STORYMIRROR

Ganesh Velankar

Inspirational

2  

Ganesh Velankar

Inspirational

बाळकडू

बाळकडू

4 mins
81

आज संध्याकाळी हॉटेल मध्ये एका मुलीला भेटायला जायचं होत. म्हणजे मावशीनेच तसं ठरवलं होत .यंदा कर्तव्य असलेले आम्ही दोघंही एकमेकांना भेटून ,एकमेकांना अनुरूप आहोत कि नाही याची चाचपणी करणार होतो .आस्वाद हॉटेलमध्ये संध्याकाळी साडेपाच वाजता भेटायचं ठरलं होतं . मी बरोबर साडेपाच वाजता हॉटेल मध्ये पोचलो .हॉटेल मध्ये तशी फारशी गर्दी नव्हती पंधरा टेबलांमध्ये दहा बारा टेबलं रिकामी होती , बाकी टेबलांवर मैत्रिणी मैत्रिणी किंवा मित्र मित्र च बसलेले होते . मी त्यातल्या एका कोपऱ्यातल्या टेबलावर जाऊन बसलो , तिची वाट पाहत . बोलावल्या शिवाय येऊ नकोस असे मी वेटरला आधीच सांगून ठेवलं होत. वेळ काढायचा असला कि लोकं हातात मोबाइल घेऊन बसतात पण मी माझ्या सवयी प्रमाणे माझ्याबरोबर नेहमी एक पुस्तक ठेवतो. मला पुस्तकं वाचायला आवडतात .

 " मंदार भिडे का ?" माझ्या कानावर शब्द पडले ." हो , आपण नेहा जोशींचं ना " मी खुर्चीवरून उठत म्हटलं . तिने फक्त स्मित हास्य केलं आणि खुर्ची मागे करून आरामात बसली. " मला उशीर झाला का ? "" नाही मी पण आत्ताच येतो आहे " ." तुम्ही काही घेणार का ? " मी विचारलं " खायला काही नको पण मला कॉफी चालेल , इथली कॉफी स्पेशल असते " " लगेच सांगू कि " " कसंही " " मग ठीक आहे नंतरच मागवू " तिने मानेने होकार दिला ." मी माझी ओळख करून देतो "......विषयाला सुरवात करीत म्हटलं 

मी मंदार भिडे , माझं शिक्षण Bsc IT मुंबई येथे झालं , "

" एक मिनिट " माझं बोलणं मधेच तोडत ती म्हणाली. 

 " एकमेकांबद्दल बेसिक माहिती आपल्याला आहेच , गरज आहे , ती आपला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे ते समजून घेण्याचा , नाही का ? "" हो हो " मी थोडा गडबडलोच , भौतिक गोष्टींचीच नेहमी चर्चा होते असा गाढ अनुभव असतांना हे काय वेगळं ?मी मनाशी म्हटलं.  ती बोलू लागली " आयुष्यात सर्वात महत्वाची कोणती गोष्ट असेल तर ती आपली तत्व आणि  आता चांगली कोणती आणि वाईट कोणती ती आपल्याला बालपणापासून मिळणाऱ्या अनुभवावरून आपण ठरवू शकतो नाही का ?" हं " मी फक्त हुंकार दिला " का काय झालं ? " आश्चर्याने तिने विचारलं ." मुलगी पाहण्याचा आणि तिच्याशी बोलण्याचा माझा हा आठवा प्रसंग ! पण भौतिक गोष्टी सोडून आयुष्यातील महत्वाच्या गोष्टींवर एका होतकरू मुलीबरोबर चर्चा करण्याची माझी हि पहिलीच वेळ .गाडी बंगला प्रॉपर्टी ऐषोआराम , पॅकेज , एका छताखाली फक्त झोपण्यासाठी यायचे , कुटुंबात दोनापेक्षा जास्त सदस्य असता नयेत अश्या अमानवीय भरलेल्या अपेक्षांच्या ओझ्याखाली झालेले लग्न कसे यशस्वी होणार ?"" आणि म्हणूनच आपल्याला त्या विषयावर बोलायचे नाही , तुम्हाला काय वाटत ? " " खरं सांगू मला माझ्या आईवडिलांनी माझ्या लहानपणापासून मला एक बाळकडू सतत पाजलं आहेत ते म्हणजे प्रेम ,वात्सल्य ,त्याग, आदर, विनम्रता , विश्वास ,आणि .संयम .ह्या सातही हि गोष्टी ज्याच्या ठायी आहेत तो कधीही असमाधानी दुख्खी राहूच शकत नाही .तत्वांशी तडजोड हि स्वतः ची केलेली फसवणूक असते ." " हो ना , " नेहा बोलू लागली "अगदी बरोबर , माझे बाबा मला नेहमी सांगत आले आहेत कि प्रतिकूल परिस्थितीतही जो काही करून दाखवण्याची जिद्द बाळगतो तोच खऱ्या अर्थाने आयुष्य जगतो .कष्टाशिवाय मिळालेल्या गोष्टींनी आपण काही काळ सुखावतो ,पण त्याच वेळी मोह हि भावना उफाळून येते जी कधीच आपल्याला सुखाने समाधानाने राहू देत नाही ! माझ्या बोलण्याचे तुम्हाला आश्चर्य वाटेलही पण खरं सांगू या शहरातल्या जीवन शैलीचा मला प्रचंड तिरस्कार आहे.अगदी नाईलाजास्तव मी पुण्यात राहून CA पूर्ण केलं . या जीवन शैली पासून दूर जाण्यासाठी लग्न हि गोष्ट म्हणजे मला मिळालेली एक संधी आहे असे मी समजते . आणि म्हणूनच माझी पहिली अट होती शहरात राहणारा मुलगा नको ."

" अगदी बरोबर , आणि म्हणूनच मी हि अडीज वर्ष नोकरी करून रत्नागिरीत मालवी गावात माझा छानसा व्यवसाय सुरु केला ,आणि आता बऱ्यापैकी जोर धरला आहे . एकत्र कुटुंब हि आयुष्यभराची आपली शिदोरी असते कधीही न संपणारी . " आई वडील किंवा सासू सासरे आपल्या संसाराचे आधार स्तंभ असतात , आणि दुसरी गोष्ट म्हणजे  आपण जे इतके कष्ट करून शिकलो ते काय दुसऱ्याची चाकरी करण्यातच आयुष्य घालवायचं का ?" मी नेहाकडे आश्चर्याने पाहतच राहिलो." तुम्ही इतक्या वेगळ्या विचारांच्या असाल असं मला वाटलं नव्हतं म्हणजे तशी कल्पनाही केलेली नाही असाही मुली विचार करू शकतात ! ग्रेट मी खरंच भारावून गेलो आहे आणि ........ मी पुढे काही बोलणार तोच तिने धक्कादायक प्रश्न केला " मग कधी येऊ तुमचं घर बघायला मालवीला ?" मी तिच्याकडे पाहताच राहिलो , तिच्या प्रश्नातच तिची पसंती तिने सांगितली ." येऊ ना ? ' तिने पुन्हा प्रश्न केला " येऊ ना म्हणजे आता तुम्हाला कायमचं च तिकडे यायचं आहे ज्या वेळी तुम्ही म्हणालात कि या शहरी जीवनशैलीचा तुम्हाला तिरस्कार आहे तेव्हाच तुम्हाला मी पसंत केलं होत . "" आपल्या दोघांच्याही आईवडिलांनी आपल्याला असं "बाळकडू " पाजलं कि या शहरी मोहजाळातून आपल्याला मुक्त केलं आहे " बाळकडू या शब्दावर जोर देत ती म्हणाली मी वेटरला हाक मारली " दोन झकास कडक आणि नेहमीपेक्षा गोड कॉफी घेऊन ये "                                                                       .........................................मालकंस 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational