छंद
छंद


असं म्हणतात की विधात्याने सर्वाना दोन कान, दोन हात,दोन डोळे,असं सगळं सारखं दिलंय..डोकं हि एकच पण विचार करण्यात हि किती ते वेगळेपण... किती नवल आहे नाही का!.. डोळे प्रत्येकाला दोन ते सुद्धा काळे पांढरे पण प्रत्येकाचा आवडीचा रंग वेगळा...कुणाला लाल, कुणाला पिवळा, जांभळा, नारंगी .आणि वेगवेगळे.. रंग किती सुंदर दिसतात ना..एखादं चित्र खूप सुबक काढलंय पण त्यात रंग च भरलेला नाही मग ते अगदी निर्जीव वाटतं ना!! आणि रंग भरले कि मग काय साक्षात जिवंत च भासतं चित्र... हो माझा छंद चित्र काढणं नाही,तर काढलेल्या चित्रात रंग भरणं आणि त्यात प्राण आणणं❤️ अगदी लहान पणा पासूनच मला रंग आवडतात मग ते रांगोळीत रंग भरणं असो अथवा कागदावर... खरं तर ज्यावेळेस मी चित्रामध्ये रंग भरते त्यावेळेला मला वाटत कि ह्या रंगाद्वारे माझ्या आयुष्यात हि बहर येतोय असं वाटत, अगदी हरवून जाते मी त्यामधे...आपण खूप वेळेला ऐकतो कि चित्र काढणं कौशल्य आहे पण त्यामधे अचूक रंग भरणं हि सुद्धा एक प्रकारची जोखीम च तर आहे...एखादं चित्र लक्ष वेधून घेण्यासारखं दिसावं असं वाटत असेल तर प्रत्येक रंग मनात आणून तो साजेसा दिसेल का?विचार करावा लागतो...रंगही कसे असावेत,निसर्ग चित्र असेल तर अतिशय सौम्य रंग वापरावेत ज्यामुळे निसर्गाचं सौंदर्य जाणवतं... फुलं पानं असतील तर थोडे गडद रंग वापरावेत... प्रत्येक रंग हा आपल्याशी हितगुज करत असतो,आपल्या मनाचे भाव चित्र दाखवत असतात हे खरंय पण...
त्यातील रंग आपल्या भावना.....
भरुनी चित्रात रंग
मिळतो मनास आनंद
जोपासला मनापासूनी
आवडता माझा छंद