kanchan chabukswar

Inspirational

4.5  

kanchan chabukswar

Inspirational

टर्निंग पॉइंट

टर्निंग पॉइंट

3 mins
356


त्याचं झालं असं की वर्गात नेहमीप्रमाणे वार्षिक संमेलनासाठी म्हणून नाटक करायचं ठरलं.

  तेव्हा पु ल देशपांडे यांची सगळी नाटकं मुलांना पण आवडायची आणि फार मजेशीर असल्यामुळे नाटकाची तालीम करताना पण खूप मजा यायची. सर्वानुमते "विठ्ठल तो आला आला" या नाटकाला थोडं अजून संक्षिप्त करून आमच्या दहा मिनिटाच्या वेळेमध्ये करायचं ठरलं.

   पात्रांची निवड करणे ही नेहमीप्रमाणेच एक डोकेदुखी होती.

विठ्ठलाच्या देवळातल्या ब्राह्मण, थोडासा अनुनासिक उच्चार असलेला, गोरापान मुलगा , अनुज याला करण्यात आलं.

शेठजी पण का गोर्‍यापान सुरेख उंच बांधेसूद मुलाला करण्यात आलं. देवळात येणारी नटी साठी बऱ्याच मुलींनी हात वर केले, त्यातून अनघाची निवड झाली. नऊवारी साडी नेसून ती तालीम करत असे. देवळात येणाऱ्या शिंपी, बाकीची पात्र फटाफट ठरली, राहता राहिला विठ्ठल.


   नेहमी शांत बसणाऱ्या सिद्धार्थ का कुणास ठाऊक माझ्या मनात भरला होता.

विठ्ठला साठी म्हणून मला काळाच मुलगा हवा होता.

शेवटी दररोज जेवणाच्या सुट्टी च्या वेळेला मी मुलांची परीक्षा घेत असे. पंधरा मिनिटाच्या नाटकांमध्ये विठ्ठल स्थिर उभाच पाहिजे, तो हलून चालणार नाही, तोः हसता कामा नये , दोन्ही कमरेवर हात ठेवून डोळ्याची पापणी पण न हलवता स्थिर उभे राहणे हे अतिशय कठीण काम होते. त्यातून विनोदी नाटक असल्यामुळे बाकीची पात्र हसल्यावर विठ्ठलाला पण खूप हसू येई.

वर्गामध्ये सात-आठ काळी मुलं होती. कोणीही स्थिर उभी राहू शकत नव्हती. त्यामुळे शेवटी सिद्धार्थची विठ्ठल म्हणून निवड झाली.


    वर्गामध्ये आमूलाग्र बदल झाला. सिद्धार्थच कमरेवर हात ठेवून स्थिर उभे राहणे, कितीही गोंधळ झाला, मुलांची हसून हसून पुरेवाट झाली तरीपण चेहऱ्यावरची रेषही न हलवता स्थिर, धीर गंभीर पणे उभे राहणे, फक्त त्यालाच जमत होते.


 झालं! दुसऱ्या दिवशीपासून आमची तालीम जोरात सुरु झाली. काही मुलं हौसेने रोजच नाटकाचे कपडे जेवणाच्या वेळेस चढवत.


शेटजी, भटजी, शिंपी, फुलं विकणारी, सगळ्यांनाच बोलण्याची वाक्य कमीच होती. शेटजी चा लाळघोटेपणा, तो आपल्या धोतराचा काचा मारणे वरून व्यवस्थित दाखवत असे. हडकुळा गोरा पान भटजी, तिरळा शिंपी सतत मोजमापाची टेप घेऊन देवळात येणाऱ्या सगळ्यांचीच मापे घेत राही. स्त्री पात्र सतत ठुमकत ठुमकत चालत राही, बऱ्याच वेळेला बाकीची मुले तिच्या मागे तसच चालून तिची नक्कल करत.


    होणारी आरती," येई ओ विठ्ठले माझे माऊली ये" सर्व मुले अगदी तालासुरात म्हणत.

क्लायमॅक्सच्या सीनमध्ये भटजी च्या पाठीत विठ्ठल स्वतः बुक्का घालतो , हा सिन मुलांनी मनापासून घटवला. सगळ्याचं टाइमिंग एकदम व्यवस्थित केल्यामुळे आमचं नाटक फारच जोरदार झालं.

   प्रत्येक मुलाला आपणच हिरो असल्यासारखं वाटत होतं, सुरेख सुंदर शेटजी नायकिणीच्या तर प्रेमातच पडला. शिंपी बाकीची मंडळी सगळेच एकमेकांच्या प्रेमात पडली. अभ्यासात सगळेजण काही अपवाद वगळता, जेमतेम होते, पण जसं नाटक झालं तसेच जादूची कांडी फिरली. काळे गोरे हा भेदच मावळला, एकजुटीने सगळ्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. मधून मधून स्ट्रेस बस्टर म्हणून एखाद्या फ्री पिरियड ला परत मुलं नाटक खेळत. गंमत म्हणून नाटक खेळताना प्रत्येक जण दुसऱ्याचा रोल करे, त्यांच्या दिलखुलास असल्यामुळे, हसण्यामुळे, माझा वर्ग एकदम आनंदी झाला होता.

मुलांनी मला गम्मतच सांगितली, त्यांच्या स्काऊट गाईड कॅम्प मध्ये आमच्या नाटकाला बरीच मागणी झाली, बरे स्काऊटच्या कॅम्पमध्ये मुली नव्हत्या मग नायकिणीचा रोल मुलांनीच केला. सगळीच मज्जा.

 वर्षाच्या शेवटी तर मला आश्चर्याचा धक्काच बसला, माझा पूर्ण वर्ग उत्तम मार्कांनी पास झाला होता आणि पहिला आला होता विठ्ठल झालेला सिद्धार्थ. 

   " मला माझ्या क***** रंगाने, चेहऱ्यावर आलेल्या मुरुमांचा डागाने फार लाजिरवाणी वाटे हो, वर्गातील सुंदर सुरेख दिसणारी मुलं, त्यांचं रुबाबदार वागणं, कुठेतरी मला सलून जाई. मॅडम, तुम्ही मला विठ्ठलाच्या रोल दिल्यामुळे माझ्यातला "मी" जागा झाला. एवढ्या मोठ्या देवाची भूमिका केल्यानंतर माझ्या मानसिकतेमध्ये बदल झाला, दिसण्यावर काहीच नाही, आपण जसं करू तसे आपण दिसू हे मला ठळकपणे जाणवलं आणि स्वतःला अभ्यासात झोकून दिलं.

   तुम्ही मला जे स्थिर उभे राहण्याचे चॅलेंज दिले ना, तो क्षण, ते नाटक, माझ्या आयुष्याचं टर्निंग पॉइंट ठरल." डोळ्यात पाणी आणून, अभिमानाने सिद्धार्थ आपलं मन मोकळं करत होता.


खरंच, अभ्यासाव्यतिरिक्त काही ॲक्टिविटी शाळेमध्ये केल्या जातात, ज्या, कोणाच्या तरी हृदयाला हात घालून जातात आणि माहिती नाही एखादी कृती कोणाच्यातरी आयुष्यातला टर्निंग पॉइंट बनुन जाते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational