STORYMIRROR

Seema Kulthe

Abstract

3  

Seema Kulthe

Abstract

उन्हाळ्याची सुट्टी

उन्हाळ्याची सुट्टी

2 mins
323

एका रात्री मी अशीच आमच्या आवारातलया सोफ्यावर जाउन लोळले होते आणि सिलसिला चित्रपटाची गाणी ऐकत होते. अचानक आकाशात चंद्र आणि चांदण्या बघता बघता जी आठवणींची, सुखाची आणि माणुसकीची पिटारी उघडली, ह्याची तुम्हाला कल्पनाच करता येणार नाही. लहानपणीची उन्हाळ्याची सुट्टी जशी एका क्षणात समोर येऊन उभी राहिली.


ती उन्हाळाच्या सुट्टिची चाहुल, ती मामाच्या येण्याची चाहुल, लहानपणी आम्हा मुलांना उतावळे करुन सोडायची.


मामा आला कि भरलेली पिशवी घेऊन पटकन बाहेर पळून जायचाे. घरच्यांचा विचार बदलायच्या आधिच, मामालाही बाहेर काढायचो.


काकु आजी, आजोबा आणि मामाच्या छोटयाश्या घरात इतकि लोक कशी मावायाची, ते आज पर्यंत कळलंच नाही. त्यांची मोठी मने, प्रेम आणि आपुलकी पुढे सगळ्याच गोष्टी अगदी छोट्या होत्या. 

आज दोन मुले आणि ॲाफिस सांभाळता येत नाही, पण आजी सकाळी ४ वाजता उठून सगळी काम करायची शक्ती कुठून यायची, हे आज पर्यंत कळले नाही.


सकाळी सकाळी सगळ्यांच्या आंघोळी साठी लावलेला तो बंब आणि त्यातल्या जळणारया लाकडाचा सुगंध, कोणत्या अगरबत्तीला सुद्धा नाही. आंघोळी , सडा-रांगोळी नंतर तो पोह्यांचा सुगंध गावभर पसरायचा आणि आम्हाला उठायला भाग पाडायचा.


तयार होइन आजी आणि मावशी बरोबर नदीवर कपडे धुवायच्या नावाने जायचाे, पण आम्हाला एकदाही कष्ट पडु दिले नाहीत त्यांनी. उनाडक्या करत, कधी कधी छोटे मासे पकडत, आमचा दिवस कसा जायचा ते कळायचेच नाही.

घड्याळ नाही का सेल फोन नाही, पण पोटातले कावळे आणि तापते ऊन बरोबर घराची वाट दाखवायचे.

कधी पाऊस आला कि दिवसभर पत्ते खेळायचे, जो हारेल त्याने ब्रेड पकोडयाची पार्टी द्यायची. मज्जाच मज्जा.


नविन घराला मोठ्ठी गच्ची होती, गच्चीवर झोपायला जाणे म्हणजे आमच्या साठी मोठे celebration. 

अंताक्षरीच्या नादात गाणे गुनगुनत, तारे मोजत एखाद्या सिनेमाचे खरेखुरे द्रुष्यच समोर उभारायचे.

पण कधी कधी मध्य रात्रीचा पाऊस सगळ्या स्वप्नांवर पाणी फिरवायचा.


छान गार हवेची झुळुक क्षणात परत आज मध्ये घेऊन आली आणि आठवणीनी डोळे ओले करुन गेली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract