Rucha Rucha

Others

5.0  

Rucha Rucha

Others

झोपडीतील दवाखाना

झोपडीतील दवाखाना

5 mins
1.1K


डा मावशीssssss! शिळं, पाकं काय बी रातीच उरलेलं सुरलेलं वाडा ओ! झोपडीत माझी माय लई आजारी हाय,तिले लई भूक लागल्या, अन्नाचा शिळा तुकडा बी नाय ओ झोपडीत" असं म्हणत आठ वर्षाची सखू अगदी प्राण डोळ्यात आणून आसवे गाळत गाळत , गावातल्या सगळ्यात श्रीमंत असलेल्या पाटलीणबाईंच्या वाड्या समोर आली. हातात एक फुटका प्लास्टिक चा डबा तो ही रिकामाच होता! 


भर उन्हात गावातल्या सगळ्या घरांवर दार ठोठावुन आलेल्या सखूच्या पदरी फक्त लोकांच्या शिव्या आणि हकलपट्टी इतकंच होतं. "कोण आहे तिकडे? भर उन्हात कोण आलंय मरायला? रामू ,जरा बघ बघू , असा आतून पाटलीणबाईंच्या ओरडण्याचा आवाज आला... "व्हय मालकीणबाई ,जी म्या पाहतो, असा रामू उत्तरला व धावत धावत वाड्याच्या प्रवेशद्वारा जवळ आला. आणि सखुला पाहताच " ए तुला काय अक्कल बिक्कल न्हाय का ग? कशाला इथं आली हायस? निघ जा इथून"अस रामू सखुला म्हणाला.

सखू म्हणाली-" जी, माजी माय झोपडीत भुकेजली हाय, त्यात ती लई आजारी हाय, दवा पाण्याला बी पैक न्हाय, चार घास अन्नाचे पोटात गेलं तर तिले बरं वाटेल म्हणून मी अन्न मागाया आलेय,काय बी चाललं ओ.. रातीचं असुदे किंवा अगदी अर्ध तुकडा कशाचा बी द्या ओ " इतकं म्हणाली...रामू व सखूचा आवाज ऐकून पाटलीण बाई विजेच्या गतीने बाहेर आल्या व रामुला बोलल्या ,काय रे रामू तुला मी कोण बाहेर आलंय इतकंच पाहायला पाठवलं होतं, तुला ह्या भिकरड्या पोरीशी गप्पा मारायला नव्हतं पाठवलं


रामू खाली मान घालून म्हणाला-" न्हाय जी, मी बोलत नव्हतो,हिला इथून जा असच सांगत होतो. पाटलीण बाईंनी रामुला आत जायला सांगितलं व त्या तिथंच थांबल्या. चिमुरडी सखू पाटलीण बाईंच्या चेहऱ्याकडे निरागस अपेक्षेने पाहत होती, तिला वाटत होतं की पाटलीण बाई नक्कीच तिला काहीतरी देतील. पण तिला जसं वाटत होतं तस काहीच घडलं नाही. पाटलीण बाई म्हणाल्या सखुला- "ए भिकारडे, जा ग इथून. आमच्याकडे आज खास पाहुणे येणार आहेत,त्यांच्या येण्याची वेळ झालीय ,उगीच इथं वाड्या समोर थांबू नकोस ,तुला काहीच मिळणार नाही ,जा चल निघ इथून! " असे उद्गार करत पाटलीण बाईंनी लहानग्या सखुला ढकलून दिलं, व जोरात सखू जमिनीवर आपटली. तितक्यात समोरून चार चाकी गाडी आली व त्यातून 5-6 माणस उतरली ,त्यातील एक होते स्वतःच पाटलीण बाईचे पती,व त्यांच्या सोबत सर्जेराव जे चांगल्या पदावर कार्यरत होते, व इतर मंडळी होती. गाडी समोरूनच येत होती त्यामुळे गावचे पाटील सकट सगळ्या गाडीतल्या व्यक्तींनी वाड्यासमोरचा घडलेला प्रकार पहिला. "हे तुम्ही आता काय केलंत अस पाटलीण बाईच्या पतीने त्यांना विचारलं" कुठं काय, आम्ही कुठ काय केलं अस त्या (पाटलीणबाई) बोलल्या.. तेवढ्यात गाडीत बसलेले सर्जेराव खाली पडलेल्या सखुला उठवण्यासाठी तिच्या जवळ गेले आणि तुला जोरात तर नाही ना लागलं बाळा अस तिला विचारले' ,खाली पडलेला फुटका डबा घेत सखू म्हणाली ,न्हाय जी..त्यावर त्यांनी तिला तिच्याबद्दल विचारलं व घडलेला प्रकार विचारला,तिने सगळी हकीकत त्यांना सांगितली. साहेबानी लगेचच खिशात हात घातला व 10 रु ची नोट सखुला दिली,हे घे ह्यातून जे काही येईल ते तुझ्या माय ला खायला घाल अस म्हणत ते मागे वळणार इतक्यात सखूच्या डोळ्यातील पाणी अनावर झाले व तिने सर्जेरावांचे पाय धरले ,आणि काहीही न बोलता आईच्या ओढीने पळत सुटली. इकडे सगळे वाड्यात आले सारेच आत वाड्यात पाहुणचार घेत बसले होते, इकडे सखू वाऱ्याच्या वेगात पळत पळत आली ,"माय ओ माय हे बघ म्या काय आणलंय तुझ्यासाठी अस म्हणत झोपडीच्या आत शिरली"


तर तिची माय तिथं निपचित पडलेली होती, सखुला वाटत भूक लागून झोपली असेल म्हणून, तिने तिच्याजवळ जाऊन 10 रु तुन आणलेला वडापाव आईच्या जवळ नेली व तिला उठवण्याचा प्रयत्न केली तर ती उठलीच नाही. माय उठ ना गो,अस काय करते म्या आले तुझ्यासाठी घेऊन खायला,हे धर ना गो माय... पण तिची माय काय उठली नाही. घाबरत घाबरत व रडत सखूने शेजारी जाऊन आई उठत नसल्याचं सांगितलं तर लगेच लोकानीं झोपडीत येऊन पाहिले, व ती देवाघरी गेली अस सखुला सांगितलं, कोण्या एकाने डॉक्टरांना बोलवून सुद्धा declare केल की औषध उपचार वेळेत झाले नाहीत म्हणून सखूची आई गेली.. गावात बातमी पसरली,इकडे पाटलीन बाईच्या घरी सुद्धा एक माणूस सांगत आला की सखू ची आई गेली म्हणून ... तितक्यात पाटलीण व पाटील तिच्या झोपडीकडे गेले त्यांच्याकडे आलेले पाहुणे देखील आता न्हवते ,आईबापाविना पोर आता एकटीच पडली होती . सखूच्या कोमल मनावर इतका दुःखाचा आघात झालेला त्यामुळे ती शांत, शून्यात टक लावून बसलेली.. शिवाय नातेवाईक कोणीच नसल्याने अगदीच एकटी पडलेली पोर ही,आता हिला अनाथ आश्रमात सोडुया असा सर्व गावकऱ्यांनी निर्णय घेतला. व तिसऱ्याच दिवशी तिला पाटलीण बाई व पाटील त्यांच्या जिल्ह्यातील अनाथ आश्रमात सोडलं. योगायोगाने पाटलांच्या घरी आलेल्या सर्जेरावांनी तिला तेथे सोडताना पाहिलं,व त्यांच्या मागोमाग जाऊन त्यांनी इथं सोडण्याच कारण विचारलं व घडला सारा प्रकार त्यांना कळला. निरागस सखूच्या चेहऱ्याकडे त्यांनी पाहिलं व क्षणाचाही विचार न करता त्यांनी सखूचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला. आजपासून सखू माझी मुलगी अस म्हणून त्यांनी सखुला आनंदाने त्यांच्या घरी नेलं.


3 वर्षानंतर


आता सखुला शाळेत घातलं होतं, शिवाय आई बाबा दोघांचं ही इतके वर्ष न मिळालेलं प्रेम तिला त्या घरात मिळत होत. पण तरीही तिच्या मनात एक सल होती की औषध वेळेवर न मिळाल्याने जन्मदात्या आईचा मृत्यू झाला. सखूने ठरवलं माझ्या आईचा जीव औषध न मिळाल्याने गेला,तसा कुणाचा जाऊ नये म्हणून तिने लहानग्या वयातच डॉक्टर होण्याचं ठरवलं. मुळातच हुशार असलेल्या सखुला 10 वी ला 95 टक्के पडले ,ती शाळेतच नव्हे तर अख्या जिल्ह्यात पहिली आली. इकडे तिला दत्तक घेतलेल्या आई बाबांनी देखील तिला डॉक्टर करण्याचं स्वप्न बाळगलं. आणि अपार मेहनतीने ,रात्रीचा दिवस करून सखूने अभ्यास केला. 11वी 12वी science झालं, त्यातही पहिला नंबर पोरीने पटकावला. आता तिला वेध लागले होते ते NEET च्या परीक्षेचे... रात्रीचा दिवस करून अभ्यास करणारी ही मुलगी NEET मध्ये सुद्धा नंबरात आली. सखुला मेडिकल कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळालं. आणि झपाट्याने अभ्यास करू लागली.. आणि ती Finally ती डॉक्टर झाली.  

 

 आज तिला तिचं आयुष्य परिपूर्ण झालं असं वाटत होतं ,वेळ आली होती आता तिच clinic बांधण्याची त्यावेळेस ती सर्जेरावांना (बाबांना) म्हणाली , बाबा, तुमचे उपकार मी कधीच फेडू नाही शकणार,त्यावेळेस जर तुम्ही मला अनाथ आश्रमातून तुमच्या घरी आणलं नसत,तर मला नाही माहिती माझं काय झालं असत! माझ्या आयुष्याला आकार तुम्ही दिलाय, पण माझी एक च इच्छा आहे बाबा, माझ्या जन्मदात्या आईला वेळेवर उपचार झाले नाहीत म्हणून मी डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला व आज तुमच्या मदतीने झाले देखील. पण आज माझी इच्छा आहे की ज्या झोपडीत मी माझी 7 वर्ष हालअपेष्टात काढली त्या झोपडीत च मला माझा दवाखाना सुरू करायचा आहे. 

  ज्या जागेवर माझ्या आईने वेळेवर उपचार न झाल्याने प्राण सोडला त्याच जागेवर मला हजारो लोकांना बरं करायचं आहे. हे सर्व बोलताना तिच्या व तिच्या आई बाबांचे डोळे भरून आले होते. झोपडी केव्हाच पडून गेली होती,त्याच जागेवर त्यांनी टोलेजंग दवाखाना बांधला व नावदेखील दिलं

   झोपडीतील दवाखाना...


Rate this content
Log in