Priyanka Kute

Horror Thriller

3  

Priyanka Kute

Horror Thriller

मसणवाट

मसणवाट

2 mins
227


नमस्कार मित्रांनो,


एक कुटुंब आपल्या घरात अगदीच सुखाने राहत होते. दोन मुले आणि नवरा बायको अगदी शांतेत त्यांचे जीवन जगत होते. पण, त्यांनी अजूनही स्वतःचे घर घेतले नव्हते. भाडोत्री म्हणून ते एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरात राहत होते. कालांतराने त्या मालकाचे निधन झाले, पण मालकी हक्क दाखवत त्याचा मुलगा तिथे आला आणि या चौकोनी कुटुंबाला घरातून बाहेर पडण्यासाठी सांगितले. राधा आणि मोहन चे या एवढ्या मोठ्या शहरात कोणीच नव्हते, आणि हातातले काम सोडून गावी जाणे त्यांना परवडण्यासारखे नव्हते. मोहन ने तिथेच एका ठिकाणी छोटेसे घर पाहिले जे त्याच्या कामापासून जवळपास होते. घर पाहिल्यानंतर त्याने रात्रीच राधाला आणि मुलांना तिकडे नेण्याचा निर्णय घेतला. मालकाच्या मुलाला तो सांगू लागला, " आजपर्यंत , आम्ही इथे थांबलो, तुझ्या बाबांनी आम्हाला आसरा दिला आणि आम्ही ही त्यांना आपलेच मानले होते, आज ते नसताना आम्ही इथे राहणे योग्य नाही ". काही क्षण मोहन थांबला आणि पुन्हा म्हणाला, " माझ्या कामाच्या ठिकाणाच्या जवळपास मी जागा पाहिली आहे, आणि आता आम्ही तिकडेच जात आहोत, तुझ्या बाबांचे शेवटच्या महिन्याचे भाडे आणि माझ्या जवळच्या किल्ल्या तुला सोपवतोय". मोहन एवढे बोलून घरातून बाहेर पडला. 


आपल्या दुसऱ्या नव्याने भाडे भरलेल्या घरी तो आला आणि रात्र झाल्यामुळे सगळे सामान फक्त रचून आणि घरी बनवून आणलेला डबा खाऊन चौघेही शांत झोपी गेले. रात्रीच्या वेळी कसल्याशा आवाजाने राधाला जाग आली तिने सामानामधून स्वतःला सावरत घराच्या बाहेर पाऊल टाकले, तिच्या घरा समोरच एक वयस्कर माणूस शांत बसला होता. त्याच्या समोर काही तरी जळत होते, तिला वाटले शेकोटी केली असावी, तिने जास्त लक्ष न देता माघारी वळाली तितक्यात एक मोठी विज कडाडली आणि समोरच्या वेसीवर तिला अर्धगोलाकार कमानीवर नाव दिसले " हिंदू स्मशानभूमी , मसनवाट". ते शब्द वाचून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ती तशीच मोहनच्या दिशेने आत गेली आणि रागातच त्याला उठवू लागली. " मोहन, मोहन, उठ". ती अजूनही मोहनला उठवत होती. तिचा जरा खर्जातला आवाज ऐकून मोहन खडबडून उठला ,त्याने समोर तिच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि तो नखशिखांत शहारला " राधा, तू अशी!". 

मोहन तिला बोलवताना तिने पुन्हा एकदा खर्जातला आवाज काढला आणि म्हणाली , " राधा , आता राहिली नाही , पण तू सुध्दा राहणार नाही , कारण तुम्ही जिथे आहात तो आहे मसणवटा आणि आम्ही आहोत तुमचे आमंत्रक" . एक भयानक हसू तिथे घूमले आणि मोहन सोबत त्याच्या मुलांचीही मोठी किंकाळी तिथे फुटली. 


धन्यवाद


पिकू



Rate this content
Log in

Similar marathi story from Horror