Sangita Tathod

Tragedy

4  

Sangita Tathod

Tragedy

तो आणि ती

तो आणि ती

3 mins
339


त्याने तिला एका लग्नात बघितले .ती नवरीची मैत्रीण म्हणून ,नवरदेवाच्या स्वागताला ,पंचारती घेऊन ,आली होती .तो नवरदेवाचा मावस भाऊ म्हणून त्याच्या बाजुला उभा होता .गुलाबी साडीतील ,भुरभुरणाऱ्या केसांची ,टपोऱ्या डोळ्यांची ,सावळ्या रंगाची ,ती त्याला पाहता क्षणीच आवडली .मग, काय दिवसभर तो ,तिच्या मागे पुढे रहायचा प्रयत्न करीत

होता .दिवसभरात त्याने तिची बरीचशी माहिती काढली .ती ग्रॅज्युएट झालेली होती आणि एका , Private ऑफीस मध्ये जॉब करत होती .तो एका Goverment ऑफीस मध्ये कॅशिअर होता .

    दिवसभर नवरदेव ,नवरीच्या मित्र ,मैत्रिणींनी भरपूर एन्जॉय केला .लग्न आटोपले .ती तिच्या घरी. तो त्याच्या घरी . अधुन मधुन तिला त्याची आठवण  यायची .पण मनाला समजावून सांगायची, " काही फायदा नाही आठवण काढुन . पुन्हा थोडच भेटणार आहे तो - -? 

    

   आणि एक दिवस .तिला बघायला पाहुणे येणार म्हणुन ,ती साडी घालुन तयार झाली .त्या लग्नात घातली होती तिच ,गुलाबी साडी .हॉल मध्ये गेली . बरेच लोक होते. त्यांच्यामध्ये तो दिसला. तिला आनंदाचा धक्काच बसला .चट मंगणी , फट शादी . लग्न होऊन ,ती सासरी आली .तिला तर स्वप्नात असल्यासारखे वाटत होते .तो तिच्यावर खूपच प्रेम करत होती .ती पण करत होती .कितीतरी वेळा ,तो तिला घेऊन चांदण्या रात्री गप्पा करत बसायचा .कधी शेतावर घेऊन जायचा ,तर कधी  जत्रेत घेऊन जायचा .घरातील सर्वांच्या आणि तिच्या स्वतःच्याइच्छेने तिने लग्नानंतर जॉब सोडला होता . दोघा राजा ,राणीच्या संसाराचे गोकुळ झाले होते . संसारवेलिवर तीन फुले उमलली होती .कितीही झाले तरी ती दोघे कधीच एकमेकांची मने मोडत नसत . कधी तो पडती बाजू घ्यायचा तर ,कधी ती .

   मुलांची लग्ने झाली ,ती आपापल्या संसाराला लागली .मुलांनी खूप आग्रह केला तरीही ,ती दोघेच राहत .कधी कोणाला अडचण असली ,गरज असली की जात मुलांकडे .काही दिवस राहून परत येत आपल्याच घरट्यात .

    एक दिवस काय होते - - ? तिन्ही मुलं ,सुना, नातवंड एका घरगुती कार्यक्रमासाठी एकत्र जमली

होती .तो , - - - मुलांनी नाही म्हटले तरी बाजरात गेला होता .

 " बाबा मी आणतो भाजी ,राहू द्या तुम्ही - " मुलगा

" नाही ,रे ,तुझ्या आईला ,कशी भाजी लागते ,हे मलाच माहिती आहे . आता जातो आणि लगेच येतो " तो

     येताना त्याचा मोठा अपघात होतो . मोठ्या मुलाला फोन येतो .तो मधल्याला घेऊन हिस्पिटलला

जातो . घरात सर्वाना बजावून सांगतो की  " आईला यातले काहीच कळता कामा नये ."


  इकडे ती सुनेला म्हणते ,  " बघ गं ,माझ्या हातुन कधीच ,कुंकू सांडत नाही. आज कसे काय सांडले - -? " ती

 " काही नाही हो आई होते एखाद्यावेळी चुकून ." सुन


   खूप प्रयत्न केले ,पण डॉक्टर ,त्याला वाचवू शकले नाहीत .तो जेव्हा सिरीयस होता ,नेमकी त्याच वेळी तिचा जीव घाबरू लागल्याने तिला अडमिट करावे लागले . त्याच हिस्पिटल मध्ये . त्याला माहिती नव्हते ती ,बाजूच्या रुम मध्ये आहे ,तिलाही माहिती नव्हते ,तो इथेच कुठेतरी आहे .

     पहाटे पहाटे दोघांची ही प्राणज्योत मालवली . दुसऱ्या दिवशी दोघांची प्रेतयात्रा सोबत निघाली .


    वर भेटल्यावर तो विचारतो,  "कसे कळले गं तुला ,मी इकडे आहे ?"

ती म्हणते , "खिडकीतून वाऱ्याची शितल झुळूक आली ,तिने मला तुमचा निरोप दिला .मग मी पण आली तुमच्या मागे ."


( शेवटच्या दोन चार ओळी सोडल्या तर ,बाकी सम्पूर्ण कथा सत्य घटनेवर आधारित आहे .)

   


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy