Tejashree Pawar

Tragedy

2  

Tejashree Pawar

Tragedy

तो एक क्षण ( भाग 2 )

तो एक क्षण ( भाग 2 )

3 mins
9.3K


प्रशांत… ज्याला आता शोधायचं होतं. प्रियाला कळवून त्याच्या आईकडून सलिलने त्याच्या कॉलेजचे नाव मिळवले होते. दुसऱ्याच दिवशी उठून तो कामाला लागला. कॉलेजमधे पोहोचून समजले की प्रशांतचा तिथेही काही थांगपत्ता नव्हता. गेले पंधरा दिवस झाले त्याने कॉलेजमधे पाऊल ठेवले नव्हते. सलील तातडीने हॉस्टेलकडे गेला. तिथेही प्रशांतला बरेच दिवस कोणी पाहिले नव्हते. सुट्टीसाठी घरी गेला असेल समजून सर्वांनीच दुर्लक्ष केले होते.

कोण असेल हा प्रशांत ? कुठे असेल ? कसा असेल ? काय करत असेल तो ? या व अशा अनेक प्रश्नांनी सलिलला हैराण करून सोडले. खूप प्रयात्नांनंतर प्रशांतच्या एका ‘जिवलग’ मित्राचा त्याला शोध लागला. रूमचे दार ठोठावल्यावर आतून “कोण आहे रे ?” असा उर्मट आवाज आला. काही वेळाने दार उघडल्यावर पाहतो तो काय, संपूर्ण खोली सिगारेटच्या धुराने व्यापून गेलेली. श्वास घेण्यासही अवघड होईल अशी अवस्था. कपाटाच्या एका बाजूला दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि टेबलावर सिगारेटचीची रिकामी पाकिटं. हे सर्व दृश्य पाहून सलील थबकलाच. समोरची व्यक्ती अजिबातही बोलण्याच्या अवस्थेत नव्हती. तरीही आपल्या परीने प्रयत्न करूनही अपेक्षित काहीही न मिळाल्याने सलील तसाच रूमवर निघून गेला. ती रात्र त्याने कशीबशी घालवली.

सकाळ झाली आणि सलील पुन्हा त्याच जागेवर हजर झाला. रूमचे दार ठोठावले. पुन्हा अवस्था तीच. दहा मिनिटांनी दरवाजा उघडण्यात आला. आजची दशा बरी होती. कालचा व्याप उरकलेला दिसत होता. प्रशांतविषयी प्रश्न विचारला आणि उत्तराचा सूर जरा नकारार्थीच आला. प्रचंड विनंत्या केल्यांनतर उत्तरादाखल एका हॉस्पिटलचा पत्ता आणि वॉर्ड नंबर मिळाला. आता मात्र सलीलच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. मन असंख्य विचारांनी दाटून आले. नको नको त्या शंका मनात येऊ लागल्या. सलिलने ताबडतोब प्रियाला फोन करून तिथे येण्यास सांगितले अन तोही धावतच तिथे पोहोचला. प्रिया तिथे येऊन त्याचीच वाट पाहत होती. दोघेही मन घट्ट करून सांगितलेल्या खोलीकडे पोहोचले….. मात्र दरवाजा उघडण्याची सलीलची हिम्मत होईना. त्याने एक नजर प्रियाकडे टाकली अन त्याची अवस्था तिला कळून चुकली. तिने त्याचा हात धरला अन दरवाजा उघडला. समोरचे दृश्य पाहून सलीलचे सगळे अवसानचं गळाले. प्रशांत शांतपणे बेडवर पडलेला होता. नर्सचे स्वतःचे काम चालू होते. एकूणच दृश्यावरून सलीलला परिस्थितीची कल्पना आली. त्याच्या जिवलग मित्राकडे पाहून कोणालाही ती आली असती. सलिलने डॉक्टरांची भेट घेतली. आता काळजीचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि त्यांचा जीव भांड्यात पडला. आपल्या आजारपणाविषयी कोणालाही कळू नये हा प्रशांतचा हट्ट आणि आई वडिलांना तर नाहीच, ही विनंती. आपल्या इतक्या वर्षांच्या पराक्रमाची ही फळे घरच्यांना काय तोंडाने दाखवणार ?? गेले १५ दिवस झाले हा मुलगा अशाच प्रकारे हॉस्पिटलमधे पडून होता. कोणालाही न कळवता !! अपवाद म्हणजे ह्याचा तो जिवलग मित्र ज्याच्याकडून सलीलला ह्याची माहिती मिळाली होती. आपल्या व्यसनांच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून प्रशांतला भेटायला येत होता आणि नशीब म्हणजे त्याचा सर्व खर्च आणि गरज पुरवत होता होता.

एम ए (इंग्लिश) च्या शेवटच्या वर्षाला असणारा हा प्रशांत अत्यंत हुशार आणि गुणी मुलगा. मुलाने कॉलेजमधे मोठा प्रोफेसर व्हावं ही घरच्यांची एकच इच्छा. परंतु ह्या इच्छेला अत्यंत राजरोसपणे तडे जात होते आणि याची त्या मायबापांना तिळमात्रही कल्पना नव्हती. हॉस्पिटल वरून परतताना सलील पूर्णवेळ शांत होता. प्रियाचे घर आले तेव्हा तो भानावर आला. अंगणातल्याच खुर्चीवर त्याने बसून घेतले. प्रिया अस्वस्थ होऊन त्याच्याकडे गेली आणि त्याने तिला मिठी मारली. सलील जोरजोरात रडू लागला. त्याला शांत करण्याची घाई तिनेही केली नाही. प्रत्येक परिस्थितीला गरजेनुसार आणि नाजूकतेने कशाप्रकारे हाताळायचे हे तिला चांगलेच माहित होते. मनमोकळे होईपर्यंत तिने त्याला रडू दिले. थोड्या वेळाने तो स्वतःच शांत झाला. भानावर आला आणि तितक्याच घाईने बाजूलाही झाला. आपण आयुष्यात वाया घालवलेल्या दोन वर्षांविषयी त्याला पश्चाताप होत होता. प्रशांतची अवस्था पहिल्यापासून त्याचे मन थाऱ्यावर नव्हते. सतत आपल्या आईवडिलांचा चेहरा समोर दिसत होता. आपण केलेल्या प्रत्येक गोष्टीविषयी त्याला आता चीड येत होती. संताप येत होता. प्रियाने बोलायला सुरुवात केली. नेहमी बडबडणाऱ्या तिच्या चेहऱ्यावर आज चंद्राची शीतलता होती. तिने सलिलला समजावले. परिस्थिती अजूनही हाताबाहेर गेली नसल्याची त्याला जाणीव करून दिली. त्याला वेळीच योग्य गोष्टींची कल्पना आल्याचे समाधान व्यक्त केले. परंतु त्याचबरोबर झाल्या प्रकाराविषयी त्याला प्रशांतच्या आई वडिलांनाही कळवायचे आहे याचे भानही आणून दिले. त्यासाठी त्याच्या मनाची तयारी करून दिली. खरंच वेगळी होती ती….उसळलेल्या समुद्राला शांत करण्याची जादू तिच्यातच…. अन कोमेजलेल्या फुलपाखराला उभारी देण्याचा सामर्थ्यही तिच्यातच…….


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy