The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Rucha Rucha

Others

5.0  

Rucha Rucha

Others

तिची युक्ती

तिची युक्ती

3 mins
887


चल ग आई .. ,आवरलं का ग तुझं? चल निघूया आपण नाहीतर इथंच रात्र होईल असं म्हणत म्हणत गिरीजा ओढणी सावरत तिच्या रूम मधूनबाहेर आली... हो चल हे बघ मी हि तयार आहे, नेहाकडे कडे जाऊया, आपण असं गिरीजा ची आई म्हणाली...नेहा ही गिरीजाची अगदी खास मैत्रीण होती व दोघींच्या आया सुद्धा खास मैत्रिणी होत्या एकमेकींच्या, खूप दिवसानंतर चौघींची मैफिल नेहाच्या घरी रंगणार होती त्यामुळे दोघींहि मैत्रिणीला भेटण्यास आतुर होत्या...ताईसाहेब, गाडी बाहेर लावलीय असं सांगत ड्राइवर आला.. मायलेकी आता घराच्या main gate जवळ येणार इतक्यात त्यांच्याच घरातील शहाणी मनीमाऊ पळत पळत त्यांच्या आडवी गेली....

झालं ! कल्याण झालं रे देवा! हा कसला अपशकुन झाला! बाई बाई बाई ,हिला हि आताच आडवं जायचं होत का?? गिरीजाची आई असं बोलू लागली....देवभोळी ,शकुन अपशकुन मानणारी गिरीजाची आई ,सुतकी तोंड करून म्हणाली ,आता आपण नेहा कडे जायला नको ....मांजर आडवं गेलं ग राणी अपशकुन होईल ...असं म्हणत तिने नेहाच्या आईला फोन करून सांगितलं की आम्ही उद्या येतोय...तिने काहीतरी खोटं कारण सांगून फोन ठेऊन दिला...गिरीजा ला आईच वागणं पटलं नव्हत

पण आई चा मान राखण्यासाठी तिने आईला बरं असं सांगितलं....

गिरीजा हि एक हुशार मुलगी होती, विचारी मुलगी...तिला आईची अंधश्रद्धा पटत च नव्हती...तिला घडला प्रकार आवडला नव्हता...तिने मनात पक्के केले की काहीही झालं तरी आता आईच्या मनातील मांजर आडवे गेल्याने अपशकुन होतो हि भावना समूळ नष्ट करायची...पुढच्याच दिवशी बोलल्याप्रमाणे दोघी नेहाच्या घरी गेल्या ...गप्पांचा कार्यक्रम झाला.. आणि खूप काही बोलून ,हसून,share करून दोघी घरी परतल्या... पण गिरीजाला कालचा प्रसंग आठवत होता, घोळत होता मनात....

गिरीजाची unit test होणार होती पुढल्या आठवड्यात, तिने ठरवलं की हीच ती वेळ आहे आईला अंश्रद्धेच्या प्रकरणातून बाहेर काढण्याची....तिने मुद्दाम पेपर च्या पहिल्याच दिवशी मांजर तिच्या आडवे जाईल अश्या प्रकारे घराच्या बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, ठरवल्याप्रमाणे अगदी तसेच झाले, तिचं पाऊल पुढं पडणार इतक्यात मांजर आडवे गेले....बाप रे! आई ग ...आई ग...हे काय ग झालं...अपशकुन ....आई आता मी नापास होणार ग ....असं गिरीजा म्हणू लागली...तिच्या आईच्या तोंडचं पाणीच पळालं... पण पेपर होता म्हणल्यावर बुडवता कसा येईल असं म्हणत तिने गिरीजाला काही नाही होणार जा तू बोलली...पण मनामध्ये ती घाबरलेली होती...कसाबसा गिरीजाला तिने दाखवण्यापूरता का होईना धीर दिला ..बघ बाई आई आता काय होईल देवजाणे असं म्हणत गिरीजा निघून गेली.. व आई दुसऱ्या च क्षणी देवाचा धावा करू लागली...माझ्या पोरीवरच संकट टळू दे .. देवा अरे तिला पेपर चांगला जाऊ दे असं ती म्हणत होती.....

गिरीजा एक अभ्यासू मुलगी असल्याने तिला पेपर सोपाच जाणार होता व तो तसाच गेला....

घरी आल्या आल्या आईला तिने सांगितले आई हे बघ मला मांजर आडवं गेलं तरीही मी सुखरूप पेपर मस्त लिहून घरी आले कीनी!! आणि आई, नापास मी केव्हा होईन ज्यावेळेस मी अभ्यास केलेला नसेन ...आई तुला तर माहितेय मी किती अभ्यास करते, मग असं कसं होईल आई...असं म्हणत तिने आई ला मिठी मारली...

आई तुला अंधश्रद्धेतुन सोडवण्यासाठी हा plan मीच केला होता.....आई अग मांजर जर इतकं वाईट काम करू शकलं असत ना तर कदाचित आज कोणाच्याच घरी मांजर हा प्रकार पहायला मिळाला नसता... काम होईल की नाही हे मांजर नाही तर आपले प्रयत्न ठरवतात....😊😊असं म्हणून गिरीजाने आईचा गैरसमज दूर केला...


Rate this content
Log in