The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Rucha Rucha

Others

4.6  

Rucha Rucha

Others

विधवा (एक जगावेगळी प्रेमकथा)

विधवा (एक जगावेगळी प्रेमकथा)

3 mins
1.5K


तर आज दिनांक 23/10/2013 समीर आनंदी च्या लग्नाला 8 वर्षे झाली आणि आजही आनंदी अगदी तशीच सजली होती जशी तिच्या लग्नाच्या दिवशी सजलेली. मुळातच गोरा पान रंग, नक्षत्रासारखं रूप, घाऱ्या डोळ्यात काजळ खुलून दिसत होतं, लांबसडक आणि असे हलकेच वेणीत गुंफलेले दाट, काळेभोर केस आणि लग्नातील भडक जांभळा व त्याला लाल काठ असलेला शालू तिने परिधान केला होता. हा श्रुंगार तर तिने केलाच त्यात ती अगदी अप्सराच भासत होती पण... पण... आता तिचे पाऊल चालले होते बंद कपाटातील त्या छोट्याश्या कुंकवाच्या डबीकडे, कपाट उघडताच तिला ठसका लागला, वर्षानुवर्षे जे कपाट नेहमी बंद असतं ते तिने आज उघडलं. फक्त वर्षातला एक दिवस तो म्हणजे आजचा एवढंच एक दिवस हे कपाट ती उघडायची... डोळ्यातून एक थेंब ओघळत तिच्या गालावर विसावला. स्वतःला सावरत ती डबी घेऊन ती आईन्यासमोर आली आणि त्यातील कुंकू चिमटीत घेऊन तिने मोकळ्या कपाळावर लावलं व स्वतःच्या भांगांतदेखील भरलं व स्वतःच स्वतःकडे पाहू लागली. तेवढ्यातच तिची नजर पाठीमागच्या भिंतीवर गेली, आणि त्या हार घातलेल्या फोटोजवळ जाऊन म्हणाली, समीर आज आपल्या लग्नाला आठ वर्षे पूर्ण झाली. दिवस कसे गेले कळले नाही. आयुष्यभर साथ देणार असं म्हणाला होतास तू, खरं मला दगा देऊन निघून गेलास, पण तू वचन तोडलंस म्हणून मी नाही हो तसं करणार. तू माझ्याकडून वचन घेतलं होतंस ना, की काहीही झालं तरी आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला मी अगदी नव्या नवरीच्या रूपातच कायम रहायचं अगदी मी मेलो तरीही..., आणि तसंच करत आलेय मी राजा.., समीर, तुला आठवतंय, लग्न झाल्यावर पहिल्या दिवाळी पाडव्याला तू मला हे तोडे आणि तन्मणि भेट दिला होतास आणि हेदेखील सांगितलं होतंस की आपल्या लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसाला हे नेहमी तुझ्या गळ्यात आणि हातात दिसायला पाहिजे आणि ते बघायलाच तूच थांबला नाहीस  


बघ ना माझे हात तुझ्या तोड्याने किती खुलून दिसत आहेत! समीर तुला आठवतंय, तू मला म्हणाला होतास की आपल्याला बाळ झालं तर मुलगीच हवी असा तुझा अट्टाहास... तिने बाबा बाबा करून तुझ्या गळ्यात पडावं, तुझ्याशी राग आल्यावर कट्टी करावी, इतकी स्वप्न रंगवून स्वतः मात्र निघून गेलास. तुला माहितेय का? तुझ्याविना माझ्या आयुष्यात काय हाल होत आहे? आज सगळं जग मला विधवा वांझोटी म्हणतंय... पण समीर मला नाही वाईट वाटत त्या गोष्टीचं. चल अरे समीर आज तुला मी एक surprise देणार आहे, चल हा! असं म्हणून आनंदी समीरचा फोटो हातात घेऊन रूमच्या बाहेर गेली आणि तिला सवाष्णाच्या वेशात पाहून सगळ्यांनी तिच्या घरच्यांनी तिच्याकडं पाठ फिरवली, पण आता आनंदीला ह्या सगळ्याचीच सवय झालेली तिने पटकन स्वतःच्या गाडीची किल्ली घेतली व बाहेर निघाली. विधवेनं असं सवाष्ण रहाणं शोभत का? असा आवाज तिच्या कानावर पडला, पण तिकडेही दुर्लक्ष करत ती आता फक्त पुढेच गाडी वेगात चालवत होती.

 

आता मात्र तिची गाडी येऊन थांबली शेजारच्या सीटवर ठेवलेला समीरचा फोटो तिने उरी कवटाळला व लगबगीने धावत एक मोठ्या वाड्यासारख्या ठिकाणी गेटच्या आत शिरली आणि तिची चाहूल लागताच अचानकपणे प्रत्येक खोलीतील मुली तिच्याजवळ आई आई म्हणून तिला बिलगल्या व आई कुठं होतीस तू, असं म्हणत तिच्याशी बोलायला लागल्या. तिने ही साऱ्या जणींना हो अगं माझ्या फुलराणींनो आता मी आलेय ना असं म्हणत समजूत काढली व म्हणाली पाहिलंत का? आज तुम्हाला भेटायला कोण आलंय? असं म्हणाली, साऱ्या मुली आपापसात कुजबजत कोण आलंय आई, इथे तर फक्त तुझीच गाडी आहे, असं म्हणाल्या. आनंदीने तिच्या हातातील फोटो मुलींना दाखवला, हे बघा, आज तुमचे बाबा आलेत हो, लेकीना भेटायला. तिथे जवळ जवळ 35 मुली होत्या प्रत्येकीने फोटोला नमस्कार केला व आनंदीसकट साऱ्यांचेच डोळे पाणावले. आईचा म्हणजेच आनंदीचा व त्यांच्या जगात नसणाऱ्या बाबांच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने त्यांनी आधीच केक आणून ठेवलेला. (सारा समारंभ झाला)


समीरच्या फोटोला पाहून आनंदी म्हणाली, पाहिलंस समीर, जगाने काही जरी म्हटलं तरी मी वांझोटी नाहीये, 35 मुलींची आई मी आणि तू बाबा, आपल्याला एक गोंडस मुलगी व्हावी अस तुला वाटत होतं ना! हे घे 35 मुली... आता कर त्यांच्याशी कट्टीबट्टी वरूनच, ती म्हणते, समीर, तू गेल्यानंतर लगेच 2 महिन्यात मी आपल्या गावात असलेलं जे अनाथ मुलींचं वसतिगृहाचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला, येथील प्रत्येक मुलीची आई बनले मी...

 मी तर म्हणेन बरं झालं ना रे, आपल्याला बाळ नाही झालं कारण आपण फक्त किंवा तुझ्यानंतर मी फक्त आपल्याच जन्म दिलेल्या बाळाचा सांभाळ केला असता, पण आज बघ मी 35 मुलींची आई व तू बाबा आहेस. सारा दिवस मी ह्यांच्यापाशी असते. वर्षे कशी गेली कळलं नाही, पण इतकंच सांगते... मी विधवा जरी असले तरीही तुझ्या आठवणींनी मी सदोदित सवाष्ण आहे...


Rate this content
Log in