धोकादायक रहस्य राजवाड्यातील
धोकादायक रहस्य राजवाड्यातील
(साधारण नव्वदीच्या दशकात घडलेली घटना)
एक सुंदर तरुण एका अलिशान बंगल्यातून बाहेर पडतो. दिसायला देखणा आणि नजरेत एक वेगळीच चमक, चेहऱ्यावर स्मितहास्य जपून तो आपल्या महागड्या सवारीकडे चालला होता. त्याच्या वयावरून तो साधारणतः महाविद्यालयात शिकत असावा. महागडे स्मार्ट वॉच आणि हिरव्या रंगाचे त्याचे सनग्लासेस चढवत तो त्याच्या महागड्या आणि नामांकित कंपनीच्या सवारीमध्ये तो महाविद्यालयात जायला निघाला.. त्याच्या प्रत्येक बाजूला गडी माणसांची रिघ होती. दार उघडायला एक, सुरक्षापट्टा लावयाला एक, त्याला या सगळ्याची चिडचिड व्हायची. त्याचे वडील नामांकित उद्योगपती असल्याने त्याला हे सगळे पाचवीला पुजल्याप्रमाणे होते. तो बऱ्याचदा बोलायचा ही गडी लोकांना एवढे असे करू नका. पण ते लोक वडीलांचे नाव पुढे करून त्याला समजावयचे, आणि मग त्याची गाडी महाविद्यालयाच्या दिशेने निघाली.
महाविद्यालयात
"हाय सुजल", असा आवाज ऐकताच आताच आपल्या महागड्या नामांकित सवारीतून नुकताच उतरलेला सुजल मागे वळाला. मागे त्याचे नेहमीचे सगे सोबती त्याची वाट पाहत बसले होते(उनाडक्या करत.. ). जरी सुजल श्रीमंत घराण्यातील होता, तरीही तो एकदम सामान्य माणसाप्रमाणे वागायचा, त्याच्या बोलण्यामध्ये कुठेही श्रीमंतीचा अंहकार नव्हता. महाविद्यालयात तो एक हुशार विद्यार्थी आणि नेहमी मदतीला तत्पर असा होता. त्याचे काही निवडक मित्र होते. त्याच्या मित्रांच्या त्या एकूण समितीचे नाव होते, उनाड समिती. महाविद्यालयचे नवीन आणि तिसरे वर्ष.. सगळेच या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी महाविद्यालयात हजर होते. या स्वागताची मूळ जबाबदारी घेतली होती एका विद्यार्थींनीने.
नव्या पालवी फुटलेल्या एखाद्या महाकाय वृक्षाप्रमाणे महाविद्यालयाच्या आवारातील ती मुलांची गोतावळ भासत होती. त्याच गर्दीत एक नाजुक , सुंदर आणि तेवढीच कठोरवक्ती धानी ही आपल्या मैत्रिणींच्या सोबत होती. तिला पाहायला तसाही अख्खा महाविद्यालय जमा व्हायचा. तिच्या दर्शनाला कितीतरी रांगेत उभे राहायचे. पण तिला त्या गोष्टीचे काही घेणे देणे नव्हते. ती फारच कठोर आणि सरळ होती. सहसा लक्ष न देणारी ती आज अचानक त्या घोळक्या कडे वळाली, आणि तिचे लक्ष वेधले गोऱ्या पान सुजलने. ती फार वेळ टक लावून पाहातच राहिली. तिच्या मैत्रिंणीपैकी एकीने तिच्या डोळ्यासमोर टिचकी वाजवली तेव्हा भानावर येत ती लाजतच निघून गेली. तिने मग एक घोषणा करण्यासाठी रंगमंचावर येत सगळ्या गर्दीला आपल्या दिशेने बोलावून घेतले. तिने सगळ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना आज पासून आठवडाभर येणाऱ्या दिवसाची थिम सांगितली, आणि आठवड्याच्या शेवटी सांस्कृतिक कार्यक्रम सहभागी होण्यासाठी पत्रक वाटले. तिथे नेमका सुजल आणि त्याची टिम नव्हती. ती आपल्या काही मैत्रिणींसोबत पूर्ण महाविद्यालयात ते पत्रक वाटण्यासाठी निघाली. तसेही नोटिस बोर्ड होताच, पण बाईला त्या मुलाची पुन्हा भेट घ्यायची होती. कुठल्या शाखेत आणि कुठल्या वर्गात आहे , हे काही तिला माहिती नव्हते. ती कला शाखेत होती तर तो अभियंता विभागात. तिचा हा पराक्रम तिच्या वर्गशिक्षकांच्या लक्षात येताच, त्यांनी तिला गपचुप पणे पत्रक नोटीस बोर्डवर लावायला सांगितलं ,आणि त्यातच तिचा नाईलाज झाला
महाविद्यालयात अभ्यासिकेच्या वर्गात
मेंगळे गुरुजी वर्गात गणित विषय शिकवत होते. मेंगळे गुरुजी
फार सक्तीचे होते, कोणी केलेली हेळसांड त्यांना चालत नसे.
त्यांच्या काळ्याभोर डोळ्यांनी ते सगळ्या वर्गात करडे लक्ष ठेवून होते. मेंगळे गुरूजी जास्त करून या चौकडी वर जास्त लक्ष ठेवून असत. यातल्या प्रियदर्शन वर त्यांची नजर जास्त होती. तो नेहमी अभ्यासिकेच्या वेळेस वर्गात झोपत असे, आणि काही तरी बडबडत असे. गुरुजींनी त्याला बऱ्याचदा त्या विषयी शिक्षा केली होती. पण ते रोजचचे झाल्याने ते काही न बोलता त्याला फक्त जागे करत होते. प्रियदर्शन म्हणजे सुजल चा घट्ट मित्र त्याने ही त्याला बऱ्याचदा विचारले पण त्याच्या कडे काही उत्तर नसायचे.
काही दिवस उलटले प्रियदर्शन चा त्रास कमी होईना. सुजल ने त्याच्या ओळखीने या विषयाशी निगडित काही डॉक्टरांची भेटीची वेळ पण घेतली होती. पण प्रियदर्शन प्रत्येक वेळेस हे सगळे टाळायचा. सुजल ने मात्र त्याला काहीही न सांगता त्याला एका मानसशास्त्राज्ञाच्या दवाखान्यात आणले. प्रियदर्शन मात्र पुरता घाबरला ज्या स्वप्नांमुळे तो रात्री जागयाचा आणि दिवसा महाविद्यालयात पेंगायचा त्याच्याबद्दल कदाचित खुलासा होऊ शकणार होता.
तो सुजलला राग आणि भिती अशा मिश्रित भावात बघत होता. राग यासाठी की तो अचानक घेऊन आला, भिती त्याच्या स्वप्नांची. काही वेळाने डॉक्टरांचा सहाय्यक प्रियदर्शन यांना आत बोलावले आहे , असे सांगून निघून गेला.
खुर्चीवरून उठून ते सल्लागार खोलीमध्ये जाईपर्यंत प्रियदर्शनची हृदयाची स्पंदने जोरजोरात चालत होती.
प्रियदर्शन सुजलसोबत डॉक्टरांच्या सल्लागार खोलीत होता. त्याच्या चेहऱ्यावर भितीची लकेर साफ दिसत होती.
डॉक्टर असे बरेच रूग्ण हाताळतात म्हणून त्यांनी प्रियदर्शन ला बघताच त्याची स्थिती समजून घेतली. सुजल एक एका नामांकित घरातला असल्याने आणि त्याचे वडील डॉक्टरांचे जूने मित्र असल्याने ते सुजल ला ओळखत होते अगदी चांगल्या प्रकारे. त्यामुळे सुजल चे तिथे असने दोघांना ही खटकणारे नव्हते.
सुजलने च डॉक्टरांना प्रियदर्शन च्या त्रासाबद्दल सांगितले. त्याला पडणारी स्वप्न, मग त्याचे महाविद्यालयात अभ्यासिकेच्या वेळेस झोपेत बरळणे. अगदी सविस्तर पणे तो डॉक्टरांना सांगत होता.
सुजल : "डॉक्टर , प्रियदर्शन आणि मी महाविद्यालयाच्या पहिला वर्षांपासून एकत्र आहोत. " , दर्शन ला हा त्रास लहानपणापासून आहे. तो रात्री जागाच असतो, नुसता शुन्यात गेल्यासारखं बघत असतो. त्याला नक्की काय स्वप्न पडते, नेमके काय घडते त्याच्या स्वप्नात काहीच कळत नाही.
दुसऱ्या दिवशी "नका मारू मला" असा बरळत राहतो. पूर्ण अभ्यासिकेच्या वेळामध्ये दर्शन झोपेत असतो. एकच वाक्य बोलत असतो. तुम्ही यावर मदत कराल तर तुमचे उपकार जन्मभर विसरणार नाही मी. माझ्या मित्राला ठिक करा डॉक्टर.
शेवटचे वाक्य गहिवरून आल्यागत सुजल च्या तोंडून बाहेर आले. जिवाभावाचा मित्र होता जो त्याचा अडचणीत.
डॉक्टर सगळे ऐकून घेतल्यानंतर एक दिर्घ श्वास सोडतात, बोटांचा कोन करून ओठांवर ठेवून बराच वेळ विचार करतात. मग ते दर्शन कडे आपला मोर्चा वळवतात. त्याला एका विशिष्ट प्रकारच्या खुर्ची मध्ये बसवतात. ज्या खुर्चीसमोर एक गोलाकार वस्तू लावलेली अजून एक खुर्ची असते, जिच्या मध्ये काळ्या रंगाच्या आडव्या तिडव्या उभट गोल अश्या रेषा असतात ज्या संमोहन करण्यासाठी वापऱ्याल्या जातात.त्या खुर्चीत बसून समोरच्या खुर्चीच्या वाकड्या आडव्या उभट गोल रेषांना डॉक्टरांनी दर्शन ला बघायला सांगितले ते पण अगदी डोळे जड होईपर्यंत. त्याने अगदी तसेच केले व काही वेळाने डोळे जड होऊन त्याला पेंग येऊ लागली.
तो झोपेत असताना डॉक्टर त्याला प्रश्न विचारू लागले.
प्र. १ दर्शन , तू आता पूर्ण झोपेच्या स्वाधीन झाला आहेस. तुला जर माझा आवाज ऐकू येत असेल, तर तुला काय दिसत आहे आता. कुठे आहेस तू नेमके, सांगू शकशील.
दर्शन : हंहंंंहंंह. हंहं . डॉक्ट....र. मीईईई.. डोंगरा..... अळ भा...गा..त आ....हे.. आजू..बाजू...ला को..णी.. नाही.. साम...सूम.. आ...हे..
प्र. २ मला सांग, दूरवर काही दिवा किंवा काही उजेड आहे का???
दर्शन : ना..ही... सूर्य ... मा..वळतीला.. जातोय एव..ढेच .
प्र. ३ दुसरे काहीच दिसत नाही तुला. ज्यामुळे तू घाबरतोस !?? काही ही असे असेल तर निरखून बघ. डोळ्यांची कडा विस्फारून बघ. तुझ्या घाबरण्याचे कारण काय आहे दर्शन. काही ही दिसले तरी सांग
या प्रश्नानंतर एक मोठा उजेड बंद नजर करून स्वप्नातल्या दुनियेत असलेल्या प्रियदर्शन वर पडतो , त्याला तिथे एक चौकट दिसून येते, त्या चौकटीत एक आकृती उमटू लागते. त्यामधूनच उजेड बाहेर पडत असतो, त्या आकृतीमधून एक भयंकर केसाळ असा चेहरा बाहेर येतो ,त्याला डोळे नसतात फक्त रिकामी खोबणी असते, त्याचे ओठ आ वासल्याप्रमाणे उघडलेले असतात. ते ध्यान पाहून दर्शन मोठमोठ्याने किंचाळू लागतो. त्याचे किंचाळणे ऐकून ती आकृती त्याच्या दिशेने पुढे सरकते आणि त्याला हातानेच इशारा करून दूर फेकल्यागत करते. त्याच्या त्या हरकतीनंतर दर्शन एका कोपऱ्यात जाऊन आदळतो. त्याला जबर मार लागतो, डोक्यातून रक्त वाहू लागते.
तो पडला त्या दिशेने डॉक्टर आणि सुजल धावतात.
पडलेल्या प्रियदर्शन ला उठवत डॉक्टर बोलतात
डॉक्टर : प्रियदर्शन, अरे काय झाले तुला. एवढ्या जोरात कसा आदळलास. नेमके काय घडले तुझ्यासोबत.
सुजल ही दर्शन ला विचारू लागतो :" दर्शन, नेमके काय दिसले तुला." आणि इतक्या प्रखरपणे कसा इथे आदळलास. सांग ना
दर्शन मान खाली घालून दोघांना ऐकत असतो, डॉक्टरांना दर्शन ला बघून वेगळच वाटत असते. त्याची राखाडी त्वचा त्यांच्या मनात प्रश्न निर्माण करते. तो एखाद्या यंत्रमानवाप्रमाणे त्याची मान १८० च्या कोनात फिरवतो, त्याचे सफेद पांढरे बुबुळे बघून डॉक्टर घाबरून मागे होतात. सुजल ला ही ते पाहून भितीने पोटात गोळा येतो
दोघांकडे कुत्सित पणे बघत प्रियदर्शन त्याच्या घोगऱ्या आवाजात बोलतो.
प्रियदर्शन : काय विचारून फायदा, कारण त्यालाच काही माहिती नाही..
आणि तो बेशुद्ध होऊन जातो. बेशुद्ध होताच एक काळी आकृती त्याच्या शरीरातून हवेमध्ये निघून जाते.
दर्शनला इस्पितळात दाखल करण्यात येते. तो अजूनही बेशुद्ध असतो. त्याच्या श्वासाची गती अजूनही जोरात चालू असते, कदाचित त्याला तेच ध्यान आठवत असावे. डोक्याला पट्टी बांधून आणि योग्य सिरिंज टोचून त्याच्यावर इलाज केलेला असतो, पण त्याच्या स्वप्नात असणारे ते अजूनही त्याला मानसिक त्रास देत असते.
सुर्य मावळतीची किरणे इस्पितळाच्या त्या लोखंडी गजातून आत प्रवेश करण्यासाठी धडपडत असतात, तब्बल दहा तास बेशुद्ध असलेल्या दर्शन ला त्याच्याशी काही घेणेदेणे नसते. तो अगदी निश्चल पडलेला असतो. तिथेच एक परिचारिका तिच्या नेमून दिलेल्या कार्यालयात तिचा दिवसभराचा कामाचा रकाना भरत असते. इकडे अचानक दर्शन च्या शरिरात हालचाल होऊ लागते, तो जोरजोरात बिछान्यावर आदळला जातो. परिचारिका आवाजाने धावतच दर्शन असतो त्या खोलीकडे जाते. तिला ते पाहून भयंकर धक्का बसतो. ती त्या माळ्यावर एकटीच असते.
तिथून ती निघणार तितक्यात जोराने दार बंद होते. दार बंद होताच दर्शन एका सरळ रेषेत उभा राहिला, त्याच्या अंगावर पांढऱ्या रंगाची चादर होती. तो ताठ असल्याने ती चादर ही त्याच्या अंगाला लपेटून राहिली होती, दर्शन ला तसे बघून ती परिचारिकेच्या सर्वांगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. तिला काही सुचत नव्हते, दार ही बंद होते. अचानक त्या खोलीमध्ये भयंकर गडगडाटी हास्य घूमू लागले, आणि त्या परिचारिकेच्या कानामागून काही शब्द तिच्या कानात घूमू लागले.
तो आवाज : "खूप वर्षांपासून मी या आत्म्या ला माझ्या ताब्यात घेतले आहे, कोणी कधीच ते ओळखले नाही. अगदी हजारो वर्षापासून मी हा छळकपट चालू ठेवला आहे " आज तुम्ही लोकांनी चौकशी चालू केली , आता मला पण माझी ओळख पटवून द्यायला हवी ना. तैयार आहेस ना, ! माझी ओळख पटवून घ्यायला. पुन्हा तेच भयंकर गडगडाटी हास्य .
तिच्या अंगावरून सरकन काटा उभा राहिला. मागे वळून बघण्याचा तिला धीर होईना. ती तशीच स्तब्ध पणे उभी राहिली. काही काळाने तो आवाज जिथून येत होता तिथून एक काळसर हवा निघाली जी थेट चादर ओढून उभ्या असलेल्या दर्शन च्या दिशेने गेली. त्या काळ्या हवेचा स्पर्श होताच ती पांढरी चादर खाली पडली आणि राखाडी पडलेली भयंकर त्वचा तिथे दिसून आली, रक्ताचा एक थेंब ही नसावा असा ते ध्यान दिसत होते. डोळे आणि तोंड एकत्र जोडल्यागत भासत होते.
त्याचे तसे रूप बघून ती परिचारिका तिथून बाहेर पडण्याच्या धडपडीत होती. पण कुठे ही वाट सापडली नाही. ती तशीच धावत बाहेर जायचा रस्ता शोधू लागली. पण ती तिथे अडकली आहे, हे तिची बुद्धी मानायला तयार नव्हती. ती सतत बाहेर पडण्याचा रस्ता चाचपडत होती. तिला काही दिसून आले नाही. भितीपोटी माणसाची बुद्धी खुंटीत होऊ लागते. भितीपासून दूर जाण्याचे मार्ग शोधू लागते. अशा वेळी कुठून तरी आपण बाहेर पडू असे सतत वाटत राहते, माणूस आपल्या चांगल्या कर्माला आठवून आपण चांगले केल्याची धन्यता मानून देवाकडे वाईट शक्तींशी सामना करण्याचे बळ मागतो. पण ज्याचा काळ आलेला असतो, तो त्याची कितीही चांगल्या कर्माची यादी असो हे जग सोडणारच.
त्या भयंकर उभ्या असलेल्या ध्यानाने हरकत केली. तो बिछान्यावरून उठल्याची चाहूल परिचारिकेला लागली. तिला मागे वळून बघायची भिती वाटू लागली. अख्ख्या अंगाला घामाने ओलेचिंब होते. त्यातच तिला एक थंड स्पर्श जाणवतो, मागे वळून बघायची तिची हिम्मत होत नाही. एक भयंकर काळ्या नखांनी भरलेला लांबलचक हात तिच्या मानेभोवती फिरू लागतो आणि क्षणात तिची मान एखाद्या पशुसारखी पिरगाळून टाकतो. एक भयंकर किंकाळी फोडून ती परिचारिका मनुष्य योनीतून मुक्त होते. तिचे कलेवर तिथेच पडून राहते आणि तिची आत्मा मुक्ती साठी तडफडत राहते.
तिच्या सारख्याच शेकडो वर्षापासून भटकणाऱ्या आत्मा तिला तिथे आसपास दिसू लागतात. त्यांचा भयंकर अवतार बघून तिच्या सोबत पुढे काय होईल याचा विचार तिला कापरे भरवत असते. तो भयंकर आवाज पुन्हा एकदा गडगडाटी हास्य करत बोलतो
तो आवाज : मला कोणी रोखू शकणार नाही, मी जे हजारो वर्षांपासून करू इच्छितो ते आता करणार. तुझ्या सारख्या कैक पट आत्म्यांना मी कैद करून ठेवलय. त्या आत्मांच्या मदतीने मी या सगळ्या जगाला उध्वस्त करणार , या सेनापती ला आणि याच्या राजाला ही उध्वस्त करणार. या लोकांनी माझ्या यज्ञांची भंगता केली होती. आज हजारो वर्षे तपस्या करून मी शक्तीशाली झालो आहे. आता मी अजून तुझ्या सारख्या भय जवळ करणाऱ्यांना मारून स्वतःची शक्ति वाढवणार.
साधारण चौदाव्या शतकातील कहाणी
राजा मेहेरसिंग एक निपुण, निष्णात असा , वयाच्या अगदी कोवळेपणातच त्याने शस्त्र हाती घेतले होते. त्याला कारण त्याच्या वडिलांचा आकस्मिक मृत्यू होता. त्याच्या मुलखाच्या आजूबाजूचे मुलूख एका महाभयंकर मुघल सम्राटाने ग्रासले होते. आजच्या भारताच्या उत्तर दिशेला त्याचे" मेहेर" नावाचे राज्य होते. त्याचे वडील निर्मलसिंग त्या मुघल सोबत लढत असताना मरण पावले. त्यांनी त्याला त्यांच्या आजूबाजूच्या राष्ट्रांपासून बरेच दूर पाठवले, त्यांनी जवळपास १३००० किमी चा भाग आपल्या राज्यात मिळवला होता. प्रत्येक घरात त्यांच्या राज्यात आनंद वसला होता.
त्यांच्या पराक्रमाने तिथल्या बऱ्याच राज्यांना त्यांच्या सोबत उभे राहण्याचे सामर्थ्य दिले होते. अशातच राजा मेहेरसिंग ने त्याच्याच सारखा एक सेनापती निवडला तो राजाला अगदी साजेसा होता आणि प्रामाणिक ही. त्याचे नाव होते "भेदनाथ". राजा भेदनाथला त्याच्या प्रत्येक मोहिमेत सामिल करत होता. त्यांच्या बऱ्याच मोहिमा सफल होत होत्या. त्यांना गगन ठेंगणे झालेले. आता त्यांचा मोर्चा होता वनविभागाकडे . राजाला त्याच्या आईने वनविभाग सोडून इतर ठिकाणचा मोर्चा सांभाळयाला सांगितला, तिथे ऐकिवात असणाऱ्या गोष्टींचं तिला भय होते. पण नवीन रक्ताने सळसळणारा राजा आईला श्वाशती देत होता की काही अभ्रद जाणवले तर तो मागे फिरेल. आईचा आशिर्वाद घेऊन राजा आणि सेनापती त्यांच्या सैन्यासह वनविभागाकडे निघाले.
आहहहहह..... एक भयंकर किंकाळी सगळ्यांच्या कानावर येऊन आदळली. राजा आणि सेनापती यांनी जास्त प्रतिक्रिया दिली नाही , पण सोबतचे सैनिक प्रचंड घाबरले होते. राजाने प्रत्येकाला शांत राहण्यास सांगितले. राजा आणि सेनापती थोडे पुढे आले घोड्यावरून उतरून आवाजाच्या दिशेने जाऊ लागले . जवळ पोहचताच एक रक्ताने माखलेली स्त्री त्यांच्या नजरेस पडली, तिच्या शेवटच्या घटिकेत ती होती. तिला असे पाहून राजाने विचारले " माते, तुम्ही आहात कोण?? आणि या अवस्थेत कशा?? , नेमके काय घडले आहे इथे.. " तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता, ती इशाऱ्याने राजाच्या मागील बाजुस बोट दाखवत होती. तिचे बोट हवेतच राहिले, कारण तिचा जीव तिच्या शरीरातून बाहेर पडला होता. तिचे कलेवर खाली ठेवून राजा आणि सेनापती तिने बोट दाखवलेल्या दिशेने जाऊ लागले. तिथे एक भली मोठी गुहा त्यांच्या नजरेस पडली आणि ती पाहून सेनापती जोरात किंचाळला.
दर्शनला स्वप्नात इतके सारे दिसले होते की त्याची ह्दयाची धडधड वाढली होती, तो फक्त किंचाळत होता. त्या आवाजाने सुजल आणि त्याचे मित्र डॉक्टरांसोबत दर्शन च्या खोलीकडे धावले. दर्शनला सिस्टर्स आणि डॉक्टरर्स दोन्ही बाजूने घटू पकडून होते, त्याला सिंरिंज टोचून तात्पुरते शांत केले. सुजल आणि त्याचे इतर मित्र फक्त हे सारे पाहून गोठल्यासारखे झाले होते. तिथेच एका बेडजवळ एक तरूणी एक चित्र रेखाटत होती तो वार्ड लहान मुलांचा होता त्यांना त्या चित्रांनी आजारपणातून बाहेर येण्यात मदत होण्यासाठी ती हे सगळे करत होती अर्थात इस्पितळ प्रशासनाच्या होकारानंतरच. ती तिथेच त्या सगळ्यांशी गप्पा ही मारत होती, तिचा तो गोड आवाज सुजल ला ऐकल्यासारखा वाटू लागला. तो त्या वार्डच्या दिशेने पावले टाकू लागला. वार्डच्या आत नजर टाकताच त्याला त्या गोड आवाजातली धानी दिसून आली. ती आणि तिच्या क्लासमेटस तिथे त्या आजारी मुलांच्या आयुष्यात रंगबेरंगी चित्र आणत होते, ज्याने त्यांना लवकर बरे होण्याची उभारी येईल. सुजल तसाच आत चालत आला, त्याच्या वडिलांच्या नावामुळे त्याला सगळेच इस्पितळात ओळखत होते ज्या कारणाने तो मुक्त संचार करू शकत होता. त्या सगळ्यांचे काम आटोपल्यावर त्या तिथून निघू लागल्या तितक्यात तिथे एक इसम आला त्याच्या हातात काही पैशाचे बंडल होते जे त्याने धानीकडे दिले. धानीने पुन्हा ते पैसे त्या इसमाच्या हातात दिले व त्याला म्हणाली, " दादा, पैशासाठी आम्ही हे करत नाही, या मुलांना बर वाटून ती लवकर इथून बरी व्हावीत या भावनेने आम्ही हे करतो." तसा तो इसम धानीला म्हणाला, " हे बघ मुली, मला माहित आहे तू हे पैश्यासाठी करत नाहीस , पण साहेबांनी मला बोलले की त्या मुलीला तिचे मानधन दे म्हणून मी तुला देऊ केले. आपल्या नाजूक ओठांना मुडपत धानी पुन्हा म्हणाली, " दादा, तुमच्या साहेबांना सांगा की तिने या मुलांच्या साह्यतेसाठी ते पैसे वापरले आणि ते खरच मुलांसाठीच वापरा अशी मी विनंती करते. " तिच्या चेहऱ्यावरच्या प्रत्येक हालचालीला सुजल बारकाईने टिपत होता. ती सुजलला आडवी उभी होती पण तरी तिला बारकाईने पाहण्यात सुजल व्यस्त होता. धानी आणि तिच्या मैत्रिणी त्या इसमाचे आभार मानून तिथून जाण्यास वळल्या. थोडे पुढे आल्यावर धानीला नजरेतून सुटल्यासारखे काही वाटले तिने थोडे मागे येऊन वळून पाहिले , तिथे सुजल होता. सुजल ला पाहताच धानी त्याच्या अगदी समोर जाऊन उभी राहीली पण त्याच्याशी बोलण्याची हिम्मत नव्हती होत तिची. ती अगदीच समोर गेल्याने तिला काहीतरी बोलणे भाग होते. ती सुजल ला पाहून बोलू लागली, " हाय, मी धानी . आपण एकाच कॉलेजमध्ये आहोत. मी कालच पाहिले तुम्हाला. "
धानीचे ऐकून सुजल ही तिला बोलला, "हाय, मी पण कालच पाहिले तुम्हाला कॉलेजमध्ये . मला वाटत तुम्ही नवीन आलात कॉलेजमध्ये..
धानी थोडा धीर करत आता बोलू लागली,." नाही, मी कला शाखेत आहे , आपले कार्यक्रम वेगळे असावेत म्हणून याआधी कधी आपण भेटलो नाही. यावर ती सुजलच्या प्रतिक्रियेसाठी वाट पाहत उभी होती, कारण तो कुठल्या शाखेत आहे हे तिला जाणून घ्यायचे होते. कारण कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे कार्यक्रम एकत्र व्हायचे त्यामुळे या तिन्ही शाखेत तो नाही हे तिने जाणले होते. पण मग हा नक्की आहे तरी कुठे. आता अभियंता विभाग आणि व्यवस्थापन विभाग हेच बाकी होते.
धानीचे बोलणे ऐकल्यावर सुजल तिला थोडा निरखून पाहतच म्हणाला, " मी अभियंता विभागात आहे, सुजल तिला अजून निरखूनच पाहत होता, त्याच्या अश्या पाहण्याने धानी शहारत होती.
सुजल धानीला डिवचण्यासाठी पुन्हा म्हणाला, " माहीती आहे ना अभियंता विभाग" .. त्याचे तसे बोलणे धानीला काही समजले नाही. तसा धानीचा गोंधळलेला चेहरा बघून सुजल म्हणाला, त्या दिवशी मेंगळे गुरुजी तुम्हालाच बोलत होते ना..
त्याचे बोलणे ऐकून सगळे स्पष्ट होऊन धानी तिथून बाहेरच पळत आली, दर्शन आता बराच नीट झालेला असतो, त्याचे स्वप्न पण त्याला त्रास देत नसते. सकारात्मक वातावरण त्याच्याभोवती निर्माण झालेले असते. सुजल ने धानीला सांगून तिथे सकारात्मक चित्रांची मांदियाळी आणली असते. जसे की त्रिशूल, डमरू , शंख असे बरेच दैवी शक्ती एकत्र केलेल्या असतात. सुजल या सगळ्यात धानीला साथ देतो, त्या दरम्यान दोघांची मैत्रीही छान होते. दर्शन ला आता घरी सोडले जाते. घरी आल्यावर मात्र एका दबाव आल्याचे त्याला जाणवले. सुजल तिथे थांबणार असतो पण नकारात्मकतेच्या जाणिवेमुळे दर्शन त्याला थांबून देत नाही. सुजल बऱ्याचदा आग्रह करतो, पण दर्शन ला काहीच योग्य वाटत नाही तिथे
"सुजल, नको थांबूस तू मी बरा आहे रे आता, मी मला काय हवे नको ते बघेन खरच तू नको त्रास घेऊस. " दर्शन आजूबाजूला बघत आणि खोटी हिम्मत आणत सुजल शी बोलत होता.
"दर्शन , पण तुला आताच इस्पितळातून आणले आहे, तुला एकट्याला असे थांबवणे योग्य नाही वाटत मला".
"हे बघ, मी खरच ठिक आहे, मला काही लागले तर मी सांगेन न तुला". खरच नको काळजी करूस माझी. दर्शन आता जवळजवळ सुजल ला दरवाजा जवळ घेऊन आला होता.
दर्शन चे असे वागणे सुजल ला समजत नव्हते. तो त्या वेळापुरता तिथून बाहेर पडला. त्याला गाडीतून जाताना पाहिल्यावर दर्शन पुन्हा घरात आला त्याला खूप काही भयंकर दडून बसल्याचे जाणवत होते. तो जरा सावधच बसत होता की अचानक एक घोगरा आवाज त्याच्या कानी पडला, " सेनापती, माझ्या वाड्यात प्रवेश करून चांगले नाही केलेत तुम्ही दोघांनी. तुझ्या राजाला शोधता नाही आले मला पण मी तुला शोधलेय." लवकरच मी तुझ्या राजाला ही शोधणार आहे. एक भयंकर काळी सावली दात विचकत त्या काळोखातून बोलत होती. तिला नीटसा आकार ही नव्हता.
ते ध्यान पाहून दर्शनची पाचावर धारण बसली त्याला काही सुचत नव्हते. तो जरा धीर करून त्या आवाजाशी बोलू लागला. " क..क. कोण आहे , क.कक.काय बोलायचे आहे नेमके तु.. ललला.. कुठठललला सेनापती कोणणण. राजा... दर्शन ला धड बोलायला ही जमत नव्हते. तो तसाच गादीच्या एका कोपऱ्यावर बसून बोलायचा प्रयत्न करत होता.
त्याचे बोलणे ऐकून हा महाभयप्रद जोराने बरसला आणि पुन्हा गर्जना केल्यासारखे बोलू लागला "आठव त्या रात्री माझ्या वाड्यात प्रवेश केल्यावर तुम्ही दोघांनी काय केले ते ". कशी उध्वस्त केली माझी तळघरातील गुहा.
दर्शन ला तो काय बोलतोय काही समजत नव्हते. कुठली गुहा, कोण राजा , कोण सेनापती त्याला काही समजत नव्हते. त्या भयानक आवाजाने दर्शन वर एक वार केला ज्याने दर्शन बेशुद्ध झाला. दर्शन ला निपचित पडलेले पाहून तो जोरजोरात किंचाळू लागला आणि तिथून तसाच बाहेर पडला.
काही वेळाने दर्शन ला जाग आली तर तो एका गुहेसमोर होता त्याच्या बाजूला बरेचसे सैनिक आणि राजा होते. त्या राजाच्या शेजारीच एक सेनापती उभा होता, त्याला पाहून मात्र दर्शन चक्रावला. तो सेनापती म्हणजे दर्शन होता, पण त्या राजाला त्याने कधी पाहिलेले नव्हते. त्यांचे बोलणे त्याच्या कानावर येत होते.
सेनापती : "महाराज, त्या बाईने या दिशेला खूण केलेली. पण इथे काही दिसत नाही आहे."
"सेनापती, आम्हाला वाटते या वाड्याच्या आत काही आहे, ज्याकडे ती माता इशारा करत होती." तलावरीची मूठ हातामध्ये फिरवत राजा बोलत होता.
"मग प्रवेश करायचा का आत?" सेनापती राजाच्या होकाराची वाट पाहत वाड्याच्या दिशेने पाहत होता.
वाड्यावर एक प्रकाशाची तिरीप पडली तसा दर्शन अजूनच अवाक झाला , हा तोच वाडा होता जो त्याच्या स्वप्नात येत होता आणि या वाड्यासमोर "मला मारू नका, मला मारू नका" असे बोलत असायचा.
दर्शनची उत्सुकता चाळवली तो तसाच या सैन्यामागे वाड्याच्या दिशेने जायला निघाला. सैन्य वाड्याच्या महाद्वाराच्या जवळ आले. खूपच अलिशान तो वाडा होता पण खूप जीवघेणी शांतता होती तिथे. सैन्याने आपले काम वाटून घेतले, निम्मे सैनिक उजवीकडे निम्मे डावीकडे पसरले. तिथे एका प्रकारची गुहा उजवीकडील सैन्याच्या नजरेस पडली, त्या गुहेजवळ जाताच मोठमोठे मंत्रजप त्यांच्या कानावर ऐकू आले ते ही अघोरी पद्धतीचे. एक काळा कुट्ट आणि उंच धिप्पाड माणूस तिथे बसून काहीतरी अघोरी कृत्य करत होता. सैन्यातला एक जण राजाला हे सांगायला आला.
"महाराज, तिथे एक कूकर्मी अघोरी कृत्य करत आहे, आपण सत्वर तेथे चला." एक सेनिक धापा टाकत राजासमोर येऊन बोलू लागला .
राजा जरी धनवान होता तरी तो मनाने निर्मळ होता कुठलही कपट तो सहन करू शकत नव्हता. तो तातडीने सैनिकाच्या मागे गुहेच्या दिशेने निघाला. तिथे बंद दाराच्या गुहेमध्ये एक कपटी त्याचे डाव साध्य करत होता, तितक्यात राजाने एक जोरात पायाने त्या दाराला उडवून लावले, ते दार थेट त्या अघोरीच्या तोंडावर जाऊन आदळले. त्याच्या कार्यात स्थिरता आली तो एकदम गर्जना करत उठला. त्याला असे बघून मागे असलेला दर्शन घाबरला, तो तीच काळी सावली होता जी त्याला त्याच्या घरी दिसली होती. तिला आकार नव्हता पण त्याचे डोळे दर्शन ने लक्षात ठेवले होते.
राजाने त्याचे अस्तित्व तिथून संपवायला सुरुवात केली, त्याची सामुग्री तिथून उध्वस्त केली. ते सगळे पाहून तो अजूनच चिडला त्याने एक वार राजाकडे करण्याचा प्रयत्न केला पण सेनापती ने एका वारात त्याचा हात धडापासून वेगळा केला . तो त्या वाराने काही क्षण बेशुद्ध अवस्थेत गेला . त्याला तिथेच सोडून राजा आणि सेनापती गुहेच्या अंतरंगात आले, कोणालाही दहा जन्म पुरेल इतकी संपत्ती त्या गुहेत होती. राजा आणि सेनापती एकमेकांकडे बघत होते. राजाने आपल्या जनतेच्या भल्यासाठी हे धन वापरायचे असे मनोमन ठरवले. तसेच, सेनापती ने ही राजा म्हणतील तसेच वागायचे ठरवले. दोघांनी ही सहमतीने मान डोलावली आणि त्यांच्या सैन्याकडे पुन्हा आले.
"सैनिकहो, या गुहेत जेवढे धन आहे ते पेट्यांमध्ये भरून घ्या , या नराधमाला हे धन मिळता कामा नये. " राजा एका आदेशपूर्ण शब्दात सैनिकांना बोलत होता.
राजाचा आदेश जाताच सैनिक युध्दपातळीवर धन जमा करण्यासाठी धावू लागले. सेनापती च्या मागेच तो उठण्यासाठी धडपडत होता , त्याचा तुटलेला हात अचानक हालचाल करू लागला आणि तो सेनापती च्या दिशेने जाऊ लागला. दर्शन हे सारे पाहू शकत होता, घामाची एक थंड लहर त्याच्या सर्वांगाला शहारून गेली. त्या हाताने सेनापती चा पाय पकडला या अचानक झालेल्या हल्ल्याने सगळे सैन्य आणि राजा स्तब्ध झाले. त्याचा एक भयंकर आवाज त्या गुहेत घूमू लागला. " राजा , तुझा सेनापती आता मी संपवणार . " त्याला वाचण्यासाठी काही पर्याय नाही.. असे म्हणून तो राक्षसी हसू लागला. त्याच्या रक्ताच्या थेंबातून पण काही उपद्रवी आकार जन्म घेऊ लागले. त्या सगळ्याची आता किळस येऊ लागली होती. त्याने सेनापतीच्या डोक्याला घट्ट धरून ठेवले होते जणू आता फोडणार आहे. तेव्हाच सेनापती दर्शन चे तेच वाक्य बोलत होता. ".मला सोडा, मला मारू नका". बाहेर उभ्या दर्शन ला आता त्या वाक्याचा उलगडा झाला होता. राजाने एकदा बजरंगबलीचे ध्यान केले व हातात असलेल्या तलवारीने बरोबर त्याच्या बेंबीत वार केला, जन्माला आलेले उपद्रवी ही त्याने जळून खाक झाले, आणि तो महाभयप्रद तिथेच ओरडू लागला.. "माझ्या या नुकसानाची भरपाई करण्यासाठी मी पुन्हा येईन. " तुम्ही दोघेही जेव्हा धरणीवर जन्म घ्याल , तेव्हा मी पुन्हा येणार. त्याचा तो काळा धूर तिथून क्षणात नाहीसा झाला.
इकडे सेनापती राजाच्या पाया पडू लागला. तेव्हा राजाने त्याला खांद्याशी धरून आलिंगन दिले आणि म्हणाला, " मी नेहमी तुझ्यासोबत असेल, प्रत्येक जन्मात तुझा पाठीराखा असेल. " राजाचे शब्द ऐकून इकडे दर्शन ला ही काही तरी लक्षात आले.
तुमच्या आले का!! मग सांगा कमेंट्स मध्ये.
दर्शन त्याच्याच खोलीत बेशुद्ध पडला होता, बाजूलाच सुजल आणि त्याचे मित्र त्याला उठवायचा प्रयत्न करत होते. पण दर्शन अगदी निपचित पडला होता. बराच वेळ प्रयत्न केल्यावर हे सगळे निघू लागले. तेवढ्यात दर्शन ची हालचाल चालू झाली. त्याचे बोट हलताना सुजल ने पाहिले, तो त्याच्या दिशेने येऊ लागला. त्याचे श्वास वाढल्याचे सुजल ला तेवढ्या अंतरावरून ही लक्षात आले. जवळ जात असताना अचानक दर्शन उठून उभा राहिला, त्याने जवळ येत असलेल्या सुजल ला येऊन बोलला " महाराज, मी आलोय पुन्हा. तुम्हालाही ओळखले आहे मी". मला त्या राक्षसाबद्दल ही माहित झाले आहे महाराज." पण, यात आपले दुर्दैव आहे कि तो वायुरूपी आहे. तो आपल्या जवळपासच आहे. त्याला पकडणे कठीण काम आहे पण अशक्य नाही. "
दर्शन चे बोलणे अविरत चालू होते. सुजलला मात्र काही कळत नव्हते. तो फक्त दर्शनला पाहात होता. दर्शन चे डोळे लख्ख प्रकाशासारखे चमकत होते. दर्शन पुन्हा बोलू लागला.
"महाराज, स्वतःला ओळखा." "जागे व्हा महाराज जागे व्हा." तो तसाच सुजलच्या दिशेने पुढे येऊ लागला. सुजल ला आता धडकी भरली तो काही पावले मागे ही झाला , पण दर्शन ने त्याला धरून त्याच्या जवळ खेचले आणि त्याला गतजन्माची आठवण करून देऊ लागला. सुजल समोर सगळे चित्र फिरत होते त्याला काहीच संदर्भ लागत नव्हता. कारण त्याला ना दर्शन सारखी स्वप्न पडत होती नाही कधी त्याचा त्या जागेशी संबंध आला होता. त्याच्या समोर बराच वेळ ती घोडदौड सुरू होती. त्या तणावामुळे त्याला जागीच घेरी आली आणि तो काही क्षणात खाली कोसळला. त्याचे मित्र त्याला पकडण्यासाठी धाव घेत तिथे पोहचले , पण सुजल खाली आधीच कोसळला होता . आता दर्शन त्या सगळ्यांना उद्देशून बोलू लागला. ".महाराज पडले, महाराजांच्या सेवेसाठी हजर राहा, त्यांना त्यांच्या कक्षात न्या. " सगळे असह्य झाल्यामुळे त्यांच्या एका मित्राने जोरात दर्शन ला कानाखाली मारली. त्या आघाताने दर्शन चांगलाच शुध्दीवर आला. त्याची नजर प्रथम सुजलवर पडली आणि मग सगळ्या मित्रांकडे तो आळीपाळीने पाहू लागला. त्याला आता शुद्ध आली होती तो त्या स्वप्नातून पूर्णपणे बाहेर पडून दर्शन च्या रूपात आला होता. सुजल ला बराच धक्का लागला होता त्याला बराच वेळ उठवण्याचा प्रयत्न करूनही तो उठत नव्हता. सुजलचा आणि त्याचा मित्र जगदीश दर्शन समोर येत त्याला जवळजवळ खेकसतच बोलला " तू, हे काय करत असतोस . कुठल्या जगात असतोस "अरे जगू, मला का बोलतोयस. काय केले मी. " दर्शन पूर्ण अजाण होता काही क्षणांपूर्वी घडलेल्या प्रसंगापासून म्हणून तो जगदीश काय बोलतोय याचा अर्थ समजून घेऊ शकत नव्हता. दर्शनचे बोलणे ऐकून मात्र जगदिशचा पारा चढला दर्शनची कॉलर धरून त्याने त्याला खोलीच्या मधोमध असलेल्या खांबावर आदळले आणि पुन्हा त्याला बरच काही सुनावू लागला. "अरे हा सुजल, तुझ्यासाठी काय काय केले याने आणि तू यालाच असे केलेस. " जगदीश सुजलकडे बघत बोलत होता. " अरे आता याला शुध्दीवर आणयाचे कसे दर्शन". असे म्हणत दर्शनची कॉलर सोडून जगदीश सुजल जवळ येऊन बसला. सुजल जवळ येताच त्या सगळ्यांना एकदम लहान आवाजात काही तरी ऐकू येऊ लागले. जसे कोणी तरी आवाज देत आहे कोणालातरी. सगळे कान बारीक करून ऐकण्याचा प्रयत्न करू लागले, आधी सगळे दर्शनकडे पाहू लागले तर दर्शन ठिकठाक होता मग सुजलच्या हातांची हालचाल झाल्यावर सगळ्यांचे लक्ष सुजलकडे ठिकून राहिले. सुजल बारीक आवाजात " सेनापती, सेनापती". असे बोलत होता. "एक कमी होता जो हा पण बडबडतोय". त्या मुलांमधला एक जण बोलला. एक वेगळीच ऊर्जा सुजलच्या आसपास चमकू लागली, त्याचे सगळे मित्र त्याला गोलाकार करून उभे राहिले . एक झटका लागल्यासारखा सुजल जागीच थरथरला आणि क्षणात जागेवरच उठला. दर्शन ला समोर बघून तो म्हणाला, " सेनापती, आपले काम लवकरात लवकर करून घ्यावे लागणार आहे . कारण तो मनुष्यरूपात येऊन जास्त खतरनाक सिद्ध होऊ शकतो. " वर्तुळ करून उभे असलेल्या सुजलच्या मित्रांना सुजल च्या चेहऱ्यावर एक प्रकाश दिसून आला त्याच्या डोळ्यातून एक प्रकाशाची उजळ तिरीप बाहेर पडत होती. समोरच दर्शन उभा होता जो आता पूर्ण बरा होता पण, सुजलच्या डोळ्यातून निघणाऱ्या प्रकाश तिरपेतून एक चलचित्रपट तिथे सुरू झाला ज्यात सुजल आणि दर्शन च्या गतजन्माचा पुरावा आणि अधुऱ्या राहिलील्या कार्याची जाणीव होती. आता मात्र दोघेही एकमेकांसमोर उभे राहिले आणि गतजन्माच्या तसेच या जन्माच्या दोन्ही आठवणींना उजाळा देऊन व त्या स्वतःमध्ये जाग्या ठेवून त्या अदृश्य शक्तीला सामोरे जाऊन तिचा नाश करण्यास तयार होता. नीरव एक गरीब कुटुंबातील मुलगा नेहमीचे त्याचे वेटरचे कपडे काढून त्याचे साधे टिशर्ट आणि एक फाटून आलेली जीन्स घालत होता. एका नामांकित उपहारगृहात तो वेटरचे काम करत होता. आपले कपडे बदलून आणि त्याचे वेटरचे कपडे कपाटात ठेवून तो उपहारगृहाच्या बाहेर पडला, आज आधीच उशीर झालेला त्यात मोबाइलला नेटवर्क ही नव्हते. आपली पाऊले झपझप उचलत तो शेअर ऑटो स्टँड जवळ करू पाहत होता. बाजूच्या इमारतीच्या त्या भव्य कमानीवर तसेच इमारतीच्या भिंतीवरही त्याला एक भयानक आकार दिसून आला जो तेवढाच भव्य होता. त्या सावलीत धारदार नखे आणि चेहऱ्याचा वेगळाच आकार त्याला दिसून आला ते पाहून जागीच थिजला व मनोमन देवाची आराधना करू लागला तसा काही वेळासाठी तो भयानक आकार तिथून नाहीसा झाला , धोका टळला आहे असे समजून तो पुढे वळणार तोच एक भयानक चेहरा त्यच्या समोर आला आणि क्षणात धुरासारखा त्याच्या नाकातून त्याच्या शरीरात गेला. तो किती तरी वेळ बेशुद्ध होता, साधारण मध्यरात्री त्याने डोळे उघडले जे पिवळेजर्द दिसत होते. आता दोघांनीही एकमेकांना ओळखले होते, दर्शन ला पडलेल्या स्वप्नांचा सगळा अर्थ दोघांनाही उमगला होता. सुजल धानी बद्दल मात्र पूर्ण विसरून गेला होता. त्याचे लक्ष सध्या त्या दृष्ट आत्म्याला माराव इतकच होतं. सुजल आणि दर्शन पुनर्जन्म घेऊन आलेले त्यातच त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची शक्ती सुद्धा होती, जी आता त्यांना सगळं आठवल्यानंतर जाणवत होती. त्यांना कुठेतरी ही जाणीव झाली की त्या आत्म्याने एक मानवी शरीर धारण केलं आहे पण ते कोणाच आहे हे त्यांना समजत नव्हतं. सुजल एक महाराज म्हणून आपले कर्तव्य करत त्याच्याच एका मित्राला अर्थात , जगदीशला या कामासाठी पुढाकार देत होता त्याने जगदीशला असा कोणता मनुष्य दिसतो का जो अमानवी किंवा विक्षिप्त वागतोय याची खबर घ्यायला सांगितली. जगदीशसाठी हे काही नवीन नव्हतं तो बऱ्याचदा अशा गोष्टी शोधण्यासाठी पोलिसांची मदत करत असतो कारण तो एक गुप्तहेर असतो त्यामुळे या कामासाठी तो लगेच तयार होतो. त्यालाही आता सुजल आणि दर्शन च्या गत जन्मा बद्दल सगळं काही माहीत असतं कारण तोही त्या गतजन्माचा एक छोटासा हिस्सा असतो तो कसा ते आपण पाहू. त्यांचे बाकीचे मित्र मात्र या दोघांचा तिघांचं काय चाललंय याच विचारात असतात त्यांचा अजून एक मित्र नमित त्याला मात्र हे सगळं खोटं वाटत असतं तसं वाटत असतानाच तो तिथून निघून जातो ,आणि इतर मित्रांनाही त्यांच्या या मूर्खपणापासून लांब राहण्याचा सल्ला देतो. इकडे नीरव त्याचा रस्त्याने चालत असतो तो आता एक सामान्य माणूस असतो, पण त्याच्या आत लपलेली ती सुप्त शक्ती अजूनही असतेच. नीरव हा नमित चा शेजारी असतो, नीरव हा त्याच्या आई-वडिलांना सोडून एका छोट्या फ्लॅटमध्ये भाडोत्री म्हणून राहत असतो आणि तो फ्लॅट नमित चा असतो. नीरव फ्लॅटचा दरवाजा उघडून आत जात असतोच की नमित त्याला महिन्याच्या पैशांची आठवण करून द्यायला येतो, नमित जेव्हा नीरवला हात लावतो तेव्हा तो त्याला थंडगार जाणवतो जणू शीत कपाटातील एखाद मेलेलं शरीर असावं. तो दचकून मागे होतो नीरवचे पिवळे जर्द डोळे त्याला तिरक्या नजरेने बघतात, आणि पुन्हा समोर येऊन साधारण माणसाप्रमाणे त्याच्याशी संवाद साधत निरव शांततेत त्याला सांगतो" दादा ,यावेळेस माझ्याकडून दोन दिवस उशिरा पैशांची सोय होईल मी दोन दिवसात तुला पैसे देतो". नीरव असं बोलून त्याच्या रूम मध्ये प्रवेश करतो मागे मात्र नमितची अवस्था खूप वाईट होते त्याला सुजल चे शब्द आठवतात तो तिथून काढता पाय घेऊन सुजल कडे जायला निघतो कारण, त्याच्या समोरच एक अमानवी घटना त्याने अनुभवलेली असते. जगदीश पण त्याला मिळालेल्या कामानुसार अमानवी घटनेच्या शोधात जात असतो, पण त्याला आधी रागवलेल्या नमितची चिंता सतावते तू तसाच नमितच्या मागे त्याच्या घरापर्यंत जात असतो. अचानक त्याला काहीतरी जाणीव लागते, आणि तो काही क्षण आपली जीप साईडला थांबवून नमितच्या घरापर्यंत चालत जातो. चालत जात असताना त्याच्या समोरच एक माणूस काहीतरी विचित्र हालचाली करताना त्याला जाणवतो, जसं की तो दोन्ही हात दोन्ही पाय मागे फिरवून चालत असतो एखाद्या झोंबी माणसासारखे. जगदीश ला त्याच्यावर संशय येतो आणि तो तसाच त्याच्या मागे त्याच्या घरापर्यंत जातो तिथे झालेली नमित ची अवस्था जगदीशच्या तीक्ष्ण नजरेतून सुटत नाही आणि जेव्हा नमित सुजलच्या घराकडे जातो, तेव्हा जगदीश त्या घराजवळ म्हणजेच निरव च्या घराजवळ उभा राहून आत मधल्या काही गोष्टी ऐकू येतात का याचा प्रयत्न करतो. त्याला आतून एक वेगळीच भाषा ऐकू येत असते , आणि ती त्याच्या खूप ओळखीची असल्याची त्याला जाणीव होते, ते जे आत मध्ये असतं ते जगदीश ला पटकन ओळखतं ,आणि त्याला त्याच्या अस्तित्वाबद्दल विचारतं "ओळखलस का स्वतःला कोण आहेस तू ". जगदीशला मात्र तिथल्या तिथे घाम फुटतो आत मध्ये उभ्या असलेल्या माणसाला आपल्या अस्तित्व कसं जाणवलं ह्याच्यात विचारात असतो तेवढ्यात फ्लॅटचा दरवाजा उघडतो आणि जगदीशला आत मध्ये खेचून घेतो.जगदिश त्या रूममध्ये त्या भयाण सावलीच्या कक्षेत जातो, जगदिशला त्याने ओळखल्यामुळे त्याने त्याचे सुटकेचे मार्ग बंद केलेले असतात. " तू मला रोखून काही ही करू शकत नाही, महाराजांनी आणि सेनापतींनी पुन्हा जन्म घेतला आहे, तू त्यांचे काहीही बिघडवू शकत नाहीस. मागच्या जन्मी तू त्यांना हरवलस पण या जन्मी ते शक्य नाही. मागच्या जन्मी ही मीच महाराजांना सांगितले होते तुझ्याबद्दल आणि या जन्मी ही मीच सांगणार आहे. " इतके बोलून जगदिशने उभ्या जागी महाराजांचे स्मरण केले. इकडे नमित सुजल जवळ आला त्याने सगळा प्रसंग सुजल समोर उभा केला , दर्शन ही नमितला ऐकत होता. तितक्यात दर्शनला आठवल्यासारखे तो बोलला , " नमित, जगदीश भेटला का तुला!! तू रागात गेलेला बघून आधी तुझ्या मागे जाणार होता तो, तसे तो सांगूनही गेला आम्हाला". दर्शनचे ऐकून नमित बोलला, " नाही रे दर्शन , मला तो दिसला नाही." नमित पण थोड्या चिंतेच्या स्वरात म्हणाला. सुजलला त्याच्या नावाने अर्थात महाराजांच्या नावाने कोणीतरी आवाज देत आहे असे जाणवले, त़ो मागे पुढे पाहत बैचेन होत होता, नेमका आवाज येतोय कुठून समजत नव्हते. त्याने ध्यान लावून पुन्हा एकदा आवाज ऐकायचा प्रयत्न केला, कोणीतरी पोटतिडकीने ओरडतय असाच तो आवाज होता. सुजलला त्याच्या बंद डोळ्यामागे धूसर काही दिसू लागले ज्यात एक मुलगा एका दुसऱ्या माणसाला भिंतीशी ठेकवून मारत होता. सुजलला काही वेळानंतर चित्र स्पष्ट झाले ज्यात जगदिश आणि नीरव दिसू लागले त्याने त्याचा एक हात नमितच्या खांद्यावर ठेवला आणि त्याला समोरच्या भिंतीवर बघण्याचा इशारा केला, " नमित, हाच का तो? ". सुजल ने त्याच्या डोळ्याच्या मधून एक प्रकाशझोत भिंतीवर टाकला ज्यामध्ये जगदिश आणि नीरव स्पष्ट दिसत होते. " अरे , हा तर नीरव".. नमित एकदम किंचाळत बोलला. " कोठे असेल हा आता!! ". सुजल शांतपणे बोलला. " हा माझ्या फ्लॅटमध्येच राहतो , माझ्या अगदी शेजारच्या फ्लॅटमध्ये" . सगळे घाई करत तिथून निघाले . दर्शन आणि सुजल ने एकदा एकमेकांना टाळी दिली आणि त्या अतरंगी सैतानाला शिक्षा देण्यास पुढे सरसावले . जगदिश चा श्वास अडकत चालला होता, त्याला काही बोलता ही येत नव्हते. प्रतिकार करणेही त्याने सोडून दिले, तसा तो असुर, तो सैतान पिसाटल्यासारखा हसू लागला. जणू त्याच्या आणि त्याच्या शत्रूमधला विरत जात आहे. जगदिश ने पुन्हा एकदा मनातल्या मनात महाराजांच्या नावाचा जप सुरू केला तसेच भोलेनाथ महादेव यांनाही मनोमन नमन केले. साक्षात भोलेनाथ तिथे उपस्थित झाल्याची जाणीव दोघांना ही झाली. तो सैतान हडबडला जगदिशवरचा त्याचा जोर कमी होऊ लागला तो आग ओकल्याप्रमाणे नीरव च्या तोंडातून बाहेर पडला आणि क्षणात बंद खिडकीचे तावदान तोडून बाहेर पडला . नीरव क्षणात खाली कोसळला व पसरलेला पिवळा प्रकाश ही लुप्त झाला. तिथे फक्त जगदिश आणि बेशुद्ध नीरव दिसून येत होते . जगदिशने तात्काळ नीरवच्या चेहऱ्यावर पाणी मारले. सुजल , दर्शन आणि बाकी मंडळी नमितच्या फ्लॅटवर आले. नमित ने स्वतःच्या जवळ असलेल्या किल्लीने दार उघडले . आतमध्ये जगदिश नीरवला शुध्दीवर आणण्यासाठी प्रयत्न करत होता पण सगळे व्यर्थ. त्याला काही सुचणे कठीणच. त्याचे लक्ष समोर उभ्या सुजल आणि दर्शन वर गेले तो ढसाढसा रडू लागला आणि त्याच्या बरोबर झालेले आठवून सगळ्यांना सांगत होता . महादेवांची उपस्थिती चे ऐकल्यानंतर मात्र सगळे अवाक झाले. तिथेच जगदिश समोर हात जोडून " धन्य जगदिश्वरा" . असे म्हणत त्याचे मित्र त्याच्या समोर हात जोडून उभे राहिले. सुजल ने जगदिश ला धीर दिला आणि त्या तुटलेल्या खिडकीतून बाहेर पाहत उभा राहिला. चालकाच्या बाजूला उभ्या असलेल्या धानीने एक झटका देऊन मान हलवली , ती अगदी लालबुंद डोळे घेऊन सुजल आणि दर्शनला पाहत होती. " धानी, तुझी या जीवनातली जिवलग मैत्रीण , हो ना!! असे म्हणत ते ध्यान कुत्सित हसू लागले. त्याचे हसणे या दोघांच्या आणि उपस्थित सगळ्यांच्या कानावर चिरा पाडत होते. धानीच्या अर्थात त्या सैतानाच्या शेजारी उभी असलेली धानीची मैत्रीण तिला बघून घाबरू लागली , मागूनच सुजल तिला न घाबरण्यासाठी सांगत होता, " सोना, घाबरू नकोस. " पण त्याआधीच सोना घाबरून मागच्या दिशेने पळू लागली आणि धानीरूपी राक्षस तिच्या मागे आला तिला पकडून जोरात चालकाच्या स्टेरिंग वर आदळले ज्याने जागीच सोना गतप्राण झाली. तिला तसे पाहून सगळेच हादरले. आता सुजल आणि दर्शनला त्यांचे रूप घेणे भाग होते अजून कोणता जीव जाण्याआधी . सुजल महाराजांच्या रुपात आणि सेनापतीच्या रुपात दर्शन तिथे समोर आले, महाविद्यालयातील इतर लोक आणि विद्यार्थी त्या दोघांना पाहतच राहिले आणि धानीला पाहून घाबरून जाऊ लागले. सुजल ने त्याला जोरात पकडून त्याच्या भोवती एक विशिष्ट विभूती फिरवली , ती त्या वेळेस कोठून आली हे त्याला ही समजले नाही. प्रसंगावधान राखून दर्शनने सगळ्यांना बस रिकामी करायला सांगितली, सगळे घाबरत घाबरतच धावून बाहेर पडू लागले. सुजल ने त्याला बराच वेळ दाबून धरलेले आता त्याची पकड सैल होत चालली होती. त्या सैतानाने एक जोरात धक्का सुजलला दिला तो थेट मागच्या खिडकीवर जाऊन आदळला , खिडकीच्या काचा ही काही प्रमाणात त्याच्या खांद्याला रूतल्या होत्या. तसाच सावरत सुजल त्याच्या दिशेने येऊ लागला , बस आता पूर्ण रिकामी होती. तो सैतान आता बाहेर पडू लागला होता तो बसचे दार गाठणार तोच सुजलने त्याच्यावर झेप घेतली त्याला अडवले , त्याचा पवित्रा पाहून त्या सैतानाने सुजलला
बसमधून बाहेर काढले आणि सगळ्यांसमक्ष त्याला जोरात जमिनीवर आदळले . आता तिथे दर्शनही त्याच्यावर चाल करून आला पण त्या सैतानाने त्यालाही काही क्षणात दूर भिरकावले. तो सैतान आता आरोळी ठोकू लागला एका क्षणात त्याने दोघांना ही लाथे ने पुन्हा एकदा दूरवर भिरकावले, त्या दोघांना ही उभं राहायची सुध्दा संधी तो सैतान देत नव्हता. सुजल आणि दर्शन दोघांच्याही ओठातून आणि नाकातून रक्त वाहत होते. त्या सैतानाच्या बळाची त्यांनी प्रचिती घेतली होती. दोघेही मनोमन महादेवाचे स्मरण करू लागले. या दोघांना असे निपचित पडलेले पाहून धानीरूपी सैतान आता इतर उभ्या असलेल्या लोकांकडे जाऊ लागले. त्या सगळ्यांना आता भिती भरून वाहू लागली, तो सैतान तिथे उभ्या दोघांना घट्ट पकडून होता, तो त्याच्या नरडीचा घोट घेतच होता की एक डमरू त्याच्या जोरात हातावर आदळलला, त्या डमरूच्या स्पर्शाने त्याचा तेवढा भाग जळून निघाला. त्याच्या दुसऱ्या हाताला ही बेलाचे पान स्पर्शून गेले ज्यामुळे त्याची पुन्हा लाही होऊ लागली, त्याला त्रास असह्य झाला तसा त्याने धानीचे शरीर सोडले आणि किंकाळ्या फोडत तो तडफडू लागला . धानी च्या अंगात काही शक्ती न उरल्यामुळे ती धाडकन खाली कोसळली जिथे आधीच सुजल पडला होता. धानीच्या स्पर्शामुळे सुजल अगदीच शहारला. तिची जाणीव होताच त्याने प्रतिक्रिया द्यायला सुरवात केली तो डोळे किलकिले करत समोर पाहू लागला. त्याला साक्षात महादेवांचे दर्शन झाले आणि त्या राक्षसाचा त्या सैतानाचा नाश होताना तो समोर बघत होता. साक्षात गंगा माता तिचे पवित्र जल त्या राक्षसाच्या तोंडात सोडत होती, ज्यामुळे तो हैवान तप्त अग्नीसारखा तापत होता. त्याच्या अपवित्र आत्म्याला ती पवित्रता सहन होत नव्हती. महादेव ही त्यांच्या डोईवर असणारा पवित्र दुग्धमिश्रीत कलश त्याच्या अंगावर सोडत होते, ज्यामुळे तो आग ओकत होता. खूप वेळाच्या या थरारानंतर त्या हैवानाची जागीच राख झाली जी क्षणात हवेत विलीन ही झाली. सगळे काही नीटनेटके झालेले पाहून सगळे विद्यार्थी एकत्र आले. धानीला उठवायचा प्रयत्न चालू होता पण ती अशक्त झाली होती. इकडे दर्शन आणि सुजल ही सामान्य रूपात आले. सगळे काही नीट झाले होते. धानी इस्पितळात एका बेडवर आडवी होती आणि तिच्या आजूबाजूला तिला प्रसन्न करणारे चित्र काढण्यात आलेले, जशी ती इतरांसाठी करायची तेच आज तिच्यासाठी करण्यात आले होते. सुजल ने धानीला त्याच्या मनातले सांगितले, तिनेही लगेचच होकार दिला, तिलाही सुजल आवडतच होता. दोघेही छान रमले त्यांच्या आयुष्यात आणि त्या राजवाड्याच्या खोल भागातले धन सरकार पर्यंत पोहोचल्याबद्दल सरकारने त्यातला दहा टक्के भाग सुजल आणि धानी या जोडप्याला देऊ केला. राजवाड्यातील रहस्य आता धोकादायक मुळीच नव्हते, कारण धोका टळून रहस्याचा ही उलगडा झाला होता.
(समाप्त)

