Rucha Rucha

Drama Tragedy

4.2  

Rucha Rucha

Drama Tragedy

ती घरात रिकामटेकडी असते!

ती घरात रिकामटेकडी असते!

5 mins
1.9K


"अगं अन्नपूर्णा ए अन्नपूर्णा,माझे सॉक्स कुठं आहेत?"कितीवेळा सांगितलं हिला माझ्या वस्तू मला व्यवस्थित लागतात. तरीही हि बाई अशीच (पुटपुटत) अगं कुठे आहेस मेली बिली नाहीस ना??? असं म्हणत राजीव थेट किचन मध्ये आला,पाहतो तर काय तिथे ती नव्हतीच,ती किचन मध्ये नव्हती हे पाहून आता तर त्याच्या डोक्यात राग गेला अन किचन ते थेट 20 वर्षाच्या अपूर्वा च्या रूम मध्ये तो अन्नपूर्णेला पाहायला गेला ,बहुदा हि अन्नपूर्णा लेकीच्या च रूम मध्ये असेल! अन पाहतो तर काय चक्क ती तिथे हि नव्हती... अपूर्वा झोपली होती,त्यामुळे तिला तिची आई कुठं आहे माहित असण्याचा प्रश्नच नाही.असं म्हणून तो शेवटी हॉल मध्ये आला, तितक्यात किचन मधून गरमागरम चहा घेऊन अन्नपूर्णा आली..


  दिसायला अगदी चार चौघींसारखी होती पण पाककलेत मात्र चार चौघीत उठून दिसणारी ही अन्नपूर्णा... 'अहो, हा चहा घ्या! 'चेहऱ्यावर स्मितहास्य करीत ती म्हणाली. त्याने तो चहा चा कप तिच्या हातातून घेतला व जोरात फेकून दिला,व आवाज चढवून म्हणाला कुठं खपली होतीस एवढ्या सकाळी सकाळी??किती वेळ झालं तुला मी वेड्या सारख्या हाका मारतोय,कामं वैगेरे आहेत की नाही का हिंडायांचं नुसतं जनावरसारखं??? असं राजीव म्हणाला....


  घाऱ्या डोळ्यांतील तिच्या दुखाश्रु लपवत अन्नपूर्णा राजीव ला म्हणाली, अहो आज आपला दूधवाला दादा आला नाही ना,काल रात्रीच तुम्हाला आवडते म्हणून 

शेवया ची खीर केलेली ना मग संपलं होतं दूध,म्हणून आज सकाळी लवकर उठून आणायला गेले खाली तर तिथे भले मोठी रांग होती, म्हणून लागला वेळ, ..आणि आता तर फक्त सकाळचे साडे आठ वाजलेत तुम्हाला 9 ला जायचं असतं ना मग उशीर नाही झाला अजून (हास्यमुद्रेत ती म्हणते) बास बास!मला अक्कल शिकवू नकोस जा जा ही फर्शी पूस व मला आजून एकदा चहा आणून दे!

बरं आणते हो-अन्नपूर्णा म्हणते


  (राजीव चहा पितो व ऑफिस ला निघून जातो)

अगं माझं पिल्लू ग ते उठलं का बाळ माझं?? असं म्हणत दूध घेऊन अपूर्वा च्या खोलीत येते,व तिला उठवत असते..

 ए मला अजून झोपायचंय ग तू का आलीस मला उठवायला??

तुला माहितेय ना मला रात्री झोपायला उशीर होतो त्यात दिवसभर शाळा क्लास यांत धावपळ असते माझी ,तरीही तू का ग मला उठवतेस? 


अन्नपूर्णा: आग बाळा लवकर उठणं हि चांगली सवय नाही का??

अपूर्वा: हो आहे ना!तुझ्या सारख्या रिकामटेकड्या बायकांसाठी आहे ही चांगली सवय..दिवसभर घरात कुठं काय काम असत तुला आई??स्वयंपाक, धुणे भांडी बस झालं ... 

अन्नपूर्णा:बरं बाई मी रिकामी आहे. असं म्हणून ती खोलीतून बाहेर येते..

 मुळात अन्नपूर्णा हि अस्सल गृहिणी असते..मोठा च्या मोठा बंगला असूनही नवलाची गोष्ट म्हणजे बंगल्यात एकही नोकर माणूस कामला नाही...काटकसर करणं हा तिचा स्थायी स्वभाव असतो,त्यामुळं ती नोकर चाकर ठेवण्यास नकार द्यायची...

   स्वयंपाक करणं ,धुणे भांडी करणं, अख्या बंगल्याची दररोज स्वतः साफ सफाई करणं शिवाय बागकाम करणं ही ती एकटीने करायची दररोज न चुकता!

  इतकंच नव्हे तर तिच्या लाडक्या लेकीचे कपाट हि तीच आवरायची, 

तिचा दररोज चा दिनक्रम 

 सकाळी 4 वा उठणे( प्रात: विधी उरकून सडा सन्मार्जन करणे .त्यानंतर सम्पूर्ण बंगल्यातील केर काढणे, केर काढण्यासाठीच तिला जवळजवळ 2 तास लागायचे इतका मोठा आवारा होता, बिचारी, कधीही तिची कंबर दुखत असल्याचे तिने कोणालाच सांगितले नाही..


  केर काढून झाला की लगेच ती स्नान करून देव पूजा करून बरोबर साडे सहा च्या ठोक्याला स्वयंपाक घरात प्रवेश करायची व विजेसारखी स्वयंपाक करायची...पोरीची आवडती भाजी,नवऱ्याच्या आवडी निवडी च करून दररोज जेवणात स्वीट डिश करायची...कधी खीर,कधी गुलाबजामुन तर कधी बासुंदी दररोज हं अगदी दररोज... 

  स्वयंपाक झाला की नवऱ्याला बेड टी लागतो म्हणून तो त्याला द्यायचा तोवर इकडे नाश्त्याच पाहायचं.. बाप रे...एवढं सार करताना तिच्या चेहऱ्यावर कधीच अटी यायचीच नाही....  


   आज संध्याकाळी अपूर्वा च्या मैत्रिणी घरी येणार होत्या त्यामुळं तिने आईला सांगितलं की आई आज काहीतरी चांगलं खायला कर हा, आणि वेगवेगळे पदार्थ कर असंही तू घरात रिकामी तर बसून असतेस...

  संध्याकाळी 6 वाजता राजीव घरी आला पाहतो तर काय घरात अपूर्वा च्या मैत्रिणी...त्याने मुलींकडे पाहून स्मित हास्य केले व हाय करून तो फ्रेश होण्यासाठी आत रूम मध्ये निघून गेला... इकडे अन्नपूर्णेन चहा ठेवलाच होता


तितक्यात अपूर्वा ची एक मैत्रीण म्हणाली ,काकू भूक लागलीय काहीतरी खायला आणता??जरा तिखट च आणा हा.... आणते आणते ग ..असं म्हणत तिने छान दडपे पोहे आणि मस्त चटकदार भडंग आणलं...

शी!हे काय अपूर्वा तुझ्या आईला Western food बनवता येत नाही!?? अगं आधी सांगितलं असत तर माझ्या मम्मी ने मस्त Mexicon food ऑर्डर करून दिलं असत ना ....


   आता मात्र अपूर्वा जाम चिडली ,तिने त्या साऱ्याजणींसमोर आई हे काय ग तुला वेगळं काय बनवता आलं नाही का??दिवसभर तर रिकामी असतेस तुला काय होत ग नवीन पदार्थ वगैरे बनवायला?? 


  आता मात्र शांत सोज्वळ अन्नपूर्णा भडकली, तिच्या सहन शक्तीचा अंत झाला ,अन म्हणाली ....होय मी दिवसभर रिकामी असते...सकाळी लवकर उठून तुम्ही दोघे उठण्याच्या आत चहा तयार करून ठेवते,होय मी रिकामी असते म्हणून तर सकाळी सकाळी मलाच वेळ जात नाही म्हणून नाश्ता करून ठेवते ,होय ग मी रिकामीच...

इकडे तिकडे कसेही पडलेले तुझे कपडे व्यवस्तीत तुझ्या कपाटात लावते, होय मी रिकामी च असते...बागेतील फुलं दररोज टवटवीत दिसतात ,दररोज त्यांना पाणी घालते ,त्यांची काळजी घेते ,हो ग बाळा मी खरंच घरी रिकामी असते...तुला डब्यात काय द्यावं ,काय नको संध्याकाळी घरी आल्यावर काय नवीन करावं हा सगळा विचार करते ,हो ना मला कुठं काम असत मी खरंच ग एकटी रिकामी असते... हो खरंच मी रिकामी असते म्हणून तर तुला रात्री काढा देते सर्दी खोकला येऊ नये म्हणून, ...बरोबर ग बाळा मी रिकामीच आहे कारण मी बाहेर जाऊन जॉब करत नाही ना! तुझ्या मैत्रीणीं च्या।  आयांसारखी मी पैसे कमवून घरी आणत नाही,....


   हे सारं बोलताना तिच्या तर डोळ्यात पाणी येतच होतं पण अपूर्वलाही मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं,कोपर्यातून हळूच राजीव हि सारं ऐकत होता त्याला हि त्याची चूक उमजली...


  अपूर्वा ने मैत्रिणीना तुम्ही निघा! असं म्हणून सांगितलं व म्हणाली होय माझी आई घरी असते म्हणून माझं घर आज जिवंत आहे,माझ्या घरातील प्रत्येक गोष्टीला आईचा स्पर्श आहे ह्या साऱ्या पैंटिंग्स तिने बनविल्यात तिने या भिंतींना बोलकं बनवलंय!

 राजीव आणि अपूर्वा दोघांनीही अन्नपूर्णेची क्षमा मागितली... आम्हाला दोघांनाही माफ करशील??,खरंच उलट आमच्या पेक्षाही तुला खूप काम असत ग ,खरंच... स्वतःच्या जगात आम्ही दोघे बुडून गेलो की तुझी कदर च ठेवली नाही ग आई माफ करशील ना मला व बाबांना??


 अन्नपूर्णा म्हणाली,प्रत्येक बाई हि स्वतःचे घर चालवण्यासाठीच काम करते फरक इतकाच आहे की जॉब करणाऱ्या स्त्रिया त्या कामाचा मोबदला घेतात पण मी चार भिंतीच्या आत राहून हे सारं करते त्यामुळं मी कामवाल्या लोकांना द्यायला लागणारा मोबदला वाचवते...


असं म्हणून मायलेकी गळ्यात पडतात,तेवढ्यात आतून राजीव तिघांसाठी मस्त फक्कड चहा करून घेऊन येतो..तिघेही मस्त पैकी हसत चहा पितात व राजीव म्हणतो तू दिवसभर कामात असतेस दमतेस त्यामुळे दररोज संध्याकाळचा चहा मी तुला बनवून देईन अगदी न चुकता प्रॉमिस माझ्या प्राणप्रिय पत्नी गं


  ता.क { ती म्हणजे कोण? आई,बायको,बहीण घरात प्रचंड व्यस्त असते रिकामटेकडी नाही...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama