Priya Jawane

Romance Fantasy

3  

Priya Jawane

Romance Fantasy

तो आणि ती - "धारा...!"

तो आणि ती - "धारा...!"

4 mins
157


पावसाची रिपरिप होती आज पण त्याच्या घरीही जायचं होतं. माझं काम होतं त्याच्याकडे.

(हो त्याच्याकडे काम. मला एक पुस्तक हव होतं त्याच्या कलेक्शन मधुन. त्याला जेवढं प्रेम पुस्तकांवर होतं तेवढं तर माझ्यावरही नव्हतं.)


असो, मी एक पुस्तक घ्यायला त्याच्याकडे जानार होते. मलाही वाचायला आवडायच पण त्याच्या इतकं खोलवर जाऊन नाही. तो खुप खोल विचार असनारे पुस्तके वाचतो. अशे काही जे मला समजायला ही कठिण असतात. मग तो च समजवतो सोप्या भाषेत, त्याच्या अर्थाच. असो, मी त्याला मेसेज केला.

'मी घरी येतेय.एक काम आहे तुझ्याकडे.'

त्याचा रिप्लाय होता.

'लवकर ये. एका ठिकाणी जायचयं'

मी ही १० मिनटातच त्याच्या घरी पोहचले.

brezza बाहेरच होती तयारीत आणि स्वारीही. ब्लॅक कॅज्युअल शर्ट, ब्लु जिन्स् आणि गॉगल. माझीच नजर लागेल त्याला. खरतर मी त्याला शोभतही नाही. मी विचारातच आत गेले. तो गाडीत फळं ठेवत होता. माझ्याकडे पाहून किंचित हसला.

'आज गाडी वेळेवर? बर झालं आलीस. चल.!'

तो अधिकारवानीत बोलला.

मी न समजुन हाताने कुठे विचारलं.

'तुला मेसेज केला होता ना'

तो केविलवाना बोलला.

'कामात असशील तर. . .' 

तो हाताने माझ्यासाठी दार उघडत बोलला.

मी हसून आत बसले. तो लाघवी हसला. एव्हाना त्याच सगळं सामान ठेऊन झालं होतं. आम्ही निघालो.

'किती वेळ लागेल परत यायला. घरी सांगायचं होतं' 

मी अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होते. कारण त्याच्यासोबत असल्यावर घरी काही प्रोब्लम नव्हता.

'काळजी नको करुस. अंकल ला सांगितलय अंधाराच्या आधी घरी पोहचवेल तुला' 

तो हसुन मला आश्वस्त करत म्हनाला. मी ही मागे मान टेकली. 

'झोप आलिये?' त्याने काळजीत विचारलं.


'नाही त्या नाटकाच्या तालमीमुळे दमलेय जरा. सरांना हवे तशी पटकथा लिहिताच येईना मला. म्हणुन विचार केला तुला....अरे देवा विसरलेच' 

मी अचानक काही आठवलं म्हणून ओरडलेच.

'तुझं काहीतरी काम होतं माझ्याकडे!' तो प्रेमळ हसत बोलला.

'ते मला पटकथेच्या लिखानासाठी मदत म्हणुन एक पुस्तक हवं होतं' मी जरा संकोचित होऊन बोलले.


'एवढा काय विचार करतिये. तुझं तुच घेऊन जायचं ना bookshelf मधुन' तो

'तु खूप वरती ठेवलयं. माझा हात नाही पोहचनार.' 

मी मान खाली घालून बोलले.तो थोडा चमकला. विचार करत बोलला.

'वरती तर सगळे तुझ्या डोक्यावरतुन जातिल अशे पुस्तक आहेत. पिऊ मॅम कोणतं पुस्तक वाचायचा विचार करताय.' 

तो एक भुवई वर करुन मला विचारत होता.


'शिवाजी सामंतांच मृत्युंजय' मी केविलवान पण ठाम बोलले.

तो चपापला. मग काही क्षणात मोठमोठ्याने हसायला लागला. मला राग आला होता. तो इतका हसला की त्याला ठसका लागला म्हणून त्याने गाडी बाजुला लावली, एका तळ्याजवळ. मी त्याला बाटलीतलं पाणी दिलं आणि रागातच गाडीतुन उतरु खाली गेले. तो अजुनही हसत होता. ठसका लागला म्हणून बाहेर आला. त्याच्या डोळ्यातुन हसुन पाणी आलं होतं आणि माझ्याही. पण मी दुखावले गेले होते. मी तळ्याकडे तोंड करुन उभी होते. तो थोडा सावरुन पाणी घेऊन माझ्या मागे आला.


'ओ रुसुबाई.' तो माझ्यासमोर आला. माझ्या डोळ्यात पाणी पाहुन हादरला होता. त्याचे डोळे अपराधबोधाने भरले.


'पिऊ i am sorry, तुला hurt नव्हतं करायचं मला. प्लिज रडू नको ना.' त्याने बोटाच्या मागच्या बाजुने माझे डोळे पुसले.


'तु का हसलास एवढा. वैचारीक पुस्तक मागितल म्हणून? कि मी विचार करु शकत नाही म्हणून.?' मी रागातच विचारलं.


'तु बदलु नये म्हणून....' त्याने तितक्याच शांततेने उत्तर दिलं. मी रागातही चमकुन त्याच्या डोळ्यात पाहीलं. खरतर त्याचे शब्द जळत्या निखार्‍यावरही पाणी मारुन जातात.

'तु जशी आहे तशी राहा. निरागस. प्रेमळ. चंचल. कोमल. या विचारांच्या वैचारीक दुनियेत हरवुन मला तुला गमवायचं नाहीये.तुझी सादगी मला कायम तुझ्याशी बांधुन ठेवते. कधी दुर जायचा विचार आला तर हेच डोळे मला परत बोलावतात. तु नको होऊस ना या विचारांच्या शब्दात शामिल. म्हणून तर ती पुस्तके वरती आहेत तुझ्यापासून दूर.' तो मनापासुन बोलत होता. संयम राखुन. तो खुप जवळ होता माझ्या पण मी ही संयम राखुन फक्त एक हसु आणलं.


'बरं मग मी माझी पटकथा कशी लिहू?' मी त्यालाच प्रश्न केला.

'कोणावर आहे कथा?' तो

'कर्णावर. . . कुंतीपुत्र राधेय वर.' मी

'कुंतीपुत्र राधेय किती जुळून येत ना. आईच नाव कायम शोभतं पुत्रावर. अंगराज, दुर्योधन मित्र या केवळ उपमा. तो तर खरा वसुच. राधामातेचा अधिरतबाबाचा वसु.' 

तो धुंदित बोलत होता. 

'तू लिहिशील हि पटकथा. तुझ्या विचारांनी. तु समजु शकतो कर्णाला, प्लिज.' मी पटकन बोलुन गेले. मात्र मी किती मोठी चुक केली होती याची सीमा नव्हती. त्यानेही तर कर्णासारखचं आयुष्य जगलं होतं. रक्ताच्या नात्याकडून झिडकारणे, सामर्थ्य असुन ते प्रदर्शित करण्याची परवानगी नसने, उपहास, अपेक्षाभंग अशा अनेक बाबी त्याने मागे सोडल्या होत्या. आणि मी पुन्हा त्याच जखमा नकळत जाग्या केल्या होत्या. तो तलावाकडे पाहत होता. तितकाच शांत पण मनात किती वादळ असेल याची कल्पना न केलेली योग्य.

'sorry' मी पुटपुटले. आणि गाडीकडे जायला वळाले.

'मी लिहिल तुझी पटकथा. . .' मागुन धीरगंभीर आवाजात तो बोलला. मागे माझ्याकडे वळाला तेव्हा चेहर्‍यावर लाघवी स्मित होतं.

'माझं नाव जरी अर्जुन असलं तरी मी कर्णाचा जन्मच जगलोय. पण तरीही लिहिल तुझी कथा. कारण कर्णाच्या आयुष्यात ही प्रेमळ वृषाली होती, जशी माझी पिऊ.'तो तितक्याच गोड आवाजात बोलला.

'अर्जुन...' त्याने माझ्याकडे पाहिले. मी हसुन काही नाही म्हणून मान हलवली. आम्ही गाडीच्या दिशेने निघालो. त्याने पुढे होऊन गाडीचा दरवाजा उघडला. आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance