Ganesh Velankar

Inspirational

3  

Ganesh Velankar

Inspirational

शिस्त - काय फालतुगिरी की गरज?

शिस्त - काय फालतुगिरी की गरज?

3 mins
79


आमच्या घरात एक दंडकच होता कि मुलगा कॉलेजला जायला लागला कि हळू हळू घरातील एक एक जबाबदारीची कामे मुलांनी घ्यावयास सुरवात करायची ,अर्थातच कॉलेज आणि अभ्यास सांभाळूनच हे करायचं , मला जमत नाही , येत नाही , कॉलेज सांभाळून कसकाय करायचं ? असे प्रश्न आम्हाला कधी पडलेच नाहीत, लहान पणा पासून घरातल्या अश्या वातावरणात वाढलो कि असे प्रश्न असू शकतात हेच आम्हाला माहित नाहीत . शाळेत असल्यापासून बाहेर जायचे कपडे आपल्या आपणच धुवायचे , चहा , नाश्ता केला असेल तर स्वतःचा स्वतःच घ्यायचा , आपल्या बरोबर लहान किंवा मोठे भावंडं असेल तर त्याचेही घ्यायचे, इतकंच काय पण दुपारी शाळेतून आल्यावर आई झोपलेली असेल तर जेवण आपल्या आपलं वाढून जेवायचं आणि सर्व झाकून ताट घासायला टाकायचं ! चहाचा कप कधीही धुतल्याशिवाय तसाच ठेवला असं कधी घडूच शकत नव्हतं कारण मुळात बाबांचाच कप कधी धुतल्याशिवाय राहिला नाही कारण ते स्वतःच धुवायचे .आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी असलेली बहीण आणि आम्हा दोन लहान भावात कधीच फरक केला नाही ! शेजारच्या कुटुंबात असे दिसायचे कि घरातील सर्वच कामे मुलींना करायला लावायचे .पण खरं सांगू कोणी आम्हाला भडकवायचा प्रयत केला तर आम्ही सांगत असू " अरे घरातली काम आम्ही सर्वजण करतो आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे , समजलं काय "असं म्हटलं कि भडकावणारा गप्प !अशी अनेक लोक मुद्दाम मनात गैरसमज करून देण्याचा प्रयत्न करायची परंतु असं का आणि कशासाठी आम्ही करतो याची चोख उत्तर आमच्याकडे असल्यामुळे ती लोक निरुत्तर व्हायची , आणि त्यांना गप्प केल्याचा आम्हालाही आनंद मिळायचा .

सर्वसाधारण पणे वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षांपासून मुलं अनुकरण करायला शिकतात , आणि घरातील मोठीमंडळी ज्यापद्धतीत वर्तन करतात , त्याप्रमाणे मुलंही करू लागतात . त्यामुळे घरातले वातावरण मुलांच्या दृष्टीने खूप महत्वाचे असते . मुलांनी हे असे करावे असे ज्यावेळेला वडीलधाऱ्या मंडळींना वाटत असते त्यावेळेला वडीलधाऱ्या मंडळींनी तसेच वागणे महत्वाचे असते . आई तर गृहिणीच होती त्यामुळे घरातील कोणत्याही कामाला कधीही तिने कंटाळा केल्याचे माझ्या स्मरणात नाही.आणि कुटुंब सांभाळण्याची वैशिष्ठ्य पूर्ण कला सर्वांच्या " आई " मधेच असते . आणि म्हणूनच कुटुंब व्यवस्था आणि निरोगी समाज घडवण्याचे कार्य फक्त गृहिणीच करू शकते आणि त्या कार्याचे मूल्यांकन कशातच होऊ शकत नाही . 

आज हे साठाव्या वर्षी आठवलं कि वाटत किती प्रॉपर जगण्याचे ट्रेनिंग होत . आई नेहमी म्हणायची " शरीर म्हणजे मशीन नव्हे काम केसेस तर झिजायला . चाळीस वर्षापर्यंत जेवढ काम करशील तेवढं तुझे शरीर आणखी कार्यक्षम होईल !" ' आणि चाळीस वर्षानंतर काय ? ' मी मद्दामच आईला विचारायचो , पण त्यावरही तिचे उत्तर तयार " चाळीस वर्षानंतर फारस , काम करावं लागत नाही , आणि चाळीस वर्षापर्यंत वाढवलेली कार्यक्षमता पुढील आयुष्यासाठी उपयोगी येते ,समजलं .आणि मी मान डोलवायचो , आणि कदाचित मान डोलावल्यामुळेच आज मी " रडत राव " नाही झालो आजच्या तरुण पिढी सारखे ! कोणतीही अडचण येउदेत आम्हाला संकट असे कधी वाटलंच नाही . आजच्या युवांच्या दृष्टीने आमचा अप्रगत जरी काळ असला तरी आमच्या सारखे आनंदी / सुखी आयुष्य हि युवा पिढी कधीच जगू शकत नाही ,कारण तुमचे तंत्रज्ञान जीवन मूल्य कधी बदलवत नाहीत .


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational