Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Mitesh Kadam

Tragedy


4.8  

Mitesh Kadam

Tragedy


ती म्हटलं की????

ती म्हटलं की????

5 mins 960 5 mins 960

ती म्हटलं की आपल्या मनात खुप विचार तयार होतात. मी तिला शोधत होतो. कोण तरी म्हणाल की ती तुला शोधत असेल. पण खरं तर मी तिला शोधत होतो. कॉलेज च्या कॅन्टीन मध्ये, लायब्रेरी मध्ये, कुठेच नाही सापडत म्हणून मी मैदानात एका झाडा खाली जाऊन एकटाच बडबडत होतो. तेवढ्यात ती आली म्हणाली कुठे होतास मी शोधत होते. तुला मी विचारले कशा साठी तर तुला काहीतरी सांगायचं आहे, असं तर तिने तिचा टेप चालू केला मी ऐकत होतो पण समजून गवत नव्हतो एक टक तिच्याकडे बघणं चालू होतं मध्ये मध्ये हा !!!! हो!!!! अस!!!!ठीक आहे!!!!! माझं बोलन होत.


काही वेळाने तिच्या डोळ्यात पाणी आलं मला काहीच समजलं नाही ती काही न सांगता निघून गेली???????


क्लायमॅक्स समजलाच नसेल ना तुम्हाला काय चाललंय के बोलतोय काय सांगतोय काहीच नाही.

चला तुम्हाला संपूर्ण स्टोरी सुरुवाती पासून सांगतो, -


दहावीची परीक्षा देऊन अकरावीत गेलो सर्व नवनवीन होत.आणि मी आवळी कसली चिंता नाही कसली फिकीर नाही काहीच फरक नव्हता. पहिला दिवस कॉलेज चा आनंद अनावर झालेला. वर्गशिक्षक वर्गात आले तेव्हा चेहऱ्यावरचा रंग बदलला कारण ते इंग्लिश मध्ये बोलत होते आणि माझे इंग्रजी चे वांदे. तारुण्य मध्ये एक वेगळीच नशा असते. नवनवीन मैत्रिणी भेटणार या आशेने पण त्यात पण एक अपवाद माझा आणि मुलींचा ३६ चा आकडा कधीच कुणाशी पटलं नाही. आज पर्यंत म्हणजे १० वी पर्यंत मैत्रिणी समजून घायच्या पण कॉलेज ला गेल्यावर सर्व नवीन काहीच कळेना. शेवटच्या बाकावर १० वर्ष काढली म्हणजे या वर्षी सुद्धा शेवटचा बाक माझाच.

असेच दिवसावर दिवस निघून गेले. असेच एके दिवशी लोकल ट्रेन ने जाण्याचा योग आला पहाटे ६ वाजता एक मुलगी माझ्या समोरच्या फलाटावर उभी होती तिने मला पाहिलं, मीही तिला पाहिलं पण काही वाटलं नाही. नंतर सतत लोकल ने प्रवास करत समजलं की ती माझ्याच कॉलेज ला आहे कारण नवनवीन असताना कॉलेज चा गणवेश नसायचा त्यामुळे इतकं लक्षात नाही आलं. काही दिवस लोटले मग मैत्रिणी कडून तिचे नाव कळले इंदिरा(काल्पनिक नाव) दिसायला सुंदर नव्हती पण माझ्यासाठी ती परी पेक्षा कमी नव्हती. तिची आठवण आली की एक स्मित हास्य येतच आजही. कालांतराने मी दररोजची गाठ भेट होत होती. मनातली भीती काढून एक दिवस ठरवला.


मंगळवार १८ ऑक्टोबर दिवाळी तोंडावर आली होती. तिला कसे विचारू हेच प्रश्न मनात चालू होते. दिवस रात्र एकच विचार कसे तिला सांगू. आदल्या रात्री ठामपणे विचार केला उद्या सकाळी मनातली गोष्ट तिला सांगणार. ठरल्याप्रमाणे सकाळी कॉलेज ला जाताना तिला विचारलं तिच्यासाठी हे नविनच होत सर्व माझ्या साठी सुद्धा नवीनच होत सर्व काही. मी ऐकून होतो असे काही केलं की पहिला कानाखाली खावी लागते त्या नंतर आई वडिलांना सामोरे जावे लागते. 


तिला ट्रेन मध्ये गपचूप हळुवारपणे कानात सांगितले ""मला तू आवडतेस""" ती गालातल्या गालात हसली. पण थोड्याच वेळात तिच्या चेहऱ्यावर १२ वाजले. कॉलेज मध्ये पोचल्यावर ती तिच्या वर्गात मी माझ्या जाताना परत तिला आठवण करून दिली कॉलेज सुटल्यावर उत्तर दे. त्या वेळी स्मार्ट फोन नावाची गोष्ट नव्हती. नाहीतर तिला सांगितलं असत व्हाट्सअप ला मसेज कर तुझे उत्तर .


कॉलेज सुटले मी स्टेशन वर खुप वेळ वाट बघितली तिची पण ती आलीच नाही. मानत वेग वेगळे विचार चालू झाले. काही सुचेनासे झाले होते . मीही तसाच निराशेने घरी गेलो आई ने विचारलं काय झालं बाळा उदास उदास का आहेस आजकाल काही प्रेम वैगेरे तर झालं नाही ना????

याला म्हणतात आई जिन्हे जन्म दिलाय तिच्या शिवाय आपल्या मुलाला कोणीही ओळखू शकत नाही अगदी खरं आहे आणि त्यातल्या त्यात माझी आई म्हणजे माझी मैत्रीण सगळ्यात जवळची मैत्रीण. मी टोलवा टोळवीची उत्तर देऊन निघून गेलो.


असेच दिवस निघून गेले माझी भीती दिवसेंदिवस वाढत चालली होती काही काळातच नव्हतं की आयुष्यात नक्की घडतंय काय??? आणि खर म्हणजे या वयात अश्या सर्व गोष्टी घडत असतात आता त्यास ""आकर्षण"" म्हणावे की ""प्रेम"" या गोष्टीवर मी कधी विचार केला नाही कारण मला ते हवं हवस वाटत होतं जग सांगत होत ते मिथ्य वाटत होतं मला. सर्व मित्र समजून सांगत होते विषय सोड त्या मुलीचा पण मला विश्वास होता आज नाही तरी उद्या ती मला भेटायला येईल. 


बरोबर एक महिन्या नंतर मला ती पुन्हा स्टेशन ला दिसली तिने मला बघून मान फिरवली. मला कलेचं नाही की तिला झालं काय? मी तिला विचारलं की नक्की झालं काय?? 

मी तुला काहीतरी विचारलं यावर तुझं उत्तर काय आहे ते तरी सांग ???

हो तर हो किंवा नाही तर नाही???

ती अबोल होती मला कळेना करण कधी मुलींच्या बाजूने विचारकरण्याचा अनुभव नव्हता.

काही वेळ असाच शांततेत गेला. काहीच वेळात मी पुन्हा त्याच प्रश्नावर आलो तर तिने उत्तर देणे नाकारलं 😢.

त्याच निराशे मध्ये मी कित्येक दिवस काढले . परंतु आशेची किरण होती माझ्या कडे पण कधी कधी वाटायचं की तिच्या मनात कुणी दुसर तर नसेल ना कारण मी सुद्धा दिसायला हिरो वैगेरे काहीही नव्हतो.


अखेर तो दिवस आला ३ महिन्यांनंतर तिने सुद्धा माझ्या कानात हळुवार पणे उत्तर दिले हो मला सुद्धा तू आवडतोय.. माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्या वेळेस जो चेहऱ्यावर तेज आलं होतं कारण आयुष्यात पहिल्यांदा मला हवं ते मिळालं होतं. 


आम्ही सुद्धा प्रेमी युगुलांसारखे भेटायला लागलो. कधी बागेत तर कधी कॉफी शॉप मध्ये, कधी मॉल मध्ये तर कधी सिनेमा घरात असे करत करत २ वर्ष कसे निघून गेले कळलेच नाही.


पण तुम्हाला सुद्धा माहीत असेल आयुष्यात आपण जेवढं सुखं उपभोगतो त्याची भरपाई दुखः सोसून भरावी लागते असेच काहीतरी माझ्या सोबत झाले.

काही दिवसात तिच्या घरी समजले की तिचं एका मुलावर प्रेम आहे . तिला नजर कैदेत ठेवणे चालू झाले. तरीही ती वेळ काढून मला फोन करायची आणि सर्व घरातील हालचालींचा आढावा द्यायची मला तर भीती वाटत होती की तीच कुठे तरी लग्न लावून देतील पण असं नाही झालं

तिने मला सांगितलं की तू माझ्या घरी मागणी टाक मी माझ्या बाबांना सर्व सांगितलं आहे. 


त्यानंतर मी सुद्धा आई बाबांना सांगितलं की माझं एक मुलीवर प्रेम आहे ते सुद्धा हडबडले पण त्यांनी मान्य केलं.

मी माझ्या आई बाबांना घेऊन तिच्या घरी गेलो तेव्हा तिकडे वेगळंच चित्र पाहायला मिळालं. ती तिथे न थांबता हळदी ला नाचण्यासाठी निघून गेली. मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने उत्तर दिले की बाबा घरी आहेत, तुम्ही बोलुन घ्या तुम्हाला योग्य वाटेल ते. माझ्या मनात आधीच लाडू फुटू लागले🤣😂🤣

जर एखादी मुलगी अशा वेळी जर असे प्रतिउत्तर देत असेल तर नक्कीच अर्थ काहीही असू शकतो

त्यानंतर तिच्या घरी गेलो असता तिच्या आई वडिलांनी माझ्या आई वडिलांच्या पान उतारा केला. त्यांचं एकच वाक्य खूप वेगळच होत माझी मुलगी एकदा घातलेले कपडे पुन्हा पुन्हा घालत नाही. मला काहीच समजले नाही परंतु काही काळ विचार केल्यावर एक वाक्यात खूप मोठा अर्थ होता मला त्या नंतर हे समजले.

त्या दिवसानंतर मी तिच्याही संबंध तोडले परंतु आजही तिच्या प्रेमात जे अनुभव घेतले स्पष्ट पणे डोळ्यासमोर उभे राहतात.

त्यानंतर माझे काय झाले यावर स्पष्टीकरण देणे महत्वाचे नाही.


आयुष्यात खुप मुली येतात आणि जातात सुद्धा त्यासाठी वेळ आणि आयुष्य कुणासाठी थांबत नाही.


(सदर कथा काल्पनिक आहे कोणत्याही वास्तविक कथेचा संबंध नाही ,असल्यास तो निवळ योगायोग आहे असे समजावे)


कारण जिथे मी तिथे तुम्ही


Rate this content
Log in

More marathi story from Mitesh Kadam

Similar marathi story from Tragedy