Arun Gode

Tragedy

3  

Arun Gode

Tragedy

उंच भरारी.

उंच भरारी.

4 mins
181


          अनुसुचित जाती मधील एक मुलगी जीच्या परिवाराची आर्थीक परिस्थिति अत्यंत दयनीय होती. . चिंध्या वेचलेल्या अन गोदडया शिवलेल्या परिस्थितित ते दिवस काढत होते. रोज आई-वडिल कमावुन आणनार व त्यातच मग कुटुंबातील जीवांचे भरण-पोषण होत होते. भारत स्वतंत्र झाल्या नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटने मुळे देशातील अनुसुचित जाती,जमाती व अन्य शैक्षणिक व मागासलेल्या नागरिकांच्या मुला-मुलींसाठी सरकार द्वारा त्यांना मोफत शिक्षण व शिष्यवृत्ती सुविधा प्रदान करण्यात आली होती. त्याच संधीचा उपयोग करुण ती तरुणी स्नातक पदवीधर झाली होती. कसले काय अन खायला काळ अन भुईला भार अशीच घरची परिस्थिति कायम होती. शिक्षण घेत असतांना तीच्याच समाजातील व वसाहती राहत असणा-या ,महाविद्यालया मधील मुलाशी तीला प्रेम झाले होते. प्रेमि मुलाची परिस्थिति तीच्या पेक्षा काही वेगळी नव्हती. सुदैवाने शिक्षण सुरु असतांनाच त्याला एक सरकारी नैकरी मिळाली होती.आर्थीक तंगीमुळे त्याने शिक्षण सोडुन देण्याचा निर्णय केला होता. व तो लगेच सरकारी सेवेत रुजु झाला होता.त्यांचे प्रेम संबंध ब-याच काळानंतर ही कायम आणी जीवंत होते. नंतर तीच्या वडिलांनी तीच्या साठी एक मुलगा पाहिला होता. त्या मुला सोबत तीने लग्न करावे असे तीच्या परिवाराचे मत होते. मियां-बिबि राजी तो क्या करेगा काजी ?. पण तीने तो मुलगा थोडा वयस्कर आहे असे कारन सांगुन नाकारले होते. शेवटी तीच्या या कृत्यामुळे तीला वडिलांचा तीरस्कार झेलावा लागला. नाव देवाचे आनी गांव पुज्या-याचे म्हणुन तिने आपल्या प्रियकरा सोबत कोर्ट मॅरेज परिवाराच्या विरुध्द जावुन केले होते.

        नवरा-मुलगा केंद्र सरकारच्या नौकरित असल्यामुळे त्याची सारखी बदली होत होती. सध्या ते दोघे ही पर प्रांतात होते. त्यांना एक मुलगा आणी एक मुलगी होती. आपल्या मुळ शहरी आपले स्वतःचे घर बांधावयाचे असे त्यांनी ठरविले होते. त्या दिशेने त्यांनी आपली वाटचाल सुरु केली होती. त्याने एका अविकसित गृहनिर्माण संस्थेमधे एक घर बांधण्यासाठी जागा घेतली होती. गृहकर्ज मिळावे या साठी एका बैंकेच्या योजनेत पैस्याची गुनंतवणुक पण केली होती. मुले साधारण मोठी होवुन मोठा मुलगा शाळेत जात होता. त्याची बायको सुरुवाती पासुनचं फार महत्वाकांक्षी होती. तीला आपले शिक्षण पूर्ण झाले नाही याची खंत होती. दोघांनी निर्णय घेतला होता कि तीने आपले शिक्षकाचे प्रशिक्षण पूर्ण करायचे !. त्यासाठी तीने धड-पड सुरु केली होती. तीला त्यासाठी प्रवेश पण मिळाला होता. ती आपल्या मुलांना सोबत आपल्या जन्म-शहरी राहु लागली होती. व आपले प्रशिक्षण पूर्ण करित होती. शेवटि तीचे प्रक्षिक्षण पूर्ण झाले होते. ती शिक्षिकेच्या नौकरीच्या शोधात लागली होती. त्याच अवधी मध्ये तीच्या पतिची पण तीथेच बदली झाली होती. सर्व योग आता मना सारखे जुळुन आले होते. 

        सर्व कुटुंब एकत्र आल्याने कुटुंबा मधे आनंदाचे वातावरण तैयार झाले होते. उताविळ नवरा अन गुडघ्याला बाशिंग. सर्व काही सुरळीत व मना सारखे घडत चालले होते.म्हणुन दोघांनीही घर बाधंनीचे काम सुरु केले होते. घर बांधण्यासाठी लागणारे भांडवल जीथुन शक्य होत होते, ते घेण्यात आले होते. डोक्यावर कर्जाचा डोंगरच उभा झाला होता.कसा तरी पहिला माला तयार झाला होता. अजुन बरेच काम बाकी होते. आता पैसा कसा जमवायचा असा प्रश्न उभा झाला होता. काम स्थगित करावे लागले होते, ते कसे पुन्हा सुरु करता येईल याच गोंधळात घरप्रमुख नेहमी राहत होता. 

         होळीच्या निमित्याने कार्यालियन मित्रा सोबोत तो एका पार्टिला गेला होता. पार्टि मध्ये स्वतःवर स्वयंम दूर्दैवाने ठेवु शकला नव्हता. दारुचे प्रमाण क्षमते पेक्षा जास्त झाले होते. सर्वच मित्र –मंडळी नशेत होती. त्यामुळे कोणाचे कोणाकडे विशेष लक्ष नव्हते. पार्टि संपल्या नंतर प्रत्येकाने आप-आपल्या घरचा रस्ता पकडला होता. रात्रीचे वेळ होती. शहरात बरेच रस्त्यांचे कार्य प्रगती वर सुरु होते. एका उडान पुला जवळ घर प्रमुखाला एका अज्ञात वाहानाने ठोस दिली होती. व ते वाहन ठोस देवुन भितिमुळे सपाट्याने निघुन गेले होते. नंतर पेट्रोलिंग घालना-या पोलिस वाहानाला अपघाताची जान झाली होती. त्याला मेडिकलला भरती करण्यात आले होते. डोक्याला मार लागल्यामुळे तो कोमात गेला होता. जवळ-जवळ एक वर्ष पर्यंत तो कोमात राहिला होता. उपचारावर बराच खर्च होत होता. नियमाप्रमाने कार्यालया तर्फे शक्य ती मदत होत होती.पन ती अपुरी पडत होती. कुंटुंबा जवळ असले-नसलेले धन संपूर्ण खर्च झाले होते. सुट्या संपल्यामुळे कार्यालयाने नियमा प्रमाने पगार काढने पन बंद केले होते. गृहिणी आता चारही बाजुने संकटाच्या जबड्यात सापडली होती. शेवटी त्याने कोमा मधेच शेवटचा श्र्वास घेतला होता. तीने केलेली तपस्या व प्रेम त्याचे प्राण वाचवु शकले नव्हते.

      गृहिणीचे या सर्व संकटातुन निघण्याचे प्रयत्न असफल होत होते.तिला शिक्षकाची नौकरी पण मिळत नव्हती. ज्यासाठी ऐवढा मोठा उठा-ठेव करण्यात आला होता. शेवटी सरकारी नियमाप्रमाने तीला निश्चित भरपाई वाटा मध्ये कार्यालयात कनिष्ठ लिपिकाच्या पदावर नियुक्ति मिळाली होती.त्यामुळे आर्थीक संकटातुन थोडी मोहलत मिळाली होती. तिला माहित होते कि या संकटातुन कायमचे बाहेर पडायचे असेल तर प्रथम मुलांच्या शिक्षणा कडे लक्ष देने जरुरी होते कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ज्या परिस्थिथित घर होते. तीथेच ते वास्तव्य करित होते.नविन कॉलोनी असल्यामुळे सर्वांची गैर-सोय होत होती. आलीया भोगासी असावे सादर म्हणुन सर्व कुटुंब हाल-अपेष्टा सहन करत मार्ग काढत होता. डॉ. बाबासाहेबांचा शिकवणीचा, शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे याचा खरा ठसा गृहिणी वर फार आधी पासुन उमटला होता. जो थांबला तो संपला. हे तीला माहित होते. म्हणुन तीने फक्त मुलांच्या शिक्षणा कडेच लक्ष दिले होते. त्याचा परिणाम असा झाला कि दोन्ही मुले इंजिनिअर झाले होते. आणी मोठ्या पगारावर चांगल्या कंपणीत निर-निराळ्या शहरात कार्यरत होती.आपल्या पतिने मेहनत करुन बांधलेल्या घराचे काम तिने पूर्ण केले होते. आणी पतिची आठवण म्हणुन त्या घरात आपले उरलेले आयुष्य काढत होती. पति-पत्निने त्यावेळेस घेतलेली ऊडण यशस्वी होवु नाही शकली याची खंत तीला नक्कीच होती.



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy