Nilesh Bamne

Romance

2  

Nilesh Bamne

Romance

वाचक

वाचक

7 mins
1.5K


एक दिवस रिकामी भेटली म्ह्णून बसमधे मी लेडीज सीटच्या मागच्या सीटवर खिडकीजवळ बसलो त्यामुळे होत काय की सुंदर सुंदर चेहरे अगदी जवळून पाहता येतात आणि त्यांचा मधूर आवाजही ऐकता येतो. एखादी सुंदर दिसणारी गुबगुबीत तरूणी अगदी तामिळ चित्रपटातील नायिकेसारखी ! शेजारी बसल्याचे भाग्यही कधी – कधी लाभते बर्‍यांच जणांना त्या सीटवर. पण याबाबतीत मला दुर्दैवीच म्ह्णावे लागेल. माझ्या शेजारी बहुदा एखादी तरूणी बसण्यापूर्वी एखादा परूषच बसतो, मी शरिराने नाजुक आहे म्ह्णून असेल कदाचित ! माझ्या शेजारी बसलेला पुरूष साक्षात मेनका जरी शेजारी येऊन उभी राहिली तरी हल्ली उठून तिला बस ! म्ह्णण्याचे धाडस करीत नाही कारण तो उटला आणि ती बसली नाही तर त्याचा पोपट व्हायचा विनाकारण ! सध्याचे पुरूष स्वतः उठून बसायला जागा देतात ती विवाहीत, गरोदर आणि वृद्ध स्त्रियांना कारण त्यांच्यातच त्यांना त्यांची आई दिसते. कित्येक वर्षाच्या दुर्दैवानंतर त्या दिवशी एखादी तरूणी शेजारी बसण्याचे भाग्य मला लाभले. माझ्या शेजारी बसलेली तरूणी परी कथेतील एखाद्या परी सारखी होती पण काळ्या परीसारखी ! तिच्या चेहर्‍यावर फॅरेन लव्हलीनेही हार मानली असती ! तिचा पोषाख हल्ली बहुसंख्य तरुणींना आवडतो तसाच होता अर्थात निळी जीन्स आणि पांढरा टी-शर्ट त्यावर अत्तराचा फवारा मारला होता. त्या अत्तराच नाव कदाचित मॅगनेट असावं ! अत्तराचा वास आला की माझं डोकं दुखू लागत आणि माझ्या कपालावर आट्या पडतात. त्यामुळे मला अत्तराच्या सुगंधापेक्षा घामाचा दुर्गंधच अधिक प्रिय वाटतो. असो ! आता तो त्रास सहन करण्याखेरीज माझ्याकडे पर्याय नव्हता. बसमधे बरीच गर्दी असल्यामुळे ती मला जरा नव्हे बरीच खेटून बसली होती. त्यात ती शरिराने जरा जास्तच मजबूत होती त्यामुळे मी अक्षरशः चेपला गेलो होतो. एखाद्याने तरुणीने चेपल्यामुळे जो आनंद एखाद्या पुरुषाला मिळतो तो आनंद मला काही मिळत नव्हता. उलट माझा जीवच गुदमरत होता. जो काही आनंद मिळायचा तो कदाचित तिलाच मिळत असावा. मी तिला चल बाजूला हो ! म्ह्णणं सध्याच्या कलियुगात सभ्यपणाच लक्षण ठरलं नसतं. मी तिच्या शरिराचा भार माझ्या शरिरावर सहन करत होतो. तिच्या शेजारी तिला खेटून एक सुंदर तरुणी उभी होती जिला तिचा हेवा वाटत असावा असा भाव तिच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता. तिला पाहताच मी मनातल्या मनात देवाला प्रार्थना करीत होतो. देवा हिचा बसस्टॉप लवकर येऊ दे आणि तिच्याजागेवर ही बसू दे ! देवालाही कधी नव्हे ती माझी दया आली. लवकरच माझ्या शेजारी बसलेली ती काळीमाता उटली आणि तिच्या जागेवर माझ्या स्वप्नातील परीसारखी दिसणारी ती सुंदर तरूणी हळूच बसली. ती ही मला खेटूनच बसली आणि आपल्या गुलाबी गालात गोड ह्सली. मी मनातल्या मनात देवाचे आभार मानले मला इतका सुंदर आर्शीवाद दिल्याबद्दल ! मगापासून मी तिच्या चेहर्‍याकडे एक टक पाहत होतो. पण आता ते शक्य होत नव्हते. अर्थात ! यापूर्वी कधी ते शक्य होत नव्हते. त्यामुळे डरपोक ही उपाधी सुंदर तरुणींनी आम्हाला केव्हाच बहाल केली होती. तिच्याकडे पाहणे शक्य नव्हते म्ह्णून मी खिडकीतून बाहेर रिक्षातून प्रवास करणार्‍या सुंदर तरूणी त्याच्या सुंदर मित्रांसह बसलेल्या पाहात होतो. इतक्यात कधी नव्हे तो जोराचा पाऊस सुरू झाला आणि पावसाच्या धारा खिडकीतून आत येऊ लागल्या. पावसात भिजन हा माझा आवडता छंद होता. त्यामुळे मी त्या पावसाच्या सरी अंगावर झेळ्त होतो. माझ्या शेजारी बसलेल्या त्या तरूणीने तिचा नाजूक हात माझ्या खांद्यावर हळूच ठेवला आणि मला म्ह्णाली, खिडकी बंद करायची नसेल तर तस सांगा म्ह्णजे मला माझी छत्री उघडायला. मी सॉरी ! सॉरी ! म्ह्णत खिडकी बंद करताच गालात गोड हसून ती थॅन्क यू ! म्ह्णताच माझ्या हृदयात जी काही काळवा - काळव झाली ती मी शब्दात व्यक्त करू शकत नव्हतो. आता मी खिडकीतून बाहेरही पाहू शकत नव्हतो आणि तिच्याकडेही पाहू शकत नव्हतो. रिकाम बसण माझ्या स्वभावात नव्हत म्ह्णून मी हातातील वर्तमानपत्र उघडून त्यातील एक कविता वाचायला सुरूवात केली. माझ्या नकळत तिनेही ती कविता वाचली आणि मला म्ह्णाली, कविता छान आहे नाही ? मी ही मानेनेच होकार दिला. तुम्हाला कविता वाचायला आवडतात का ? तिने पुन्हा प्रश्न करताच मी म्ह्णालो, मला कविता खूप आवडतात वाचायला आणि लिहायलाही ! तुला ? मी तिला सरळ सरळ एकेरी हाक मारल्यामुळे तिला थोड बरं वाटल असाव म्ह्णून की काय ती आता माझ्याशी अधिक उत्साहाने बोलू लागली. पण त्यात तिला बरं वाटण्यासारखं खरंच काही नव्हत कारण आमच्यावर आमच्यापेक्षा वयाने लहान असणार्‍यांना अहो ! जाहो ! करण्याचे मुळी संस्कारच झालेले नव्हते बहुदा ! कोणालाही एकेरी हाक मारली की आपण लगेच त्याचे मित्र किंवा नातलग होतो असा आमचा आतापर्यंतचा अनुभव होता. पण का कोणास जाणे मला अरे ! तुरे ! करण्याची हिंमत तिच्याच्याने काही होणार नव्हती तशी ती बर्‍याच लोकांची होत नाही. बोलता - बोलता तिलाही कविता लिहिण्याची आवड असल्याचे समजले म्ह्णून मी तिला तिचे नाव विचारले तर ती म्ह्णाली, ‘प्रतिभा जाधव !’ अर्थात मी मगाशी जी कविता मन लावून वाचत होतो ती तिनेच लिहिलेली होती. तोपर्यंत मी तिच्याकडे एक सुंदर तरूणी म्ह्णून पाहात होतो पण आता ती माझ्यासाठी एक कवयत्री होती. तिच्याबद्दल आता माझ्या मनात आदर निर्माण झालेला होता. आता मला तिच्यासोबत चर्चा करायला अधिक उत्साह वाटत होता. तुला इतक्या छान छान कविता कशा सुचतात ? माझ्या प्रश्नाला उत्तर देत ती म्ह्णाली, ‘ जशा त्या तुम्हाला सुचतात ! काही नाही आजुबाजुला पाहताना डोळे सताड उघडे ठेवले तर सहज सुचतात. आता हेच पाहना ! मगाशी तुमच्या बाजुला एक काळी परी बसली होती आणि आता मी बसले आहे मी स्वतःला परी म्ह्णणार नाही कारण तो अधिकार मला नाही. ते जाऊ दे ! ती काळी परी तुमच्या शेजारी बसल्यानंतर तुमच्या मनात झालेली कालवा – कालव आणि आता मी बसल्यानंतर झालली उलथा – पालथ यावर तुंम्ही एक छान कविता लिहू शकता. ती अशी बोलत होती जणू काही ती कधीतरी माझ्या हृदयातच शिरली होती तिचा बोजाबिस्तरा घेऊन ! मी स्वतःला सावरत तिला म्ह्णालो, ‘माझ्या मनात काय चाललय ? ते तुला कसं काय कळलं ? त्यावर गालात गोड हसत ती म्ह्णाली, ‘ते कळतं म्ह्णूनच मी कवयत्री झाले ना ?’ माझ्या दुर्दैवाने माझे केस तेंव्हा खांदयापर्यत वाढलेले होते आणि दाढी मिशाही बर्‍यापैकी वाढलेल्या होत्या ते पाहून ती मला विनोदाने म्ह्णाली, ‘तुमचा श्रावण आहे का ?’ तिला उत्तरादाखल मी म्हणालो, ‘ नाही ! ही सध्याची नवीन फॅशन आहे.’ माझा हजरजबाबीपणा पाहून ती खळ्खळून ह्सली. तिला हसताना पाहून साक्षात आनंद माझ्या शेजारी बसल्याची अनुभुती मला योऊ लागली होती. माझ्या दाढी-मिशांपर्यंत पोहचणारी ती पहिली तरूणी होती. पाहताक्षणी कोणा तरुणीने माझ्या प्रेमात पडावं इतका देखणा मी नक्कीच नव्हतो. मग ती अनोळखी तरुणी माझ्याशी इतकी जवळीक साधण्याचा प्रयत्न का करत होती ? हा प्रश्न मला सतावू लागला आणि मी तिला विचारले, ‘ तू मला ओळखतेस का ? त्यावर ती हसून म्ह्णाली, हो ! ओळ्खते ! अनोळखी माणसांशी ओळ्ख काढून स्वतःहून बोलण्याची मला सवय आणि हौस दोन्ही नाही. त्यावर मी म्ह्णालो, ‘ मी तर तुला ओळखत नाही तू मला कशी काय ओळखतेस ? त्यावर ती हसून म्ह्णाली, ‘ तुमची माझ्याबरोबर ओळख कविताने करून दिली ? कोणत्या कविताने ? त्यावर तिने पुन्हा प्रश्न केला तुमच्या ओळ्खीच्या किती कविता आहेत ? मी अगदी सहज उत्तर दिला चार ! अहो ! मी दोन पायांच्या कवितांबद्दल बोलत नाही मी कागदावर निवास करणार्‍या आणि ओठांवर रुळणार्‍या हजार पायांच्या कवितेबद्दल बोलतेय ! तुंम्हाला पाहून खरंच कोणाला वाटणार नाही की तुंम्ही कवी आणि लेखक आहात म्ह्णून ! तुमचं चालणं, बोलणं, हसणं, वागणं आणि राहणं ही सारच सामान्य माणसासारखं आहे. फक्त सामान्य माणसासारखे वागताना तुंम्ही तुमचे डोळे तेवढे सताड उघडे ठेवता. बर्‍याच दिवाळी अंकात मी तुमच्या कविता आणि कथा वाचल्या आहेत, वर्तमानपत्रातील लेखासोबत तुमचा फोटोही बर्‍याचदा पाहिला होता. तुमच्या कथा आणि लेख वाचताना खूपच वास्तववादी वाटतात अगदी प्रत्यक्ष जीवनात घडल्यासारख्या ! पण ते सार वास्तविक असतानाही वाचकांना ते काल्पनिकच वाटावं असं तुम्हाला वाटत असत का ? त्यावर स्वतःला सावरत मी म्ह्णालो, ‘नाही ! तस काही नाही कारण माझ्या प्रत्येक कथेत एक नायिकाही असते जी प्रत्यक्षात असतेच असे नाही. कथेला कल्पनेची जोड दयावीच लागते माझ्या कथेचा शेवट बर्‍याचदा गोड असतो जो प्रत्यक्षात घडलेल्या कथेत असतोच असं नाही. बर ! तुमच्या व्यक्तीगत जीवनात एखादी नायिका आहे की नाही ? त्यावर मी स्वतःला सावरत माझ्या कवितेतील लबाड पुरुषासारखा सहज म्ह्णालो, ‘नाही!’ माझ्या कथेतील प्रत्येक नायिका खरी होती, वास्तववादी होती अगदी हिच्यासारखी ! माझ्या कथा मन लावून वाचणार्‍या तिला माझा लबाडपणा लक्षात आल्यावाचून राहिला नसेलच ! तरीही स्वतःला सावरत मी म्ह्णाला, ‘माझ्या पुढच्या कथेतील नायिका कदाचित तू ही असशील ? त्यावर ती म्ह्णाली, ‘ मला तुमच्या कथेतील नायिका होण्यापेक्षा तुमच्या प्रत्यक्ष जीवनातील नायिका व्हायला आवडेल ...ती हे हळू आवाजात पण तरीही मला ऐकू येईल अशा आवाजात म्ह्णाली, मी ही ते ऐकुण न ऐकल्यासारखे केले. इतक्यात आमचा बसस्टॉपजवळ आला बसमधून उतरल्यावर रस्त्याने तिच्या छत्रीतून एकत्र चालताना ती मला म्ह्णाली,’ मला तुमची एका गोष्टीबद्दल माफी मागायची आहे ! त्यावर मी कोणत्या ? असं म्ह्णताच ती म्ह्णाली, ‘ मी मगाशी तुमच्याशी खोटे बोलले मी कवयत्री वैगरे नाही, माझे नाव प्रतिभा जाधव नाही तर मी नीलम पवार आहे, मी तुमच्या बहिणीची कविताची मैत्रीण आहे. आम्ही दोघी एकाच कॉलेजात होतो. तुमचे साहित्य मी वाचत असते. मी एक कवयत्री नसले तरी तुमच्या साहित्याची एक चांगली वाचक नक्कीच आहे मला तुमचे साहित्य आयुष्यभर वाचायला आवडेल त्यावर मी ही थोड्या प्रेमळ रागातच म्ह्णालो, हो ! आता तुला त्याच्याशिवाय पर्यायच नाही, नाही का ? असं बोलून ती प्रेमाने बिलगली आणि तिची छत्री तिच्या हातातून हवेने उडाली आणि आंम्ही दोघे प्रेमाच्या पावसात भिजून ओलेचिंब झालो...Rate this content
Log in

Similar marathi story from Romance