लघुभयकथा
लघुभयकथा
एक बत्तीशीतला तरुण एक्स्प्रेस ने प्रवास करत असतो, एक्सप्रेस तिच्या तालात झूक झूक करत जात असते. तिथे तीन चार मुली येतात. त्या तीनही मुली शहरातील वाटत असतात, कारण त्यांचा पोषाख तसा असतो. तो तरुण मात्र गबाळा आणि गावाकडील वाटत असतो. तश्या त्या तिघी त्याच्या कडे बघून हसू लागतात. तो तरुण मात्र खूप शांतपणे त्यांचे टोमणे ऐकत असतो, जणू त्याला काही घेणेदेणे नसते. बराच वेळ असाच जातो त्या तरूणी ही आता पेंगू लागल्या असतात, डोळ्यांची झडप बंद होत असताना एका तरूणीला अभद्र काही तरी नजरेस पडते, तशी ती पटकन डोळे उघडते. पण समोर तसे काही नसते. साधारण एक तासानंतर त्या तिघींमधली एक तरुणी नैसर्गिक विधी साठी उठते, पण बराच वेळ ती येत नाही. काही श्या चाहूलीने दुसऱ्या तरूणीची झोप चाळवते. तिला दिसते की तिची एक मैत्रीण बर्थवर नाही आहे, ती आजूबाजूला बघते पण तिला काही च दिसत नाही थोडीशी उठून ती डब्ब्याच्या सरळ रेषेत बघते, तर समोर एक तरुण पाठमोरा तिला दिसतो, ती लागलीच त्या तरूणाकडे बघते ज्याचा वर ह्या तिघी काही वेळापूर्वी हसत होत्या, पण तो तर त्याच्या बर्थवर झोपलेला असतो. त्याला बर्थवर पाहून सावध पवित्रा घेत ही तरूणी त्या तरूणाजवळ जाऊ लागते, तिला थोडे दबावाखाली असल्याचे जाणवते. खूप अशी वाईट ऊर्जा एकत्र येऊन तिला अशक्त आणि जीव गेल्या गत बनवत होते.
ती तरूणी त्या तरूणाच्या खांद्यावर हात ठेवणार तितक्यात तो तरुण मागे वळतो आणि त्या तरूणीच्या तोंडून किंकाळी बाहेर पडते. तिची किंकाळी इथे झोपलेल्या दोघांच्या कानी पडते. ती तरूणी आजूबाजूला बघते तर तिच्या दोन्ही मैत्रीणी तिथे नसतात, ती तडक उठून त्या बिचाऱ्या तरूणाच्या कॉलर धरते आणि त्याला विचारते,
तरूणी : हे, काय केलेस माझ्या मैत्रिणींसोबत, कुठे आहेत त्या!
तो तरूण घाबरून गोंधळात बोलतो: ओ, मला काही माहिती नाही. मी तर झोपलो होतो.
तेव्हाच मागून एक किन्नरी आवाज येतो.
ऐ, त्याला काय विचारते, मला विचार.
तो आवाज ऐकून ती मागे वळून बघते आणि पुरती घाबरते. तोंडून तिच्या आवाज निघत नसतो. पण तरीही, ती त्याला विचारते,
तू तू कोण आहेस, आणि माझ्या मैत्रीणींचे काय केलेस तू.
तसा एक भयानक हास्य करत तो म्हणाला: मी, मी एक गरीब घरचा मुलगा, दोन वर्षांपूर्वी तुमच्या सारखेच काही मुर्ख लोक मला भेटले होते, त्यांनी मला इतके सतवले की मला माझा जीव गमवावा लागला. बस तेव्हापासून अश्या मुर्ख लोकांना मी शिक्षा देत असतो. ही शिक्षा आता तुलाही मिळणार. एक मोठी किंकाळी तिथे घूमते आणि त्या तरूणाला तो आत्मा आश्वासत करतो की तो त्याला अश्या लोकांपासून नेहमी वाचवेल. त्या तिन्ही तरूणींना योग्य शिक्षा देऊन तो आत्मा पुन्हा त्याच्या डब्ब्यात जातो पुढील मुर्ख यात्रींसाठी.
तर मित्रांनो, तुम्ही असे कोणाशी वागू नका . नाही तर तो येईल.
धन्यवाद

