STORYMIRROR

Priya Jawane

Romance Fantasy

3  

Priya Jawane

Romance Fantasy

तो आणि ती - "अबोला"

तो आणि ती - "अबोला"

5 mins
211

त्याला भेटल्यापासून सतत वाटायचं त्याच्याबद्दल लिहावं. आमची पहीली भेट पुन्हा कधी सांगेल पण वाचकांना तो आवडेल कारण तो आहेच असा. . . . आज पुन्हा कॉलेज बंक मारुन मी त्याच्या घरासमोर उभी होते. का येते मी इथे? काय आहे जे मला सतत या घरी येण्यास भाग पाडतं? गाडी झाडाखाली लावुन मी आत जाऊ कि नको या विचारात होते. 


ऊन चांगलचं वाढलं होतं. मला तहान लागली होती, ती उन्हामुळे की त्याला पुन्हा भेटनार या भितीमुळे माहीत नाही. तशी त्याच्या घराभोवतालची जागा गजबजीची पण सगळीकडे नुस्ते बंगले. एका बंगल्यात मागे दोन खुन झाले तर दोन दिवस कोनाला कळलही नाही, सफाई कामगारांना वास आला तेव्हा कुठे उलगडा झाला. अशा भकास जागेत कोन राहत असावं. तसा हायवेपासुन डावीकडे वळण आणि समोरच त्याच घर; ओसाड, भकास दिवसाही अंधारलेलं. असो इथपर्यंत आलेच आहे तर त्याला भेटुच, तसही मागच्या महिन्य‍ापासुन त्याला पाहीलं नव्हतं. 


मन धजावतं नव्हतं पण गेट उघडलं. बागेत सगळे झाडे सुकलेल्या अवस्थेत होते, मी लावलेल गुलाब सोडुन. ते टवटवीत होतं. अनेक फुलं त्याला आलेली होती. काही सुकून जागेवरच हिरवी छोटी गोटी बनले होते. मात्र ओट्यावरचं मनीप्लांट चांगलच बहरलं होतं. त्या डार्क एलीवेशन टाईलवर ते चांगल उठुन दिसत होतं. मी पहिली पायरी चढले तसा दरवाजा उघडण्याचा आवाज आला. मी दोन्ही पायर्‍या चढुन वर आले. त्यानेच उघडला असेल यात शंका नाही, पण तो काही दिसला नाही. आत गेले तसा सोफ्याजवळच्या टिपॉयवर थंड पाण्याचा ग्लास होता. तो हातात घेऊन तशीच सोफ्यावर बसले.


खिडकीला काळ्या रंगाचे पडदे होते त्यामुळे अंधारुन आलं होतं. मी पाणी पिऊन आधी ते बाजुला केले. बाहेरुन ऊन आणि प्रकाश सोबतच आत आले आणि तो हॉल प्रकाशित झाला. पण माझ्या या कृतीमुळे नक्कीच त्याला राग येनार होता. त्याला अंधार आवडायचा. मलाच भिती वाटली कारण एकतर मी त्याच्या घरात होते आणि दुसरं मी त्याला न आवडणारी कृती केली होती.

'तुला ही बकबक का आवडते आजपर्यंत मला समजलं नाही' तो जिन्यातुन खाली येत वैतागुन बोलला. मी क्षणभर स्तब्ध झाले. तो आजही तसाच होता जसा त्याला शेवटचं पाहीलं होत तेव्हा होता. रात्री झोपला नसावा. डोळे सुजलेले होते. चेहरा थकलेला होता पण तितकाच शांत अन् संयमी. 


'झोपला नाहीस ना रात्री ' मी विचारलं

'झोप उशीर झालाय असं सांगनार कोणी नाहीये' तो विचारात हरवत बोलत होता.

 त्याचे हात रंगांनी भरलेले होते, म्हनजे तो नक्की पेंटिंग करत होता. मला त्याने बनवलेली पेंटिंग पाहायची उत्सुकता लागली. मी तशीच त्याची परवागनी न घेता वर जिन्यांकडे निघाले. त्याने रंगाच्याच हाताने माझा हात पकडून मला वर जान्यापासुन रोखलं.

'अजून पूर्ण नाही झाली.' - तो

पण माझा हात त्या रंगानी खराब झाला होता. मी रागात एक कटाक्ष त्याच्याकडे टाकून बेसिनच्या दिशेने गेले. तो गालात थोडा हसला. परत आले तेव्हा तो त्याच रंगाच्या हाताने पडदे पुन्हा लावत होता. पडदे खराब झाले होते. मी त्याला ओरडुन आधी हात धुवायला सांगितले 

(मी ओरडले त्याच्यावर😲याचा सूड तो कसा घेईल माहीत नाही.)


तो परत आला तेव्हा हात पुसायला काहीतरी शोधत होता. मी माझी ओढणी पुढे केली, तो हात आणि तोंड पुसुन समोर सोफ्यावर बसला. मी ही खुर्चीवर पालथी मांडी घालुन बसले. तो लॅपटॉपवर काहीतरी खरडत होता. कारण तो जे मनात आहे ते त्यावर लिहीत होता.

(याचं बरं आहे मनात येईल ते लिहायचं आणि प्रश्न पडले कि आमचं डोकं खायचं. पण आज तो काही बोलतं नव्हता.)


'कॉलेज?'त्याने डोकं वर न करता विचारलं.


'बंक मारलं.' मी उत्तर दिलं.


'MBA ची डिग्री बंक मारुनच मिळेल नाही?' तो वर पाहत बोलला. 


त्याचा टोमना कळला मला, पण उसणं हसु आणत मी ही उत्तर दिलं,


 'important lecture नव्हते' 


(खरतर आज GST वर खुपचं महत्वाच lecture होतं पण इथेही येऊ वाटत होतं)


त्याने पुन्हा लॅपटॉपमध्ये डोकं घातलं. 


(हा काही बोलनार आहे का? मी उगाचंच आले इथे.)


'नवीन व्यक्ती ऐकायची आहे' त्याने विचारलं, मी होकारार्थी मान हलवली. त्याने लॅपटॉप बंद करुन बाजुला ठेवला. मान मागे रेलुन दिली.


विनायक. . . . तो सांगू लागला,


डिसेंबरचा शेवटचा आठवडा होता. हवेत गारठा होता. संध्याकाळी ७ च्या सुमारास मनिषा तयार होऊन पार्टीसाठी निघाली होती. आज विनायकची, तिच्या नवर्‍याची तब्येत काहीशी बरी नव्हती पण तिला त्याची फिकीर नव्हती. निघताना थोडी कुरबुर झालीच पण मनिषा तिच्या नव्या मित्राबरोबर केव्हाच गाडीत बसुन निघुन गेली होती. विनायक हतबल होऊन फक्त जानार्‍या लाल लाईट कडे बघु शकत होता. 


त्या मोठ्या, well furnished, सुसज्ज अलिशान फ्लॅटमध्ये तो एकटाच होता. 


मनिषासोबत त्याचं लग्न झालं तेव्हा सगळं व्यवस्थित होत. नात्यात प्रेम होतं आपुलकी होती. पण विनायक कायम पैशाच्या मागे असायचा. मनिषाला हवं असनारं प्रेम देण्यात तो कमी पडत होता. हळुहळु मनिषालाही त्याची गरज वाटेनाशी झाली. मग त्या प्रेमाच्या नात्यात उरला फक्त पैसा.


मनिषा गाडीच्या काचेबाहेर शुन्यात बघत होती. ज्या विनुवर तिने एवढा जिव लावला एवढं प्रेम केलं तो कधीच तिच्यासोबत नव्हता. तो फक्त पैशामागे होता. ती आजारी होती तेव्हाही नाही अन् तिने तिचे बाळ गमावले तेव्हाही नाही. त्याला फक्त पैसा कमवायचा होता. आणि हे कारण त्या दोघांमध्ये अंतर निर्माण करत होतं.


काहीतरी मनाशी ठरवुन विनायक वरती रुममध्ये आला. डायरीतलं एक पान काढलं,


प्रिय मनिषा,


तु कितीही तुटक वागत असली तरी माझं आजही तुझ्यावर तितकच प्रेम आहे. आयुष्याच्या रस्त्यावर तुझी सोबत असुनही मी कायम तुला अंतर देत गेलो. या पैशांच्या मोहजाळात इतकं अडकलो कि परत येनं आता कठिण वाटतयं गं. तु सोबत असली कि सगळं कसं सोप्पं वाटायचं पण आता तु सोबत नाहीयेस.


 यालाही मीच कारण आहे म्हना जेव्हा तुला गरज असायची तेव्हा मी पळत होतो, कुठे? कोणापासून? नाही माहीत, पण हो आता मी तुला मुक्त करतोय त्या सगळ्या नात्यातुन, प्रेमातून, आता तुला वाट नाही पहावी लागनार.

 

फक्त तुझाच,

विनु 


सकाळी मनिषा घरी परतली तेव्हा विनायक फॅनला फासावर लटकलेला होता. नोकरांनी पोलिसांना बोलावलं. पंचनामा झाला. सुसाईड नोट वरुन आत्महत्या झालीये हे ही उघड झालं. केसही संपली. सगळी संपत्ती मनिषाच्या नावावर करुन तिचा विनु कायमचा निघुन गेला. 


आजही मनिषा झोक्यावर बसुन विनयची चिठ्ठी वाचत असते. तो मायना जर कधी तो तिच्यासमोर बोलला असता तर कदाचित तिचा विनु तिच्यासोबत असता.


'पिऊ,'

'अं. . .' मी भानावर आले. 

तो नेहमीप्रमाने माझ्या शेजारी येऊन बसला. हाताच्या बोटांच्या मागच्या बाजुने त्याने माझे डोळे पुसले.

'पैसा वाईट असतो का?' - तो

'गरजेपेक्षा कोनतीही गोष्ट वाईट. मग ती पैसा असो वा प्रेम. गरज असो व‍ा अपेक्षा. मनिषाने प्रेम केलं, विनायकला पैसा हवा होता मात्र वेळ नव्हती गेली. त्याने सांगायला हवं होतं मनिषाला' मी शुन्यात बघत बोलत होते.

'मनिषाने माफ केलं असतं त्याला??' -तो

'हो. एक स्त्री नातं जपण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत झगडत असते. त्याने बोलायला हव होतं' मी रडत मान खाली घालत बोलले. 

'मानसं असेच असताय पिऊ, न बोलताच अपेक्षा करत राहतात. नात्यात संवाद हा हवाच.' हे बोलतांना त्याचा गळा दाटला होता.

'नातं...?? एक विचारु??

त्याने होकारार्थी मान हलवली. त्याचे सुजलेले डोळे आता भरले होते.

'आपल्यात काय नातं आहे?' मी हळुवारपणे विचारलं. 


तो उठुन खिडकीजवळ गेला. त्याच्या मनात चलबिचल चालु होती हे मात्र नक्की.

'चल उशीर झालाय, तुला वेळेत घरी पोहचायला हवं' तो माझ्याकडे न पाहता शांततेत बोलला.

मी ही बॅग घेऊन बाहेर पडले. गेटपर्यंत कशी आले आठवत नाही. तो खिडकीतुन मला पाहत होता हे नक्की. मी नजरेआड होईपर्यंत तो पाहत असनार. त्याने नेहमीप्रमाणं आमच्याविषयी बोलनं टाळलं होतं. आमचं नातं मलाही कधी उमगलं नव्हतं. पण एकदिवस तो मला याचं उत्तर नक्की देनार होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance