वेळेची शिक्षा
वेळेची शिक्षा
रजत शर्मा. दिसायला एकदम हिरोच. पण मुलीबद्दलचे खूप आकर्षण. कॉलेज मध्ये असताना, त्याचे दुसऱ्या कुठल्याही कामात लक्ष लागत न्हवते, दिवसभर नुसत्या ह्या-ना-त्या गोष्टी. अभ्यास म्हणजे त्याच्या खूप जीवावरचे काम. कॉलेजमध्ये यायचं, नुस्ते चाळ्या करायच्या, मुलींसोबत पूर्ण वेळ घालवायचा, आणि तसेच कॉलेजवरून आल्यावर, एखाद्या मुलीसोबत बोलत बसायचे, जर मुलगी बोलण्याने बळी पडली तर तिला एखाद्या हॉटेल मध्ये रूम बुक करून तिच्या शारीरिक संबंध प्रस्थापित करून, मग सोडून द्यायचे, मग दुसऱ्या दिवशी दुसरी. दिवस असेच चालले होते. त्याच्या तोंडून शब्द जे बाहेर पडायचे, त्या बाहेर पडलेल्या गोड शब्दातून कोणतीही मुलगी सुटत न्हवती. त्याला कॉलेजमध्ये 'प्ले-बॉय' म्हणूनच ओळखत होते.
त्याचे आईवडील न्हवते. आई, रजत लहान असतानाच त्याच्या वडिलांनी तिला मारून टाकलं होत. आणि नंतर त्याचे वडील कुठल्या जगात गेले हे त्यांनाच ठाऊक... त्याला कुणी भाऊ बहीणही न्हवते. हो.. जन्मताना त्याची बहीण होती, पण ती नंतर कुठे गेली काही माहीत नाही. त्याचे जीवन आईवडिलांना ते जिवंत असताना टाकलेल्या एका सरकारी हॉस्टेल मधेच गेले. त्याला कॉलेजमध्ये येईपर्यंत कुठलाही मित्र जमवता आला नाही, पण मुली मात्र पाचव्या-सहाव्या वर्गापासून आपल्याश्या करत गेला. मुलींमुळे त्याला तर खूप वेळेस मारही खावा लागला. पण तरीही त्याची अक्कल काही जागेवर आली नाही. दहावीनंतर तर त्याला आपल्यावर विश्वासच बसला की, आपण मुलींशीवाय जगूच शकत नाही. मग लाफड्यांवर लफडी. कोणत्याही मुलीवर प्रेम तर आलं नाही पण, नेहमीच मुली त्याच्या सभोवताल राहायच्या. त्यांना आपल्या गोड बोलण्याववरून प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचे, आपले काम काढून कुठल्या-ना-कुठल्या बहाण्याने ब्रेकअप करून पुन्हा दुसऱ्या मुलीच्या शोधात... बस्स हेच कामं होती त्याच्याकडे. मुलींचा विश्वास जिंकायसाठी त्याने पार्ट टाइम जॉबही करू लागला होता.
कॉलेजमध्ये असताना त्याचा एक पहिला मित्र बनला, अनिकेत. तो त्याला खूप जीव लावत होता. त्याला नेहमी समजवायचा की, मुलींव्यतिरिक्त, कामवासने व्यतिरिक्त दुसरेही असे जगात खूप कामं आहेत, दुसऱ्याही खूप कामात सुख आहे, फक्त त्याला शोधायची गरज आहे, असे त्याला नेहमीच सांगायचा, पण रजत त्यावर म्हणायचा की, मला ह्याच्यातच सुख अनुभवता येते.
दिवस सरत गेलेत. कॉलेजही संपलं होतं. सर्व नोकरीच्या शोधात लागले होते. रजतने आपली पार्ट टाइमची नोकरी फुल टाइम मध्ये बदलविली. त्याच्या मित्र अनिकेत, जरा हुशार असल्याने त्याने विज्ञानाच्या दुनियेकडे वडण्याचा विचार केला. तो वैज्ञानिक बनण्याचा दिशेने गेला. पण इकडे रजत मात्र आपल्या ऑफिस मध्येच असलेल्या मुलींसोबतही कारनामे करू लागला होता. पण पुढे जाऊन एक काळ असा आला की, ऑफिसमध्यल्या पूर्ण मुलींसोबत त्याचे चक्कर चालून संपले होते. पण आता पुढे काय?, त्याने एक फ्लॅटही विकत घेतला होता, तिथल्या वॉर्डातल्या मुलींसोबतही त्याचे असेच कारनामे, त्याच्याबद्दल माहीत झाल्यावर त्याला मारायला लोकही जमा झालीत, त्याला तिथे मारही खावा लागला, पण पोलीस मध्ये आल्याने तो थोडक्यात वाचला, नाहीतर त्याच दिवशी त्याला लोकांनी बदडून मारून टाकले असते.
त्याला आता मुलींशीवाय बेचैनी वाटू लागली होती. तो एकप्रकारे ऍड्डीकट्टच बनला होता, त्याला जणू नशाच चढणे बंद झाले होते. त्याने काही दिवस आपल्या ऑफिसमधूनही सुट्ट्या घेतल्या होत्या. आपल्या नवीन फ्लॅट वरच एकटा राहू लागला होता. पण त्याचे कुठल्याही कामात मन लागत न्हवते. एखाद्या बेवड्याला दारू मिळणें बंद झाले, तसल्यागत त्याची स्थिती झाली होती. ही गोष्ट त्याच्या मित्राला म्हणजेच अनिकेतला कळली. तो त्याच्या घरी आला, त्याला समजवायला. त्याच्या घरी येताच त्याला रजत खूप वाईट स्थितीत दिसला. रजतची तब्येत खूप बघडली होती. तो साधा बोलण्याच्याही स्थितीत न्हवता. त्याने जेवणही जणू सोडलेच होते. आता अनिकेतलाही त्याची चिंता वाटू लागली होती. त्याने सर्वात आधी त्याला जेवण दिले, पण तरीही तो काही सुदृढ दिसत न्हवता म्हणून त्याने त्याला डॉक्टरांच्या मदतीने सलाईन लावून, आतून जरा मजबूत करण्याचा प्रयत्न केला. एक दोन दिवसात त्याच्या तब्येतीत जरा सुधार होऊ लागला होता. जेव्हा तो बोलायच्या स्थितीत आला, तो अनिकेतला म्हणाला, "मला करमत नाही आहे रे, मुलींशीवाय, जीवन जणू उन्हाळतल्या तलावाप्रमाणे आटत चाललंय. मी नाही जगू शकत बिना मुलींशीवाय. अनिकेतलाही त्याच्या भावना समजत होत्या. त्याने विचार केला की, आता ह्याचे एखाद्या मुलीसोबत लग्न लावून दिल्याशिवाय कुठलाही मार्ग शिल्लक उरत नाही. कदाचित त्याची बायकोच ह्याला सांभाळू शकते. त्याने ऑनलाइन मुली शोधायला सुरुवात केली. अनिकेतनेच एक मुलगी त्याच्यासाठी पसंद केली. योगायोगाने ती मुलगीही अनाथ होती. अनिकेतने तिला भेटण्याचा निर्णय घेतला. अनिकेतला भेटीदरम्यान ती मुलगी खूप पसंत पडली. त्याने रजतबद्दल खूप काही सांगितले. रजत सुदृढ झाल्यावर तिच्यासोबत भेटण्याचा दिवस ठरविला. त्यांच्या पहिल्याच भेटीत दोघेही एकमेकांच्या पसंतीस पडले. ती मुलगी म्हणजेच अक्षया त्याच्या बोलण्याच्या शैलीवरच फिदा झाली. पण रजतची नजर मात्र तिच्यावर न जात तिच्या शरीरावरच जात होती. तो तिला तिथेच छेडण्याचा प्रयत्न करणार होता, पण अनिकेत त्यांच्या मध्ये येताच, रजतला त्याने सांभाळले. ती तिथून जाताच अनिकेतने रजतला खूप समजावले की, असे केल्याने हाती काही येणार नाही, पुन्हा फक्त दुःखच येईल. ह्यावर तो म्हणाला, "ही क्रिया आता केली काय, की नंतर केली काय?, एकच ना?," अनिकेत त्याच्यावर खूप चिडला. कारण अक्षया सारखी एवढी गुणी मुलगी मिळणं खूप कठीण आहे ह्यानंतर, हे त्याला चांगलेच कळत होते. म्हणून त्याने रजतला दुःख दूर करायसाठी दारू पाजली. दारू पिल्यानंतर तो जरा हातात येऊ लागला.
काही दिवसात रजत आणि अक्षयाने लग्न केले. लग्नानंतर अनिकेतला वाटू लागले की, आता सर्व ठीक होईल. आता ह्यांचा संसार चांगल्या वळणेवर जाईल. लग्नानंतर एक महिना चांगलाच गेला. रजतला मनाप्रमाणे रोज मनाची भूक मिटवता येत होती. पण ती भूक एकाच मुलीसोबत मिटवणे त्याला जरा अवघडच जात होते, कारण त्याला वेगवेगळ्या मुलींसोबत रात्र घालवणे आवडत होते. ह्या दरम्यान अनिकेत आपल्या एका त्याच्याच लॅब मधल्या सहयोगासोबत एक मशीन बनविण्याचा कामात व्यस्थ झाला. दोघही एक वेगळीच मशीन बनविण्याच्या कमला लागले होते. ती मशीन टाइम मशीन बनणार होती. ज्यात माणूसही बसून भूतकाळात, भविष्यकाळात, हींडू आणि काही फेरबदलही करू शकतो. पण हे काम खूप कठीण असल्याने त्यांना ती मशीन बनवायला जरा वेळच लागत होता.
इकडे रजत मात्र आपल्या पत्नी पासून एका महिन्यातच बोअर झाला. त्याला रोज शारीरिक सुख प्राप्त होत होते पण, त्याला आता जास्त रुची उरली न्हवती, अक्षता मध्ये. त्याला कुणीतरी दुसरी मुलगी हवी होती. त्याने दुसरीकडे आपले बियाणे टाकण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा जाळ्यात कुठलीही मुलगी सापडत न्हवती, कारण काही दिवसातच त्याला पत्नी असल्याचे सर्वाना माहीत होत होते. म्हणजे काहीही केले तरी त्याला आपल्या पत्नी म्हणजेच अक्षता कडेच यावे लागत होते. आता पुन्हा त्याची तब्येत बिघडू लागली होती. त्याला पुन्हा तीच फीलिंग येऊ लागली होती, एखाद्या नवीन मुलीची. त्याला हळूहळू सहन होणेही कमी होऊ लागले. मग अनिकेतच्या सांगितल्याप्रमाणे दारू घेतल्याने दुःख दूर होते, रजतने पुन्हा दारू प्यायला सुरुवात केली. दारू पिल्यानंतर त्याला जरा चैन पडत होते. पण मग दारुशिवायही त्याचा दिवसही जात न्हवता, आता त्याला दारूचीही लत लागली होती. तो दारूच्या नशेततच अक्षता सोबत संबंध प्रस्थापित करत होता. काही दिवसांनी तर तिला मारायलाही सुरुवात केली. नंतर-नंतर तिला बाहेरही जाण्यास बंदी केली. आणि एक खोलीत कैद करून तिला ठवेत होता. तिच्यावर रोज-रोज अत्याचार करू लागला. तिचा मानसिक छड करू लागला. काही दिवसांनी अक्षयाला कडले की ती गरोदर आहे, हे रजतला माहीत असूनही तिच्यावर अत्याचार करणे सोडले नाही.
अनिकेत आणि त्याच्या सहकार्याने ती मशीन शेवटी बनवूनच टाकली. ज्यात बसून लोक आपल्या भविष्यकाळ अथवा भूतकाळात जाऊ शकतील. अनिकेतच्या सहाकार्याने सर्वात आधी त्या मशीनचा उपयोग करण्याची इच्छा दर्शविली. पण अनिकेत त्याला असे करण्यास रोखू लागला, कारण अजून त्यावर कुठलंही एक्सपिरिमेन्ट झालेले न्हवते. पण उत्साहाच्या भरात अनिकेतच्या नजर चुकवून तो त्या मशनीद्वारे आपल्या भूतकाळात गेला. नंतर त्याचा पत्ताच लागला. नाही. अनिकेतने ती मशीन आपल्या घरीच आणून ठेवली. दुसऱ्या रात्री सुमारे रात्रीचे दोन वाजता, मशीन आपोआप सुरू झाली. मशीनच्या आवाजाने अनिकेत उठला, तो घाबरलेल्या अवस्थेतच मशिणीकडे बघू लागला. काही क्षणातच त्याला दिसले की, त्या मशिणीतून एक हात बाहेर येत आहे, हे बघून तो पुन्हा घाबरला. काही वेळात खूप विचित्र अवस्थेत त्याचाच सहकारी, ज्याने ती मशीन सर्वात आधी चालविली होती, तो अर्धा बाहेर आला, आणि अनिकेतला म्हणाला, "मला माफ करा अनिकेत सर, मी तुमचे त्या दिवशी ऐकले नाही. पण त्यामुळे मला एवढी मोठी शिक्षा भोगावी लागत आहे. माझी खूप वाईट दशा झाली आहे सर. मी इथून निघूही शकत नाही सर. (त्याला बघून अनिकेत मशिणीकडे येऊ लागला) नाही सर नाही. माझ्याकडे येण्याचा जराही प्रयत्न करू नका, अन्यथा तुम्हीही ह्याचा शिकार व्हाल. दूर व्हा, ह्याच्यापासून. मी माझ्या भूतकाळात येऊन जराशी काय सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, तर पूर्ण चक्रच माझयाभोवती फिरत आहे सर. माझ्याकडे वेळ नाही आहे सर. तुम्ही ह्या मशिणीला फोडून टाका, खूप घातक आहे सर ही मशीन, कुणालाही वापरू देऊ नका ह्याला, मी तर म्हणतो आताच तोडून टाका. कुठलीही वाट बघू नका. मला जी सजामिळत आहे, ती कुणालाही भेटू नको, भलेही तो दुष्मनच का नसो."
एवढे बोलून तो त्याचा सहकारी पुन्हा आत गेला. दुसऱ्या दिवशीही रात्री दोन वाजता तसाच विचित्र चेहरा घेऊन तेच कालचे वाक्य म्हणत तो त्याचा सहकारी त्या मशिनद्वारे आला, आणि कालप्रमाणेच सेम तेच बळबडू लागला. असे आता अनिकेत सोबत रोजच घडत होते. तो भीतीदायक चेहरा घेऊन त्याचा सहकारी रोजच एकच वाक्य बोलून पुन्हा त्या मशीनची जात होता. अनिकेतने ती मशीन फोडली नाही, त्याने त्याचे काही पार्ट काढून टाकले, म्हणजे ती मशीन निष्क्रिय झाली.
रजत आणि अक्षताला जुळे मुलं झाली होती, एक मुलगा आणि एक मुलगी, त्यांना जुळे म्हणता येणार नाही, कारण त्यांचा जन्माच्या वेळी मेंदू एकमेकांना जुळूनच होता, सोबतच त्या दोघांतील प्रत्येक अवयव एकसारखेच होते, जसे त्यांच्या बोटाचे ठसे, डोळ्यांचे पुतडे, आणि दुसरे अवयव. म्हणजेच त्यांना एक बिमारी होती, जी बिमारी लाखोंतून एखाद्याला होत असते. ज्यात होणारी दोन मुलांत पूर्णता साम्य राहते. म्हणजेच दोघेही एकच जीव असतात, फक्त फर्टिलायझेशनच्या वेळेस आईच्या पोटातील दोन झाइगोट एकत्र मिळून एकाच स्पर्मसोबत मिळून दोन मुलाला जन्म देतात. जन्म होताच त्यांना ऑपरेशन करून त्यांचा मेंदू वेगळा करण्यात आला. काही दिवस चांगलेच गेले. पण रजतची एक मुलगी आपोआप गायब झाली. त्यांनी खूप प्रयत्न केला शोधण्याचा, पोलीसही तिला शोधण्यास असमर्थ ठरली. पण ती काही मिळाली नाही. आता त्यांना फक्त एक मुलगाच होता. त्याला लहानपणीच हॉस्टेलमध्ये टाकण्यात आले. तो कमी वयातच हॉस्टेलमध्ये शिक्षणाच्या नावाखाली दाखल झाला.
रजतने अक्षतावर एवढे अत्याचार केले होते, की, तिची पूर्ण तब्येत बिघडून गेली होती. रजतलाही पुढे तिला आपल्यासोबत ठेवण्यास त्याच्यासाठी काहीही उपयोगी नाही असे त्याला वाटू लागले. एकदा तो खूप दारू पिऊन आपल्या घरी आला. अक्षतासोबत त्याने जबर शारीरिक संबंध स्थापित करण्याच्या बहाण्याने अत्याचार केले, त्यानंतर आपले काम झाल्याचे बघून घरीच असलेल्या काडीने तिला मारहाण करण्यास सुरू केले. तिला एवढे मारले की तिच्या शरीरातून रक्तही वाहू लागलं होतं. पण तो इथेच थांबला नाही. त्याला आता ती नकोच होती, म्हणून त्याने पुन्हा मारणे सुरूच ठेवले. अक्षता जागेवरच बेहोष झाली. पण तिच्यात अजूनही प्राण बाकी होता. तिला तसेच सोडून देऊन तो आपल्या घराबाहेर पडला. बाहेर जाताना, त्याने घरचाच ग्यास सुरू करून दिलं, सोबतच घरी असलेल्या रॉकेलने पूर्ण घराला आग लावून दिली. त्या खुल्या सोडलेल्या बाहेर पडत असलेल्या ग्यासमूळे एक भीषण स्पॉट झाला, त्यामुळेच काही क्षणातच घर पूर्णतः जाळून खाक झाले. त्यात अक्षताचा होरपडून मृत्यू झाला. घराबाहेर लोकांची गर्दी झाली, अग्निशमन दलही आलेत, पण अक्षताचा फक्त हाडांचा सांगडाच सापडला. हे बघून मगरीचे अश्रू दाखवून, लोकांना आणि पोलिसांना असे दाखवून देत होता की, त्याला ह्यामुळे खूप दुःख झाले आहे. पण कुणालाही हे कळू शकले नाही की, ह्यामागे रजतचाच हात आहे.
दिवस सरत गेलेत. रजतला आता नवीन मुलीची गरज भासू लागली होती. अक्षताची पूर्ण केस बंद झाली होती, त्यात कुणालाही दोषी ठरविण्यात आले नाही. जास्त चौकशीही झाली नाही. रजतने काहीच दिवसात एका अमीर मुलीला आपल्या जाळ्यात ओढले. तिच्यासोबत कितीतरी वेळ शारीरिक सुखाचे क्षण अनुभवले, पण त्याचे काही मन भरत न्हवते. त्याला ती फीलिंग येत न्हवती, म्हणून त्याने त्या मुलीला सोडून दुसऱ्या मुलीला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला, त्यात तो सफलही ठरला, पण तिच्यासोबतही तो आनंदी राहत न्हवता. त्याला अक्षताचीच आठवण येऊ लागली, कारण ती त्याच्या मनमर्जीनुसार त्याचे पूर्ण हौस पुरवायची, सोबतच तिच्यावर कितीही अत्याचार केलेत तरीही ती काहीही म्हणायची नाही. पण आता काही उपयोग होत न्हवता. म्हणून त्याने आपल्या दारूची मात्रा पुन्हा वाढविली. पण दारूची नशाही काही टिकत न्हवती. म्हणून त्याने आपल्या मित्राला म्हणजेच अनिकेतला आपली व्यथा सांगायला बोलावले.
रजतने दारूच्या नशेत अनिकेतला पूर्ण घडलेला प्रकार सांगितला. हे ऐकून त्याला विश्वासच बसत न्हवता, की कुणी आपली हौस पुरविण्यासाठी, एखाद्यावर किती अत्याचार करू शकतो.., त्यानंतर रजतने त्याच्याकडे आपली इच्छा ठेवली, आणि म्हणाला, "मला अक्षतासोबतच्या त्या रात्रीची खूप आठवण येत आहे रे, काय ती मला सहन करायची, किती माझी हौस पुरवायची, काश पुन्हा मी भूतकाळात जाऊन तिच्यासोबत आणखी काही वेळेस शारीरिक सुख अनुभवण्यास मिळाल्यावर किती चांगलं होईल ना?" त्याचे हे वाक्य ऐकून अनिकेतचा राग अनावर आला. त्याला वाटले, एवढे अत्याचार करूनही त्याला भूतकाळात जाऊन पुन्हा अत्याचार करावंसं वाटतं आहे? अनिकेतच्या तोंडून फक्त एक शब्द बाहेर पडला, "माद**द"
अनिकेतला वाटू लागलं, रजतला कुठल्याही स्थितीत शिक्षा तर मिळायलाच हवी, त्याने किती मुलींचा भावनांसोबत खेळल्यानंतरही आपल्याच पत्नीवर एवढे अत्याचार केलेत. पण कायद्याने ह्याला काही तेवढी मोठी शिक्षा मिळूच शकणार नाही. तर ह्याला कुठली शिक्षा देणे सर्वात चांगले राहील?". काही वेळात त्याला आठवले की, त्याच्या सहकार्याने त्याला म्हटले होते की, कुठल्याही परिस्थितीत, आणि कुणालाही आपल्या टाइम मशीनचा वापर करू देऊ नको, कारण ही मशीन सर्वात भयंकर शिक्षा देते.
अनिकेतने ठरवले, की रजतला आता त्याच मशीनमध्ये पाठवायचे आणि वेळेसोबत खेळल्यानंतर त्याला वेळच शिक्षा देणार. म्हणून रजतला म्हणाला, "तुला पुन्हा अक्षतासोबत संबंध प्रस्थापित करायचा आहे काय?" त्यावर रजत म्हणाला, "होय ना, तू तर शास्त्रज्ञ आहेस, तुझ्याकडे काही उपाय आहे काय, ज्याने पुन्हा ती जिवंत होईल आणि मी आपली हौस भागवू शकेल?"
रजत म्हणाला, "तिला जिवंत तर करता येणार नाही, पण तू भूतकाळात जाऊन तिला पुन्हा त्रास देऊ शकतो, मग तू तैयार आहेस काय, भूतकाळात जायला?"
रजत, "अरे आताच!"
अनिकेतने ती मशीन त्याला दिली. अनिकेत तिथून निघून गेला, त्याने पूर्ण पुढची क्रिया निसर्गावर आणि वेळेवर सोडून दिली. रजत माशिणीद्वारे अक्षताच्या मृत्यूच्या काही दिवसाआधी जाऊन तिच्यावर अत्याचार केला, त्याला वाटले, अक्षताला कळणारही नाही की तो भविष्यकाळातला रजत आहे. त्या वेळेत अत्याचार करून झाल्यावर तो परत वर्तमान काळात आला. दुसऱ्याच दिवशी त्याने भूतकाळात पुन्हा कालच्या दिवसाच्या आधी म्हणजेच जेव्हा त्यांना मुलं झाली होती, त्या दिवशी गेला, आणि त्या वेळीही तिच्यावर अत्याचार केले. आणि वर्तमानकाळात येऊन खुश होऊ लागला. त्याच्या दुसऱ्या दिवशी, पुन्हा भूतकाळात जाऊन, जेव्हा अक्षता गरोदर होती त्यावेळी जाऊन पुन्हा अत्याचार केले. आणि वर्तमान काळात परतला. त्या नंतरच्या दिवशी त्याने गरोदर अस्तनाच्याही आधी जाऊन अत्याचार केले. असे त्याने खूप दिवस केले. पण त्याने भूतकाळात फक्त अक्षता त्याची पत्नी झाल्यावरच्याच काळात जाऊन अत्याचार करत होता. आता त्याला ती पुन्हा नवीन असतानाचा अनुभव घ्यावासा वाटू लागला. म्हणून तो भूतकाळात त्यांचे लग्न व्हायच्या आधीच्या दिवशी जाऊनही तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर त्याने त्या आधीही म्हणजेच त्यांची भेट घडवून आणल्यावरच्या दिवशीही अत्याचार केले. त्याला पुन्हा अक्षता नवी असताना अत्याचार करायचे होते, म्हणून तो, भूतकाळात, जेव्हा अक्षता आणि रजत ओळखतही न्हवते तेव्हा तीच्या हॉस्टेलमध्ये जाऊन तिच्यावर अत्याचार केला. असे करता-करता वर्तमानकाळातले सहा महिने उलटले होते. त्यानंतर त्याने तर मर्यादाच ओलांडली होती, तो भूतकाळात जाऊन अक्षता जेव्हा लहान होती, त्यावेळेस जाऊनही तो तिच्यावर अत्याचार करू लागला होता. रजत खूप आनंद साजरा करू लागला होता कारण त्याला त्याच्या मर्जीनुसार आधी जाऊन अक्षतावर अत्याचार करता येत होते. तो वर्तमानकाळात आपल्या मित्राला म्हणजेच अनिकेतचे आभार मानायचे ठरवले, कारण त्याने त्याची मदत केली होती. रजतने त्याला आपल्या निवासस्थानी बोलावले. तो येईपर्यंत तो पुन्हा भूतकाळात गेला तिच्यावर अत्याचार करायला. अनिकेत त्याच्या निवास स्थानी आला, पण रजत दिसला नाही. काही वेळात रजत मशीन मधून बाहेर येऊ लागला, आणि येता येताच त्याचे आभार मानू लागला. अनिकेतला वाटले की, हा पुन्हा भूतकाळात जाऊन आपले पुन्हा गुन्हे वाढवत आहे, असे कसे होऊ शकते?, म्हणून त्याने रजत पूर्णता वर्तमान काळात यायच्या आधीच मशीन तोडून टाकली. त्याचा लाठीच्या एकाच दणक्याने, ती मशीन तुटून गेली. पण रजत अर्धा भूतकाळात आणि अर्धा वर्तमानकाळ फसला होता. ती मशीन बंद होताच, रजतचे अस्तित्व मिटून गेले. पण त्याचा जन्म एका मुलीच्या रुपात झाले.
पण त्याची बुद्धी तीच होती, म्हणजेच त्याला पूर्ण माहीत होते, की आपण कोण होतो, म्हणजेच त्याला आपल्या रजतच्या अस्तित्वाबद्दल माहीत होते. तिचा जन्म झाला तेव्हा ती जुळ म्हणून जन्मली होती. तिला तिच्या आईने अनाथ आश्रमात आणून सोडले होते. तिथे आल्यावर काही वर्षात तिला काही गोष्टी आठवू लागल्यात. पण तिला काही कळायच्या आत एका रात्री एक माणूस आला, आणि तिच्यावर अत्याचार करून गायब झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशीही असेच घडले, पण ह्यावेळी तिने त्या माणसाचा चेहरा बघितला, तो रजतच्या म्हणजेच आपल्याच आधीच्या चेहऱ्याप्रमाणे दिसत होता. तो येऊन तिच्यावर खूप अत्याचार करत होता. ती सहनही करू शकत न्हवती, एवढी तिची कमी वय होती ,म्हणून तिने ही बाब आपल्या तिथल्याच सरांना सांगितली, पण त्यांनी काही लक्ष दिले नाहीत. म्हणून तिच्याकडे सहन करण्याशिवाय कुठलाही पर्याय उरलेला न्हवता. तिचे नाव ती इथे आल्यापासून माहीत न्हवते, म्हणून अनाथल्याने तिचे नाव अक्षता ठेवले. ती जसजशी मोठी होत गेली, तिला माहीत होऊ लागले की, केव्हा रजत पुन्हा येणार कारण, आधीच्या जन्मी ती रजतच होती, रजतची बुद्धी आताही तिच्यात होतीच. जेव्हढे अत्याचार रजत असताना केले तेवढे अत्याचार अक्षता असताना सहन करावे लागत होते. तिची सहन करण्याची परिस्थिती नसतानाही रजत येऊन पुन्हापुन्हा तिच्यावर अत्याचार करतच होता.
अक्षता मोठी होऊन तिची भेट एका मुलासोबत झाली. तो रजतचाच मित्र अनिकेत होता. त्याने रजतबद्दल माहिती दिली, ते नंतर एकमेकांना भेटू लागले. त्यानंतरची पूर्ण क्रिया, म्हणजेच पुढे काय होणार?, रजत पुन्हा केव्हा येणार हे सर्व माहीत होत, तिच्याकडे पुन्हा सहन करण्याशिवाय पर्याय न्हवता. त्यानंतर तिचे लग्न झाले, आता तर रोज दोन वेगवेगळे रजत येऊन अत्याचार करू लागले. त्यात ती गर्भवती राहिली. काही दिवसात तिला जुळे मुलं झालीत. आता तिने विचार केला की, आपण ह्याला बदलले पाहिजे, नाहीतर आपल्याला तर माहीतच आहे पुढे किती कष्ट होणार ते?, अक्षताने आपल्या मुलीवर पुन्हा अत्याचार होऊ नये म्हणून तिला अनाथ आश्रमात सोडून दिले. पण घरी आल्यावर तिला आठवले की, तिचेही तेच हाल होईल मोठं होऊन, पण आपण पुन्हा काही बद्दलविण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा बिघडेल, म्हणून तीने त्यानंतर कुठलेही निर्णय घेतले नाही. म्हणजेच तिच्यावर पुन्हा अत्याचार होतच होते. रजतने तिला पुढे जाऊन जाळून मारून टाकले. पण पुन्हा ती आपल्याच मुलीच्या रुपात तिचा पुन्हा जन्म झाला, जिला अनाथ आश्रमात सोडून देण्यात आले होते.
अनिकेतने मशीन तोडून टाकल्याने रजत आणि अक्षताचे पूर्ण अस्तित्व मिटून गेले. म्हणजेच वर्तमान काळात ज्या अनाथ आश्रमात अक्षता नावाची मुलगी होती तिचे अस्तित्व मिटले सोबतच जो मुलगा रजत म्हणून होता हॉस्टेल मध्ये त्याचेही अस्तित्व मिटले होते. म्हणजे अक्षता आणि रजत एका काळात इन्फिनिटी लूप मध्ये फसले होते. जिथे प्रत्येक वेळेत रजत नावाच्या मुलाचे आणि अक्षता नावाच्या मुलाचे जन्म एकाच आईच्या पोटातून होत होते. ज्यांचे आईवडीलच रजत आणि अक्षता होते. पुढे जाऊन रजत अक्षता सोबत म्हणजेच आपल्याच जुळ्या बहिणीसोबत असे म्हणता येणार नाही, पण आपल्यासोबतच लग्न करणार आणि आपल्यावरच अत्याचार करणार. जीचे नाव होते, अक्षता.
समाप्त...
(मेंदू फिरला ना वाचून? काही हरकत नाही, पुन्हा एकदा वाचा, नक्की समजेल, जर नाही समजली तर सोडून द्या... ज्यांच्या अभ्यासक्रमात विज्ञान हा विषय असेल त्यांना ही कथा जरा लवकर समजणार. ह्या कथेचा कुठला भाग कडला नाही अथवा समजला नाही नक्की विचार कमेंट मध्ये, नक्की उत्तर देईन, आणि हो, कशी वाटली कथा नक्की सांगा...)
ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. ह्यामागचा लिंगभेद करण्याचा जराही हेतू नाही. सोबतच नाव, जागा ह्याच्या काहीही संबंध नाही. फक्त ह्याला कथा म्हणूनच समजा आणि विसरून जा...
