STORYMIRROR

komal Dagade.

Tragedy

3  

komal Dagade.

Tragedy

#वेळ

#वेळ

4 mins
292

           कोरोनाच्या भयानक परिस्थिने सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढलेलेच आहेत. जिथं तिथं कोरोनाच्या बातम्या ऐकून मन हेलवल्याशिवाय राहत नाही. सर्वांनाच वाटतंय कि येणारी परिस्थिती कशी असेल. या संकटाना सर्वांनाच सामोरे जावे लागत आहे. लांब लांब वाटणारा कोरोना आता खूपच जवळ येऊन पोचलाय. मास्क सॅनिटीझर दैनंदिन गरज होऊन बसलंय . असाच एक लेख घेऊन आले आहे. 

          सुनील आणि त्याची फॅमिली खूप आनंदी झाली होती. कारणही तसंच एकुलत्या एक त्याची बहीनीचे लग्न ठरले होतें. लग्न ठरवून एक वर्ष झालं होतं, पण हे कोरोनाचा काळ काही कमी नव्हता. अजून लग्न किती दिवस ठरवून ठेवायचं....?त्यामध्ये विघ्न नको असं त्याच्या आईवडिलांचं मत होतं. दुसरं वर्ष सुरु झालं पण परिस्थिती तशीच होती. सासरकडचे लोकांचे फोन वर फोन किती दिवस लग्न ठरवून ठेवायचं. थोड्या लोकांत लग्न उरकून टाकुयात.

        सुनील च्या घरच्यांनी त्यांचं बोलणं ऐकून लग्न पुढच्या आठवड्यातच उरकून टाकूयात तेही साध्या पद्धतीने आणि मोजक्या माणसात असं ठरवलं . सुनिलने काहींना व्हाट्सअप वर तर काही जवळच्या लोकांना पत्रिका वाटप केल्या. जेवणाचा मेनू, तसेच बस्ता, लग्न, या सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या. सुनिलने जवळ जवळ अर्धा निम्म काम स्वतःकडे घेतले होतें. वडिलांना जास्त त्रास नको म्हणून....!

...आता त्याचा जवळचा मित्र भरतला पत्रिका देईला गेला. भरत डॉक्टर होता. सुनील आणि भरत लहानपणापासूनचे मित्र होतें. सुनील ने त्याला पत्रिका जाऊन देईची ठरवली आणि तो दुसऱ्या दिवशी भरत कडे पत्रिका देईला गेला.

           

भरत......, "सुनील...अरे काय रे अचानक कसा आलास आज ...काही नाही एकुलत्या एक लाडक्या बहिणीचं लग्न ठरलंय...! त्याचीच पत्रिका घेऊन आलोय. 

भरत... , "अरे वाह छान....! अरे पण बाहेरीची परिस्थिती पाहिलीस का..? सुनीलचा डॉक्टर मित्र भरत म्हणाला.


हो लग्न आता यां वर्षीच करून टाकायचं आहे...! किती दिवस थांबणार ना ...?


पण आता थांबण्याची गरज आहे सुनील...!,"भरत म्हणाला.

सुनील... , काळजी करू नकोस लग्न साध्या पद्धतीने आणि मोजक्या लोकांमध्येच करणार आहे, आणि तुला आग्रहाचे निमंत्रण आहे...! "सुनील म्हणाला.

   भरत.....,"अरे पण ऐक ना....!  पत्रिका देऊन सुनील हसत केबिनच्या बाहेर पडला. सुनील बहिणीच्या लग्नामुळे खूप खुश होता,पण त्याच्या डॉक्टर मित्र भरतला त्याची काळजी लागून राहिली होती. सुनील जास्त काही बोलावे तर त्याच्या आनंदावर पाणी फिरवण्यासारखं झालं असतं म्हणून भरत थोडक्यात समजवण्याचा प्रयत्न करत होता.मात्र तॊ निष्फळ ठरला.


           इकडे लग्नाची तयारी झाली. मोजक्याच लोकांमध्ये म्हणजे जवळचे मामा, काका, आणि इतर जवळचे नातलग यामध्येच लग्न पार पडलं, पण सुनील खुश दिसत नव्हता. त्याचा प्रिय डॉक्टर मित्र भरत आला नव्हता.

           दोन दिवसानी सुनील डॉक्टर मित्राकडे त्याच्या दवाखान्यात आला.  

       "पपांना जरा ताप आला आहे, तर कोणती गोळी देऊ...? भरत.. हे घे गोळी जेवण करून घेण्यास सांग. जरा जास्त देतोस का....?? कारण घरात मला सोडून सर्वांनाच ताप जाणवतोय. हो का..! बरं मी देतो....!,"सुनील गोळ्या घेऊन निघून गेला.


          दोन दिवसांनी सुनीलच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. भरत काहीपण करून व्हेंटिलेटरची व्यवस्था करून दे. पपांची ऑक्सीजनची लेवल खूप कमी झाली आहे . डॉक्टर भरत नें खूप शोधल्यावर व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिला.

        सुनिलच्या आईचा काही केल्या ताप कमी होत नव्हता. आईसाठी लागणारे रिमिसिवीर इंजेकशनसाठी सुनील वनवन भटकत होता. काही केल्या त्या इंजेकशनचा तुटवडा असल्याने कोणत्याही स्टोरमध्ये ते इंजेकशन उपलब्ध नव्हते. एका ठिकाणी डॉक्टर भरतनें भेटल्याचे सांगितले. हे कळताच सुनिल धावतच त्याच्याकडे गेला . त्याला इंजेकशन पाहून आनंद झाला होता. त्यातच त्याला हॉस्पिटलमधून फोन आला तुमच्या वडिलांचा मृत्यू झालेला आहे. हे ऐकून सुनिलच्या पायाखालची जमीनच सरकली . त्याच्या डोळ्यातून अश्रू गळत होतें . पुन्हा फोनच्या आवाजाने सुनिलला शुद्ध आली . फोन बहिणीचा होता. "दादा खूप अस्वस्थ झालय. इकडे घरात सर्वाना खूप ताप आलाय. तू येशील का इकडे....? वडील तर राहिलेले नव्हते . आईलाही गोष्ट कळून देईयची नव्हती . आईला हा धक्का कधीच सहन होणार नाही. हे त्याला माहित होतें.

आई, बहीण व तिच्या घरचे यात पळणारा हा एकटाच. संकटांवर संकटे यामुळे सुनीलची अवस्था खूप बेकार झालेली असते. दोन दिवसांपूर्वी आनंदी असणारा सुनील आज परिस्थितीने घाव घातले होतें, आणि डोळ्यातून अश्रू अनावर होतं होतें.


        सुनील हे इंजेकशन घे, आणि थांब जरा पाणी घेऊन जा. तुला बरं वाटेल.....! भरत त्याला पाणी देऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवतो . टेन्शन घेऊ नकोस सर्व व्यवस्थित होईल. मी आहे तुझ्याबरोबर....!

       भरत अरे हे काय तुझं अंग तर तापलंय खूप...!! तू आधी स्वतःला चेक कर. नक्की कशामुळे अंग तापलंय.

 सुनील," एवढा वेळ कोणाकडे आहे. एकीकडे आई दिसतेय, एकीकडे नुकतंच लग्न झालेली बहीण. जिच्या हातावरची मेहंदी अजून उतरली नाही." तुझं ऐकलं असतं त्यादिवशी तर ". सुनीलच्या डोळ्यातून घळाघळा पाणी सुरु होतं. तॊ तिथून निघण्यासाठी उठतो, पळत सुटतो. आईचा चेहरा बघून तॊ बहिणीकडे जाण्यासाठी निघतो. त्याला खूप अशक्तपणा आलेला होता . डोळ्यासमोर अंधाऱ्या येऊ लागल्या होत्या . रस्त्यावर चालताना त्याला सगळं दोन दोन दिसु लागलं होतं . कालची हसत असणारी वेळ त्याला आज रडवत असते. भोवळ येऊन जोरात खाली आपटतो. रस्त्यावर गर्दी विरळच जमा होतें. गर्दीतील एक माणूस उठवण्यासाठी पुढे येतो. अंग गरम लागताच कोणीही पुढे येण्यास तयार नसते. गर्दीतून काही लोक निघूनही जातात. सुनील मात्र तळमळत पडलेला असतो. कालची वेळ सुनिलने टाळली असती,तर आज आणि उदयाची वेळ त्याच्या आयुष्यातील कदाचित चांगली असते.

लेख कसा वाटला नक्की कमेंट करुन कळवा.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy