STORYMIRROR

Anuja Dhariya-Sheth

Inspirational

3  

Anuja Dhariya-Sheth

Inspirational

तुम्ही फिट तर आयुष्य होईल हीट

तुम्ही फिट तर आयुष्य होईल हीट

3 mins
238

ओह्ह्ह समिधा..!! तुझ्याकडे बघून वाटतच नाही तूला दोन जुळी मुले झाली आहेत.. कसे काय इतके मेन्टेन ठेवलस? समिधाची मैत्रिण जुई अगदी आश्चर्याने म्हणाली.


अगं मला एकच आहे, पण माझी पाठ सोडत नाही बघ. मी उठले की उठून बसतो. मी जिथे जाईन तिथे माझ्या मागे मागे येतो. त्याच करण्यातच अख्खा दिवस जातो मला स्वतःसाठी वेळच मिळत नाही. आणि सासू असून काहीच उपयोग नाही बघ. त्यांच्या मनात असेल तर त्या बघतात नाहीतर त्याचं ठरलेल वाक्य माझ्याच्याने आता काही होत नाही.. नवरा म्हणतो जरा स्वतःकडे बघ.. मला खरच काहीतरी टिप्स दे ना..


समिधा गोड हसली. ती जूईला म्हणाली, तू ऐकणार असलीस तर सांगतें.


अगं हो ऐकेन मी.. जूई


सगळ्यात आधी स्वतःला महत्व द्यायला शिक. मुले लहान आहेत तोपर्यंत त्याचं सर्व आपल्यालाच करायचे असते. त्यामुळे तू व्यवस्थित असलीस तर त्याचं सर्व व्यवस्थित होईल... समिधा


म्हणजे नेमकं काय करू?... जूई


मुलांचे टाइम टेबल ठरव. तूला वाटेल 2 वर्षाच्या मुलांचे कसले आलंय टाइम टेबल? पण तीचं सवय त्यांना पुढे लागतें. अगं हा सुद्धा पालकत्वाचा टप्पाच आहे एक प्रकारचा.. समिधा सांगत होती.


त्याचं उठण्याच, झोपण्याच, खाण्याच सगळ्याच गोष्टींचे एक टाइम टेबल ठरव, त्या प्रमाणे सवय लावलीस कि तूला तुझा मी टाइम नक्की मिळेल. माझी मुले सुद्धा असेच करायची, त्यात दोघे त्यामुळे तें झोपताना मी एकदम बारिक आवाजात म्युझिक लावुन ठेवते. नेट वर lullaby म्हणुन खुप् म्युझिक येतात. एकतर तें खूप शांत असतात. म्युझिक एक मेडिटेशन प्रमाणे असते त्यामुळे त्यांना शांत झोप लागतें. ते जेवण करताना मागे मागे यायचे तेव्हा किचन मधून त्यांच्याशी बोलणे. रोज काहीतरी नवीन खेळणं म्हणजे बाजारातून नाही बर का? आपल्या स्वयंपाक घरात असणार त्यांना दिले की मूल त्याचे निरीक्षण करते, अधून मधून आपण बोलत रहायचं.. म्हणजे त्यांचे सुद्धा काम होते आणि आपले सुद्धा..



लहान असताना म्युझिक ऐकत तें झोपले की मी व्यायाम करायचे.. कधीच खंड पडून दिला नाही. आता काय होते एवढ्या लहान मुलांना पण आपण प्ले हाऊस पासून शाळेत टाकतो. त्यात दोघांचं आवरताना मला वेळच मिळायचा नाही. पण सकाळी 9 वाजता तें शाळेत गेले की मग् मी ह्या जवळच्या गार्डन मध्ये जाऊन थोडे चालून येते. मुलं येईपर्यंत सर्व जेवण आवरून ठेवते. दुपारी त्याच्या सोबत खेळते सर्व आवरून तें झोपले की थोडा वेळ अराम करून रात्रीची थोडी तयारी करते आणि संध्याकाळी त्यांना घेऊनच व्यायाम करायला लागले. थोडे दिवस त्यांना मज्जा वाटली. पण नंतर मात्र मी शांतपणे व्यायाम करू शकले नाही.


शेवटी सरळ संध्याकाळी त्यांना इथे जवळ साने काकूंची संस्कॄती बाग आहे तिथे सोडायला लागले. तिथे त्या श्लोक शिकवतात, खेळ घेतात. मला किती जण म्हणाले एवढ्या लहान वयात मुलांना किती लोड देतेस? पण बघणार्यांना काय कळतंय ग? मी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देते. हे सगळं आपण चांगल्यासाठी तर करतो.. माझ्या सासू बाई तर सारख्या बोलत असतात, आम्ही कधि मुलांच्या मागे एवढे लागलो नाही. आम्ही कधी असल्या गोष्टींना महत्व दिले नाही.


पण मी एका शब्दाने बोलत नाही, आग मुलांचे जेव्हा कौतुक होते ना कि एवढ्या लहान वयात मुले किती छान श्लोक म्हणतात? असे म्हटलं की मग् पुढे येतात.. अश्या वेळेस मी मात्र दुर्लक्ष करते.. आपल्या फिटनेसची काळजी आपणच घ्यायला हवी हा विचार करते.


टाइम टेबल ठरवलं आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीला मला हवा तसा वेळ मिळतो.


जूईने समिधाचे आभार मानले. घरी येऊन तिने सुद्धा तिचे टाइम टेबल तयार केले. सुरुवातीला कुरबुर, कटकट झाली पण तिने त्या कडे दुर्लक्ष केले. तिच्या नवऱ्याला जयेशला मात्र तिच्या मधील हा बदल खूप आवडला, त्याने तिला सर्व मदत करण्याची तयारी दाखवली. दोन महिन्याने जेव्हा जूई समिधाला भेटली तेव्हा जूई मधला बदल बघून समिधाला खूप आनंद झाला.


काय मैत्रिणींनो तुम्ही पण बनवताय ना टाइम टेबल.. नक्की बनवा अन् स्वतःला स्पेशल समजून स्वतःवर प्रेम करा. स्वतःला वेळ द्या. तुम्ही फिट तरंच तुमचे कुटुंब, तुमची मुले, तुमचा नवरा नेहमीच होतील हिट. स्वतःला द्या दिवसभरातील काही बिट्स मग् बघा कसे तुम्ही तुमचे आयुष्यात माराल हिटस्...


कशी वाटली कथा? आवडली असेल तर खाली ❤️ असा आकार आहे तो नक्की प्रेस करा.

अभिप्राय द्यायला विसरू नका हं..!! अर्थात तुमच्या कंमेंटमधून.. अजून लेख वाचत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका.... साहित्य चोरी हा गुन्हा आहे.

सदर कथेच्या प्रकाशनाचे, वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे याची नोंद घ्यावी.

कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational