STORYMIRROR

Ganesh Velankar

Inspirational

2  

Ganesh Velankar

Inspirational

वैवाहिक जीवन

वैवाहिक जीवन

2 mins
91

नवरा-बायको दोघांनाही त्यांच्या एकमेकांकडून पूर्ण न होऊ शकणाऱ्या गरजा --- हीच गोष्ट खरी तर नवरा बायको यांच्या नात्याला तडा देणारी आहे ! कशी ? ---- नातं म्हटलं कि त्याचा थेट संबंध मानसिकतेशी जातो , आता नातं याच विश्लेषण करायचे महटले तर त्याचे प्रमुख दोन भाग पडतात १ ) नवरा - बायको , २ ) बाकी इतर सर्व नाती. बाकी इतर सर्व नात्यातील पैलू नवरा बायको यांच्या नात्यात जरी असले तरी असा एक पैलू कि जो फक्त नवरा बायको यांच्या नात्यातच येतो आणि तो म्हणजे " वैवाहिक जीवन " . आणि या वैशिष्ठ्य पूर्ण असलेल्या पैलूंकडेच आपण दुर्लक्ष करतो ! कि जो खऱ्या अर्थाने नवरा - बायको या नात्याला बांधून ढेवतो . ज्या वेळेला वैवाहिक नातं घट्ट असत याचाच अर्थ असा कि त्या दोघांमध्ये " प्रेम " आणि " त्याग " या दोन महत्वाच्या भावना उत्तुंग असतात . आणि याच दोन भावना त्यांच्या इतर गरजा सहज पूर्ण करतात .नवरा बायको हे असे एकमेव नातं आहे कि जे सर्व नात्यांचे प्रतिनिधित्व करत अगदी आईचे सुध्दा ! म्हणूनच " स्त्री ( जिच्याशी विवाह झाला आहे ) हि क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते ". आता क्षणाची म्हणजे घड्याळाचा क्षण नव्हे तर वैवाहिक काळापेक्षा त्यानंतर चा काळ मोठा असतो कि ज्या वेळी ती माता होते . यावर मी खूप वाचन केलं आहे , अनेक आजूबाजूला घडणारे अनुभवही पहिले आहेत . काही मित्रांच्या so called गरजांच्या समस्या सोडवलेल्या हि आहेत . त्यांना एकच मंत्र दिला - वैवाहिक नातं घट्ट करा , इतर गरजा भागविण्यासाठी तुम्हाला कुणाला शोधण्याची गरजच भासणार नाही !

हे निकष मध्यम वर्गीयांसाठी आहेत कारण ते अजूनही निसर्ग नियमांच्या जवळ आहेत , सर्वसाधारण पणे श्रीमंत आणि गर्भ श्रीमंत यांची विचार सरणीचं इतकी भिन्न असते कि भौतिक सुख हेच त्यांचे अंतिम सुख असते .प्रत्येक गोष्ट पैशाने विकत घ्यायची असते अशी त्यांची मानसिकता असते.त्यामुळे प्रेम ,भावना त्यांच्या दृष्टीने गौण असतात.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational