STORYMIRROR

Priyanka Kute

Horror Thriller Others

3  

Priyanka Kute

Horror Thriller Others

टेनन्ट एक लघुभयकथा

टेनन्ट एक लघुभयकथा

7 mins
12

"अजय, अरे असे किती दिवस रूम शोधण्यासाठी घालवणार आहोत आपण." शेखर बिछान्यावर निराश बसून त्याला बोलत होता . ते दोघेही सध्या एका छोट्या लॉजवर राहून त्यांचा डॉक्टरकी चा अभ्यास करत होते. व्यवस्थित अशी खोली त्यांना अविवाहित असल्याने कोणी देत नव्हते.

"शेखर, मित्रा तुला माहिती आहे ना मी कुठे कुठे भटकतो ते, आता बॅचलर्स ला कोणी रूम देत नाही , त्यात मी तरी किती मागे लागणार." अजय पण निराश झाला होता.

" तसे नाही रे, इतक्या कोंदट खोलीत अभ्यास होत नाही, नुसता घामानेच अंघोळ होत राहते, कंटाळा आलाय रे, अभ्यासात लक्षच जात नाही रे ." शेखर आपली त्रासिक अवस्था अजय पुढे मांडत म्हणाला. अजय ला ही या गोष्टींची पूर्ण कल्पना होती, त्या दोघांनी अभ्यासिका हि लावलेली, पण तिथे धिंगाणा जास्त व्हायचा त्यामुळे तो पर्याय ही त्यांना बंद करावा लागला. सगळीकडून गळचेपी होत होती, आणि डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करायचे होतेच. त्यांचे बोलणे चालूच होते की अजय चा फोन वाजला, अजय ने बघितले तर इस्टेट एंजट राघवचा फोन होता, अजय ने लगेचच फोन उचलला. " बोला , राघव जी , काही मिळाले का आमच्या दोघांसाठी घर किंवा छोटीशी खोली रेन्टवर?" अजय च्या या प्रश्नावर पलीकडून राघव बोलला, " अजय, तुमच्या दोघांसाठी एक छान घर मिळाले आहे, आणि ते ही कमी भाडेतत्त्वावर." राघव जरा वयाने मोठा असल्याने तो अजय ला छोट्या भावाप्रमाणे वागवत होता, पण त्यालाही ते घर कमी भाडेतत्त्वावर दिल्याचे आश्चर्य होते, तो एरीया उच्च प्रतीच्या एरिया मध्ये गणला जात होता , पुण्यातील सोफिसेटिकेटेड असा तो भाग होता. तिथे जास्त घराची गर्दी नव्हती, ते घर नेहमीच रेन्टवर दिले जायचे, पण तिथले आधीचे भाडोत्री आपणच निघून जायचे अशी आजूबाजूची लोक सांगत होती. राघव ला मात्र यातले काही माहिती नव्हते. अजय च्या व्यवस्थित अभ्यासासाठी आणि त्याची मदत व्हावी यासाठी त्याने त्या घराचा भाडेकरार संपन्न केला.

अजय आणि शेखर पुढील आठवड्यातच तिथे राहायला जाणार होते.

" राघव जी, फारच छान आहे हे घर, पण इतकी कमी किंमत का आहे रेन्टची!" शेखर ने असा प्रश्न उपस्थित केला , ज्याचे उत्तर राघव कडे पण नव्हते.

" शेखर, मला फक्त रेन्टवर घर द्यायचे काम आहे, आणि त्याची योग्य प्रक्रिया करून घ्यायची." राघव कामापुरता बोलून मोकळा झाला. त्याच्या ही मनात शंका येतच होती की हे का कमी दरात मिळत आहे. त्याने जास्त काही विचार केला नाही. तो अजय कडे वळला आणि त्याला म्हणाला, " अजय, काही ही अडचण आली की मला बिंधास्त फोन कर, कमी दरात मिळतय खर, पण एरिया चांगला आणि उच्चभ्रू आहे, त्यामुळे काही ताण घेऊ नकोस." राघव त्यानंतर लगेचच घराबाहेर पडला.

अजय त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत काही काळ दाराबाहेर उभा राहिला, दुपार झालेली , उन मी म्हणत होते, पण त्या घरात कमालीची शांतता आणि गारठा भासत होता. दोघेही त्या शांततेने थोडे सुखावले होते खरे , पण एक जीवघेणी शांतता जणू ती भासत होती. अजय ने दुपारचे जेवण त्याच्या नेहमीच्या खानावळीतून आणले होते, दोघांनी ही जेवण करून घेतले, भात खाणे दोघेही टाळत होते, अभ्यासाच्या कारणांमुळे त्यांना ते योग्य ही वाटत होते. जेवणे उरकल्यानंतर पेपर प्लेट त्यांनी एका काळा रंग असलेल्या पिशवीमध्ये भरली आणि दोघांनी अभ्यासासाठी आपापली खोली निवडली. अभ्यासात दोघेही उत्तम होते आणि त्यात शांतपणे कसीलीही रोकटोक नसल्याने अभ्यास अजून चांगला होत होता. असेच काही दिवस गेले, दोघांचेही अगदी उत्तम चालले होते, अजय चे तसे कोणीही नव्हते, तोच पार्ट टाइम काम करून त्याचे शिक्षण पूर्ण करत होता, तर शेखर च्या घरी सगळे मुबलक होते, त्याच्या बाबांचा उद्योग त्याने सांभाळावा हिच त्याच्या बाबांची अपेक्षा होती, पण त्याला रूग्णसेवा करणारा डॉक्टर व्हायचे होते, या मतभेदांमुळेच एकाच शहरात राहून तो घरापासून वेगळा राहत होता. त्याच दरम्यान अजयशी त्याची मैत्री झाली, पहिली दोन वर्षे थोडीशी खडतरच होती, पण त्यातही त्यांनी छानपैकी निभावून नेले, दोघेही जन्मतःच हूशार होते, त्यामुळे त्यांना कसलाच त्रास जाणवत नव्हता. पण ते ज्या मुलांसोबत राहत होते त्यांना मालकाने मद्यपान करताना पकडले होते, आणि नाईलाजास्तव त्या मुलांसोबत त्यांचीही हकालपट्टी तिथून झाली होती, कुठेतरी रहावे म्हणून एका कोंदट खोलीत ते रहात होते, पण ना तिथे झोप मिळत होती ना अभ्यास होत होता. त्यामुळेच त्यांना हे घर मिळाल्याचा आनंद दुप्पटीने होता

" मला या खोलीतून बाहेर काढा, माझा जीव गुदमरतोय इथे." एक लहानसा आवाज रात्री बाराच्या शांततेत चांगलाच ऐकू येत होता. कूठूनतरी बंद खोलीतून आवाज या दोघांच्या कानावर पुटपुटल्यासारखा येत होता.

रात्रीच्या काळोखात कानाजवळ पुटपुटत असल्यासारखे भासणे आणि ते ही नव्याने राहिला आलेल्या घरामध्ये, दोघांना ही भितीची सामायिक जाणीव झाली, दोघेही एकाच वेळी बिछान्यावर उठून बसले. त्यांच्या दोघांच्या खोल्यांच्या मधोमध एक खोली होती जिच्या आतून दरवाजा बडवण्याचा आवाज आला आणि तो पुटपुटल्यासारखा आवाज आता मोठ्या प्रमाणात येऊ लागला. शेखर जरा भित्राच होता, तो भितीने अजून पांघरूणात घुसला. पण अजय मात्र, पटकन तिथून बाहेर आला, त्याला काहीतरी विचित्र जाणवले होतच पण खरच कोणी अडकले असेल तर , त्याला वाचवणे गरजेचे आहे हा विचार करून अजय पुढे जाऊ लागला. शेखर पांघरूण घेऊन असला तरी तो त्या दाराकडे तोंड करून होता, त्याला अजय दिसला तसा तो अजयला आवाज देऊ लागला, " अजय, अरे कशाला जातोस, काय असेल तिथे काय माहिती!"

" अरे, कोणी अडकले असू शकते खरच, बघायला हवे ना!" अजय शेखरला त्याच्या कडे न बघता बोलला.

" अरे पण, चार पाच दिवसांनी तो अडकलाय याची जाणीव व्हावी त्याला." शेखरच्या या वाक्यावर दोघांनाही भितीचा जबरदस्त स्पर्श झाला.

" थांब रे थोडे, बघू तरी आधी." अजय आता त्या दाराजवळ येऊन मागे वळत शेखरशी बोलत होता. तसे ते दार आपोआप उघडले आणि अजयला पटकन खेचून घेऊन बंद ही झाले, काही क्षणात सारे घडले होते, आता मात्र शेखर चांगलाच हादरला, त्याला त्या दाराजवळ जायची भिती वाटू लागली, तो पांघरूणातच शांत लपून राहिला, त्यांना हवीहवीशी वाटणारी शांतता आता मात्र शेखरला बोचू लागली होती, त्याला आता अजयची ही आठवण येत होती, पण बिछान्यावरून उठण्याची हिंमत तो करू शकत नव्हता.

त्याच्या आसपास आता त्याला काहीतरी फिरत असल्याची जाणीव होऊ लागली, आतापर्यंत माहिती असणारे सगळे देव आपणच त्याच्या तोंडातून उच्चारले जात होते, घामाने डबडबलेला तो जरा सुद्धा हालचाल करू शकत नव्हता. 

शेखर पाठीचा उंचवटा करून तसाच पांघरूणात पहुडला होता, त्याला कधी झोप लागली असावी, त्यालाच समजले नाही, दरवाजाच्या आवाजाने त्याची झोप मोडली आणि पटकन तो बिछान्यावर आदळला, रात्रीचे आठवून पुन्हा भितीने त्याला कापरे भरले, आणि क्षणभरातच तो घामाघूम झाला. दरवाजा बडवण्याचा आवाज पुन्हा पुन्हा येत होता, पण शेखरची उठण्याची हिंमतच होत नव्हती. तो भितीच्या वलयात होताच की त्याचा फोन वाजू लागला, दचकून त्याने फोनकडे पाहिले, अजयच्या फोनवर राघवचा फोन येत होता.  फोनजवळ जाताना ही त्याला दडपण जाणवत होते, पटकन त्याने कानाला फोन लावला आणि समोरून खरच राघव आहे का हे तपासू लागला, " अरे अजय, कुठे आहात तुम्ही दोघे, कधीचा फोन लावतोय दोघांना." राघव जरा काळजीत बोलत होता.

" राघव जी, मी शेखर बोलतोययय.. तततुम्ही घरी या न प्लिज. शेखर भितीने भारलेला होता, त्याचा आवज ही निघत नव्हता.

" शेखर , अरे मी घराच्या बाहेरच आहे, कधीचं दार वाजवतोय." राघवचे वाक्य ऐकताच शेखर दाराच्या दिशेने जवळजवळ धावलाच, दार उघडत घामेजलेल्या अंगाने त्याने अक्षरशः त्याला मिठी मारली. त्याचा अवतार बघून राघव ही चाट पडला.

" अरे, परवाच तर आपण भेटलो होतो, आज असे काय झाले की तुझी ही अवस्था झाली आहे, आणि अजय कुठे आहे!" राघव ला ही आता काही ठिक वाटत नव्हते, आणि त्याने लगेचच अजय बद्दल विचारले, अजयचे नाव ऐकून शेखर अजूनच जोरजोरात रडू लागला आणि त्या दाराकडे हात दाखवत राघव ला सांगू लागला, " राघवव जी, कककालल अजयय या दाराजवळ उभा होता माझ्या शी बोलत, त्याला कोणीतरी आत खेचले त्यानंतर तो परत बाहेर आलाच नाही.. आता परत एकदा शेखरने टाहो फोडला. रात्रीचा प्रसंग किती भयानक असेल हे शेखरच्या वागणूकीवरून राघव ला ही समजत होते.

राघवने दाराजवळ जाण्याची थोडी हिंमत केली, त्यालाही शेखर कडून वर्णन ऐकून दरवाजा उघडायची भिती वाटत होती, त्याने दार उघडायला सुरवात केली , पण दार आतून लॉक होते, दोघेही क्षणभर दचकले.

" अरे शेखर, हे दार तर आतून बंद आहे, तू खरच ह्याच दरवाजातून जाताना पाहिले का अजयला ." राघव प्रश्नार्थक नजरेने शेखरला पाहत म्हणाला.

" हो राघव जी, काल अजय इथेच खेचला गेला, मी तो क्षण नाही विसरू शकत." शेखर ही आता कावराबावरा होऊन कधी त्या दरवाजा कडे तर कधी राघव कडे बघत होता.

" शेखर, मला काही तरी विचित्र वाटतय, आपण हे दार उघडूयात, एक चावीचा जुडगा माझ्याकडे पण आहे." असे म्हणत राघव ने त्याच्याजवळचा जुडगा बाहेर काढला आणि त्या दाराची चावी शोधू लागला.

एक वेगळ्याच पद्धतीची चावी त्या जुडग्यात दिसली खरी , पण त्याच्यावर लिहले होते, काहीही झाले तरी दार उघडू नका, दोघांच्या ही चेहऱ्याचा रंग ते वाचून उडाला, तरीही अजयसाठी दोघांनी धाडस करायचे ठरवले, किल्ली फिरवताना अख्ख्या घरामध्ये तिचा आवाज घूमत होता, मुख्य दरवाजा धाडकन बंद झाला, आणि ते उघडत होते ती दरवाजा उघडला, दोघांच्या ही किंकाळ्या फक्त बाहेर पडल्या , ज्या त्या घरातल्या घरातच घूमून गेल्या.

काही दिवसांनी

"माझे घर भाडेतत्त्वावर द्यायचे आहे, खूप कमी किंमतीवर देईन मी." तोच मालक अजून एका एंजटला आणि भाडोत्रीला त्याच्या फायद्यासाठी फसवण्याची योजना बनवत होता.


(समाप्त)


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror