Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Deepak Warungase

Abstract


3  

Deepak Warungase

Abstract


तो अन् ती

तो अन् ती

1 min 672 1 min 672

त्याच्या केविलवाण्या स्वरात केलेल्या विनवणीने ती आज त्याला भेटली.


तो त्या नेहमीच्या ठिकाणी पावलांना एकसारखी गती प्राप्त झाल्यासारखा जागेवर सैरभैर चालत होता..


इतरांशी कणखर असलेल्या तो तिच्या आठवणीने सुद्धा मृदू होऊन जातो..


ती आली.. बाकावर अलगद बसली.. त्याच्या अनेकदा अनुभवल्या हालचालीकडे व्याकुळतेने बघत...


तो तप्त होता...अगदी ग्रिष्मातल्या सुर्यासारखा..

 पण तिच्यासाठी तितकाच अगतिक...

अन् ती शीलत होती.. पौर्णिमेच्या चंद्रासारखी.. आंधाऱ्या राञी लख्ख प्रकाश देऊन साथ करणारी...


तो डोक्यात ताण घालून खवळलेल्या धबधब्यागत बरसत होता..

अन् ती संथ प्रवाहात वाहणाऱ्या नदीसारखी अगदी अगदी शांत...

खोल विचारात बुडालेली..


आताही नेहमीचा कुणापुढे न ढळणारा त्याचा तोल तिच्या पुढ्यात ढासाळला..

अन् फेसाळल्या धबधब्यागत तो बोलू लागला....


घाबरतेस तू.. झोकून द्यायला...!!

घाबरतेस तू विश्वास ठेवायला...!!

समर्थ आहेत हात माझे...

 पण डगमगतेस हात धरायला..!!


 दुर्लक्षित करतेस ठरवून किनारे

ओहटीत मला एकटं सोडतेस..

भरती समय निकट येता

अनामिकांची मने भरतेस..!!


नाही तयारी तुझी सोबत वाहत जाण्याची...!!

नाहीच तयारी तुझी आकंठ बुडण्याची..!!


ती बघत होती.. त्याचं ते फणफलेल्या दुर्वास ऋषिचं चिञ..


अगदी तल्लिनतेनं.. पुन्हा कधी बघायला मिळेल का..?? याचं प्रश्नाच्या जाणिवेनं...


तिच्या तटस्थतेने तो अधिकच फुस्कारला.. हातानेच बाजुच्या तावदानावर जोरात झटके देत स्वतःच्या हतबल स्थितीचा ञागा पायांवर काढत निघून गेला ...

अगदी घरघर करत जाणाऱ्या भुंग्यासारखा...


ती फक्त बघत होती त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे ञयस्थासारखी...

पुसट होत जाणारी आकृती डोळे खोल करून पाहताना आता तिच्याही कडा पाणावल्या..


अन् ती स्वतःशी बोलू लागली..


हो घाबरते रे मी..


माझ्यामुळे तू अडकून पडशील या भितीला...!


माझ्या भाराने वाकून तर जाणार नाही ना खांदे तुझे या खंत स्थितीला...!!


मग सांग कशी बघू शकेल मी तुला असं बुडताना, वाहताना...??


म्हणून


तीनं बुडायचं ठरवलं..


अगदी एकटचं....!!!


Rate this content
Log in

More marathi story from Deepak Warungase

Similar marathi story from Abstract