STORYMIRROR

Ganesh Velankar

Inspirational

3  

Ganesh Velankar

Inspirational

महत्व -Importance

महत्व -Importance

2 mins
163

 ऐकलं आणि खूप वाईट वाटलं , आज तीस वर्षाचा तो मुलगा झाला तरी  त्याच आयुष्य अजूनही दिशाहीन .घरात दोघेच जण त्याची आई आणि तो . आईला pention मिळतं त्यावर घर चालत. वयाच्या बाविसाव्या वर्षानंतर प्रत्येक तरुणाच्या आयुष्यात जे घडत ते त्याचाही घडलं. कसाबसा graduate झाला आणि नोकरी पण मिळाली. नोकरी मिळाली आणि दोन वर्षात लग्नही झालं. नोकरी चांगली होती पण म्हणतात ना " देव देतो आणि कर्म नेत " तशी त्याची गत झाली .अजून चांगली नोकरी मिळेल या नादात सतत नोकरी बदलत राहिला आणि शेवटी कुठेच नोकरी नाही घरी बसण्याची वेळ आली. बायकोने गरिबी काय असते ते अनुभवलेलं होत . त्यामुळे तिची कोणतेहि कष्ट करण्याची तयारी होती. पण नवरोबा ! त्यांच्यापुढे काय चालणार? लहानपणापासून मध्यम वर्गीयात जरी त्याच आयुष्य गेलं असलं, तरी मनाला वळण लागण अत्यंत आवश्यक असत. एकुलता एक , आईने पराकोटीचे लाड केले , त्यामुळे मनाविरुध्ध होणाऱ्या गोष्टी सहन करणं, तडजोड करणं , शरीराला थोडा त्रास करून कष्ट करण्याची सवय असणं , मिळालेल्या गोष्टीत समाधानी असणं , याची त्याला सवय सोडाच पण अश्या गोष्टी आयुष्यात असतात आणि त्याची सवय असणं अत्यंत गरजेचं असत याची त्याला सुतराम कल्पनाही नाही नव्हे आईने कधी या गोष्टींची जाणीवही करून दिली नाही आणि अश्या मुलाचे वर्तन कसे असेल हे सांगण्याची गरज नाही व्हायचं तेच झालं दोन वर्षात बायको माहेरी निघून गेली, आणि बेजबाबदार आणि बेरोजगार यावर तिने सहज पणे घटस्फोट मिळवला .  

ऐन उमेदीत त्याची आई मॉडर्न विचारांची होती , त्यामुळे कुटुंब नवरा मुलं नातेवाईक हे सर्व व्यावहारिक , स्वार्थासाठी असत अश्या विचारांची असणारी आई मुलाला कोणते चांगले धडे शिकवणार होती . " जशी खाण तशी माती " त्यामुळे अश्या आईच्या मुलाचे आयुष्य दिशाहीन होणं हे काही आश्चर्याची गोष्ट नाही . आणि इथेच संस्कारांचं महत्व सुरु होत आणि तेच आपली संस्कृती आपल्याला शिकवत असते पण आम्हीच करंटे फाजील प्रगतीच्या हव्यासापायी ते थोतांड आहे असे ठरवून मोकळे होतो आणि नशिबाला दोष देत राहतो .    


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational