-या फटाक्यांचा, तीथे उभे राहुन फक्त आनंद घेत असे. संधी मिळाल्या वर लहान मुलापासुन तर वयस्क माणसला पण फटाके फोडु लागत होते.

     त्या काळात मोहल्यातील मुलानं मध्ये होळी या सणाचे फार आकर्षण असायचे.कोणात्या टोळीची होळी खुप काळ पेटत राहिल याची स्पर्धा राहत असे. त्यासाठी टोळी जंगलात जावुन लाकड जमवण्याची तयारी जवळ-जवक एक-दिड महिण्या पासुन करत असे. कोणच्या टोळीचे किती लाकडे जमले आहे, याचे वेग़-वेगळे संघ आकलन करित असे. संघतील सदस्य कुठले लाकुड चोरुन आणता येईल या वर चर्चा करुन त्याला चोरुन आणन्याची योजना आखत असे. यावेळेस सर्वांनी एकमत केली होते कि भाऊच्या लाकडावर डाका टाकायचा. भाउ आपल्या लाकडांची अशी मांडनी करित असे कि त्यातील छोटे लाकुड सहज रित्या काढता येत न्व्हते. मोठ्या लाकडावर ओल्या खुडुने निषान बनवत होते. आणी सारखी लाकडांची निगरानी करत असे. मुलांनी योजने प्रमाने होळी ज्या दिवशी पेटवण्यात येते.भाऊंना सांगितले की राकेश्च्या घरी खुप वाळलेले लाकडे आहे. आज रात्री होळी पेटल्या नंतर आपन सर्व त्यांचे लाकड चोरुन आणु. भाऊ यावेळ्स मित्रांच्या योजनेत फसले होते. त्यांनी सहकार्य देण्याचे ठरले होते. राकेश पण सोबत होता. मित्र त्याला अरे राकेश खुप वेळ झाली आहे आणी होळीत आता बरेच लाकड आहेत .ती सकाळपर्यंत नक्कीच पेटत राहिल!. त्यामुळे चला आराम करु. राकेश योजने प्रमाने घरी गेला तेव्हा रात्रीचे दोन वाजले होते. तो पुन्हा तिन वाजता पुन्हा वापस येणार होता. म्हणुन आम्ही भाऊला चला आता राकेश कडिल लाकडे लंपास करु असे म्हटले. आनी निघालो तो राकेश रस्तात मिळाला होता. अर तुम्ही अजुनही जागेच आहे कां असा प्रश्न त्याला केला होता. आणी तो म्हणाला चला होळी पासीच बसु.सगळे पुन्हा होळी पाशी आले होते. भाउचे मित्र त्याला म्हणाले अरे, सकाळी तुझी डिवटी असेल ना. तु, जा आता आराम कर आम्ही पण करतो. भाउला खुपच झोप आली होती.दर वर्षिप्रमाने भाउने लाकडाच्या बाजुला आपली खाट टाकली होती. कारण कोणी लाकड चोरुन नेवु नये. आम्ही सर्व जन योजने प्रमाने आपल्या घरी गेलो. भाऊ पण जावुन झोपले होते. त्यांचे खराटे सुरु झाले होते. नंतर अर्ध्या घनट्याने आम्ही सर्वजन पुन्हा एकत्र झालो. चोर पायानी भाउची खाट अध्धर उचलुन लाकडान पासुन दूर नेली होती. आणी भाउंची जवळ- जवळ अर्ध्या पेक्षा जास्त लाकड होळीत नेवुन टाकले होते. काही म्हण्तं होते ,चला संधी मिळाली आहे सगळेच टाकु . इतक्या वर्षाचा कोटा आज पूर्ण करुन टाकु. बरेच लाकड टाकल्या वर थोडे थकल्या सारखे वाटत होते. शेवटी भाउला खाटी सोबतच होळीच्या एकदम जवळ नेवुन ठेवले होते. आम्ही सर्वजन आप-आपल्या घरी निघुन गेलो होती. होळीने हळु- हळु चांगलाच पेट घेतला होता. होळीतुन चांगलेचे आगेचे लपटे बाहेर पडत होते. त्यामुळे भाऊची झोप उघडली होती. त्यांनी जेव्हा स्वतःला होळी पाशी बघितले. ते फार हादरुन गेले होते.पन तीथे कोणीच नव्हते.ते मग आपली खाट व गादी घेवुन घरी गेले होते. तीथे त्यांना लाकडे चोरल्याची जानीव झाली. पण शिव्या देण्यासाठी कोनीच नव्हते. शेवटी ते पुन्हा झोपले व सकाळी उशिरा जाग आला होता.त्यामुळे धाव-पळ करत डिवटी वर गेले होते. मी सकाळी उठल्यावर सहज समोरच्या गच्चीवर गेलो होतो. तेव्हा वहिणी पण त्यांचा गच्ची वर उभ्या होत्या. माझ्या कडे हसतं-हसतं म्हणाल्या. भाऊजी तुम्ही यावेळ्स चांगला डाव साधल. मी म्हटले काय झाले आहे असे वहिणी ?. त्या पुन्हा हस्ता-हस्ता म्हणाल्या यावेळेस तुम्ही भाऊंना सापळ्यात अडकवुन चाग़ंली टोपी घातली.आणी भाउंनी काल माती खालली पाहुंण फार खुश दिसत होत्या.

     भाऊंच्या ब-याच हालचाली वरुन असे लक्ष्यात येत होते कि त्यांचे वय जरी वाढत होते, तरी त्यांचा सामाजिक व बोध्दिक विकास जसा वयस्क मानसाचा होतो तसा झाला नव्हता. नंतर वया प्रमाने भाऊंचे लग्न पण झाले. त्यांना एक मुलगा व दोन मुली होत्या. वहिणी त्यांच्या सर्व हालचाली कडे लक्ष्य देत असत.त्यांना कदाचित समजावण्याचा व सुधारन्याचा प्रयत्न करित असेल. बरेच वेळ्या त्यांचे खुप भांडण होत असे.कित्येक वेळा मारपिट केल्याने , वहिणीना दवाखाण्यात न्यावे लागे. वहिणी नंतर कधी घरी आल्या की झालेल्या महाभारता वर आपले मन मोकळे आई सोबत बोलुन करायची. वहिणी बरेच वेळा भाऊंनी जमा करुन आनलेल्या वस्तुना पुन्हा फेकुन देत असे. व भाऊ पुन्हा शोधुन घरात आणत असे. 

     काही वर्षांनी काका सेवानिवृत झाले होते. चिंध्या वेचलेल्या अन गोदडया शिवलेल्या परिस्थितितुन जे काही जमा पूंजी होती त्याचा उपयोग करुन गांवातच जवळच एक चार एकर शेत घेतले होते. भाउन पेक्षा लहान, सुनिल सायंस मध्ये शिकायला गेला पण प्रयत्न करुनही तो स्नातक होवु शकला नाही. व तो पन शेतीच्या कामात गुंनतला. समोर सफल असा शिक्षित शेतकरी झाला होता. सुनिल भाऊचे पण लग्न झाले होते.त्यांनी ट्रक्टर व सोबत सिंचणाची शेतात व्यवस्था केली होती. काका आणी संपूर्ण परिवार शेतिच्या कामात व्यस्त झाला होता.काका रोज शेतात पैदल जात असे. त्यांना शेतात चांगली शुध्द हवा आनी व्यायाम होत असल्यामुळे नेहमी बिमार राहणारे काका एकदम निरोगी व तंदुरुस्त झाले होते.जीवणाचा खरा आनंद ते सेवानिवृत्ति नंतरच घेत होते. सर्व काही आता सुरळीत चालु होते.

     भाउंचा मुलगा पण त्यांच्या सारखा यांत्रीकी कामात लक्ष्य देत होता. वडिलांन पेक्षा त्याला फार यंत्रीकी कामात कौशल्य होते. पण भाऊंची जी सवय होती ती तशीच होती. सुत गिरणीत ते जेवणाच्या डब्बा घेवुन जात असे. येतांना डब्यात आईल किंवा त्यांना आवश्यक असनारी काही यांत्रीकी वस्तु जर मिळाली तर ते डब्यात टाकुन आणायचे. वडिल त्याच सुतगिरणीत चांगल्या पोस्ट वर व एक ईमाणदार,जबाबदार कर्मचारी म्हणुन ओळख होती. त्यांच कारना मुळे भाउंची जातांना जास्त तपासनी वैगरे होत नसे.परंतु काही काळा नंतरही भाउच्या व्यवहात काही सुधार झाला नाही. तो वाढतच गेला. घरचे पण त्यांच्या सवयी मुळे त्रासुन गेले होते.घरात मोठे असल्यामुळे सगळे त्यांचा कडे दुर्लक्ष करत होते. हळु-हळु सुत गिरणीच्या वर्कशॉप मधील अवजारे लंपास व्हायला लागली होती. गांव फार मोठे नसल्यामुले त्याची चर्चा सर्वत्र होत असे.भाउंच्या कारणाम्या मुळे अन्य मॅकॉनिक कामगारांना त्यांच्या डिवटी मध्य टूल भेटत नसल्यामुळे त्रास होत होता. गांवात चर्चा चालत अस्ल्यामुळे काही मॅकॉनिक कामगारांना भाउच्या वाईट सवयची माहिती मिळाली होती. एक दिवस त्यांची गेट वर सुरक्षा कर्मचा-यांनी आदेशानुसार कड्क तपासनी केली. तपासनी नंतर भाउन जवळ वर्कशॉप मधील महत्वाचे टूल मिळाले होते. व भाउंचे पितळ उघडे पडले होते. नंतर त्यांची पोलिस चौकशी पण झाली. व नंतर त्यांना कामा वरुन काढुन टाकण्यात आले होते. सुर्य लाजेल अन चंद्र लपेल अशी भाउंची थोरवी होती. नौकरी गेल्याने आर्थीक नुकसान तर झाले होते.पण वडिलांनी कमवलीली इज्जत त्या परिवाराला गमावी लागली होती. म्हातारी गेल्याचे दुःख नव्हते पण परिवाराला काळ सोकावत होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy